Skip to main content

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

लेखक महेश_कुलकर्णी यांनी गुरुवार, 20/02/2014 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात. सगळीकडे फक्त मतपेटीचा विचार आणि त्यातच ह्या दुर्दैवी निर्णयाने अजून एक भर टाकली. गांधी घराण्यातील हत्येचा विषय निघाल्यावर आपसूकच इंदिरा गांधी आणि बापू यांच्या हत्येची आठवण झाली नाही तरच नवल. (आपण जरी विसरायाचा प्रयत्न केला तरी प्रसारमाध्यमे आणि खुद्द कॉंग्रेसचे उपाध्यक्ष श्री. राहुल गांधी ह्याची आठवण करून देत राहतील.) आज कोणतीही प्रसारमाध्यमे राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांना दहशतवादी संबोधण्यास धजावत नाही. परंतू बापुंचा मारेकरी(नथुराम) आता ‘पहिला दहशतवादी’ म्हणून संबोधला जातो. खरे तर वेगळ्या खलिस्तानसाठी प्रयत्न करणारे जर्नेलसिंग यांच्या हत्येचा सूड किंवा श्रीलंकेत होत असणाऱ्या तामिळींच्या अत्याचाराचा सूड म्हणून भारतातील पंतप्रधानाना जबाबदार धरणारे लोक जे भाषा आणि धर्म यांचा संकुचित विचार करत होते व भारतापासून वेगळे होण्याची मागणी करत होते ते खरे दहशतवादी होत. उलटपक्षी अखंड आणि धर्मनिरपेक्ष भारत (जिथे सर्व धर्मांना सारखी वागणूक असेल आणि कोणत्याही विशिष्ट धर्माचे लांगुलचालन करणारी धोरणे नसतील.) याच्यासाठी कायम आग्रही राहणारा व यांच्याआड येणाऱ्या गोष्टींना बाजूला करण्यासाठी त्यावेळेस जे करता आले ते करणारा नथुराम मात्र दहशतवादी. ज्याला देशाचे नियम व कायदे मोडून काहीही करायचे नव्हते म्हणूनच स्व:ताहून शरण आला व हसत हसत फाशीला सामोरे गेला. कोणताही दया अर्ज न देता. वरील सगळ्या गोष्टी लक्षात घेता एवढेच वाटते की देशाची अखंडता डोळ्यासमोर ठेवून कायद्याने चुकीचे ठरवलेले पाऊल उचलूनदेखील त्यावर ठाम राहणारा नथुराम कायम या सगळ्यात उजवा ठरतो. टीप: इथे कोणाच्याही चुकीच्या गोष्टींचे समर्थन करायचा हेतू नसून तिन्ही गांधी जे कायमच देशाचा केंद्रबिंदू ठरले आहेत यांच्या हत्या वर मारेकरी यांचे शक्य तेवढे तटस्थपणे समीक्षण करण्याचा प्रयत्न आहे.

वाचने 67426
प्रतिक्रिया 107

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

कंटाळा आला असेल बहुदा त्याच त्याच गोष्टीवर पुन्हापुन्हा लिहायचा. सध्या केजरीवालवर धागा काढला की कमितकमी सेंच्युरी नक्कीच.आणखी काही महिन्यांनी केजरीवालवरच्या धाग्यांवरही प्रतिसाद येणे कमी होईल. :)

In reply to by चैतन्य ईन्या

चैतन्य ईन्या आपण दिलेल्या तूनळ्या पाहिल्या नाहीत पण त्या "तारेख फता" ची फटाफट मुलाखत टाईमस ऑफ इंडीयावर वाचण्याचा योग आला. त्यांच्या काशिर आणि बलुचिस्तान भूमिकेत सुधारणेस वाव आहे पण सर्वात महत्वाचे आमच्या १५ ऑगस्ट इ.स.२९४७ चे आवाहन आणि अभिनंदन संदेश या धाग्याला उत्तम होप आहे तर; चैतन्य ईन्या धन्यवाद

गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच ! एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे. कालौघात घटनांचे संदर्भ इतके बदलतात !

