आज आसु मझ्या
डोळा आले
ते पाहुन हसु तुझ्या
ओठी आले
क्वचितच घडते
असे कधी कधी
दुखावतो जेव्हा
मीही अधी मधी
कणखर म्हणवतो
पुरुष आम्ही स्वतःस
तरी अलगद फसतो
अशाच हळव्या क्षणांस
मग येतेस तु जवळ
ठेवतेस डोक्यावर हात
नकळत सांगुन जातेस
आहेना माझी साथ
मीही मग हसतो
हलकेच श्वास सोडतो
ठेवतो अलगद डोके
ओंजळीत तुझ्या.....
- कवी म. ना. दे.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1706
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है मस्तच
क्या बात है मस्तच
छान...
छान...
बर्यापैकी आवडली.
बर्यापैकी आवडली.
शेवटच्या कडव्यात अजून उत्कटपणा हवा होता का? शब्द चपखल नाहीत असं वाटतंय.
नक्की विचर करीन,,,,,,
In reply to बर्यापैकी आवडली. by प्यारे१
नक्की विचर करीन,,,,,,
तुम्च्य सल्ल्याचा नक्कि विचार करीन
धन्यवाद
सर्वच प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद