काळा घोडा फेस्टिवल कट्टा - वृत्तांत (१)
या कट्ट्याची घोषणा झाली आणि कट्टा गाठायचाच असे ठरविले. एक तर मी काळा घोडा महोत्सवाला अजुन कधीच गेलो नाही. त्याही पलिकडे मिपा गाजवणारे मुवी आणि माहितीचा खजिना असणारे रामदास यांच्या भेटीची ओढ. चार हौशी भटक्यांनी एकत्र यावं, उनाडावं, मुंबईच्या जुन्या आठवणी काढाव्यात, अनेकदा पाहिलेल्या, आपल्या नसूनही आपल्या वाटणार्या वास्तू पाहाव्यात यासारखा आनंद नाही. अशा कार्यक्रमाला रुपरेषा नसते. तो आपोआप पुढे सरकत असतो.
शनिवार ८ तारखेला सी एस टी च्या आसपास भेटायचे ठरले होते. मी थोडा आळस केला आणि आम्हाला म्हणजे माझ्यामुळे रामदासनाही जरा उशीर झाला. आम्ही घाटकोपर गाठतोय तो मुविंचा फोन! रामदासांनी २०-२५ मिनिटांत पोचतो असे सांगितले आणि नव्या पूर्व मुक्त मार्गामुळे आम्ही अवघ्या ४५ मिनिटात ठाणे ते फोर्ट हे अंतर पार पाडले. पोचता पोचता जरा जमवाजमव करत रामदासांनी मुविंना सी एस टी वरुन निघुन डी एन मार्गावर पी एम मार्गाच्या छेदबिंदूवर सिटी बँकेजवळ यायला सांगितले आणि आम्ही तिथे पोचेपर्यंत श्री व सौ मुवि आणि भाते हजर झाले.
मंडळी नाश्ता-चहा करुन आली होती, संस्थळाच्या नावाला जागुन सकाळीच मिसळ्पावाचा नाश्ता झाला होता. सोबत मुविंनी आणलेल्या इडल्याही होत्या. (त्यांनी आल्याच्या वड्याही आणल्या होत्या, त्या पुढे सत्कारणी लागल्याच).
मग मंडळींनी आम्हाला नाश्त्याला साथ दिली. खास रामदासांच्या फर्माईशीनुसार आम्ही त्यांच्या कचेरीसमोरच्या स्वागत मध्ये गेलो. तिथली तमाम प्रजा रामदासांना ओळखत होती हे सांगायला नको. तिथला खास रसमवडा आम्ही मागवला. मुळात रसम सगऴ्यांनाच जमते असे नाहे, ते इथे उत्तमच होते शिवाय वडेही अगदी मऊसूत होते. पाठोपाठ पोहे झाले आणि कॉफीने सांगता झाली.
आता आम्ही ताजेतवाने होऊन आतल्या बाजुने मुंबई समाचार मार्गे निघालो. मुंबई समाचार हे सर्वात जुने मुंबईतले गुजराती वर्तमानपत्र. तिथुन जाताना त्या लाल ईमारतीची छबी टिपावीशी वाटली.
समोर थोडे पुढे जाताच हॉर्निमन सर्कल आले. 'सगळी जुनी इंग्रजी नावे बदलली पण हे नाव अजुन का बदलले नाही असा प्रश्न अनेकांना पडतो, मात्र हॉर्निमन हे बदललेलेच नांव आहे हे त्यांना माहित नाही' - रामदासांनी माहिती पुरविली. मूळचे एल्फिन्स्टन सर्कल भारतिय स्वातंत्र्यलढ्यास पाठिंबा देणार्या बेंजामिन गाय होर्निमन या इंग्रज पत्रकाराच्या स्मरणार्थ 'हॉर्निमन सर्कल' झाले. इथुन समोर हॉर्निमन सर्कल कडे तोंड करुन उभे राहिले असता उजवीकडे 'एल्फिन्स्टन बिल्डिंग' अजुनही उभी आहे, मात्र पूर्वीच्या चर्च रस्त्याचे नाव आता वीर नरिमन मार्ग आहे.
