Skip to main content

मंत्र - सामर्थ्य आणि अनुभव

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 11/02/2014 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
(श्री शरद यांच्या http://www.misalpav.com/node/26963 या धाग्यावरील अवांतर प्रतिसाद इथे हलवून नवा धागा तयार केला आहे. एखाद-दुसरा संदर्भ त्या धाग्यातील चर्चेबद्दल असू शकतो. - संपादक मंडळ) _____________________________________ मंत्रादि गोष्टींवर लिटरली विश्वास ठेवणे अन कोणी चेष्टा केली की पोरकटपणे आरडाओरडा करणे, इ. मूर्खपणा टाळलाच पाहिजे वटवाघुळ मानवास संस्कॄताची उत्तम माहिती असताना, त्याने असे विधान करावे हे सर्वात धक्कादायक आहे. मननेन त्रायते इति मन्त्रः :- संदर्भ विकी महर्षीणां भृगुरहं गिरामस्म्येकमक्षरम्। यज्ञानां जपयज्ञोऽस्मि स्थावराणां हिमालयः।।25।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक २५ { जप हा मंत्रांचाच केला जातो} बृहत्साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम्। मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः।।35।। श्रीमद्भगवद्गीता अध्याय १० श्लोक ३५ { गायत्री छन्दात्मक मंत्र आहे हे तर आता सर्वश्रुत आहे.} मंत्रांचा वापर करुन त्याचा अनुभव, फायदा / तोटा घेणारी मंडळी आजच्या घडीला आहेत, तसेच उध्या ही असतील. अनुभव घेण्यापेक्षा चेष्टा करणे हे अगदी सोपे आहे, हे वाचकांनी लक्षात ठेवावे. जालावर या संदर्भात वाचन / शोध घेत असताना काही माहिती समोर आली { ही माहिती मी अजुन संपूर्ण वाचली नाहीये.} वाचकांसाठी त्याचे दुवे खाली देतो :- An Introduction to the "MantraŚãstra" MANTRAS दोन्ही दुवे हे पिडीएफ चे आहेत. ज्या वाचकांना या विषयात रस आहे त्यांनीच हे दुवे अघडुन वाचण्याचे कष्ट घ्यावेत, टिंगल करण्यास विशेष बुद्धी लागत नाही असा माझा समज असल्याने जे हा विषय एक टिंगल / थट्टा म्हणुनच पाहतात त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे ! प्रयत्नाचा एक भाग तुम्ही किंवा अजून कोणी ज्यांनी अनुभव घेतले आहेत त्यांना विचारणे हाही असतो. वटवाघुळाने अनुभवा विषयी विचारणा केली आहे,म्हणुन जरा टंकन कष्ट घेतो. मंत्र :- कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेन गतं नष्टं च लभ्यते ! हा मंत्र मला माझ्या तिर्थरुपांकडुन कळाला, ज्या ठिकाणी मी सध्या राहतो आहे ती जागा विकत घेतानाची ही घटना आहे.{अनुभव क्रमांक १} या जागेचे {जागा विकत घेण्यासंबंधीच्या व्यव्हारांसकट इतर महत्वाची कागदपत्रे ओरिजिनल} सर्व कागदपत्र घेउन माझे वडिल प्रवास करत होते,{मला वाटत दादर स्टेशनहुन ते डोंबिवलीला येण्यासाठी ट्रेन मधे चढत होते.}प्रचंड गर्दी आणि त्यामुळे झालेल्या धक्का-बुक्कीत त्यांच्या हाताला झटका बसुन ती फाईल त्या गर्दीत पडली. वडिल डब्यात होते,डब्यातल्या गर्दीत ती फाईल शोधणेही त्या क्षणी शक्य नव्हते इतकी गर्दी डब्यात होती.जरा गर्दी कमी झाल्यावर वडिलांनी शोध घेण्याचा प्रतय्न केला पण काहीही सापडले नाही.फाईल फलाटावर पडली का ? ट्रॅकवर पडली का ? की डब्यातच कोणाच्या पायाला लागुन ती बाहेर फेकली गेली असेल ? वडिलांनी घरी आल्यावर हे सर्व आम्हाला सांगितले,ते खूप विचारात होते... जागेच्या सर्व व्यव्हारांचे कागद गहाळ झाल्याने ते अतिशय चिंताग्रस्त झाले होते.थोडावेळ शांत बसले आणि नंतर हातपाय धुवुन झाल्या नंतर त्यांना या वर दिलेल्या मंत्राचे स्मरण झाले ! त्यांनी सात्यत्याने या मंत्राचे उच्चरण अनेक दिवस चालु ठेवले होते आणि अचानक काही दिवसांनी त्यांच्या ऑफिसमधे एका माणसाचा फोन आला, त्याने वडिलांचे नाव विचारले आणि तुमची काही कागदपत्रांची फाईल गहाळ झाली आहे का ? अशी विचारणा केली.वडिलांनी त्या फाईलचे वर्णन केले आणि त्या फाईल चे एकंदर स्वरुप सांगितले,त्यावर त्या माणसाने तुमची फाईल माझ्याकडे आहे, ती घेउन जा असे सांगितले.