म्हणून नथुराम उजवा ठरतो.....
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली.
गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.)
आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो.
खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत.
उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता.
वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो.
टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.
प्रतिक्रिया
जरूर लिहा. आम्ही वाचू तो.
गांधींचा खून करण्यात आला
संगीतखुर्ची !/?
मान्य
पूर्वानुभव हेच सांगतो
मुळात गांधी
उजवा ठरतो?
शंकानिरसन (जमेल तेवढे ) :)
>>>एक शक्यता अशी सुद्धा होती
विनंती
'गांधीहत्या आणि मी' वाचलेलं
बरं
ट्रॅक बदलताय?
नाही नाही
+1 ?
१००% बरोबर
:D
तसेच पुढे मागे काळ बदलेल आणि
कारण काळ बदलला हे नाही... आपण जिंकलो हे आहे.
पिवळा पितांबर.....
चारच माणसं चर्चा करतायत, काय
गांधीजी व नथुरामचा विषय
कंटाळा
अगदी खरंय.
खर आहे गांधीजीचा आत्मादेखिल ह्या धागा कर्त्यांमुळे
अवान्तर
आमच्या धाग्याला अजून होप आहे
जरा वेगळा मुद्दा ..
सहमत आहे.
यू टू?
धन्यवाद विटेकरजी
विटेकरबुवा
रामदासकाकांच्या एका लेखात एक
होय पण
लोकांना घाला १२ गडगड्याच्या
त्यात काही शंकाच नाही
सहमत आहे.
ह्म्म...
खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालंब्राह्मण समाजाचे खरोखरच चांगले झाले यात वाद नाही ! एकतर ९८ % लोकांनी गावे सोडली , उरलेल्या २ % लोकांचा एक पाय गावाबाहेर पडला आहेच / या पिढीत पडेलच ! पण बहुजन समाजाचे काय ? ज्या ब्राह्मण समाजाकडे त्यांचे उत्तरदायित्व होते, ते तर गावाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतः चे भले करुन घेतले! बाकीच्यांचे काय ? जे माय- बाप सरकार त्यांचे भले करणार अशी हाकाटी होती , ते तर पांढर्या बगळ्यांनी ओरबडून खाल्ले , आरक्षणाचा फायदा किती टक्क्यापर्यंत पोहोचला ?राज्यकर्त्या जमातीवर आरक्षणाचे कटोरे घेण्याची पाळी का आली ? एका तात्कालिक उन्मादामुळे पिढ्यांपिढ्या संभाळलेली सामाजिक रचना कोलमडून पडली आणि नव्या व्यवस्थेत " बळी तो कान पिळी " हा जंगल कायदा अस्तित्वात आला ! ब्राह्मण समाजाने आपल्या कोअर मध्ये काम करुन आपले काम साधून घेतले, आता बाकीच्यांचा वाली कोण ? ( आमचे एक कराडचे काका ( वय ८५) म्हणाले , तेव्हा "आमची" घरे जाळलीत आता "तुम्हाला" आत्महत्या कराव्या लागतात ..स्वाभाविकच आहे म्हणा , आम्हाला गावाबाहेर काढले , गावातील कीर्तने , प्रवचने बंद झाली, पाठीवर हात ठेऊन समजाऊन सांगणार कोण ? ...) हा " आमचे - तुमचे " भेद किती वाईट आहे! आणि त्या तात्कालिक उन्मादाला ब्राह्मण समाज जबाबदार नव्हता की काय ? त्यांच्यावरील पिढ्यांपिढ्याचा राग एका घट्नेवाटे बाहेर पडला (वावट्ळ - व्यंकटेश माडगुळकर) तेव्हा , जे झाले ते व्यापक समाज हिताच्या दृष्टीने फारसे चांगले झाले असेही म्हणवत नाही ! गांधी हत्येचे असेही दूरगामी परिणाम आहेत, जे कुळ कायद्याने अधिक तीव्र केले ! ( बट्ट्मन - आपली यावर एकदा चर्चा झाली आहे , आठवते का ? )येस, आठवते आहे.
हम्म
>>> गांधी हत्येनंतर
पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त )
अर्ध्या वाक्या करता क्षमा असावी
म्हणून नथुराम उजवा ठरतो.....?
राजीव गांधींचे मारेकरी
वैयक्तीक कारण???
हैदराबाद ?
फरक
पटले नाही
काय गम्मत आहे ..!
Pagination