Skip to main content

तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 31/01/2014 05:08 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग! प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

वाचने 42531
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. खरयं... प्रेम ठरवुन करताच येत नाही. ते फक्त होत. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. अरेच्च्या फक्त ३ वेळाच ! मला वाटल हा आकडा जास्त असावा ! ;) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? हॅहॅहॅ... अजुन तरी आमच्या आयुष्यात असा गोल्डनमयी दिवस उजाडला नाहीये... परंतु... मला गाण्याची लयं हौस असल्याने एक दुवा देतो :- I Love You...I Love You...I Love You - Meri Neendon Mein Tu

In reply to by मदनबाण

एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते
टायपो असावा. मी एका दिवसात तीनदा प्रेमात पडतो कधिकधी

In reply to by सुहास झेले

नीट वाच रे. मी दिवसातून ३ दा प्रेमात पडतो. माझ्या प्रेमात कुणी पडते असे कुणी म्हटले आहे ??

In reply to by सुहास झेले

पुन्हा हलकेच घ्या रे/ग ...;) तो : आय लव्ह यु स्नेहांकिता : ॥ प्रेमेषु बोलुनि ॥ ॥ तंगड्याषु तोडानि ॥ ॥ थोबाडुषु धुवुनि ॥ ;) खालील प्रतिसादामधील ज्योक ओळखाणार्‍यास माझ्या तर्फे काटाकिर्र मध्ये मिसळ !! ती : आय लव्ह यु बिरूटे सर : अं ! ती : सॉरी : माझ प्रेम आहे तुमच्यावर बिरुटे सर : ...अं !! ती : क्षमस्व ..माझ केवळ तुमच्यावर प्रेम आहे बिरुटे सर : गुड ! आत कसं ती : अं ती : आय लव्ह यु खटपट्या : चांगलय ती: आय लव्ह यु तस्थास्तु : :) ;) ;)

In reply to by सुहास..

एक राहीलं ती : आय लव यु.. सुहास.. ( वाश्या) : आमचे इथे प्रत्येकाला प्रपोज करुन मिळेल... आय लव यु म्हणण्याचा वेगळा खर्च पडेल !! ती. : बेशुद्ध

In reply to by आनन्दिता

हा हा हा हा ..लय भारी ग !! हे घ्या ...आणि हलके घ्या ... तो : आय लव्ह यु आनन्दिता : आमच्या इथे काकवांच्या कानाला चावुन मिळेल, भोंगा पसरायचा वेगळा चार्ज पडेल ;)

तो: आय लव यू ती: आय लव यू टू तो: आय लव यू थ्री!

व्हॅलेंटाईन डे ला आम्हाला आमची (जी केव्हा अन जी कोण होईल ती) बायको बी "आय लव्ह यु" म्हणायची नाही, रावडी, बाईक फ्रिक, दढीयल (वाढलेली दाढी) अन सदैव विद्रोही मोड ऑन असल्या पोरांस गर्लफ्रेंडा मिळत नसतात, सो मी काय उत्तर देईन ते ऑट ऑफ क्वेशचन!!!!.. कॉलेज च्या दिवसात आपल्याला गर्लफ्रेंड नाही ह्याचे कधी वाईटही वाट्ल नाही!!!!, आम्ही आपले "तोका ना मोका चुल्हा मा झोंका" च्या तत्वावर ऑपरेट करायचो/ करतो :) १. व्हॅलेंटाईन च्या १० दिवस आगोदर पासुन दाढी वाढवा २. मुद्दाम व्हॅलेंटाईन इव्हनिंग ला काळा शर्ट परिधान करुन आपल्या बुलेट वर धगधग करत "टोळभैरव मोड" ऑन करा ३. अन तुमच्या अस्तित्वाने घाबरलेल्या कन्या अन वशाळलेली पोरे ह्यांची मजा घ्या!!!!! ४. थकलात की श्रमपरिहारा हेतु मस्त एक किंगफिशर चा टिन उघडा अन स्वातंत्र्य सेलीब्रेट करा!!!! हाच आमचा शिरस्ता!!!!

माझे उत्तर... . हे सांगण्यासाठी इतका वेळ वाट बघायची गरज नव्हती...आधी माहीत असते तर मस्त प्लान बनवला असता... ;)

'आय लव्ह यू' म्हणायला व्हेलेंटाईन डेच कशाला पाहिजे? तसही, असतो कधी हा व्हॅलेंटाईन डे? (इथपासून आमची तयारी). आता ह्या उतारवयात एखादी मुलगी (रादर, एखादी बाई) 'आय लव्ह यू' म्हणेल अशी सुतराम शक्यता नसल्यामुळे (ऐन भरात असतानाही कोणी मुलगी कधी म्हणाली नाही) काय उत्तर द्यावं ह्यावर विचार करण्याची गरजच नाही. तशी शक्यताच नसल्यामुळे अगदी सेफ वाटतंय (बायकोला, मुलींना आणि ओळखितल्या बायकांना). निवृत्ती जवळ आली असताना सरकारी खात्यात वगैरे जसं आपल्या नांवाला फार जपलं जातं तसंच, 'आता 'भलती' रिस्क नको' ह्या विचारांनी माझ्याकडूनही अविचारी पुढाकार घेतला जाणार नाही. त्यामुळे 'व्हॅलेंटाईन डे' आणि 'ऋषी पंचमी' ह्यात आता कांही फरकच उरलेला नाही.