ती फाइल महत्वाची आहे हे त्या व्यक्तीस त्यातील कागदपत्रांवरुन कळाले होते. शेवटी ती फाइल मिळाली आणि आजवर त्याच फ्लॅटमधे आम्ही राहतोय जिची कागदपत्रे त्या फाइल मधे होती. २)अनुभव २:- एकदा नरसोबाच्या वाडीला मी नदीत अंघोळ करत होतो, ३ -४ पायर्‍या खाली,ज्यांनी नरबाच्या वाडीला कॄष्णेत स्नान केले असेल त्यांना नदीच्या प्रवाहाचा अंदाज येइल.माझ्या गळ्यात साधे कसलेसे तांब्याचे लॉकेट होते, ते मैल्यवान नव्हते की कुठल्याही इतर गोष्टींसाठी उपयुक्त नव्हते,पण मी या मंत्राचा उपयोग सुरु करताच जवळपास १० मिनीटाच एका पोहणार्‍याला ते सापडले आणि तिथेच हे कोणाचे आहे अशी विचारणा सुरु केली,मी ते माझे आहे असे सांगताच ते त्यांनी मला दिले,पण नदीच्या प्रवाहात पोहताना गेलेले लॉकेट परत मिळाले यावर माझाच बराच वेळ विश्वास बसला नव्हता. ३}घरात अनेकदा मला न मिळणार्‍या,दॄष्टीस न पडणार्‍या ,भरपुर शोध घेउन न सापडणार्‍या वस्त्यु या मंत्राने आम्हाला मिळाल्या आहेत, हो आइच्या हातुन घराची किल्ली हरवली तेव्हा ती या मंत्रानेच परत मिळाली. ४)अगदी आत्ताची गोष्ट सांगतो... मी नविन पल्सर घेतली, त्याला मी पेट्रोल लॉक बसवुन घेतले,पण त्या लॉकची मुव्हमेंट घट्ट आहे,त्यामुळे व्हॉल्व ऑन्/ऑफ करताना किल्लीवर दाब येत होता, एका प्रयत्नात ती तुटली,पण त्याची अजुन एक चावी माझ्याकडे होती. मी जवळच्याच चावीवाल्याकडे जाउन तशीच अजुन एक चावी बनवुन घेतली.ती मी माझ्या बॅगेत ठेवली,व एक चावी कीचेनला अडकवली. ऑफिसात आलो...कामाला लागलो,चाव्या पॅटच्या डाव्या खिश्यात ठेवल्या होत्या,काही वेळाने त्या बाहेर काढुन बॅगेतच ठेवावा असा विचार आला,तेव्हा चाव्या खिशातुन बाहेर काढल्या,पण ल़़क्षात आले की पेट्रोल लॉकची चावी कीचेनला नाही ! ती पडली होती ! माझ्या बॅगेत आधीच चावी वाल्याकडुन तयार केलेली चावी होती,त्यामुळे घाबरायचे कारण नव्हते,पण कीचेन मधली चावी पडली होती ते शोधणे तर गरजेचेच होते.मी परत एकदा खिसा तपासला,त्याच्यातच तर राहिली नसेल ना ? मग ज्या ज्या ठिकाणी मी गेलो होते त्या त्या ठिकाणी मी परत गेलो, ज्या मार्गाने ऑफिसात गेलो होतो त्याच मार्गाने उलट फिरुन कंपनीच्या आवारात जिथे बाइक पार्क केली होती तिथे गेलो,पण चावी काही सापडली नाही ! मग नेहमीचाच वरील उपाय केला,ऑफिसात परत जाताना मी सिक्युरिटी गार्डला सांगुन ठेवले की माझी अश्या अश्या प्रकारची चावी हरवली आहे ती सापडली तर मला कळवा,तो पर्यंत मनात अनेकदा वरील मंत्राचा प्रयोग करुन झाला होता,आणि मला चावी मिळणार याची खात्री आधीच झाली,संध्याकाळी कामावरुन घरी निघताना परत सिक्युरिटी गार्डला प्रश्न केला मेरी चाबी मिली ना ! खर तर हा प्रश्न नव्हताच ते अध्यारुतच होते माझ्यासाठी, त्यावर तो म्हणाला साब एक चाबी मिला है, आप चेक करलो वोह आपकी है क्या. मी मेमगेटवर जाउन विचारणा केली.चावी त्यांच्याकडे जमा झालेली होती. ऑफिसच्या एव्हढ्या मोठ्या कँपस मधे हरवलेली चावी परत मिळण्याची ही माझी दुसरी घटना {या आधीही एकदा चावी गहाळ झाली होती},दोन्ही वेळेला चावी मला परत मिळाली. या सर्व घटनांमध्ये वस्तु परत मिळण्याची प्रोबॅबिलीटी किती यावर तुम्ही विचार करु शकता, याला कोणी योगायोग किंवा इतर काहीही म्हणा... माझ्यासाठी हे प्रमाणित अनुभवच आहेत. या मंत्राचा संदर्भ तुम्हाला :- बोध दत्तमाहात्याचा अध्याय ४ था मधे मिळेल. {लेखक :- डॉ. वासुदेव व्यंकटेश देशमुख} जाता जाता :- गुगलुन हा मंत्र जालावर सापडतोय का ते पाहण्याचे सुद्धा प्रतय्न केले तरी माझी हरकत नाही. जे अनुभव आजवर या मंत्रा संबंधी घेतले ते तसेच लिहले आहेत. हा अनुभव मी ठाण्याच्या कट्ट्याला देखील गप्पांच्या ओघात कथन केला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 114185
प्रतिक्रिया 322

