मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ)
_____________________________________
मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे
वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे.
मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी
महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्।
यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो}
बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्।
मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।।
श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.}
मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे.
जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.}
वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :-
An Introduction to the "MantraŚãstra"
MANTRAS
दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे !
प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो.
वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो.
मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते !
हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १}
या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती.
२)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता.
३}घरात अनेकदा मला न मिळणार्या,दॄष्टीस न पडणार्या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली.
४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली.
या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत.
या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख}
जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पक्षी: वेलकराने तात्याला
हा लेख वाचायला लागल्यापासून
कुणाचा सापडला?
८ जीबी चा कुठला सापडायला. एक
मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव
टाळ्या.
बरं झालं बुवा आले.
@कुठल्याही प्रकारची भावना
आर यु शुअर ?
@कारण ति कमजोरी आहे असं बुद्ध
धत तेरे कि
माझ्या मनाची कमजोरी हेच
@मला वाटलं तुम्ही विचाराल कोण
+१००००
अगदी खरेय बुवा =)) पूर्ण
अलेलेलेलेले!
फार लागलं का बे? मंत्र टाकूया
झाले २००!
बाणाचे अन सर्व उत्साही
अहो हे सर्व अनिरुद्ध बाबाच्या
म्हणजे काय बे बॅट्या...
कौरवपांडव संगरतांडव
काही शंका
- मंत्र कितीही दिवसांनी म्हटला तर चालतो का?
- किती वेळा म्हणायचा?
- साधारण किती तास/ दिवस/ महिन्यांनी वस्तू परत मिळते?
- आजवर कधी वस्तू मिळाली नाही असे झाले आहे का?
- आजवर मंत्र न म्हणताच वस्तू परत मिळाली असे कधी झाले आहे का?
- तुम्ही कधी नुसतीच वाट बघितली आहे का एखाद दिवस आणि मग वस्तू मिळाली नाही म्हणून मंत्र म्हणायला सुरूवात केली आहे व वस्तू मिळाली असे झाले आहे का?
आता मलाच पडताळा घेऊन पाहायला सांगणार असशील तर राहू देत कारण मला माझ्या हरवलेल्या वस्तू मिळायला त्याच जागी परत जाणे शक्य नाही आणि इथे मला ओळखणारे लोकही फारसे नाहीयेत जे वस्तू सापडली तर परत आणून देतील. बरेचदा तर वस्तू कुठे पडतात/ विसरल्या जातात तेच आठवत नाही.अहो एवढी चिकित्सा करायची नसते
भक्ति ही मोबदल्यात काहीतरी
कुठला मंत्र?
हरवलेली गोष्ट मुळात आधी
___/\___
मूळ मुद्दा समजून घेण्याचाही
दादा... तुझ्या प्रमाणे माझाही
ताई,
अक्षरसमूहामध्ये काही अर्थ
तो काहीएक अर्थ आपणच दिलेला
डोकेफोड ... नाही ब्वा!
घडा शेवटी पालथाच आहे हे पुनरेकवार सिद्ध झाले.
तुम्ही समांतर रेषा एकमेकींना
लाख बोललात!!
@तुम्ही समांतर रेषा एकमेकींना
एकदम
छेदा छेदी विसरायचीच...!
समांतर रेषा एकमेकींना छेदत
निर्बुद्ध वाटत नाहीत म्हणजे
मूर्ख, पालथा घडा वगैरे
आवरा...
मुलामा कसला?
आता आवरलं.
मरा मरा म्हणणारा वाल्या नंतर
ओरिगिनल रामायणात नसले तरी
मरा मरा थिअरी तुम्हीच आणलीत
खिक्क!