श्री रामसेने आणि प्रमोद मुतालिकांचं नाव ऐकलांव नाय काय कंदी? ते पाठोपाठ अ.आ. बुवा, हळदीकुंकू आणि मंगळसूत्र घेऊन यायचे! आजूबाजूला बघून मगच "इ लोवे योउ" म्हणा!

In reply to by पैसा

@श्री रामसेने स्पेस चुकीच्या जागी पडली काय?? हे Mr.रामसेने असं वाटतंय. :D

माझं उत्तर : अरे माझं लग्न झालय राजा ! " सोन्या एवढे दिवस लावतात का ?? बघ उशिर नसता केलास तर आज मी तुझ्यासोबत असते छकुल्या ?? श्श्या ... बाकी तु म्हणालास ते बरं ़ केलस ... नैतर मला वाटायचं कि , मलाच असं का वाटतय कि तु माझ्यावर फीदा आहेस ते ! :-/ आता किती छान वाटतय म्हणुन सांगु .... " =))

In reply to by जेनी...

तो--आय लव्ह यु ती--अरे माझं लग्न झालय राजा ! तो--अगं म्हणुनच तर आत्ता प्रपोज करतोय..सध्या सेफ गेम खेळायचे दिवस आहेत (डेली सोप मालिकांचा प्रभाव)

ऐन वेळी जे सुचेल ते उत्तर देईन. असं आधीपासूनच कसं ठरवायचं; तसंही ते काय म्हणतात कवीहृदय वगैरे घेऊन जन्माला आलेलो नाहीच.

ते कोण म्हणतय आणि कोणत्या परीस्थीतीत म्हणतय त्याप्रमाणे उत्तर बदलेल. कोण म्हणतय याच्या कॅटॅगरी खालिल प्रमाणे लहान बालके सुंदर तरुण कन्यका (माझ्या)लग्ना आधी (मला) आवडणारी पण आता लग्न झालेली लग्न झालेल्या इतर सुंदर तरुणी (सर्व प्रकारच्या (आणि आकाराच्या) स्त्रीया सुंदरच असतात त्या मुळे खर तर सुंदर तरुणी ही व्दीरुक्ती होते) एखादी मध्यमवयिन स्त्री एखादी उतारवयीन स्त्री कोणत्याही वयाचा पुरुष (आजकाल काहि सांगता येत नाही) प्रत्येक कॅटॅगरी समोर उत्तर आपापल्या अनुभवांप्रमाणे कल्पावे.

वरती ज्ञानोबांच्या पैजारबुवांनी लिहिल्याप्रमाणेच उत्तर आहे. कोण म्हणतेय अन म्हणणारी अस्मादिकांना कशी वाटेल यावर उत्तर अवलंबून आहे.

@अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?>>> विचारतात काय हो ! खरचं कुणी ? ;) . . . . . . . . . . . हल्ली??? =))

आजपर्यंतच्या इतिहास... मख्खमयी चेहरा करुन प्रियमयीला होकार देण्यात वेळ घालवून गुलाबमयी स्वप्न हातचे घालवून, टीनपॉटमयी आयुष्य जगत आपले ह्रदय आता लोखंडमयी केले पाहीजे ह्या रुक्षपाषाणमयी विचारांपर्यंत मी आलो आहे...

In reply to by यशोधरा

पत्ता कटला कारण आमी गोरेगोमटे नाकिडोळी निटस होतो... तेलकट केस काळाढुस्स चेहरा नकटे नाक मवाली चेहरा अशी आमच्याकडे चांगली फिचर्स नव्हती.

राँग नंबर ! बेटर लक नेक्स्ट टाईम !

