Skip to main content

दोभोळकर कुटुंबीयांनी समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यासारखा सरकारी पुरस्कार नाकारावा का ?

लेखक psajid यांनी बुधवार, 29/01/2014 11:12 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना सरकारने 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला. या निमित्त माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तुमच्याशी व्यक्त करावे म्हणतो १) डॉक्टरांच्या खुनाला आज जवळ जवळ पाच महिने होत आलेत तरीही पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि म्हणून सरकारने हे अपयश झाकण्यासाठी, आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आम्ही (सरकार) सुधारणावाद्यांच्या बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली का ? २) कोणत्याही समाज सुधारकाचे कार्य हे त्याच्या मृत्युनंतरच लोकांसमोर यावे का ? ३) सरकारच्या धोरणाविरुध्द थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण हा पुरस्कार जसा परत केला. तसाच डॉक्टरांना मिळालेला 'पद्मश्री' हा पुरस्कार सरकारचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांनी परत करावा का ? ४) आजकाल हे देशातील सर्वोच्च पुरस्कार कुणालाही (वरिष्ठ पातळी वरील शिफारसीमुळे) मिळतात का ? या प्रश्नावरती मला निखळ चर्चा अपेक्षित आहे.

वाचने 4649
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

हो नाकारावा अजुन पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत जन्तेने हा प्रश्न उच्लून धरवा.

१) डॉक्टरांच्या खुनाला आज जवळ जवळ पाच महिने होत आलेत तरीही पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि म्हणून सरकारने हे अपयश झाकण्यासाठी, आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आम्ही (सरकार) सुधारणावाद्यांच्या बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली का ? >>>>शक्यता नाकारता येत नाही ! २) कोणत्याही समाज सुधारकाचे कार्य हे त्याच्या मृत्युनंतरच लोकांसमोर यावे का ? >>>>असे का ? अगोदर ही यावे की! त्यासाठी कोणाची हरकत नसावी . ३) सरकारच्या धोरणाविरुध्द थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण हा पुरस्कार जसा परत केला. तसाच डॉक्टरांना मिळालेला 'पद्मश्री' हा पुरस्कार सरकारचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांनी परत करावा का ? >>>>करावा की!पण त्यामुळे मारेकरी पकडले जाण्याची गॅरंटी आहे काय ? की नुस्ताच णिषेद ? सरकार तुमच्या निषेधाला हिंग लावून देखील विचारत नाही !!! ४) आजकाल हे देशातील सर्वोच्च पुरस्कार कुणालाही (वरिष्ठ पातळी वरील शिफारसीमुळे) मिळतात का ? >>>आज पण उद्या पण आणि काल पण . जसे लोक आहेत तसे सरकार आहे, लोक बदललेत का ? तेव्हा सरकार बदलेल.

ज्याप्रमाणे पु.लं.नी पुरस्कार स्विकारतानाच सरकारला खडे बोल सुनवले त्याप्रमाणे दाभोळकरांच्या वंशजांनी करावे. दाभोळकरांचे खुनी अद्याप पकडले गेले नाहित हे दुर्दैवी सत्य आहे. पण पोलीस त्यांच्यापरिने तपास करत असावेत. कधि कधि इन्व्हेस्टीगेशन खरच खुप कठीण असतं. सरकारचा त्याला इलाज नाहि. पण त्यापासुन जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधायला म्हणुन हा पुरस्कार दिला नसावा. दाभोळकर केस जनतेच्या स्मरणातुन पुसट व्हायला लागली आहे. त्याला आणखी हवा द्यायचं काम सरकार करणार नाहि. समाजसुधारकांच्या कार्याला मनोरंजन मुल्य नसतं. पब्लीक डर्टी पिक्चरच्या मागे असते नेहेमी. एन्टर्टेन्मेण्ट...एन्टर्टेन्मेण्ट...एन्टर्टेन्मेण्ट... त्यामुळे एका विशिष्ट परिघाबाहेर समाजसुधारकांना रेग्नीशन मिळत नाहि. सर्वोच्च पुरस्कारांची यादी वाचली तर काहि नावे खचितच आक्षेप घेण्याजोगे वाटतील. त्यामुळे सरकारी प्रभाव फॅक्टर नाकारता येत नाहि.

>>दोभोळकर कुटुंबीयांनी समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यासारखा सरकारी पुरस्कार नाकारावा का ? तो सर्वस्वी त्यांच्या कुटुंबियांचा निर्णय असेल. आपण काथ्याकूट करत बसण्यात काय अर्थ आहे?

In reply to by सूड

+३ सहमत. पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी सरकार संबंधित व्यक्तीची/कुटुंबियांची संमती घेते - हे जगजाहीर आहे. बाकी ज्यांचं नावही आपल्याला नीट माहिती नाही, त्यांनी काय करावं यावर आपण लोकांनी इथं चर्चा करण्यात काय अर्थ असेल या विचारांत पडले (अगदी पडलेच!!) आहे!

In reply to by आतिवास

बाकी ज्यांचं नावही आपल्याला नीट माहिती नाही, त्यांनी काय करावं यावर आपण लोकांनी इथं चर्चा करण्यात काय अर्थ असेल या विचारांत पडले (अगदी पडलेच!!) आहे!
सहमत.

In reply to by सांजसंध्या

:D

श्रध्देने देतायत का माहित नाही पण केला जातोय एक सोपस्कार दाभोळकर सरांना दिला जातोय मरणोत्तर पद्म पुरस्कार विरोधाला विरोध कराताना निर्णय होतात अन्य जिवंतपणी लोकांची मग किंमत ठरते शून्य अमोल केळकर

पुरस्कार हा काही अमुक एक सरकारकडून/पक्षाकडून वगैरे असं बघणेच चुकीचं आहे .त्यांच्या खिशातून थोडीच देत आहेत . आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींकडून मिळतोय पुरस्कार तो घेणे . पुरस्कार मिळाल्यावर तो किती मिरवायचा अथवा त्याच्या वजनाने नम्र व्हायचं यात फरक मात्र पडतो .

:D

दाभोकर हत्येचा तपास व दाभोलकरांना दिलेला मरणोत्तर पद्म पुरस्कार या बाबी वेगळ्या कराव्यात. पुरस्कार हा त्यांच्या आयुष्य झोकून देउन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल आहे. त्यांच्या प्रती व्यक्त केलेल्या आदराचे प्रतिक आहे. तो जरुर स्वीकारावा. दाभोलकर कुटुंबीय तो स्वीकारणार आहेत.

In reply to by प्रकाश घाटपांडे

पुरस्कार हा त्यांच्या आयुष्य झोकून देउन केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याबद्दल आहे. त्यांच्या प्रती व्यक्त केलेल्या आदराचे प्रतिक आहे. तो जरुर स्वीकारावा. दाभोलकर कुटुंबीय तो स्वीकारणार आहेत.
पुरस्कार हा राज्यातील अखिल जनतेच्या वतीने दिला जातो. ती काही सरकारची किंवा सरकार चालवणार्‍या राजकीय पक्षांची मिरास नाही.... सबब, पुरस्कार जरूर स्वीकारावा!!!! लॉन्ग लिव्ह डॉ. दाभोळकर!!!!