प्रतिक्रिया

In reply to by बॅटमॅन

गुलाम असा डायरेक्ट नाही, पण व्हिलन आहे अस म्हणताय म्हणुन सांगितल. या स्तोत्रात हा राजा फार महान आहे, अन त्याची स्तुती नाही आहे, उलत तुम्ही त्याच स्मरण केल की त्या गोष्टी तुम्हाला मिळतील अस सांगितलय. म्हणजे एका अर्थी तुम्ही नुसत त्याच नाव घ्या तो शोधेल. भिमरुपी मध्ये स्तुती आहे. तशी येथे नाही.

In reply to by स्पंदना

स्तुती नसली तरी अन्यत्र व्हिलन ठरवलेल्याची इथे भलामणच आहे ना? हरवलेली वस्तू शोधून द्यायचे काम दिले याचा अर्थ त्याला अ‍ॅटलीस्ट या श्लोकात व्हिलन ठरवले जात नाही हे तर उघडच आहे. इतकाच मुद्दा होता. असो.

In reply to by मृगनयनी

कोणतेही एक नाम जर सतत घेत राहिले, तर निश्चित त्या "नामा"ला एक विशिष्ट शक्ती प्राप्त होतेच
. 🎯

कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! या मंत्र प्रभावाचा पहिला अनुभव जो मी कथन केला आहे {जो माझ्या वडिलांच्या बाबतीत आहे, तेव्हा मी इयत्ता ५वीत होतो, या नंतर ही अनेक वेळा याचा अनुभव मी घेतला आहे हे वर आधीच नमूद केलेले आहे.} २०११ साली माझे इंदुर नगरीत जाणे झाले होते,त्यावेळी मार्तंड मंदिर {जुना राजवाडा} जाणे झाले होते,या आधीही मी अनेकदा इंदुर,उजैन या भागात लहाणपणा पासुन जात आलो आहे...आता काळानुरुप सर्वत्र शहरीकरणाचा वेढा वाढत चालला असल्याने सर्व भागांचे स्वरुप बदल्याचे जाणवते. स्कंद पर्वतावर शंकराने मणि आणि मल्ल या राक्षसांचा वध खंडा अर्थात तलवारीने केला त्याच खंडामुळे खंडोबा हे नामकरण झाले. मल्लारी वरुन मल्हारी हा शब्द तयार झाला तर मार्तंड शब्द कन्नड शब्द मुखमंडल मारि+तोंड = मार्तंड झाला.शंकराला मार्तंड भैरव असे ही संबोधले जाते.रविवार हा मुख्यत्वे मल्हारी मार्तंडाच्या उपासनेचा दिवस आहे. येळकोट शब्दाचा अर्थ येळु म्हणजे कन्नड भाषेत ७ संख्या दर्शवते मल्हारी मार्तंडाने ७ कोटी सैन्य घेउन मणि आणि मल्ल यांचा ७ व्या दिवशी रविवारी वध केला.मल्हारी मार्तंडाची संपूर्ण हिंदुस्थानात ११ ठिकाणी मंदिरे आहेत. १}जेजुरी २} निमगाव दावडी {पुणे} ३}शेबुड { अहमदनगर} ४}कामथवाडी ५} सातारे {औरंगाबाद} ६}पाली ७}नळदुर्ग ८} मंगसुळी {बेळगाव}९}मैलारसिंग {धारवाड}१०}मैलार देवरगुड {धारवाड} ११} मण्णमैलार {बेल्लारी} होळकर राजवंशाची हे कुलदैवत, त्यामुळे हे घराणे शैव पंथीय आहे हे आपल्या लक्षात येइल. लोकमाता या पदवीने सन्मानीत अहिल्याबाई होळकर यांचा जन्म १७२५ आणि शासनकाल १७६७ ते १७९५. अहिल्याबाई होळकर या त्यांच्या दान धर्मासाठी अत्यंत प्रसिद्ध होत्या, त्यांनी लोक कल्याण्यासाठी अनेक मंदिरांचा जिर्णोद्धार केला. धर्मशाळांचे निर्माण,बावड्यांचे निर्माण,कुंड आणि तलावांचे निर्माण तसेच गया पासुन रामेश्वर पर्यंत रस्त्याची निर्मीती केली जी आज ग्रांड ट्रंक रोड या नावाने परिचीत आहे. तर इंदुरातल्या मार्तंड मंदिरात मी अनेकवेळा गेलो होतो,पण यावेळी माझी नजर या लेखात दिलेल्या {तिथे असलेल्या} मंत्रावर यावेळीच गेली. खरतर या मंत्राचा संपूर्ण श्लोक आणि या आधी या मंत्राचा वापर कोणी केला होता का ? अशी जिज्ञासा माझ्या मनात अनेक वर्ष होती आणि यावेळी या मंदिरात त्याचे उत्तर मिळाले. MM कॅमेरा :- निकॉन पी-१०० महेश्वर स्थित श्री राज राजेश्वर मंदिरात देवी अहिल्याबाई होळकर या मंत्राने नित्य शिवाभिषेक करायच्या. या मत्राच्या उपयोगीते बद्धल फोटोतील टीप क्रमांक १ वाचल्यास खालील प्रमाणे माहिती मिळते :- महेश्वर के श्री राजराजेश्वर शिव मंदिर में परम शिवभक्त देवी अहिल्याबाई,नित्य नियम से पूजन एवंम अभिषेक करने आती थी | मंदिर के गर्भगॄह में शिवलिंग के सम्मुख बैठकर उपरोक्त अभिषेक मंत्र का जाप करती थी | कहा जात है की इस मंत्र के नित्यपाठ एवं अभिषेक मंत्र द्वारा गत वैभव एवं खोई हुई वस्तु तथा सुख समॄद्धी प्राप्त होती है ! * मला या मंत्राचा संदर्भ हवा होता तो मिळाला.

In reply to by मदनबाण

तुमचा नामस्मरणावर विश्वास असावा असं दिसतंय. त्यामुळे तुम्हाला या मंत्राचा अध्यात्मिक फायदाही होऊ शकतो. आपण जेंव्हां जन्माला येतो तेंव्हां आपण आपलं मूळ स्वरूप विसरतो. किंवा ते हरवतं. ते हरवलेलं मूळ स्वरूप या मंत्रामुळे परत गवसतं. असो.

In reply to by जेपी

कार्तवीयोर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् |तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते ! एव्हढाच.

सहज विचारतेय. इथे चर्चा करणार्‍यांपैकी मदनबाण सोडून कुणी कुठल्या मंत्राचा स्वतः प्रयोग करुन पाहिलाय का? अतिअवांतरः योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे? ;)

In reply to by कवितानागेश

योगी९०० यांच्याकडे जाउन एकदा चोरीचा आणि नंतर मंत्राचा प्रयोग करुन बघायचा असेल तर योगी९०० यांच्यासकट कोण कोण तयार आहे?
मी तयार आहे ;)

In reply to by कवितानागेश

हॅ हॅ हॅ ;) बाकी ते व्हिलनच्या नावाचे मंत्र कसे काय चांगलं काम करतात याबद्दल पब्लिकचं मौन रोचक आहे.