In reply to by बॅटमॅन

भाषाप्रभू , तुम्ही हा प्रश्न विचारलात ? तट्टू- घोडा , कुलकर्णीपणाच्या उचापती करायला तांबूल - विडा घ्या हो नारायणा तस्त - तांबूला नंतर तस्त येणारच , उठून थुंकायची तसदी कोण घेणार ? तक्क्या -तांबूल / तस्त नंतर तक्क्या अपरिहार्य ! दुपारचे जेवण चेपले की झाले आडवे , संध्याकाळ पत्तुर चिंता नाय ! तगाई- सदासर्वादा कर्जात , तगाई - कर्ज

In reply to by विटेकर

धन्यवाद विटेकरजी :) बाकीचं माहिती होतं, पण तगाईचा नेमका अर्थ ठौक नव्हता. धन्स!

In reply to by विटेकर

गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला.
१००% अनुमोदन ! आमचे ( आजोबांचे) गावाकड्चे घर जळाले पुढे उरली सुरली जमीनही गेली कुळकायद्यात ... मग पोटापाण्याच्या निमित्ताने आजोबा सातार्‍याला आले ... आम्ही दिल्ली मुंबै ला आलो .... पुढे मागे पोरं परदेशात स्थायिक होतील ... जळितकांड झालं म्हणुन बाहेर पडलो ( पडतोय ) ह्या चक्रातुन .... नाहीतर गावाकडं कुठंतरी पत्रिका पंचांगात ग्रहतार्‍यांशी खेळत राहिलो असतो देव जाणे ... खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं जो हुवा अच्छा हुवा , जो होरहा है अच्छा हो रहा है और जो होगा वह भी अच्छाही होगा :) बाकी तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त >>> ह्यातील तट्टू तगाई तस्त म्हणजे काय ?

In reply to by प्रसाद गोडबोले

रामदासकाकांच्या एका लेखात एक अप्रतिम वाक्य आहे. "जे कूळकायद्यानं गमावलं ते सिलिकॉन व्हॅलीनं कमावलं". यातच याचे सार सामावले आहे.

In reply to by बॅटमॅन

होय पण ते पण लोकांच्या डोळ्यावर येतय. कष्ट करून पुढे गेलेल पण पाहवत नाही आणि स्वतःही काही करवत नाही. मग उठसुठ नथुरामला शिव्या द्यायच्या

In reply to by बॅटमॅन

त्यात काही शंकाच नाही हो. पण दुख ह्याचे आहे की अजूनही काही जनता नाथूचा उदो उदो करते आणि तितकेच लोक त्याच्या नथीमागून बमान्नाना शिव्या घालतात. असो