सहजच लक्ष समोरच्या चर्चच्या उंच पांढर्या मनोर्याकडे गेले. हेच ते सुप्रसिद्ध सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च, ज्यामुळे पश्चिमेच्या परिसराला चर्चगेट हे नाव पडले. हे चर्च १७१८ सालचे म्हणजे तब्ब्ल २९६ वर्षे जुने आहे.
एकीकडे या भव्य एमारती पाहत असता रामदासांनी आमचे लक्ष एका अगदी लहानश्या बैठ्या वास्तुकडे वेधले. ही हॉर्निमन सर्कलची पाणपोई, कुण्या माणकुवरबाईने १८७३ साली बांधली होती. या पाणपोईच्या परिघातले जमिनीचे चीरे मूळचेच असावेत.
मुविंना गुप्तधनाचा लाभ
हा पिण्याच्या पाण्याचा तांब्याचा हंडा, ज्यातुन वाट्सरुंना पिण्याचे पाणी घेता येत असे.
रामदास जैयत तयारीत
रामदासांनी स्थापत्या विषयक निरनिराळ्या बांधकाम शैली दाखविणारे पुस्तक आणले होते. सर्वजण माहिती ऐकण्यासाठी गोळा झाले.
त्या पुस्तकात दाखविल्याप्रमाणे काही चेहेरे समोरच्या इंमारतींवर कोरलेले दिसले.
ते टिपत असता पुन्हा एकदा वेगळ्या अंगाने सेंट थॉमस चर्च दिसले आणि अर्थातच ते टिपले.
खरेतर हा काळाघोडा महोत्सव कट्टा पण इतके रंगलो होतो, की क्षणभर पुढे काळ्याघोड्याला लवकरात लवकर पोचायचे आहे हेही विसरलो. तसे आपण या भागातुन जातो येतो पण असा निवांतपणा आणि हातात कॅमेरा नसतो, बरोबर असे मुवि दांपत्य, रामदास, भाते वगैरे नसतात.
क्रमशः

वर्गीकरण
ओपनिंग जोरदार जाहलेली आहे..
In reply to ओपनिंग जोरदार जाहलेली आहे.. by अत्रुप्त आत्मा
+१
मस्त सुरुवात....
खूपच छान सुरुवात!
वरून पाचवे, वडा प्लेट चे
भारी चाललीये सहल! क्रमश:
मस्त ! पुढचा भाग सुद्धा लवकर
In reply to मस्त ! पुढचा भाग सुद्धा लवकर by मदनबाण
पुढील भागाच्या प्रतिक्षेत आहे
मस्त
मस्त व्रुत्तांत....
खुप[ छान!
काळा घोडा उत्स्व कधीच बघितलेला नाहिये त्यामुळे पुढिल भाग लवकर येवुद्यात.
मस्त झालेला दिसतो आहे कट्टा!
सुरेख .......
माझ्या दुर्दैवानी मी हे सर्व मिसवल … ;(
मस्तच!
In reply to मस्तच! by पैसा
सर्वसाक्षींना लिहीण्याची विनंती , रामदासकाकांनी केली.
कट्टा नेहमीप्रमाणे जोरदार
वाचतेय..
वा. सुंदर. कट्ट्ञाचा वृत्तांत
जबरी... फोटो तर एकसोएक आलेत..
सहीच जमलाय वृत्तांत!! पुभाप्र
ती पाणपोई
रामदास काकांसोबत कट्टा..!!!
छानच! वृत्तांत आणि फोटोसुध्दा!
In reply to छानच! वृत्तांत आणि फोटोसुध्दा! by भाते
ये हुई ना बात! र वि वा र !!
In reply to छानच! वृत्तांत आणि फोटोसुध्दा! by भाते
+१
In reply to +१ by चिप्लुन्कर
+ १००
कट्टा
मस्त वृत्तांत... फोटो पाहुन
छान! लेखकाचे मराठी शब्द
In reply to छान! लेखकाचे मराठी शब्द by बंडा मामा
काळा घोडा 'उत्सव' असे करु शकाल का?
In reply to छान! लेखकाचे मराठी शब्द by बंडा मामा
मराठी
In reply to मराठी by सर्वसाक्षी
शब्दश: नामांकरण
सुंदर
छान
छानच!
मस्त
फोटो का दिसत नाहीत?