काळा घोडा कला महोत्सव कट्टा - वृत्तांत (३)
लेखनविषय (Tags)
आम्ही उत्सवस्थळी दाखल झालो. माझा या उत्सवाला हजेरी लावण्याचा पहिलाच प्रसंग. कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही, अगदी रेघ देखिल सरळ मारता येत नाही. पण चार लोक जातात तर आपणही जावे, लोकांना कुठे माहित असतं की मी 'ढ' आहे? मागे एकदा तर मी जहांगिरला एक चित्र प्रदर्शन देखिल पाहुन आलो होतो. मूढ मुद्रेने एका चित्रापुढे 'हे काय असावे' याचा अंदाज घेत असता तिथल्यांपैकी एकाने मला 'जाणकार' समजुन अनेक भिकार चित्रांची सहल घडवली होती वर वहीत अभिप्राय लिहावा असा आग्रह देखिल केला होता. असो. सांगायचा उद्देश असा की मी कलामहोत्सव वा कलेविषयी लिहीणे म्हणजे लग्नात मंगलाष्टके म्हणणार्याने सवाई मध्ये गाण्यासारखे आहे. तात्पर्य मी जे दिसले ते इथे उमटवतो, त्यातले सौंदर्य तुम्हीच जाणुन घ्या. एकुण तीन प्रकारच्या कला प्रदर्शित केलेल्या दिसल्या. एक म्हणजे सुंदर, शोभिवंत चित्रे, वस्तू वगैरे, दुसरे मुक्त शैलितील वा प्रतिकात्मक कलाप्रदर्शन आणि तिसरे आजच्या समाजजीवनाचे प्रतिबिंब.
मुविंनी पुढे होत आम्हाला लवकर चला असा ईशारा केला. खाजगी रक्षक आणि पोलिसदल असा दुहेरी सुरक्षा बंदोबस्त होता. आत जाताना थैले-झोळ्या खिसे वगैरे तपासले जात होते. मी यंत्रातुन आत जाताच डाव्या हाताने कॅमेरा वर धरला आणि उजव्या हाताने माझा भिंगे ठेवलेला थैला सुरक्षा रक्षकाच्या हाती देत 'तपासा' असे म्हणताच त्याने हात जोडुन मला जा आत असे सांगितले. सबब मला खिशातली काडेपेटी टाकावी लागली नाही.
आतमध्ये थेट वाहनतळापासून ते कैखुश्रु दुभाष मार्गापर्यंत सर्व भूभागावर कब्जा करुन तिथे महोत्सवाचा व्याप होता. आतमध्ये तरूणाई मोकाट फिरत होती.
समोरच्या भिंतीवर रंगविलेला बहुरंगी बहुढंगी घोडा आवडला.
पलिकडे एक अफलातुन असे चक्रांचे झाड होते
समोर रबरी नळकांड्यांची साळुबाई होती
मधेच लाकडी विमान होते, कुठे गाडीचा अर्धभाग होता सर्वत्र लोक आपापली छबी टिपुन घेत होते.
छबी टिपायची दोन विशेष ठिकाणे म्हणजे लाह्यांचा भला मोठा पुडा आणि एक रंगीबेरंगी अॅम्बेसेडर
सगळ्यांचे लक्ष वेधुन घेत होते एक दगडी कासव
पोलिसातही कलावंत असतो! या दालनातील सर्व कलाकृती मुंबई पोलिसांच्या होत्या
शेजारीच एक सुबक भेटवस्तूंचे दालन होते, वस्तुंची मांडणी आकर्षक होती
अनेक दालनांबाहेर कहीतरी प्रचारार्थ/ प्रदर्शनार्थ मोठ्या रंगीत छत्र्या उभारल्या होत्या. उन चुकवायला छत्रीत शिरलो, तर हात आपोआप कॅमेर्यावर गेले
हे नक्की काय आहे? पानाचे डाग? गंजाचे डाग की आधुनिक चित्रकला?
एक दालन खास बाप्पांचे होते. अतिशय मोहक आणि प्रसन्न मूर्ती पाहायला मिळाल्या. सर्व मूर्ती कागदापासुन केलेल्या होत्या.
मुवि मरिओ मिरांडाच्या दालनात. 'हा बघ कसा दिसतोय?'
घंटाजाल, घंटानाद आणि घंटातरंग
अचानक समोर एक अफलातुन प्रकार दिसला आणि मी भातेंना पाचारण केले.... मिश-कील चित्र टिपायला (मिशीतली मिशी आणि मिशीवर मिशी)
पुढे एका दालनात मोजड्या मस्तपैकी प्रदर्शित केलेल्या दिसल्या
आता गर्दी बर्यापैकी सुरू झाली होती मात्र सगळे स्वतःमध्ये मश्गुल होते. गर्दीची चित्रे टिपायला मजा येते, खरेतर कधी कधी एखाद्या प्रदर्शित वस्तुपेक्षा ती पाहायला जमलेल्या गर्दीच्या चेहेर्यावरचे भाव अधिक आवडतात
'सद् रक्षणाय खल निग्रहणाय रसिकांना सोहळ्याचा आनंद निर्धोकपणे घेता यावा म्हणुन जागता पहारा देणारे मुंबई पोलिसांचे हे खास पथक. वरकरणी हे जरी आपसात गप्पा मारत असल्याचा भास होत सला, तरी त्यांचे डोळे व पवित्रा बारकाइने पाहिले असता असे लक्षात येते की चौघांची नजर बरोब्बर चार बाजुंना आहे आणि बोटे शस्त्रावर सज्ज आहेत.
एका उंच इमारतीचा भास निर्माण करणार्य कलाकृतीच्या पार्श्वभूमिवर भाते
या पोपटाने भरपूर गर्दी जमा केली होती
एकंदरीत मस्त प्रकार होता. आम्हीही त्या गर्दीत सामावुन गेलो होतो. रंग भरत होता. पण ....
(स्वगत - रात्रीचा एक वाजला, आता गपचुप झोपा उरलेले प्रदर्शन उद्या टाका)
क्रमशः
पोलिसातही कलावंत असतो! या दालनातील सर्व कलाकृती मुंबई पोलिसांच्या होत्या
'सद् रक्षणाय खल निग्रहणाय रसिकांना सोहळ्याचा आनंद निर्धोकपणे घेता यावा म्हणुन जागता पहारा देणारे मुंबई पोलिसांचे हे खास पथक. वरकरणी हे जरी आपसात गप्पा मारत असल्याचा भास होत सला, तरी त्यांचे डोळे व पवित्रा बारकाइने पाहिले असता असे लक्षात येते की चौघांची नजर बरोब्बर चार बाजुंना आहे आणि बोटे शस्त्रावर सज्ज आहेत.
प्रतिक्रिया
फोटू
झकास.
सुशेगात आलेला मस्त वृत्तांत
अप्रतीम.
सगळे फोटू व वर्णन आवडले.
बरोबर
गणपति एकापेक्षा एक भारी आहेत.
खराखुरा रंगीबेरंगी कट्टा!
मिशी .....
काळा घोडा कला महोत्सव नक्की
मस्तं वृत्तांत.
मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत!
मस्त फोटो आणि मस्त वृत्तांत!
काला घोडा फेस्टीवलला
बहुभुज बाप्पा आवडले.
एकदम झक्क्कास्स्स्स फोटो व
वृत्तांत जमून आलाय. स्वत:
या भागात फोटो बघता आले.
अत्यंत दिलखेचक वृत्तांत!
Force वन दल
सुंदर वृत्तांत आणि फोटो.
कलेचा आणि माझा काडीमात्र संबंध नाही...