In reply to by प्रसाद गोडबोले

खरंच कधीकधी बरंच वाटतं ,झालं हे चांगलंच झालं ब्राह्मण समाजाचे खरोखरच चांगले झाले यात वाद नाही ! एकतर ९८ % लोकांनी गावे सोडली , उरलेल्या २ % लोकांचा एक पाय गावाबाहेर पडला आहेच / या पिढीत पडेलच ! पण बहुजन समाजाचे काय ? ज्या ब्राह्मण समाजाकडे त्यांचे उत्तरदायित्व होते, ते तर गावाबाहेर पडले आणि त्यांनी स्वतः चे भले करुन घेतले! बाकीच्यांचे काय ? जे माय- बाप सरकार त्यांचे भले करणार अशी हाकाटी होती , ते तर पांढर्‍या बगळ्यांनी ओरबडून खाल्ले , आरक्षणाचा फायदा किती टक्क्यापर्यंत पोहोचला ?राज्यकर्त्या जमातीवर आरक्षणाचे कटोरे घेण्याची पाळी का आली ? एका तात्कालिक उन्मादामुळे पिढ्यांपिढ्या संभाळलेली सामाजिक रचना कोलमडून पडली आणि नव्या व्यवस्थेत " बळी तो कान पिळी " हा जंगल कायदा अस्तित्वात आला ! ब्राह्मण समाजाने आपल्या कोअर मध्ये काम करुन आपले काम साधून घेतले, आता बाकीच्यांचा वाली कोण ? ( आमचे एक कराडचे काका ( वय ८५) म्हणाले , तेव्हा "आमची" घरे जाळलीत आता "तुम्हाला" आत्महत्या कराव्या लागतात ..स्वाभाविकच आहे म्हणा , आम्हाला गावाबाहेर काढले , गावातील कीर्तने , प्रवचने बंद झाली, पाठीवर हात ठेऊन समजाऊन सांगणार कोण ? ...) हा " आमचे - तुमचे " भेद किती वाईट आहे! आणि त्या तात्कालिक उन्मादाला ब्राह्मण समाज जबाबदार नव्हता की काय ? त्यांच्यावरील पिढ्यांपिढ्याचा राग एका घट्नेवाटे बाहेर पडला (वावट्ळ - व्यंकटेश माडगुळकर) तेव्हा , जे झाले ते व्यापक समाज हिताच्या दृष्टीने फारसे चांगले झाले असेही म्हणवत नाही ! गांधी हत्येचे असेही दूरगामी परिणाम आहेत, जे कुळ कायद्याने अधिक तीव्र केले ! ( बट्ट्मन - आपली यावर एकदा चर्चा झाली आहे , आठवते का ? )

In reply to by विटेकर

येस, आठवते आहे. बाकी या घटनेस बरेच पदर आहेत खरे. ते यथावकाश पुढे कधीतरी समजेल तसे मांडीन.

In reply to by विटेकर

कालच चानेल ४ का बीबीसी २ वर सावूथ आफ्रिकेत सध्या गोर्यांवर काय वेळ आली आहे आणि ते आता झोपडपट्टी मध्ये जावून राहतात ह्याचे चित्रण होते. बाकी हे चित्रण एका काळ्या माणसाने केले होते. एका बाजूला काही शतके झालेला अन्याय त्यामुळे काळ्यांच्या मनात साचलेला राग आणि दुसऱ्या बाजूला सध्याच्या गोऱ्या लहान मुलांचे भवितव्य ह्यामुळे तो काळा फारच दुखी झालेला होता. ह्याला काहीच सोलूशन आहे असे मला वाटले नाही. हां झगडा संपणे कठीण आहे.

