Skip to main content

क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्स

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 14/02/2014 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्य क्रिस्पी सेसमी प्राँससाठी: १०-१५ कोळंबी साफ करु घेणे पाऊण वाटी मैदा (ह्यातील थोडा बाजूला काढून ठेवा कोटींगसाठी) पाऊण वाटी भाजलेले पांढरे तीळ शेजवान सॉस / चटणी (चिंग्सची शेजवान चटणी भारतात सहज मिळते, मस्तचं लागते) मीठ तेल . पाकृ: एका बाऊलमध्ये मैदा, शेजवान चटणी, थोडे मीठ (चटणीत मीठ आहे त्याप्रमाणे घालावे) व थोडे पाणी घालून बॅटर तयार करावे. एका प्लेटमध्ये भाजलेले तीळ पसरवून घ्या व दुसर्‍या प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवलेला मैदा घ्या. पॅन / कढईत तेल मंद आचेवर गरम करायला ठेवा. कोळंबीला प्रथम मैद्याने कोट करा, मग तयार केलेल्या बॅटरमध्ये घोळवून तीळाने व्यवस्थित कोट करुन घ्या. गरम तेलात अलगद सोडून डीप-फ्राय करा. सोनेरी रंगावर क्रिस्पी तळून पेपर टॉवेलवर काढून ठेवा. . साहित्य सॅलॅड: १/२ वाटी पातळ, उभे चिरलेले गाजर १/२ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी थोडासा पातळ उभा चिरलेला कांदा बारीक चिरलेली कांद्याची पात १/४ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून लिंबाचा रस मीठ चिमूटभर सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे. साहित्य सोया + शेजवान सॉस: डार्क सोया सॉस चिंग्स शेजवान चटणी / सॉस मध बारीक चिरलेले आले कांद्याची पात व भाजलेले तीळ सगळ्याचे प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे बसवावे. . पाकृ सॅलॅड: गाजर + कोबी + कांदा + थोडी कांद्याची पात + लिंबाचा रस + लाल तिखट + मीठ सगळे एकत्र करावे. पाकृ सोया + शेजवान सॉस: सोया सॉस + शेजवान चटणी + मध + चिरलेले आले एकत्र करुन फेटणे. त्यात कांद्याची पात व थोडे भाजलेले तीळ घालून आबंट , गोड, तिखट सॉस तयार. . सर्व्हिंगः लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी. त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे. थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा. . हॅप्पी व्हॅलेंटाईंस डे !! :)

वाचने 8592
प्रतिक्रिया 34

प्रतिक्रिया

दंडवत.... आयला इथे आम्हाला एक फोटो धड काढता येत नाही आणि इथे ह्या ताई सुरेख फोटो काढतातच शिवाय ह्यांची पा.क्रु. कधी बिघडत पण नाही... असो... परत एकदा त्रिवार दंडवत....

दिसायला भन्नाटच आहे, पण हे खायचं कसं? कुरकुरीत कोलंबी आधी खाऊन नंतर खालचा मसाला पानासारखा तोंडात घालायचा? का कोलंबी लेट्युसमध्ये गुंडाळूनच खायची? ते जरा विचित्र नाही का वाटत, म्हणजे बुरखा घातलेल्या तरुणीचे चुंबन घेण्यासारखं??

In reply to by चिन्मय खंडागळे

च्यामारी, ह्यातलं नेमकं काय खायचं असतं आणि काय पानात टाकायचं असतं बरं? बादवे, नेहमीप्रमाणेच नादखुळा... आणि बॅकलायटिंग चा ह्याही छायाचित्रांमध्ये मस्त वापर.

In reply to by एस

हे असच्या असचं खायचं असतं (लेट्युस कप्ससकट- शेवटी ते सॅलॅडच), जबराट लागतं.

In reply to by सानिकास्वप्निल

सर्व्हिंगः
लेट्युसची पाने स्वच्छ धुवून, पुसुन घ्यावी. त्यात तयार केलेले सॅलॅड घालावे व त्यावर क्रिस्पी सेसमी प्राँस ठेवावे. थोडासा सॉस त्यावर घालावा किंवा सोया + शेजवान सॉस क्रिस्पी सेसमी प्राँस इन लेट्युस कप्सबरोबर सर्व्ह करा.

एखाद दुसरे खाऊन काय होणार? एकावेळी पोट भरण्यासाठी सुमारे ३०-४० तरी खावीत का? म्हणजे ते करणे आले... अतिशय गहन प्रश्न आहे !!! (विचारमग्न)!!!

कोळंबी तर जीव का प्राण. कसले जबरा फोटो आलेत... पाककृती ही अल्टीमेट.... :) :)

चिकन बिकन पेक्षा मत्स्य पाकॄ पाहिली की मला कधी तरी मी मासळी खाईनच ही भिती वाटते ! :) शेवटच्या फोटु पाहिल्यावर हे प्राँस चांगलेच कुरकुरीत लागत असणार असं वाटतय ! :)