In reply to by बॅटमॅन

व्हिलनकडं सुद्धा साधनेची ताकद असते. व्हिलन ती तुलनेनं वाईटासाठी वापरतो. त्यामुळं एखादी शक्ती त्या कार्तवीर्य अर्जुनाला 'वश' असेल, म्हणून त्याच्या नावाचा वापर होत असेल. रावणाला, बलिला दक्षिण भारतात पूजतातच. साधना अभ्यासासारखी तर त्याबदल्यात मिळणारी शक्ती पदवीसारखी असते. नीट अभ्यास केला किंवा कॉप्या न पकडता केल्या तरी पदवी मिळतेच. पदवी माणूस बेकार आहे म्हणून नाकारता येत नाही. तिचा परिणाम बराच काळ टिकतो असा मानायला जागा आहे.

In reply to by प्यारे१

=)) म्हणजे कोण व्हिलन कोण हीरो हेच निश्चित नाही. एका पुराणात व्हिलन म्हणतात तर दुसरीकडे कोणीतरी हीरो करतं. मृत्युंजयसारख्या कादंबर्‍या अन असली पुराणे यांत कसलाच फरक नाही. वरील स्पष्टीकरण वाचून मृत्युंजय वाचून तावातावाने युक्तिवाद करणार्‍या बालकांची आठवण येते. तोच आवेश अन तितकाच पोकळ वासा.

In reply to by बॅटमॅन

आखिर कहना क्या चाहते हो! चल, सगळं झूठ आहे असं मान्य केलं. देव नाही, धर्म नाही, सगळी पुराणं पुचाट आहेत, झालं केलं मान्य. आम्ही आतापर्यंतचा वेळ फुकट घालवला. झाली चूक. मान्य. वरचे प्रतिसाद रद्दबातल समजावेत! कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा! आता काय करुया?

In reply to by प्यारे१

कुठल्या कन्स्ट्रक्टीव्ह मार्गानं तुम्ही आम्हाला नेणार आहात ते सांगा!
असले छंद आम्हांला नाहीत.
आता काय करुया?
पाहिजे ते करा! तुम्हाला कोण अडवतंय????

In reply to by कवितानागेश

आहो माझा मोबाईल आधीच गेलाय चोरीला... आम्हाला नका चोरीला लावू... तुम्ही सर्व या मंत्राचे पठण करा आणि जर मोबाईल मिळाला तर मी स्वतः १ मार्च ( की ८ मार्च ?) च्या घारापुरीच्या कट्ट्याला येऊन सर्वांना पाणीपुरी खाऊ घालीन...आईस्क्रीमपण...!! चोरावर चेटूक केल्याने मला जादूटोणा कायद्याअंतर्गत पकडले जाईल काय? दुष्टप्रव्रुत्तीना आळा घालावा म्हणतोय मंत्रसामर्थ्याचा उपयोग करून..!! मदनबाण : तुम्हाला आता बहुतेक जादुटोणा कायद्यामुळे अटक होऊ शकते..

In reply to by मदनबाण

एक चित्रपट पाहिला होता Now you see me! त्यात ४ जादुगार त्यांचा जादुचा प्रयोग म्हणुन लाइव शो मधे बँक जादुने लुटतात. अर्थातच शो संपल्यावर एफ बी आय त्यांना ताब्यात घेते व बँक कशी लूटली याची चौकशी करते. त्यात जादुच्या शक्यते बाबत मस्त धमाल संवाद आहे. तुम्हाला अटक झाली की तुम्ही पोलीसांना तशीच उत्तरे द्यावीत म्हणून हा चित्रपट आधीच अवश्य बघावा अशी शिफारस करतो ;)

In reply to by आत्मशून्य

दाभोळकरांचे याबाबत मनापासुन कौतुक वाटते. उगा आइने मुलीला देवासमोर निरंजन लावायला लावले... अथवा पोराला स्त्रोत्र म्हणायची सक्ती केली म्हणून कोर्टात खेचता येत नाही.

In reply to by आत्मशून्य

शुभंकरोतीचे, वदनी कवळ घेता चे दिवस आणि संस्कार कधीच गेले ! असे करणारे शुद्ध मराठीत बॅकवर्ड लोक म्हणुन पहायचा जमाना आहे हा....

In reply to by कवितानागेश

या मंत्राचा प्रयोग केलाय, अर्थातच आज्जी सांगायची म्हणून. नंतर तो विस्मृतीत गेला. आज हा धागा पाहून आठवला. माझ्या हरवलेल्या गोष्टी सापडल्या का? तर हो! अगदी सगळ्या! मंत्रामुळे सापडल्या का? तर माहीत नाही. मंत्र विसरल्यावर किंवा तो वापरणे विसरल्यावरही वस्तू हरवल्या व सापडल्या म्हणून जे अजून वापरतात त्यांना नावे ठेवण्यात अर्थ नाही. तुम्हाला काय करायचे आहे ते बघा! माऊश्री, आपण म्हणता तसा प्रयोग, चोरी व सापडणे यांस मी तयार नाही.

कार्तवीर्य अर्जुन ही पुराणांत खल व्यक्तिरेखा म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या हजार हातांच्या बळावर उन्मत्त झालेला हा अर्जुन ऋषीमुनींशिवाय साक्षात देवादिकानांनाही त्रास देत फिरायचा. जमदग्नीची धेनू बलात्काराने हरण केली म्हणून भार्गवरामाने त्याचा वध केला. ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी ! कार्तवीर्याचा जन्म, गर्ग ऋषींचा त्याला उपदेश व दत्तमाहात्म्याचे कथन. कार्तवीर्याची दत्तभेट, परीक्षा व त्याला दत्तप्रभूंचे वरदान व राज्यारोहण. कार्तवीर्याची विरक्ति, दत्तप्रभूंकडे आगमन, स्तुति, पुनःपरीक्षा व त्याचे प्रश्न. अवांतर :- रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होता. शंकाराने त्याचे आत्मलिंग रावणाला देवु केले होते या वरुन त्याची शंकाराप्रती भक्ती किती उच्चकोटीची होती हे सहज लक्षात येइल. असुर असुन तो विद्वत्तेत आणि भक्तीत कुठेच कमी नव्हता ! एकाद्या व्यक्तीची / व्यक्तीरेखेची एकच बाजु पाहुन मत बनवणे चुकीचे ठरेल. जाता जाता :- तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही. संपादक मंडळास विनंती :- या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही.