In reply to by विटेकर

>>> गांधी हत्येनंतर महराष्ट्रात ब्राहमण समाजावर जे अत्याचार झाले त्याच्यामुळे ब्राहम्न समाज अंतर्बाह्य सुधारला. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) त्याची सुटका झाली ती कायमचीच ! एका पिढीचे झाले नुकसान पण निदान ब्राह्मणांना कष्टाची किंमत तरी कळली !हा नथुरामने करुन दिलेला फायदा आता ६० वर्षांनी दृगोचर होतो आहे. + १ महाराष्ट्रातील ब्राह्मणांचे आजवर एकूण ३ वेळा स्थित्यंतर झाले. औरंगजेबाच्या मृत्युनंतर बाळाजी विश्वनाथांना पेशवेपदाची सूत्रे मिळाल्यावर जवळपास १०० वर्षे ब्राह्मण राज्यकर्ते होते. त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अनेक ब्राह्मण सरदार व मुत्सद्दी होते. पण १७०७ नंतर ते प्रथमच राज्यकर्ते झाले. त्यानंतर १९४८ नंतर गांधीवधानंतर झालेली जाळपोळ हा त्याआधी काही दशके ब्राह्मणविरोधी वातावरण निर्माण केले गेले होते त्याचाच उद्रेक होता. पण ही ब्राह्मणांसाठी इष्टापत्ती ठरली. जाळपोळीपाठोपाठ राखीव जागा, राजकारणातून हद्दपारी, कूळकायदा इ. गोष्टींमुळे ब्राह्मण शहरांकडे वळून त्यांची उत्तरोत्तर प्रगतीच झाली. त्यानंतर १९९०-९१ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींमुळे राखीव जागांचे प्रमाण २२.५ % वरून ४९.५ % पर्यंत वाढल्यामुळे शिक्षण व सरकारी नोकरी हे क्षेत्र ब्राह्मणांसाठी अजूनच आकुंचित झाले. पण ही पण इष्टापत्तीच ठरली. यानंतरच्या काळात ब्राह्मण मोठ्या प्रमाणात संगणक, आर्थिक क्षेत्र, प्रसारमाध्यमे, मालिका-चित्रपट इ. खाजगी क्षेत्रात गेले. परदेशी जाऊन स्थायिक होण्याचेही प्रमाण वाढले. आता पुन्हा एकदा स्थित्यंतराची वेळ आलेली आहे. २०१४ मध्येच महाराष्ट्र सरकार नवीन विधेयक आणून उर्वरीत खुल्या ५० टक्के जागांपैकी किमान २०-२५ टक्के जागा मराठा जातीसाठी राखीव ठेवण्याची शक्यता आहे. तसे झाले तर शिक्षण व सरकारी नोकरी हे ब्राह्मणांसाठी अजून अवघड होतील. पण त्याही परिस्थितीत ब्राह्मण मार्ग काढतील अशी माझी खात्री आहे. परदेशी स्थलांतर करणे किंवा इथेच राहून नोकरीच्या ऐवजी व्यवसायात गुंतणे हे पर्याय ब्राह्मण स्वीकारतील असे वाटते. अजून अंदाजे २०-२५ वर्षांनी म्हणजे २०३५ नंतरच ब्राह्मणांनी या आपत्तीचे इष्टापत्तीत रूपांतर केले आहे का ते समजेल.

