फँड्री... पड्द्याबाहेरचा !
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
चांगला चित्रपट हा नेहमी चित्रपटगृहातच पहावा असे माझे आतापर्यंतचे ठाम मत होते. मात्र आता ते बदलावेसे लागणार बहुधा. चित्रपट सिंगल स्क्रीनवरुन मल्टीप्लेक्समधे आलेत, चलतचित्रांचा दर्जा सुधारलाय, ऑडीयो सिस्टीम देखील उत्तम. भिकार ते दर्जेदार असे सगळ्या प्रकारचे चित्रपट बनतायत आणि पिटातलं पब्लीक हाय फाय बनून मॉलमधे २००-२५० रु. चे तिकीट वट्टात फाडतयं.
मात्र "भगवान जब अकल बाँट रहा था तब बहोत सारे लोग घास चरने गये थे" अस वाटतयं. एखादा चांगला चित्रपट बघण्यासाठी जावं, त्यात मनानं गुंगुन जावं आणि मधेच कोणीतरी मोठ्यानं बोलतयं, कोणीतरी नको त्या प्रसंगावर दात काढतयं, कुणाला मधेच कसलेतरी प्रश्न पडतात आणि त्याच उत्तर त्याला अब्बी के अब्बी हवं असतं.
‘फँड्री’ चित्रपट पाहतांना अगदी हेच अनुभव आले आणि आता यापुढे चित्रपटगृहात जाऊन चांगले चित्रपट पहावेत काय ? अशा प्रश्न पडला.
मुळातच संवेदनाशील चित्रपट पाहण्याइतकं भारतीय प्रेक्षकाचं वय वाढलयं का ?
एका प्रसंगात जब्ब्याचा बाप त्याच्या कानफाटात लगावतो तेव्हा बरेच नग खो खो हसत होते.
अरे एखादा माणूस मार खाताना तुम्ही हसुच कसे शकता ?
हाच प्रसंग कोणी पडले तरी हमखास घडतो. अरे ती व्यक्ती पडलीय, त्याला लागलं असेल ह्याचा विचार न करता माणसं पहिली हसून घेतात. ह्यामुळे माणूस पडल्यावर काय करतो माहितीय ? आपल्याला कुठे लागलयं का हे न बघता आपल्याला पडतांना कुणी बघीतलं तर नाही ना याची खात्री करतो.
एका बाईंना ‘फँड्री’ चा अर्थ काय ? याचे उत्तर तिच्या नवर्याकडून चित्रपट सुरु झाल्या झाल्या हव होतं.
अग बाई, चित्रपट संपेपर्यंत तरी थांबायचस ना ? किंवा घरुन गृहपाठ करुन यायचास ना ?
एका साहेबांना फोन आला होता आणि ते चित्रपट सोडून फोनवर बोलण्यात मग्न होते. बरं बोलण्यावरुन लगेचच कुणाची तिरडी उचलायला जायची होती अशी काही इमर्जन्सी जाणवत नव्हती. त्यांच्याच बरोबरचा मुलगा त्यांना फोन ठेवा म्हणुन सांगत होता पण हे महाशय मात्र ऐकायला तयार नव्हते. पण प्रत्येक दहा सेकंदाने ठेवू का ? ठेवू का ? असे विचारत होते.
कॉलेजकुमारांची तर आणखीनच वेगळी गोष्ट. घोळक्यातल्या कुणा ना कुणाला पोरींवर भाव मारण्याची इतकी काही घाई लागली असते की त्यांची सतत काही ना काही रनिंग कॉमेंट्री चालू असते.
खरचं आपण भारतीयांना एटीकेट्स कळत नाहित काय ? कुठे कसे वागावे याचे भान नसावे काय ?
कधी बरे सुधारणार आपण ?
तीर्थयात्रा, पुस्तक वाचन आणी चित्रपट बघणे ही एकट्याने अनुभवायची आहे हेच खरं.
प्रतिक्रिया
ह्याच त्रासामुळे मी चित्रपटग्रुहात जाणे सोडले.
मुद्याशी सहमत पण...
बाई बाई!! टाईमपास!
आपले...
अगदी मान्य.. वैताग येतो अशा
+१
सहमत
हम्म जो गुन्ग्वुन ठेवत नाही तो चित्रपट न्हवे
लोक चित्रपट पहायला मनोरंजन हाच हेतु ठेवुन
अॅटीट्युड आवडला.
पण पहिला ती कलाकृती कसल्या
मला वाटंलं की तुम्ही विचारताय
....
सेम
नाही हो!
इट डिपेंड्स, इतकेच नम्रपणे
खरच अगदी असाच अनुभव मला हाच
मलाही असाच गलिच्छ अनुभव आला.
हा अनुभव नेहमीच आला आहे ,
भारतीयांना मेंदू अॅलॉटच होत
सहमत.
मिल्टीप्लेक्स नविनच आले होते
ह्म्म...
सिक्सर.....
विटेकरांशी सहमत
अतिशय बिभत्स अनुभव येतात.....
पुढे काय ?
तिकडे गेल्यावर मात्र जेट लॅग
असहमत.
प्रचंड सहमत!
मी गोल्ड अड्लेब कल्याणी नगरला
सभ्यता - शिष्ठाचार
आंशिक सहमती
हम्म
बेर्डे आणि मंडळी (अशोक सराफ,
महागुरु आणि महेश कोठारे
महागुरु महेश कोठारे यांना.....