आज पत्रिका आली एका मंगळ कार्याची. एका मित्राच्या लग्नाची. म्हटलं तर माझा मित्र, म्हटलं तर माझ्या वडीलांचा मित्र. माझ्यापेक्षा बारा वर्षे मोठा तर माझ्या वडीलांपेक्षा बारा वर्षे लहान. जुन्या वाडीतला जुना मित्र. आतासे राहायला आणखी कुणीकडे. लग्न त्याचे आजवर झाले नव्हते हे पत्रिका बघूनच समजले. अन नाही म्हटले तरी धक्काच बसला. अजून झाले नव्हते की एक मोडून हे दुसरे? पहिले कोणाशी झाले, कधी झाले, का मोडले? कि झालेच नाही ! पण मग एवढे उशीरा का? भावांची लग्ने झाली असे कानावर होते. एकाचे सहकुटुंब फोटोही फेसबूकावर बघून झाले होते. मग तीनही भावांत देखणा हा, याचेच कसे राहिले? अवाजवी अपेक्षा? कि आजकाल काय ते म्हणतात ते करीअर ओरीएंटेड?
ईतक्यात आईच म्हणाली, "बरे झाले, जमले एकदाचे. मंगळ असल्याने राहिले होते.."
हा मला दुसरा धक्का .. !
एखादे तिसरेच कारण ऐकायला आवडले असते, पण हे कारण ! अजूनही आपण नक्की कोणत्या जमान्यात जगतोय. एखादी गोष्ट चांगली व्हावी यासाठी चांगला मुहुर्त बघणे (आता हि श्रद्धा असो वा अंधश्रद्धा) हे समजू शकतो. शेवटी करणार्याची नियत चांगलीच असते तर का उगाच वाद घाला. मात्र एखाद्या अंधश्रद्धेपोटी एखाद्याला लग्नापासून वंचित ठेवणे? हे कितपत पटते? लोकांना मुलं होत नाहीत तेव्हा किती हवालदिल होतात, उपासतापास, नवसप्रार्थना, औषधोपचार, आणि एवढेही करून न भागल्यास दत्तक घेण्याची तयारी. पण इथे तर एखाद्याला ती संधीच नाकारली जातेय. मूल तर दूरची गोष्ट पण आयुष्याच्या जोडीदारापासून वंचित ठेवले जातेय. ते देखील एका कपोकल्पित कारणासाठी?
शप्पथ वाईट वाटले एका तरुणासाठी.. स्मार्ट बंदा, एकेकाळी मैत्रीणीही बर्यापैकी राखून होता. पुढे जाऊन मुली फिरवण्याबाबत याचाच आदर्श ठेवावा असेही कैकदा त्या किशोरवयात मनात आले होते. पण हा गडी स्वता मात्र लग्नाच्या बाजारात मागे पडला. जरी मधल्या काळातली त्याची काही खबर नसली तरी नक्कीच कुठेतरी त्याने जमवले असणार हा त्याच्या इमेजला पाहता विश्वास पण त्या मुलीच्या घरून याच कारणास्तव नकार पचवावा लागला असणार. मग पुढे स्वतालाच लग्न करायची इच्छा राहिली नसणार. ज्या मुलीवर प्रेम होते तीच अश्या कारणामुळे मागे हटली तर ठरवून लग्न करणार्यात काय कोण भेटणार आणि भेटलीच तर कशी भेटणार या विचारांनीच आत्मविश्वास डळमळीत झाला असणार. काय रिअॅक्ट झाला असेल तो या सर्व परिस्थितीवर? आपलेच दुर्दैव म्हणून नशीबाला दोष देत बसला असेल की बंड करून उठावेसे वाटले असेल? आजूबाजुच्या मित्रांची, स्वताच्या भावंडांची लग्ने होताना काय वाटले असेल त्याला? च्यायला, मी त्याच्या जागी असतो तर मी काय केले असते अश्या परिस्थितीत? लोकांच्या नाकावर टिच्चून लग्न करण्यासाठी समोरून एखादी मुलगी तरी तयार व्हायला हवी. त्याचे लग्न आज एवढ्या उशीरा होत होते याचा अर्थ ती अशी सहजासहजी मिळत नाही, त्याला तरी मिळाली नाही..
नुसते विचार ओसंडून वाहू लागले माझ्या चार बाय चार च्या डोक्यात. पण हे माझ्या घरच्यांसमोर बोलण्यात काही अर्थ नव्हता हे जाणून मी मुद्दामच म्हणालो, "चला फायनली एक मुलगी, एक घर तरी त्याला असे मिळाले ज्यांचा या भाकड गोष्टींवर विश्वास नाही.."
तर कसले काय,
आई म्हणाली, "हं, मुलीला पण मंगळ असेल ..... " माझी बोलती बंद !
वाचने
14452
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
कडक..!
पाहिलंत ना..
In reply to कडक..! by आत्मशून्य
नक्किच कडक मंगळ होता.
In reply to पाहिलंत ना.. by उपास
काय बोल्लात..