सामान्य भिक्षूकी करून दारिद्र्यरेषे खाली जीवन कंठणार्‍यांना जमीनदाराच्या पंक्तीला बसण्याचा मान आणि तांबूल पर्याय नसलेला विराम या पलिकडे काही मिळत नसावे. तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त हि स्वातंत्र्यपुर्व सर्वच जमिनदार आणि महसूली यंत्रणेचे चित्र होते. बर्‍याच मोठ्या प्रमाणावर ब्राह्मण होते जमिनदारी आणी महसुली यंत्रणेतील सर्वच ब्राह्मण होते हा निष्कर्ष कदाचित तपासून पहावा लागेल. कोणतीही वडलोपार्जीत समृद्धी सात पिढ्यांच्या पुढे सहसा जात नाही ती कधीतरी संपावयाची होती ती संपली आणि हा समाज स्वतःच्या पायावर उभाटाकण्यास धडपडू लागला हे बरे झाले हे निश्चित. शासकीय नौकरीच्या निमीत्ताने/आमिषाने महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज शेती अवलंबीत्व ब्रिटीशांच्या १८१८ च्या आगमना नंतर हळूवार सोडावयास लागलाच होता यात दुष्काळा सारखी कारणंही समाविष्ट होती. १८४८ मध्ये महात्मा फुलेंनी बहुजन शिक्षणाची आणि ब्राह्मणेतर चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. आणि ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) या गोष्टी किमान ब्रिटीश शासित प्रदेशात आणि किमान ब्राह्मण जमीन मालकांकरता चॅलेंज आणि खिळखिळ्या होऊ लागल्या. निजाम शासित प्रदेशात अधिक वेळ लागला असावा पण त्यांच्या करता तो बदल ब्रिटीश शासित प्रदेशा पेक्षा अधिक शॉकींग असा असावा. महसूल गोळा करण्याचे अधिकार गेले प्रिव्ही पर्स बंद झाल्या कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे आले. त्यामुळे तगाईची आणि तट्टूचे (कारण स्वातंत्र्यापुर्वी ग्रामीण भागात फारसे रस्ते नसत त्यामुळे बहुतांश सारा वसूली तगाईची कामे तट्टूवरून केली जात.) काम संपले. उरलेला पैसा संपे पर्यंत नौकरीची सवय नसलेल्या पिढीत तक्क्या , तांबूल, चालू होते तस्तही हरवले. ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव; महसूल गोळा करण्याचे अधिकार जाणे प्रिव्ही पर्स बंद होणे; कमाल जमीन धारणा कायदे आणि कुळ कायदे गांधी हत्या झाली नसती तरीही झालेच असते. पाच "त"कारापासून ( तक्क्या , तट्टू, तगाई, तांबूल, तस्त ) स्वांतत्र्योत्तर काळात सुटका झाली आणि हा सर्व इतिहास मान्य केलाकी गांधी हत्या झाली नसती तरीही हे सर्व घडलेच असते किंवा कसे म्हणुन विटेकरांनी मांडलेला कार्यकारण संबंध पुन्हा तपासून पाहण्याची गरज आहे का असे वाटते. महात्मा फुल्यांनी १८४८ मध्ये