In reply to by मदनबाण

>>या धाग्यात वल्ली आणि बॅटमॅन यांचे जे अवांतर प्रतिसाद आहेत ते कॄपया काढुन टाकावेत, अथवा त्यांना नविन धागा काढुन तिथे टिंगलटवाळी करण्यास मूभा द्यावी. हा धागा वाचनमात्र जरी केला तरी माझी त्याला हरकत नाही. छे !! असं कसं? उलट संपादकावर शिंतोडे उडवले म्हणून तुमचाच प्रतिसाद काढतील. (आता मी हे असं लिहीलं ,म्हणून माझा प्रतिसादही जाईल तो निराळाच !!)

In reply to by प्यारे१

सदस्याने सदस्य म्हणून चेष्टा केल्यावर सदस्य संपादक म्हणून कारवाई करु शकत असावेत. ;)

In reply to by प्रचेतस

>>संपादकांविषयी विनाकारण कुत्सित बोलल्यामुळे आता बरं वाटत असेल ना जरा. जे दिसलंय ते बोललो, आता तुम्हाला ते कुत्सित वाटलं असेल तर तसं समजा.

In reply to by मदनबाण

तुम्हा दोघांचे {वल्ली आणि बॅटमॅन}एकंदर प्रतिसाद आणि त्यातुन उपहास करण्याचा चाललेला क्षीण प्रयत्न पाहता या पुढे तुमच्या कुठल्याही प्रश्नांना मी उत्तर देणार नाही.
उपहास अथवा टिंगलटवाळी करण्याचा कुठलाही प्रयत्न नाही किंवा दुसर्‍यांच्या श्रद्धांचा अवमान करण्याचा हेतूही नाही. किञ्चितसा उपहासात्मक का होईना पण विरोधाचा सूरही नको असेल तर मात्र असोच.
ह्म्म... कार्तवीर्याची दुसरी बाजु देखील माहित असण्यास हरकत नसावी !
तू दिलेले दत्ताबद्दलचे इतर दुवेही वाचलेत. हे दत्तमाहात्म्य तुलनेने बरेच अलीकडचे आहे. ज्या मूळ दत्तपुराणावरून हे रचले गेले आहे ते दत्तपुराण साधारण १२/१३ व्या शतकात रचले गेले असावे. दत्ताचा सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात येतो. दत्ताच्या वरदानामुळे कार्तवीर्याला सहस्र हात लाभले हा इतका आणि इतकाच उल्लेख आहे जो माझ्या मताप्रमाणे प्रक्षिप्त आहे. अर्थात ५/६ व्या शतकात (अगदी गुप्तकाळानंतरच) महाभारतात घुसडला गेला असावा. तस्मात आपण हे कितपत ग्राह्य धरावे ह्याबाबतीत शंकाच आहे.
रावण जरी राक्षस होता तरी तो दशग्रंथी ब्राम्हण होता
हे मान्यच. रावण हा विश्रवा मुनीचा व राक्षसकन्या केकसीचा पुत्र. वेदांचे अध्ययन त्याने केले होतेच असे स्पष्ट उल्लेख आहेतच. पण यावरून महाभारतातील यक्षप्रश्नांची आठवण होते. यक्षः हे राजा, कुल, वृत्त, वेदाध्ययन आणि वेदांचे ज्ञान यापैकी कोणत्या उपायाने ब्राह्मण्य प्राप्त होते. युधिष्ठिरः कुल हे ब्राह्मण्याचे साधन नव्हे, वेदाध्ययन आणि त्यांचे ज्ञान हे एकच साधन असून तेही ब्राह्मण्याचे साधन नव्हे. केवळ वृत्त अथवा सदाचार हेच एकमेव ब्राह्मण्याचे साधन आहे. चारी वेदांचे अध्ययन करूनही जो दुर्वृत्त आहे तो शूद्रांहूनही हीन होय. वृत्तं यत्नेन संरक्ष्यं ब्राह्मणेन विशेषतः | अक्षीणवृत्तो न क्षीणो वृत्ततस्तु हतो हतः ||

In reply to by प्रचेतस

ज्या मूळ दत्तपुराणावरून हे रचले गेले आहे ते दत्तपुराण साधारण १२/१३ व्या शतकात रचले गेले असावे. दत्ताचा सर्वात जुना उल्लेख माझ्या माहितीप्रमाणे महाभारतात येतो. दत्ताच्या वरदानामुळे कार्तवीर्याला सहस्र हात लाभले हा इतका आणि इतकाच उल्लेख आहे जो माझ्या मताप्रमाणे प्रक्षिप्त आहे. अर्थात ५/६ व्या शतकात (अगदी गुप्तकाळानंतरच) महाभारतात घुसडला गेला असावा. तस्मात आपण हे कितपत ग्राह्य धरावे ह्याबाबतीत शंकाच आहे. तुझ्या जवळपास प्रत्येक प्रतिसादात घुसडला गेला असावा,प्रक्षिप्त असावे हे मी बर्‍याच वेळा वाचले आहे.याचे दुवे उपलब्ध करुन दिल्यास वाचन करता येइल.माझ्या परीने जेव्हा जेव्हा शक्य झाले तेव्हा जवळपास कुठल्याही विषयाच्या धाग्यावर मी त्या विषयी माहिती शोधण्याचा प्रयत्न करतो आणि दुवे देतो म्हणजे समोरच्याला तुमचा मुद्दा पडताळुन पाहता येतो. या धाग्यावरही तुझ्या प्रश्नांना उत्तर म्हणुन दिलेले दुवे योग्यच आहेत. जे या धाग्यात मी वारंवार म्हणत आलो आहे तेच परत एकदा सांगतो की नुसत्या शंका काढायच्या असतील तर ते कोणीही काढु शकतो.तू वाचण्यास संदर्भ देणार नसलास तर दरवेळा मलाही तुझा विधाना बद्धल शंका वाटते असे सातत्याने म्हणता येउ शकेल. ;) रावणाचा विषय मधेच तुम्ही दोघांनी काढला, त्यामुळे मला उदा. देताना असे निदर्शनास आणायचे होते की जर रावण व्हिलन ठरत असेल तरी त्याच्या गुणांकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही आणि त्याच्या क्षमतेकडे देखील्.तसेच रावणावर जर मंत्र चालत नसेल तर रावणकृत शिवतांडव स्त्रोत्र कसे चालते ? तो व्हिलन आहे ना ? ;) बाकी रावण व्हिलन असला तरीही हिंदूस्थानात आजही काही ठिकाणी त्याची पुजा केली जाते.तसेच रावणाची बायको मंदोदरी हिचे माहेर जयपुर पासुन जवळ असलेले मंदोर {Mandore} असल्याचे समजते,व तिथेही त्याचें मंदिर उभारण्यात आलेले आहे. संदर्भ :- In MP's Ravan village, the demon king is a revered deity A temple in Jodhpur for Ravana बाकी वटवाघुळ मानवाने दिलेले दोन्ही दुवे वाचुन त्यांचे मत काय आहे हे अजुन सांगायचे कष्ट घेतलेले या धाग्यात दिसले नाहीत ! ;) असो... त्याच्याकडुन ती अपेक्षा ठेवणे देखील गैर आहे हे त्याच्या प्रतिसादातुन व्यक्त होणार्‍या विचार सरणीतुन जाणवते.

