Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by साळसकर on Fri, 02/28/2014 - 00:03
आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड? ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.." हा मला दुसरा धक्का .. ! एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्‍याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी? शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्‍यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्‍यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअ‍ॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही.. नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.." तर कसले काय, आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !
  • Log in or register to post comments
  • 14412 views

प्रतिक्रिया

Submitted by साळसकर on Sun, 03/02/2014 - 23:00

In reply to लग्न झाल्यावर त्याला मी by मृगजळाचे बांधकाम

Permalink

आता काय बोला, चांगलेच आहे,

आता काय बोला, चांगलेच आहे, माझा तरी कुठे विश्वास आहे यावर..
  • Log in or register to post comments

Submitted by मृगजळाचे बांधकाम on Sun, 03/02/2014 - 23:12

Permalink

बडे मजाकी हो

बडे मजाकी हो
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 03/06/2014 - 14:26

Permalink

पत्रिका बदलून जीवन सुखी

पत्रिका बदलून जीवन सुखी झालेली उदा. तर माझ्याही पाहण्यात आलेली आहेत. असे फशीवगंडीव करता येत असेल तर त्या ज्योतिषाची सुरळी करून त्याला धुरी द्यायला हर्कत नसावी!
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on गुरुवार, 03/06/2014 - 14:46

In reply to पत्रिका बदलून जीवन सुखी by बॅटमॅन

Permalink

इथं ज्योतिषाची सुरळी, वर

इथं ज्योतिषाची सुरळी, वर मंगळाची सुरळी... त्यावरुन आठवलं 'सुरळीच्या वड्या' खाल्ल्या नाहीत बर्‍याच दिवसात! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 03/06/2014 - 14:52

Permalink

काही लिंक्स

हे काय प्रकरण आहे म्हणून शोधले तर जुन्या ज्योतिषांमधे 'मंगळदोष' असले काही प्रकरण मानत नव्हतेच असे वाचायला मिळाले. हे नंतरच्या लोकांनी काहीतरी पूजा बिजा करून दक्षिणा मिळवण्यासाठी काढलेले प्रकरण दिसते आहे. अशाच आणखीही काही लिंक्स उपलब्ध आहेत. त्यात आणखीही बर्‍याच गोष्टी असतील तर मंगळाचा दोष असे म्हटले आहे. http://simpleastroguide.blogspot.in/2013/03/manglik-dosha-patrika-matching.html http://bhagyalikhit-jyotish.blogspot.in/2012/04/blog-post_20.html मंगळदोष वगैरे असल्या समजुती कोण पसरवतो त्यांना शोधून पोकळ बांबूचे फटके द्यायला पाहिजेत!
  • Log in or register to post comments

Submitted by कंजूस on Fri, 03/07/2014 - 15:26

Permalink

कोणी पसरवत नाही .

कोणी पसरवत नाही . त्या मंगळ असलेल्या वधुवरांच्या याद्या सूचक मंडळांत वेगळ्या ठेवलेल्या असतात ."Handle with Care".
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com