In reply to नक्किच कडक मंगळ होता. by आत्मशून्य
खरंय !
In reply to कडक..! by आत्मशून्य
पुलंच्या लेखनात कुठेतरी
In reply to खरंय ! by साळसकर
आपली अंधश्रद्धाफारच अंध आहे हो!
कोणाला प्रश्न आहे ?
In reply to आपली अंधश्रद्धाफारच अंध आहे हो! by आयुर्हित
प्रश्न आहे साळसकर साहेबांना!
In reply to कोणाला प्रश्न आहे ? by आत्मशून्य
मंगळ वगैरे असणे वा तो "अशुभ" वगैरे मानणे
In reply to आपली अंधश्रद्धाफारच अंध आहे हो! by आयुर्हित
सर्वात आधी पुर्ण माहिती घ्या
In reply to मंगळ वगैरे असणे वा तो "अशुभ" वगैरे मानणे by बाळकराम
आहे ना अभ्यास मंगळाचा..
In reply to आपली अंधश्रद्धाफारच अंध आहे हो! by आयुर्हित
यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास आवश्यक आहे.
In reply to आहे ना अभ्यास मंगळाचा.. by साळसकर
वरील प्रतिसाद नवीन धाग्यात रुपांतरीत केला आहे
In reply to यासाठी संपूर्ण कुंडलीचा अभ्यास आवश्यक आहे. by आयुर्हित
देव जाणे ब्वा!
हि आयडिया चांगली आहे. माझे पण
In reply to देव जाणे ब्वा! by स्पंदना
ज्यांनी पत्रिकाच बनवली नसते
In reply to देव जाणे ब्वा! by स्पंदना
साळसकर साहेब त्या बैलाच्या
ओह, आपल्या लक्षात आहे ती
In reply to साळसकर साहेब त्या बैलाच्या by जेपी
पत्रिकेतला मंगळ असणे
साहेब,
In reply to पत्रिकेतला मंगळ असणे by कंजूस
आर्मी नेव्हीतली स्थळे नको
पैसे देऊन पत्रिका मॅनेज
खरेच सोप्पय की, पण या आधी असे
In reply to पैसे देऊन पत्रिका मॅनेज by शिद
मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२
ढोबळेपणाने होत असाव.
In reply to मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ by कवितानागेश
नाही हो, काहीतरी गणित चुकत
In reply to मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ by कवितानागेश
शपथेवर सांगते वाटलं तर. अस्सच
In reply to नाही हो, काहीतरी गणित चुकत by साळसकर
असं नसावं मौतै. बारा घरात
In reply to मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ by कवितानागेश
१२ राशींमध्ये ३६० अंश
In reply to असं नसावं मौतै. बारा घरात by आदूबाळ
कडक मंगळ
In reply to १२ राशींमध्ये ३६० अंश by कवितानागेश
पण तेदेखिल १२ मध्ये ५ सापडतील
In reply to कडक मंगळ by साळसकर
>>> मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८
In reply to मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८,१२ by कवितानागेश
वाऑ!
In reply to >>> मूळ जन्मपत्रिकेत १,४,७,८ by श्रीगुरुजी
मंगळ असलेल्या व्यक्तीशी मंगळ
अगं मौ, पण एक मंगळधारक दुसर्
हे मात्र भारी.
In reply to अगं मौ, पण एक मंगळधारक दुसर् by रेवती
"मंगळ विवाह मंडळाची" आयडिया
In reply to अगं मौ, पण एक मंगळधारक दुसर् by रेवती
आता तुम्ही एवढं सुचवताय आणि
In reply to "मंगळ विवाह मंडळाची" आयडिया by डॉ सुहास म्हात्रे
१००% सहमत
In reply to आता तुम्ही एवढं सुचवताय आणि by रेवती
बघा तुमीच योग्य व्यक्ती आहात
In reply to आता तुम्ही एवढं सुचवताय आणि by रेवती
त्या मंगळाची एक सुरळी करून
हुश्य थकलो बुवा सारख सारख
प्रबोधन करण्याचा उत्तम प्रयत्न
In reply to हुश्य थकलो बुवा सारख सारख by प्रकाश घाटपांडे
अवघडे!
मोठ्ठा गहन प्रश्न आहे हा!
In reply to अवघडे! by पैसा
मोठ्ठा गहन प्रश्न आहे हा!
In reply to अवघडे! by पैसा
आमच्या घरासमोर संजय कुलकर्णी
हि खरीकथा आहे की परीकथा आहे?
In reply to आमच्या घरासमोर संजय कुलकर्णी by मृगजळाचे बांधकाम
लग्न झाल्यावर त्याला मी
आता काय बोला, चांगलेच आहे,
In reply to लग्न झाल्यावर त्याला मी by मृगजळाचे बांधकाम
बडे मजाकी हो
पत्रिका बदलून जीवन सुखी
इथं ज्योतिषाची सुरळी, वर
In reply to पत्रिका बदलून जीवन सुखी by बॅटमॅन
काही लिंक्स
कोणी पसरवत नाही .