In reply to by माहितगार

१८४८ ते १९४८ या दोनवर्षातील चक्क १०० वर्षांचे अंतरही लक्षात घेतले पाहिजे असे वाटते.

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....
अजिबातच नाही. काँग्रेस ने पाकिस्तान ला ५५ कोटी दिले काय किंवा नाही काय फरक पडत होता? बहुजन समाज होता ना द्यायला? काय गरज होती समाजोद्धाराची? मरू द्यायचं ना या अडाणचोटांना!

राजीव गांधींच्या मारेकर्‍यांनी सुद्धा वैयक्तीक कारणांसाठी हत्या केली नाही .. तमिळ लोकांच्या दृष्टीकोनातून ते हीरो आहेत.. नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ?? मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील , तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ??

In reply to by कपिलमुनी

वरील लेखात कुठे वैयक्तिक कारण असा उल्लेख आला आहे का? फरक हा आहे की राजीव गांधीचा खून हा संकुचित भाषावादाच्या अस्मितेतून झाला आहे तर नथुरामने अखंड भारत राहण्यासाठी (हैदराबाद वेगळे होवू नये यासाठी) बापूंना मारले. कृपया संभ्रमात पडू नये..

In reply to by कपिलमुनी

नथुराम किंवा मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांच्या पंक्तीत त्यांना बसवायचे का ?? नथुरामला तुम्ही मदनलाल धिंग्रा आणि अनंत कान्हेरेंच्या पंक्तीत बसवत आहात का? ते आक्षेपार्ह आहे. एकाने स्वतंत्र राष्ट्रात (राष्ट्रपिता म्हणून देखील नाही अगदी साधे) एका नि:शस्त्र व्यक्तीचा खून केला. ती त्याच्या दृष्टीने राजकीय हत्या असेलही पण अक्षम्यच आहे. तर दुसरीकडे, मदनलाल धिंग्रा, अनंत कान्हेरे यांनी वायली आणि जॅक्सनचे "वध" केले कारण ते परकीय सत्तेचे प्रतिक होते. आणि त्यांना गुन्हेगार या अर्थाने खुनी म्हणायचे असले तर ब्रिटीशांच्या संपूर्ण खानदानाला आणि तत्कालीन ब्रिटीश राज्यकर्त्यांना गुन्हेगार आणि खुनीच म्हणावे लागेल. कारण त्यांनी तेच तर केले. त्याला उत्तर म्हणून जर कोणी त्या वेळेस योग्य वाटले म्हणून हत्यार उचलले असले तर त्यात गैर काहीच नाही. साधे लोकलट्रेन मधे गर्दीत कुणाचा घुसताना पाय पायावर पडला तर पब्लीक खेकसतं, इथे तर देशाला पारतंत्र्य आले होते आणि जनतेचे हाल देखील केले जात होते. आणि पारतंत्र्याच्या मुकाबल्यासाठी शस्त्र घेणे म्हणजे दहशतवाद असेल तर तसे काय जॉर्ज वॉशिंग्टनपण दहशतवादी ठरतील. एखाद्या अमेरीकन समोर असे म्हणून बघा काय मत होते ते... मदनलाल धिंग्रा , अनंत कान्हेरे यांनी केलेल्या हत्या भारतीयत्वाच्या दृष्टीकोनातून योग्य असतील, तर राजीव गांधींची हत्या योग्य ठरते ?? प्रामाणिकपणे ह्या प्रश्नाला माझ्या लेखी सोपे उत्तर नाही... तरी देखील एका वाक्यात - राजीव गांधींची हत्या अयोग्यच ठरते. आता किंचित स्पष्टीकरणः श्रीलंकेच्या स्वातंत्र्यानंतर तिथल्या स्थानिक तमिळ जनतेस कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. ती उत्तरोत्तर अधिकच अन्यायकारक होत गेली. त्याची परीणिती लिट्टे तयार होण्यात आणि प्रभाकरन सारखा तिथल्या तमिळांना सुरवातीस हिरो वाटेल असा नायक तयार होण्यात झाली. पण ह्या प्रभाकरनमुळेच एका अर्थाने कुठलीही तडजोड न झाल्याने नागरी युद्ध सुरू झाले. प्रभाकरन हा केवळ नेता न रहाता गुंड झाला ज्याचे दुष्परीणाम असंख्य तामिळींना भोगावे लागले आहेत (ज्यातील काही मी जवळून पाहीले आहेत). पुढे राजीव गांधींनी श्रीलंका सरकारच्या मदतीस शांतीसेना पाठवायची आणि भारतासाठी व्हिएतनाम तयार केला. सैनिकांचे हाल झाले आणि श्रीलंकेतील तामिळ जनतेचे देखील हाल अधिक झाले (ऑपरेशन पवन). त्या आधी राजीव-प्रभाकरन भेट झाली होती, त्यांच्यात करार झाला होत, वगैरे बरेच काही आहे, म्हणले जाते पण त्यातले खरे किती ते माहीत नाही. पण त्याचा सगळ्यास राजीव गांधी कारण आहेत असे लिट्टेला वाटले आणि मला वाटते पहीलाच ह्युमन बाँब तयार केला गेला. पण त्याचा सगळ्याचा परीणाम हा भारत श्रीलंकन तमिळींच्या विरोधात जाण्यात झाला. तामिळनाडूत मदत मिळाली असेल कदाचीत पण देशाकडून मिळणारी रसद थांबली. नंतरच्या काळात (९१ सालानंतर) जे काही संगणकक्षेत्रामुळे झपाट्याने बदल झाले त्यात तामिळनाडूचे स्वतःच्या भाषा - संस्कृतीबद्दलचा अतिरेकी अभिमान राहीला असेल कदाचीत पण आपण वेगळे आहोत आणि स्वतंत्र तमिळीस्तान वगैरेची कल्पना लोप पावत गेली. शेवटी त्या प्रभाकरनला स्वतःच्या मुलाला मुद्दामून डोळ्यासमोर मारलेले बघून मरावे लागले. पण ते त्याच्या कर्माचे फळ होते, झालं!

