कालच मी सीकेपी खाद्य जत्रेला गेलो होतो.त्याचा व्रुत्तांत मिपावर टाकला.नेहमीप्रमाणे तो बायकोने वाचला.ती मुलतः कर्नाटकातली तर मी मराठी मातीतला.आपला नवरा कर्नाटकी प्रेमीच असावा, ह्यासाठी ती अधून-मधून तंबीटाचे लाडू,सुसला तर करत असतेच शिवाय चटणी पुडी,चित्रान्ना,बिशी बेळी भात हे पण होत असतेच.मी व्रुत्तांत लिहीत असतांनाच स्वैपाक घरातून किसणीचा आवाज ऐकला.भर दुपारी आपली बायको, काय किसत आहे? हे बघावे म्हणून गेलो तर, बायकोने गूळ चिरून ठेवलेला आणि खोबरे पण किसून तयार होते.
तिला विचारले, काय करतेस?
तर म्हणाली, तंबीटाचे लाडू.
मी म्हणालो, मग ठीक आहे.मला वाटले, तू काय कानोले वगैरे बनवतेस की काय?
ती म्हणाली, मी कशाला कानोले वगैरे बनवू? त्यापेक्षा तुम्हीच एखादी कानोले बनवणारी स्वैपाकीण शोधा.
(आमची बायको, मिपाचे कट्टा व्रुत्तांत वाचते, आणि त्यातील मौलिक माहिती, कधी कधी वदते.)
मी म्हणालो, ठीक आहे.मग तू ही रेसीपी टाक आपल्या मिपावर.
ती म्हणाली, हे असले धागे काढायचा शौक तुम्हाला.मी इतक्यात काही लिहीणार नाही मिपावर.
आता बायकोने नकार दिल्यामुळे ही तंबीटाच्या लाडवाची पा.क्रु. लिहायची जबाबदारी आम्हाला घ्यावीच लागली.काय करणार?
तर ते असो....
आता प्रथम साहित्य.
२ वाट्या डाळं भाजून घ्या.
१ वाटी खोबर्याचा कीस, अरे हो, सुक्या खोबर्याचाच कीस.
३ चमचे तीळ
१ चमचा खसखस
५ चमचे तूप
गूळ चवी नुसार.
पाव चमचा वेलदोडा पूड
क्रुती:
प्रथम डाळ भाजून घ्या.ते मिक्सरमध्ये घाला.लगेच पुड करायला घेवू नका.आता मंद गॅस वर खोबरे भाजून ताटलीत काढा.मग तीळ भाजून घ्या.आणि तो पण ताटलीत काढून घ्या.गॅस बंद करा.आता त्याच कढईत ५ चमचे तूप घाला आणि किसलेला गूळ घाला.
आणि आता डाळ्याची पूड करा.तोपर्यंत कढईतला गूळ आणि तूप थोडे विरघळले असेल.
गूळ जर विरघळलेला नसेल, तर थोडा वेळ मंद गॅस वर ठेवून गूळ विरघळवून घ्या.पाक करू नका.
आता ह्या विरघलेल्या गूळात डाळ्याचे पीठ्,खोबर्याचा कीस्,तीळ, खसखस आणि वेलदोडा पूड टाका.
आणि उलथन्याने थोडे हलवून सारखे करून घ्या.
तापमान थोडे आटोक्यात आले, की, सरळ हाताने मळून घ्या आणि लाडू वळायला घ्या.लाडवाचा आकार थोडा मध्यभागी खोलगट ठेवा.
कर्नाटकांत हे लाडू नागपंचमीला करतात.
वाचने
14743
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
कॉलिंग गवि.
रेवतीआज्जी केव्हाची रेशिपी
बा द वे, हे लाडू खोलगट का
In reply to रेवतीआज्जी केव्हाची रेशिपी by सूड
त्यावर तुपाची धार धरायची णी
In reply to बा द वे, हे लाडू खोलगट का by सूड
मस्त हं
पाक्रु आवडली .
हेच का ते रेवाक्काचे
आली आली तंबीट
आता बाळाचा कान फुटायचा.......
व्वा व्वा.. लगे रहो
+१
In reply to व्वा व्वा.. लगे रहो by सुहास झेले
वा..
वा वा वा वा..
मस्तच.
तम् लड्डू BEET ME
मस्त पा. कृ.!
देवाऽऽऽ! किती दिवसांनी पावलास
अभी और टाईम
In reply to देवाऽऽऽ! किती दिवसांनी पावलास by रेवती
उसकेलिये ठराविक तांदूळ और
In reply to अभी और टाईम by सानिकास्वप्निल
मिक्सर होनेकु मंगताय ..
In reply to उसकेलिये ठराविक तांदूळ और by रेवती
@ रेवती आजी....
In reply to देवाऽऽऽ! किती दिवसांनी पावलास by रेवती
वा वा वा! आभार!
आजच करुन पाह्यले. फोटु डकवत
लाडू कसे झाले?
In reply to आजच करुन पाह्यले. फोटु डकवत by सूड
आता चटणी पुडीची रेसिपी
ओके
In reply to आता चटणी पुडीची रेसिपी by त्रिवेणी
आरोग्यवर्धक .... तंबीटाचे लाडू......
झक्कास!