In reply to by मदनबाण

तू वाचण्यास संदर्भ देणार नसलास तर दरवेळा मलाही तुझा विधाना बद्धल शंका वाटते असे सातत्याने म्हणता येउ शकेल.
मान्य. महाभारतातील कार्तवीर्य अर्जुनाबद्दलच्या दत्ताच्या वरदानाबाबतच उल्लेख येथे बघ http://www.sacred-texts.com/hin/m03/m03115.htm आता उल्लेख प्रक्षिप्त असण्याबाबत- उल्लेख घुसडले गेल्याबद्दलचे थेट दुवे देता येत नाहीत. पण साधारण पुराणे वेदोत्तर काळात रचले गेल्याबद्दलचे सुस्पष्ट पुरावे आहेत. गरूड पुराण, विष्णू पुराण, ब्रह्म पुराण, वराहपुराण, स्कंद पुराण यांमध्ये सातवाहन राजे, चंद्रगुप्त मौर्य त्याचा पुत्र बिंदुसार आणि सम्राट अशोक यांचे उल्लेख आहेत. नमुन्यादाखल विष्णूपुराणातला हा संदर्भ बघ. http://www.sacred-texts.com/hin/vp/vp117.htm साहजिकच हे पुराण नंतर रचले गेले आहे. तिथे जरी ह्या राजांचा उल्लेख भविष्यकालातील राजे असा असला तरी तो केवळ हे पुराण अत्यंत जुन्या काळात रचले गेले आहे हे दाखवण्यापुरताच आहे. तात्पर्य काय तर वेद, पुराणे ह्यात स्थलकालांची बरीच उदाहरणे येतात त्यावरून ह्यांचा काळ साधारणपणे काढता येतो. महाभारताचेच उदाहरण घेतले तर त्यातील काही घटनांचा उल्लेख कधी घुसडण्यात आला असावा ते सांगता येते. उदा. महाभारतात यवन, शक, हूणादिकांचे उल्लेख आहेत ते सर्व मौर्यकाळानंतरचे आहेत कारण त्याआधी भारतावर ह्या टोळ्यांची आक्रमणे झाली नव्हती. वेदांतही ह्यांचे उल्लेख आढळत नाहीत. तस्मात प्रत्येक वेळी दुवे देणे शक्य नसते. आता शिवतांडवस्तोत्राबद्दल म्हटले तर वाल्मिकी रामायणात हे स्तोत्रच नाही. त्याची एकंदरीत भाषा बघता शंकराचार्यांसारख्या महान व्यक्तिनेच ते रचले असावे याची शक्यता जास्त आहे. पण ह्याचा रचयिता नक्की कोण ते माहित नाही. पण रावण खासच नाही.

In reply to by प्रचेतस

ह्म्म... हरकत नाही परंतु त्यामुळे मी दिलेले संदर्भ चुकीचे ठरतात असा अर्थ होत नाही. उल्लेख घुसडले गेल्याबद्दलचे थेट दुवे देता येत नाहीत. हा.आता मुद्द्यावर आलास,तुमच्याच {{ इथे फक्त तुला उद्धेशुन नाही}} शब्दात सांगायचे झाले तर जर पुरावा नसेल तर सत्य कसे मानायचे ? ;) असो... इथे मी बरोबर किंवा तू किंवा इतर कोणीही चूक आहे हे मला दर्शवायचे नाही, माझा तो उद्देश नाही. जो अनुभव घेतला तोच लिहला. ज्यांना मंत्राची प्रचिती /अनुभव याच्या सत्यतेची खात्री पटवायची असेल त्यांनी स्वतः प्रयत्न करुन पहावा हीच माफक अपेक्षा आहे. :) साखर गोड लागते हे समजुन घेण्यासाठी ती चाखावीच लागते. पटले तर घ्या नाहीतर सोडुन द्या... ;) उगाच साखर गोड कशी हे तुम्हीच पटवुन द्या...ती कडुच आहे. अश्या विधानांना अर्थ उरत नाही.साखर चाखा आणि पहा !

