Skip to main content

स्ट्फ्ड मटार पराठे

लेखक सानिकास्वप्निल यांनी सोमवार, 03/03/2014 16:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः नेहमीप्रमाणे पोळ्यांचे/ चपात्यांचे कणिक जसे तेल, मीठ घालून भिजवून घेतो तसे भिजवून घेणे. १ वाटी मटाराचे दाणे उकडून घेणे व मिक्सरला पाणी न घालता भरडसर वाटणे (मी फ्रोझन मटार वापरले आहेत) १-१/२ टेस्पून आले + लसूण + हि.मिरची पेस्ट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं करु शकता) १/४ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून गरम-मसाला १/२ टीस्पून अनारदाना पावडर (आमचूर पावडर ही वापरू शकता) १/२ टीस्पून जीरेपूड मीठ चवीप्रमाणे १-२ टेस्पून बेसन बारीक चिरलेली कोथींबीर . पाकृ: पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करुन त्यात आले + लसूण + हि.मिरची पेस्ट परतवून घेणे. त्यात भरडसर वाटलेले मटार घालून परतणे. त्यात मीठ व सर्व मसाले घालून थोडे कोरडे होईपर्यंत परतणे. त्यात बेसन घालून , ते शिजेपर्यंत परतणे. (बेसनामुळे सारण खमंग होतं व पराठा लाटताना फाटत नाही) वरुन थोडी कोथींबीर घालावी व मिश्रण गार होऊ द्यावे. . कणकेचा लिंबापेक्षा जरा मोठा गोळा घेऊन, छोटी पोळी लाटून घ्या. त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा. पराठा जरा जाडसरच लाटावा. नॉन-स्टीक तव्यावर पराठा तूप किंवा बटर लावून दोन्ही बाजूंनी शेकून घ्यावा. लाकडी उलथण्याने हलके दाबून सगळीकडून नीट शेकावे. . गरमा-गरम मटारचे पराठी बुंदी रायत्याबरोबर सर्व्ह करावे. आवडत असल्यास टोमॅटो सॉस, चटणी - लोणच्याबरोबरही सर्व्ह करु शकता. .

वाचने 12682
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

झक्कास्स...हा प्रकार मला जाम आवडतो... मस्त मिरचीचे लोणचे व चाट-मसाला मिसळलेले दही सोबत एकदम जबरा लागते... आता बायकोकडे थोडा हट्ट (म्हणजे विनंती ;) ) करावा लागणार बहुदा.

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ....... काल खालेल्या पराठ्यांची अठवण जागी झाली. :)

सानिका, तुझे नाव वाचुन माझ्या लेकाने पा. कृ. माझ्याआधी वाचली! रात्रीसाठी मटार पराठेच करावे लागणार!

नेहमीप्रमाणेच असं म्हणता म्हणता थबकलो.... शेवटच्या फोटोतला पराठा आवडला नाही. पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय. :(

In reply to by प्यारे१

>>पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय. ओ काका, तूप/तेल जरा उजव्या हाताने लावलं की असं दिसतं ते.

In reply to by रेवती

तुमच्यासाठी शिल्लक राहीला पाहिजे ना! ;) फोटो आवडला नाही म्हणून खाणार नाही असं थोडीच्चे? :)

In reply to by सूड

प्यारे काकांना उगाच चुका काढायच्या असतात. पराठ्याला तेल/ तूप लावले, फोटो काढेपर्यंत ते पराठ्यात जिरले म्हणून तसे दिसत आहे.
पूर्ण भाजला गेला नाही असं वाटतंय
असं तुम्हाला उगाचचं वाटतंय.

In reply to by सानिकास्वप्निल

तो दुसर्‍या कोणी खावू नये यासाठी ती आयडियाची कल्पना असावी ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हल्लीच्या पोरांची घाई हो एक्का शेठ, घाई! दुसरं काही नाही. ;) पोळी मस्त भाजली गेल्यावर फुलली की मग त्यावर हळूच तेला/तुपाची धार सोडावी, ती धार पोळीच्या फुगवट्यावरुन मस्त घरंगळत यावी नि मस्तपैकी गरम गरम ताटात पडावी.... आहाहा! करुन बघा सानिका/सूड. बरं सांगितलं की असं चुका काढतो म्हणतात बघा! :-/

मस्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त्त!

झक्कास. (आयला, रोज रोज नविन शब्द आणायचे तरी कुठून?)

काय सुंदर सादरिकरण आहे. डोंबिवलीत फडके रोड ला "शमी गृह उद्योग " नावाचे एक दुकान आहे तेथे "खर्डा" नावाचा एक प्रकार मिळतो लालभडक, असल्या खंग्री पराठ्या सोबत असा खर्डा हवाच

त्यात मटारचे सारण भरुन सर्वं बाजूंनी बंद करून, कोरडे पीठ लावून हलक्या हाताने गोल पराठा लाटावा.
ही क्रिटिकल ष्टेप करायला लय तपश्चर्या लागते. माझे पराठे सारण उतू गेल्याने सनी लियॉनसारखे तरी दिसतात, किंवा कणीक जास्त झाल्यामुळे अलका कुबलसारखे तरी दिसतात. सीरियसली - ही ष्टेप बरोब्बर जमण्यासाठी सुग्रणीचा सल्ला मिळेल का सानिकातै?

In reply to by आदूबाळ

१. सारणात बेसन घातल्यामुळे सारण कोरडे झाले त्यामुळे पराठा लाटताना फाटत नाही, करुन बघा जमेल :) किंवा २. सारण भरलेल्या कणकेच्या गोळ्याला हातानेच हलके दाबून पसरवणे व कोरडे पीठ लावून हलके लाटले की सारण बाहेर येत नाही. किंवा ३. २ लाट्या घेऊन पात़ळ लाटावे. एका पोळीत सारण भरून, हलके पसरवणे व त्यावर दुसरी पोळी ठेवून, कडा दाबून बंद कराव्यात. हलक्या हाताने पराठा लाटून घ्यावा.

हिरवे हिरवेगार गालिचे ..... ही कविता आठवली फोटो बघुन :) मस्त !!!