Skip to main content

केक रस्क

लेखक Mrunalini यांनी रविवार, 23/02/2014 03:07 या दिवशी प्रकाशित केले.

केक रस्क

साहित्यः मैदा - १५० ग्रॅम साखर - १५० ग्रॅम बटर - १५० ग्रॅम अंडी - ३ बेकिंग पावडर - १/२ छोटा चमचा व्हॅनिला इसेन्स - १/२ चमचा मिक्स ड्राय फ्रुट्स - १/४ वाटी मिठ चिमुटभर कृती: १. एका भांड्यामधे मैदा, मिठ व बेकिंग पावडर एकत्र चाळुन घ्यावे. २. दुसर्‍या भांड्यामधे बटर व साखर फेटुन घ्यावे. ३. साखर निट मिक्स झाल्यावर त्यात १-१ अंडे टाकुन फेटुन घ्यावे. ४. ह्यात मैदा व ड्राय फ्रुट्स टाकुन एकत्र करावे. ५. एका बेकिंग ट्रे ला बटर लावावे व त्यावर मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांद्यास चिटकत नाही. ६. हे सर्व करताना ओव्हन १८० degree celcius ला १० मिनिटे preheat करुन घ्यावा. ७. Preheat झालेल्या ओव्ह्न मधे केक टेवुन १५-२० मिनिट बेक करुन घ्यावा. ८. १५-२० मिनिटात केक तयार झाला असेल. ९. केकचा ट्रे बाहेर काढुन १ तास थंड होउन द्यावा. cake १०. केक पुर्ण थंड झाल्यावर त्याचे १ इंचाचे तुकडे करुन घ्यावेत, ११. हे सर्व एका ट्रे मधे ठेवुन ओव्हन मधे १५० degree celcius ला १५ मिनिटे परत बेक करावे. १५ मिनिटांनी ओव्ह्न बंद करावा व तो ट्रे ओव्ह्न मधेच १० मिनिटे ठेवावा. cake2 १२. १० मिनिटांनी ट्रे बाहेर काढल्यावर केक रस्क तयार झाले असतील. १३. हे केक रस्क वाफाळत्या चहा सोबत किंवा नुसतेच सुद्धा खुप छान लागतात. rusk rusk2 rusk3

वाचने 8243
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

व्वा, केक रस्क काय आलेत फोटोमध्ये,एकदम खुसखुशीत दिसताय! सुंदर फोटो आणि सादरीकरण ! एवढा मैदा आणि साखर आहे म्हणून एकच तुकडा घेतो चहाबरोबर.

झक्कास

तोंडाला पाणी सुटलय , फोटो एकदम झक्कास !!!!!

केक रस्क खुसखुशीत दिसत आहेत, करुन बघेन म्हणतेय. फोटो मस्स्त्त्त्तं :)

मस्त. आज ही केकृ पाहून लगेच केक बेक केला आहे. केक तर मस्त दिसतोय. तो पूर्ण गार करून पुन्हा बेकिंग करेपर्यंत धीर धरवत नाहीये. पण धीर धरून केक रस्क तयार झाले की फोटू टाकेन.

छान दिसतो आहे, स्वाती

केकात अंडे आहे हे माहित असूनही,केकच्या प्रेक्षणीयपणामुळे खायची इच्छा झालेला---http://www.pic4ever.com/images/91.gif आत्मू! http://www.pic4ever.com/images/91.gif

काय मस्त फोटो आहेत! पाकृ तर चांगली झालेली दिसतेच आहे!

कसला भारी दिसतोय केक रस्क आणि चहासुद्धा, अफलातुन रंग आला आहे.