In reply to by मदनबाण

थेट दुवे देता येत नाहित म्हणजे म्हणजे हे पुरावे शोधायचे काम जालावर कष्टप्रद आहे. त्यासाठी वेद, पुराणे आदी साधने सखोलपणे अभ्यासावी लागतात. जालावर हे फारच अभावाने दिसते. आता महाभारतातील प्रक्षिप्त भाग ओळखण्यासाठी ते सर्वच वाचावे लागते .कमीत कमी 3 ते 4 वाचनानंतर ते निश्चितपणे ओळखता येते असे माझ्या अनुभवानुसार सांगतो.काहिवेळा मुर्तिशास्त्राचा अभ्यासही कामी येतो. उदा. गीतेतील अध्यायात विष्णूचे वर्णन शंख,चक्र, गदा, पद्म असे आहे तर विष्णूच्या गुप्तोत्ताराकाली न मूर्ति ह्या वर्णनाबरहुकूम आढळतात. त्याआधीच्या विष्णू मूर्त्तित पद्माच्या जागी अभयमुद्रा दिसते. साहजिकच ह्या वरून हे अध्याय नंतर लिहिले गेले असावेत असा तर्क लढवता येतो. आता ह्याचे पुरावे आयकोनोग्राफ़ीशिवाय कुठून आणनार? बाकी तुझ्या मतांचा आणि त्या मागच्या भावनेचा आदर आहेच. त्यावर टीका नाहीच आणि नसेल.

कॉग्निटिव्ह बिहेवियर थेरपी मधे माईंड डायव्हर्टींग टेक्निक्स साठी स्त्रोत्र,म्ंत्र, पाढे यासारख्या गोष्टींचा देखील उपयोग होतो. विचारांच्या दुष्टचक्राशी सामना करायला ही टेक्निक्स उपयोगाला येतात. हा माझ्यासारख्याचा देखील स्वानुभव आहे. आलामंतर कोलामंतर छू हा मंत्र आपण लहानमुलांना दुखापत झाली की वापरतो. त्याला वेदना होत असते पण आपण हा मंत्र म्हणून त्याचे लक्ष वेदनेपासून विचलीत करतो. नंतर तो आपले दु:ख विसरुन हसायला पण लागतो. खरतर आलामंतर कोलामंतर छू या शब्दांना काय अर्थ आहे का? एकदा मला कुणी तरी विचारत होत की गण गण गणात बोते म्हणजे काय? मी त्याला म्हणल आलामंतर कोलामंतर छू! धागाकर्त्याने दिलेल्या उदाहरणे आपल्या आयुष्यात घडत असतात. अशा प्रसंगात मन भरकटते, मनावर चिंता काळजी वगैरे गोष्टींचा ताण येतो, अशा प्रसंगी मन शांत ठेवण्यासाठी या (अंध)श्रद्धांचा उपयोग होतो.

In reply to by बॅटमॅन

ब्याट्या काकांचे म्हणणे बरोबर आहे. पण "आला मंतर कोला मंतर छू " या शब्दात सुद्धा मंत्र सामर्थ्य आहे हे तुला ठौक आहे का? हा मंत्र उलट लिहीला तर त्यात एक गुप्त संदेश आहे. हा मंत्र अकरा , एकवीस किंवा एक्कावन्न वेळा उलट लिहीला आणि अक्षरे एका विषिष्ठ क्रमाने जुळवलीत तर तो गुप्त संदेश त्या त्या प्रमाणात तुमच्या हाती लागेल. धन प्राप्ती होईल, मूल नसलेल्यास मूल होईल , स्वर्गात जागा रीझर्व होईल , मोक्ष मिळेल , क्षीरसागरात हंसाचा जन्म मिळेल.. ई.

In reply to by विजुभाऊ

अरे हो की हो विजुभौ!!! विसरलोच बघा. मूर्खासारखे सैन्य बिन्य बाळगण्यापेक्षा कमंडलूधारी साधूंचीच फौज ठेवायला पाहिजे होती भारतानं, पाकडे मेले असते क्षणार्धात! मूर्खागमनी अन अबुद्धशेपपणाचा कळस आहे झालं.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रकाका आपण दोन्ही बाजुने विचार करता हे मला ठावुक आहे. ;) फक्त एकच सांगावेसे वाटले की गॉगल लावला नजरेस सगळ्या वस्तु त्याच रंगाच्या दिसु लागतात्.तसेच अंधश्रद्धे बाबतीत आहे. ;) आपल्या वाचनासाठी :- Mantra A mantra can make the impossible possible Benefits of Mantra Chanting The Power of Mantra Chanting

ओबामाला हा मंत्र माहीत असता तर उगीच पाकिस्तानात सैन्य घुसवायची गरजच पडली नसती. पाच पन्नास माणसं हा मंत्र म्हणत बसवली असती की तो ओसामा स्वतःहून चालत व्हाईट हाऊस मधे गेला असता. काय म्हणता?

In reply to by रामपुरी

हा.हा.हा चांगला विनोद आहे, पण ओसामा ओबामाच्या घरी राहत नव्हता, की तो ओबामाची कुठलीही वस्तु नव्हता ! ;) शिवाय तो पळाला होता अफगाणिस्तानातुन पाकिस्तानात, हरवला नव्हता कै. ;)

In reply to by मदनबाण

मग त्या मंत्रावर एक "*" छापून खाली "अटी लागू" हा जाहीरातीतला संदेश सुद्धा लिहा की. म्हणजे आमच्यासारख्या अडाणी, सामान्य पामरांना समजेल की हा मंत्र कधी चालणार आणि कधी नाही ते. (अवांतर: "बाटगा धर्मांतरीत जास्त कडवा" या चालीवर आता "जास्त सुशिक्षित जास्त अंधश्रद्ध" अशी नवीन म्हण रुढ करता येईल काय? आणखी उदाहरणे द्यायची झालीच तर नाडीवाले, ओशोवाले, इत्यादी इत्यादी)

In reply to by रामपुरी

जास्त सुशिक्षित जास्त अंधश्रद्ध
अगदी अगदी!! अशिक्षित माणूस फार तर फार 'आमचे म्हाराज' म्हणेल पण हे सुशिक्षित चार चोपड्यांची नावे सांगतील इतकाच काय तो फरक. बाकी सगळं सेम टु सेम!