(कोल्लापुरी) पक्या - माजं लै प्रेम हाय तुझ्यावर. ती- सॉरी यार, आय अ‍ॅम अलरेडी एंगेज्ड. . . . पक्या - अगायाया !!! इंग्लीश???? :D

In reply to by यसवायजी

पक्या - माह्यं लै लव हाय तुह्यावर. ती- सॉरी यार, आय अ‍ॅम अलरेडी एंगेज्ड. . . . पक्या - अम्मम्म... पाह्यं नं वं जरासं अ‍ॅडजश्ट व्हत असनं तं.. ;-)

विचारणारी कोण, कशी इ.इ. आहे त्यावर उत्तर अवलंबून असेल. अगदीच खडकी दापोडी असेल तर नेहमीचाच रिप्लाय 'बरं मग?' ;)

मेल टु फिमेलः आय लव्ह यु. फिमेल टु मेलः कसं शक्य आहे ते? मी आधीच विवाहीत आहे, त्यात मी एकाच्या प्रेमात सीरियसली आहे. परवाच दोन जणांनी मला प्रपोज केलंय. दे आर रियल गुड लूकींग अ‍ॅण्ड रिच. बॉसनं विचारलं त्याला मी नाही म्हणूच शकत नाही आणि त्यात तू? नाही रे शक्य नाही. . . . . . मेल टु फिमेलः बघ ना, कर ना थोडं अ‍ॅडजस्ट, जमेल तुला! (फॉरवर्डेड मेसेजमधून साभार)

मागे एका इंग्रजी मासिकात Sexual Harassment at Workplace या संदर्भात मुलाखती घेताना एका मुलाला विचारलं गेलं की उलट्या हॅरॅसमेन्ट बद्दल म्हणजे बायका पुरुषांच्या करत असलेल्या कार्यालयीन लैंगिक शोषणाबद्दल तुमचे काय मत आहे? तर पठ्ठ्याने उत्तर दिलं, "काय म्हन्टा? बायका पण sexual harassment करतात? मी वाटच बघतोय" :P धाग्याच्या शीर्षकातला प्रश्न वाचून काहींना असंच काहीसं वाटलं असेल :D

In reply to by आदूबाळ

धागा वाचुन माझ्या मनात पण हेच आले होते. :) पण धाग्याचा वार आणि वेळ बघितल्यावर शंका आली कि कदाचित शुक्रवारी हापिसात वेळ जात नसेल म्हणुन काढला असेल धागा. ह. घ्या. हो सुवर्णमयी.

खर का काय ? दररोज पाय चेपुन देणार का ते बोल ?मंग पुढच पुढ बघु...

व-हाडी दणका पोट्टा :- तु मले हाव त म्हण सा-याईले मारतो पोट्टी :- बाप्पा!!! खरंच!!!! पोट्टा :- हाव मंग!!! अन तु फक्त नाई म्हण तुले बी मारतो!!!!!

व-हाडी दणका पोट्टा :- तु मले हाव त म्हण सा-याईले मारतो पोट्टी :- बाप्पा!!! खरंच!!!! पोट्टा :- हाव मंग!!! अन तु फक्त नाई म्हण तुले बी मारतो!!!!!

दुखावलेला आशिक :- भाई वो मेरी नहीं तो किसी की नहीं टवाळ मित्र :- वो हिसाब से भाई तेरी हो गई तो सबकी हो जाएगी क्या!!!! *lol*

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

@वो हिसाब से भाई तेरी हो गई तो सबकी हो जाएगी क्या!!!! >>>> क्या मारा है रे!!! =))

तो: (लाडात येऊन)संगे, गंऽऽऽ संगे. ती: तुला कांय झालांय रं मेल्या आज? तो: मांजा पिरेम हांय तुज्यावं. *blush* ती: आँऽऽऽऽ!! जल्लां म्होरा तुजा. पटकी आली नाय ती तुज्यावं!! आसली फालतू कामा करीत बसलो तं मांजी गुरां कोन बगील? तू परत आसला काय बोलच, नाय चुलीतला कोलीत मारला तुज्या पाटानीत तं नावाची संगी नाय !! तो: *shok* =))))

व्हॅलेंटाइन डे 'पौर्णिमेला' आल्याचा दुर्मिळयोग साधायची तयारी अंमळ पंधरा दिवस आधीच सुरु झालेय तर.. असो माझं उत्तर - 'उशीर केलास' किंवा उत्तर भारतीय असेल तर 'देर आये दुरुस्त आहे' आणि अभारतिय असेल तर 'Better late than never' काहीही झालं (नाही) तरी एक कॉफी मात्र नक्की होईल.. बाकी (नेहमीच्या) व्हेलेंटाईन बरोबर (नेहमीचा) व्हेलेंटाईन साजरा होईलच ;)

आप का साथ, साथ फूलों का आप की बात, बात फूलों की फुल खिलते रहेंगे दुनियाँ में रोज निकलेगी, बात फूलों की साभार: गीतकार: मखदुम मोहिद्दिन, गायक: लता-तलत अजीज, संगीतकार:खय्याम, चित्रपट:बाजार - 1982

कुठे आहे लाईक बटन? जाम धमाल सुरु आहे! धन्यवाद.

In reply to by सुवर्णमयी

जो प्रश्न मिपाकरांना विचारलाय त्याचं उत्तर तुम्ही पण द्यायला हवं? केवळ लाईकून चालणार नाय...