In reply to by विकास

वर आधीच मुद्दा मांडला आहे , अनंत कान्हेरे , मदनलाल धिंग्रा हे तत्कालीन परीस्थितीत खुनी होते मग पुढे भारत ताब्यात आल्यावर त्यांना आपण "धेशप्रेमी कांतिकारक" घोषित केले ....पुढे मागे ... नथुराम चे ही तसे होवु शकेल ... सगळा काळाचा महीमा आहे ... कालोsह्यं निरवधीर्विपुला च पृथ्वी ||

दश्कांचा लढा महासत्तेविरुध्द अहिंसेने यसस्वी दिला अख्खा देश ज्यातुन एकसंध बनवला असे तत्वद्न्यानजन्माला घालून यशस्वी जोपासले आशा जागतिक पातळिवरिल नेत्याने दोन दिवसात म्यान केले असते तर तर खरी गंमत आली असती नाही ? एखाद्याच्या प्रभावाखाली गेले, अन्ना हजारे अथवा केजरीवाल झालाय, अथवा अगदीच गेला बाजार अर्ध्या हळकुंडाच्या पिव्ळ्या वाकड्या नि हमखास बायपोलार निदान तर केले च असते ;)

In reply to by आत्मशून्य

गांधीजी अचानक आक्रमक वगैरे झाले असते तर्च्या या गोष्टी म्हणा.!

मागे वळून बघताना असेच वाटते की नथुराम गोडसेने गांधींना मारून चूक केले. गांधी संपला पण गांधीवाद कायमचा बोकांडी बसला. भारतात दुसरा कुठला सत्पुरुष होऊन गेला की नाही अशी शंका येण्याइतपत ह्या माणसाचा उदोउदो सुरू झाला. प्रत्येक नोटेवर गांधी छापण्याचा खुळचटपणा हे एक उदाहरण. अर्थात १९४८ साली नंतर काय घडेल हे कळण्याचा मार्ग नव्हता हे ही खरे. पण गांधी जगले असते तर गांधीवाद लवकरच हास्यास्पद झाला असता असा माझा ठाम विश्वास आहे. फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते. फाळणी होताना आणि झाल्यावर गांधींना केवळ मुस्लिम निर्वासितांचीच चिंता होती. हिंदूबद्दल काहीही सहानुभूती नव्हती असेच दिसते. तमाम महाराष्ट्रातील ब्राह्मण जातीवर त्या हत्येनंतर जे अत्याचार झाले ते सर्वथा निंदनीय होते. त्यामुळे ब्राह्मणांचे आणि समाजाचे नुकसान झाले. जरी ब्राह्मण त्याल पुरून उरले असले तरी काही क्षेत्रातून ब्राह्मण कायमचे हद्दपार झालेले आहेत. जसे राजकारण. मोजके अपवाद वगळले तर बहुतेक राजकारणी हे मराठा वा अन्य तथाकथित मागास जातींभोवतीच फिरते. चूक की बरोबर ते वेगळे पण पिढ्यानपिढ्या बुद्धीवादी म्हणून वागवलेला एक वर्ग राजकारणात शिरला असता तर कदाचित समाजाचा फायदा झाला असता. टिळक, सावरकर, आगरकर, गोखले, कर्वे अशी उदाहरणे आहेतच. पण नंतर हे प्रमाण कमी झाले. दंगलींनंतर बहुधा ब्राह्मण समाज हा बहुतांश आत्मकेंद्रित बनला असावा. अर्थात ह्यामुळे वेगळ्या क्षेत्रात लोकांनी आपली चमक दाखवायला सुरवात केली हेही खरे.

