मिपाच्या पाककृती विभागात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रांतातील पाककृती नेहमीच सादर होत असतात. असाच एक विदर्भात केला जाणारा पदार्थ म्हणजे गोळा भात. विशेषतः वर्धा-नागपूर या बाजूला केला जाणारा. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा सगळे नातलग एकत्र येतात तेव्हा गोळा भात हमखास केला जातो. आज खास मिपाकर खवय्यांसाठी ही पाकृ.
साहित्य:
१ वाटी हरभरा डाळ (चणा डाळ)
१ वाटी तूर डाळ
१ चमचा हळद
२ चमचे लाल तिखट
१ चमचा धणेपूड
१ चमचा जिरेपूड
४-६ कढीपत्त्याची पाने
१ चमचा साखर
कोथिंबीर
मीठ चवीनुसार
२ वाट्या तांदूळ भातासाठी
फोडणीसाठी:
१ वाटी तेल
२ चमचे मोहरी
३-४ लसूण पाकळ्या (आवडत असल्यास)
३-४ सुक्या लाल मिरच्या
अर्थातच आवडीनुसार लसूण आणि मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
कृती:
तूर डाळ आणि हरभरा डाळ ६-८ तास भिजवून ठेवावी. नंतर त्यातील पाणी पूर्णपणे निथळून दोन्ही डाळी पाणी न घालता मिक्सर मधून भरडसर वाटून घ्याव्या. या वाटलेल्या मिश्रणात हळद, तिखट, मीठ, धणेपूड, जिरेपूड, किंचित साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्त्याची पाने सगळे एकत्र करावे.
या मिश्रणाचे छोटे गोळे करावे. या साहित्यात १४-१६ गोळे होतात.
हे गोळे ढोकळा वाफवतो तसे वाफवून घ्यावे. वाफवण्यासाठी इडली पात्र, स्टीमर किंवा कुकरला शिट्टी न लावता अशा कुठल्याही प्रकारे वाफवले तरी चालतात. साधारण १०-१२ मिनिटे वाफवण्यासाठी पुरेसे आहेत. मायक्रोवेव्हचे इडली पात्र असेल तर त्यातही वाफवू शकता. मायक्रोवेव्ह मध्ये ४-५ मिनिटे लागतात.
बासमती शिवाय कुठल्याही तांदळाचा मोकळा भात शिजवून घ्यावा.
तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्या आणि लसूण घालून फोडणी करावी.
आता भात, त्यावर हे गोळे कुस्करून आणि त्यावर फोडणी घालावी. गोळा भात तयार आहे.
सोबत ताजे लोणचे असेल तर अधिकच रंगत येते. यासोबत नेहमी ताक अथवा मठ्ठा केला जातो. आज मी सोलकढी केली होती. हे कॉम्बिनेशन पण चांगले लागत होते.
वाचने
21947
प्रतिक्रिया
33
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा! मस्तच दिसतोय गोळाभात.
यप्प.. मस्तच एकदम. माझी आजी
खल्लास पाकृ आणि फोटू. एक शंका
धन्स गं. तू म्हणतेस ते बरोबर
In reply to खल्लास पाकृ आणि फोटू. एक शंका by रेवती
ओके.
In reply to धन्स गं. तू म्हणतेस ते बरोबर by मधुरा देशपांडे
झक्कास .
नविनच अन मस्ताड पाकृ.
वाह
सुरेख फोटो आणि पा. कृ.!
मी भात शिजत असताना (हाफ) गोळे
मधुरा,
वडा भात
वडा भात करताना तळलेले वडे
In reply to वडा भात by रमेश आठवले
आवडली पाककृती
रामदास काका, कंसाशी सहमत.
In reply to आवडली पाककृती by रामदास
विदर्भ वेगळा नाहीच आहे......
In reply to रामदास काका, कंसाशी सहमत. by मधुरा देशपांडे
पहिल्यांदाच पाहिला हा प्रकार
मस्त !!
मस्त रेसेपी.. आणि सोप्पी
सुंदर
कोरडं कोरडं नाही का लागत हे
अजिबात नाही....
In reply to कोरडं कोरडं नाही का लागत हे by सूड
नाही. कोरडे होत नाही.
In reply to कोरडं कोरडं नाही का लागत हे by सूड
वडा-भात
सानिका, जेवढे केले त्यासाठी
In reply to वडा-भात by सानिकास्वप्निल
हा येडा प्रकार आहे......
आभार
उत्तम पाकृ आणि सादरीकरण...
वेगळीच पाकृ.
जुन्या आठवणी ताज्या झाल्या
मस्त प्रकार!
मस्तच ...
पाकृ आवडली!