वांग्याची भाजी
साहित्यः
४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ
कृती:
१) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.)
२) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा.
३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या.
४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या.
५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या. पॅनवर झाकण ठेवू नका.
६) भाजी शिजत आली की त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, उसळ मसाला घालून भाजी चांगली परतून घ्या. भाजी नीट शिजली की गॅस बंद करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त वांग्याची भाजी तयार.


वाचने
10510
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
मस्त
तेल?
In reply to तेल? by साती
:)
In reply to :) by Pearl
नाही, ५ वांगी अन एक बटाटा, १
कान्ट रेझिस्ट
In reply to कान्ट रेझिस्ट by वेल्लाभट
यप्प... अगदी ह्येच बोलतो
मस्त
आतिशय दुर्मिळ रेसिपी
छान दिसतीये भाजी.
साधी सरळ
मस्त आणि चटपटीत..
वांग्याबटाट्याच्या काचय्रा..
(त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.
ज्युलियन्स म्हणजे?
In reply to ज्युलियन्स म्हणजे? by आयुर्हित
बरोबर
करून बघेन ...वांगी खूप आवडतात
वेगळा प्रकार, करून बघायला हवा