In reply to by हुप्प्या

अन्यथा नथुरामचा अतातायिपणा आणी समाजपरिणाम असे शिर्षक, लिखाण हवे. गांधिंपुर्वी विवीध जातीधर्माचे अनेक थोर क्रांतिकारी होउन गेले (नाइलाजानेच हे वाक्य लिहताना एक भारतिय म्हणून मला अतिशय लाज वाटली आहे. सुज्ञांनी मला यासाठी क्षमा करावी) परंतु अख्या भारताचा एकसमान शत्रु इंग्रज असुनही भारत हा एक संलग्न देश आहे आणि या देशाने एकजुटिने इंग्राजाविरुध लढा उभारायचा आहे ही जाणिव फक्त महात्मागांधिच्या लढ्यातुनच जनसमुदायात निर्माण झाली पसरत गेली. थोडक्यात भारत एकसंध राष्ट्र बनायची निर्मीतीप्रक्रिया केवळ गांधिजींमुळे निसंशय सुरु केली/झाली. ज्याला पुर्णत्व अर्थातच सरदार पटेलांनी दिले. अन्यथा एंग्रज एकाचा शत्रु अन दुसर्‍याचा मित्र किंव्हा त्याचा लढा तो देइल माझा लढा मी असा प्रकार असे. राजकिय ह्त्या पौराणीक काळापासुन पृथ्विवर सर्व देशात होत आल्याच आहेत (अगदी उसगावही अपवाद नाही). म्हणून हत्येमागील उद्देश साध्य करता आला नसेल तर हत्या जस्टीफाय करणे कधिच शक्य होत नाही, कारण सर्व काही बोलाचीच कढि अन बोलाचाच भात उरते. यातुन प्रत्यक्ष हत्येचे समर्थन तर होत नाहीच पण त्याचे जे कॉन्सिक्वेंन्सेस असतात त्याचीही किंमत मोठी असते अन या दोन्हीच्या परिणामात हत्येच्या निर्णयाबाबत खरी चर्चा नक्कि कशाबद्दल करायची यात बहुतांश गोंधळुन जातात.
फाळणीच्या आगीत होरपळलेल्या एखाद्या निर्वासिताने गांधींचा निकाल लावला असता तर कदाचित त्या खुन्याला माथेफिरु वगैरे म्हटले गेले नसते.
ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...!

In reply to by आत्मशून्य

आज ६० वर्षांनंतरही त्याचे सर्व पक्षांकडुन निव्वळ राजकारण केले जाते ज्यात सर्वसामान्यजनहितांचा वेळोवेळी बळी जातोय ही एकमेव गोष्ट जरी टाळता आली तर भारताच्या कोणत्याही स्वातंत्र्यसैनीकाचे बलिदान खर्‍या अर्थाने व्यर्थ गेले नाही असे मानता येइल.

In reply to by आत्मशून्य

>>ही तर अतिशयोक्तीला विनोदाची झालरही आहे...! मुद्द्याला उत्तर देता येत नसल्यामुळे विनोदाची झालर वगैरे पुस्ती जोडताय का? भारत एकसंध बनायचे श्रेय फाळणीच्या जन्मदात्याला देणे हा खरा विनोद आहे. टिळकांना तेल्या तांबोळ्यांचे पुढारी असे तुच्छतेने म्हटले जात असे. पण त्याच्यामागचा अर्थ असा आहे की त्यांनी स्वातंत्र्यलढा सामान्य लोकांपर्यंत नेला. तेव्हा निव्वळ गांधीजींना त्याचे श्रेय देणे हे ढोंगीपणाचे आहे. गांधीजींचे योगदान कुणी नाकारत नाही पण त्यांचा अतिरेकी मुस्लिम अनुनय अक्षम्य आणि नुकसानकारकच होता. त्याची घातक फळे आजही भोगत आहोत.

In reply to by हुप्प्या

ह्म्म... त्याचे श्रेय इंडिअन नॅशनल कोन्ग्रेसला (तेव्हाच्या) देणे योग्य ठरेल. गांधींच्या व्यक्तीगत करिश्म्याला कोंग्रेस ची साथ मिळाली नसती तर हे होणे तसे कठीण होते.

भारतातला पहिला अतिरेकी हैद्राबादमधील अब्दुल रशीद हा होता. त्याने स्वामी श्रध्दानंदांचा खून केला होता. याच अब्दुल रशीदला नंतर गांधींनी भाई असे म्हटले होते.