Skip to main content

वांग्याची भाजी

लेखक Pearl यांनी बुधवार, 26/02/2014 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः ४ वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ कृती: १) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.) २) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) ४-५ टबलस्पून तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. ३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या. ४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या. ५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या. पॅनवर झाकण ठेवू नका. ६) भाजी शिजत आली की त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, उसळ मसाला घालून भाजी चांगली परतून घ्या. भाजी नीट शिजली की गॅस बंद करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त वांग्याची भाजी तयार. abv

वाचने 10530
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

झक्कास.... आमची फेवरीट भाजी म्हणजे, वांग्याची भाजी......

चार वांग्यांना चार पाच टेबलस्पून तेल? वांग्याचे काप पोहतील एवढ्या तेलात!

In reply to by साती

बरोबर आहे तुमचं. तेल जास्त होईल. वरील रेसिपीमध्ये ४-५ टीस्पून किंवा आपापल्या अंदाजानुसार तेल घालावे.

In reply to by Pearl

नाही, ५ वांगी अन एक बटाटा, १ कांदा म्हणजे एवढं तेल हवंच. या भाजीला रस नसल्याने तेलाशिवाय वांबी शिजणार नाहीत.

ज्युलियन्स म्हणजे बारीक फोडी/काप (जसे फ्रेंच फ्राईज मध्ये असतात तसे)म्हणायचे असेल त्यांना. पण माझ्या मते ज्युलियन्स म्हणजे अगदी बारीक काप अगदी केसर असतो तसे.(हे आल्याचे करतात हे ऐकले आहे)

In reply to by आयुर्हित

ज्युलियन्स म्हणजे पातळ उभे काप, चायनीज पदार्थ बनवण्यासाठी जसे गाजर, कोबी, भोपळी मिरची, आले पातळ उभे चिरतात त्यांना ज्युलियन्स म्हणतात.