In reply to by बॅटमॅन

(नया दिन नयी शुरुवात!) हे सगळ्यासाठीच लागू होतं. नाही का? आमचा अमुक म्हणतो, आमचा तमुक म्हणतो, ही लिंक, ती लिंक चालूच असतंय की. तिथं विश्वास ठेवायला प्रत्यवाय येत नाही तो? ;) कालच्या मटाला ९५ % संशोधनं बोगस असतात अशी बातमी होती ब्वा! ;)

In reply to by प्यारे१

"कालच्या मटाला ९५ % संशोधनं बोगस असतात अशी बातमी होती ब्वा" कालच्या .....ला बातमी होती "मटा बोगस आहे" :)

In reply to by रामपुरी

पाच पन्नास माणसं हा मंत्र म्हणत बसवली असती की तो ओसामा स्वतःहून चालत व्हाईट हाऊस मधे गेला असता. काय म्हणता? काहितरीच काय?..ओसामा तीन/चार बायकांबरोबर बरेच दिवस रहात होता. त्याला बाहेरही पडता येत नव्हते..म्हणून त्याने स्वतः ओबामाला फोनकरून स्वत:चीच सुपारी दिली.

आम्रिकेने पण हाच मंत्र वापरायला हवा होता...तो लादेन केव्हाचा सापडला असता...च्यायला उगाच बाँब्ची फेकाफेकी झाली :) अजुन एक...हा मंत्र गुगलबाबाला अस्सल भारतीय पर्याय असेल का? म्हणजे आपण बोलु शकु...फक्त मंत्र म्हणुन काहीही न करता शोधता येइल हवे ते :) आणि हे तर आपल्या पुराणांमधे आधीच लिहिले आहे :) आपण कित्ती कित्ती जगाच्य पुढे होतो "तेव्हा"

बाणा, काही म्हण, मूळ धाग्यापेक्षा तुझा अवांतराचा धागा नुसता धावतो आहे! :-/

In reply to by मदनबाण

गप्प बैस! माझा प्रतिसाद मात्र खाली ढकलला गेला तो मंत्र म्हणून वर आण. कधी नव्हे तो प्रतिसाद द्यायचा आणि असं व्हायचं म्हणजे वाईट वाटणारच की!

शेवटी श्रद्धा, अंधश्रद्धा, झाकलेल्या मुठीत लपलेल्या शास्त्राच्या तशाच शास्त्रीय कसोट्या, पहिले प्रयोग कि अनुभव (कामाचे/बिनकामाचे), थोडंफार स्कोर सेटलींग, कोण जास्त मट्ठ हा वाद... इत्यादी सर्व सोपस्कार पार पाडुन अपेक्षेप्रमाणे हा धागा शतक ठोकता झाला. बरं वाटलं. फास्टेस्ट शतकाचा विक्रम य धाग्याच्या नावावर येईल काय? अवांतरः एक क्षुल्लक मुद्दा चर्चेत आलाच नाहि. "मंत्र" शब्दाचा सर्व क्रियाकलाप "मन" या एण्टीटीवर अवलंबुन आहे. आपण सो कॉल्ड शास्त्रीय कसोट्यांच्या आधारे गणीतीय प्रमेय सोडवण्याच्या पद्धतीचा अवलंब करुन मंत्रांच्या प्रभावाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न (नक्की करतोय का?? दावा करायला काय हरकत आहे म्हणा ;) ) ज्या "मंत्रा"वर करायचा विचार करतोय, त्याची प्राथमीक रिक्वायएमेण्ट "मन" या तत्वाच्या क्लॅरीटीशी आहे. कुठलं तत्व अपेक्षीत आहे इथे? तर ते म्हणजे स्थळ-काळ बाधीत जगात स्थळ-काळ अबाधीत तत्वाचं रिप्रझेंटेशन करणारं तत्व... ज्याला "मन" म्हणतात. दोन कॉम्प्लेक्स केमीकल्स एकत्र येऊन एक ट्युमर/मासांचा गोळा तयार करतात व तो गोळा वाढत वाढत एक दिवस टरफल फोडुन बाहेर येतो, हा फिनॉमिनॉन म्हणजे एका "बाळाचा जन्म" होय, असा प्रत्यारोप करणारं तत्व म्हणजे मन. मंत्रांच्या प्रभावाचा तपास करताना इथुन सुरुवात करावी लागते. असो. एण्टरटेनमेण्टच्या उद्दीष्टाने प्रेरीत चर्चेत तसंही असले मुद्दे यायची गरज नाहि...

In reply to by अर्धवटराव

http://misalpav.com/comment/553986#comment-553986 >>>प्रत्येक प्रयोगासाठी लागणारी उपकरणं वेगवेगळी असतात हे मान्य नाही तर का बोलतोय आपण? (मी किती शाना हाय ते नको का सांगायला? ;) ) >>>एण्टरटेनमेण्टच्या उद्दीष्टाने प्रेरीत चर्चेत तसंही असले मुद्दे यायची गरज नाहि... ह्याबाबत लई वेळा सहमत!

In reply to by बॅटमॅन

अम्म्म्म्म्म्म्.... बॅट्या...आयला, आम्हाला तुझे सगळे मुद्दे, गुद्दे, युद्धे मान्य असतात...नव्हे, आवडतात प्रचंड...आणि तुला आमचा फकस्त येक्क मुद्दा मान्य होय...इ ना चॉलबे. असो...चॉलबे चॉलबे. >> पुढे -- पुढे एकच...भंग का रंग जमा हो चकाचका...फिर लो पान चबाय...

In reply to by धन्या

सायकॉलॉजी इज द ओन्ली सायन्स विदाउट डेफीनेशन असं म्हणतात ना... जिथे मोजमापाची परिमाणं तयार करता येत नाहि पण परिणाम सुद्धा नाकारतायेत नाहि. ते मिस्टीसीझम नाहि, पण तर्काला पुरेसा वाव पण देत नाहि.

इतका विनोदी धागा यापूर्वी कधीच वाचला नव्हता. पाशवी शक्तींनी वाचायला पाहिजे होता. त्यांच्या प्रतिक्रियांनी आणखीनच मौज वाटली असती. बाकी बॅटमन यांची तुफानी बॅटिंग बघून, त्यांनी बॅटस्मन हे नांव घ्यावे असे सुचवतो.