केक रस्क
साहित्यः मैदा - १५० ग्रॅम साखर - १५० ग्रॅम बटर - १५० ग्रॅम अंडी - ३ बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी मिठ चिमुटभर कृती: १. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. २. दुसर्या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे. ३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे. ४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे. ५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही. ६. हे सर्व करताना ओव्हन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. ७. Preheat झालेल्या ओव्ह्न मधे केक टेवुन १५-२० मिनिट बेक करुन घ्यावा. ८. १५-२० मिनिटात केक तयार झाला असेल. ९. केकचा ट्रे बाहेर काढुन १ तास थंड होउन द्यावा.
१०. केक पुर्ण थंड झाल्यावर त्याचे १ इंचाचे तुकडे करुन घ्यावेत,
११. हे सर्व एका ट्रे मधे ठेवुन ओव्हन मधे १५० degree celcius ला १५ मिनिटे परत बेक करावे. १५ मिनिटांनी ओव्ह्न बंद करावा व तो ट्रे ओव्ह्न मधेच १० मिनिटे ठेवावा.
१२. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढल्यावर केक रस्क तयार झाले असतील.
१३. हे केक रस्क वाफाळत्या चहा सोबत किंवा नुसतेच सुद्धा खुप छान लागतात.

वाचने
8243
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर फोटो आणि सादरीकरण !
मस्त
सुपर !!!!!
कड्क चहाबरोबर क्रिस्पी रस्क
In reply to सुपर !!!!! by कच्ची कैरी
केक रस्क!!
सहीच...
मस्त.
अरे वा मधुरा... नक्की टाक
वा..
खुसखुशीत झालेत एकदम!
सुरेख आलेत फोटू! वेगळीच पाकृ!
आहाहा...
केकात अंडे आहे हे माहित
व्वा!
मस्त आहे एकदम प्रेझेंटेशन अन
सहीच !!
खल्लास!
कमाल प्रेझेंटेशन !