Skip to main content

तुम्ही आय लव्ह यू च उत्तर काय द्याल?

लेखक सुवर्णमयी यांनी शुक्रवार, 31/01/2014 05:08 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हॅलेंटाईन्स डे" यंदा पौर्णिमेला येतो आहे (बहुधा.. ) म्हणजे अगदी दुर्मिळ असा योग! प्रेम कुणावर, केव्हा आणि कोणत्या वयात होऊ शकत त्याच काही सांगता येत नाही अस म्हणतात. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती किमान तीन वेळा आयुष्य़ात प्रेमात पडते.. (पडते म्हणजे तोंडघाशी पडते असा अर्थ घेऊ नये..) तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?

वाचने 42531
प्रतिक्रिया 126

प्रतिक्रिया

In reply to by पिवळा डांबिस

उत्तर इथेच लिहायचे मनात आले होते. प्ण त्यापेक्षा सविस्तर वेगळा लेख लिहीता येइल. ;)

In reply to by विजुभाऊ

लिहा, सविस्तर लेख लिहा, आम्ही जरूर वाचू... आम्ही फक्त 'ब' च्या प्रेमात असलेल्या 'अ' शी जर 'क' ने 'अ' वर असलेलं प्रेम व्यक्त केलं तर 'अ' ची प्रतिक्रिया काय असावी ते सांगितलंय!! आमच्या उत्तरात 'अ' ने 'क' चं त्याच्या/तिच्यावर असलेलं प्रेम अ‍ॅकनोलेज तर केलंय पण आता त्यावर काय अ‍ॅक्शन घ्यायची ते सर्वस्वी 'अ' च्या हातात आहे.... :) "बझीचा-ए अतफाल, है दुनिया मेरे आगे, होता है शबो-रोज, तमाशा मेरे आगे ||" :)

In reply to by पिवळा डांबिस

ओ पिडां काका. अ ब क असली काळकाम वेगाची गणीते नका टाकु? आमच्या गणीताच्या मास्तरानी फुटके हौद गळक्या तोट्या आणि भिंत बांधणारे अ ब आणि क नामक मजूर असलंच शिकवलय. अ ब किंवा क नामक मजूर प्रेमात पडले तर काळ काम आणि वेगाची गणना करायला लावणारी गणीते कधी शिकवलीच नाहीत. काय करणार आम्ही पडलो सातार्‍याचे. ठाण्यातले असतो तर गोष्ट वेगळी झाली असती. ;)

In reply to by विजुभाऊ

का नाव घालवायलाय सातारचं विजुभौ! ;) आक्ख्या महाराष्ट्रात जगप्रसिद्ध महाबळेश्वर सातार्‍यात आहे, आक्ख्या भारतात शालेय शिक्षणासाठी प्रसिद्ध पाचगणी सातार्‍यात आहे जिथं शालेय शिक्षणाबरोबर/आधी सगळ्या बाराखड्या शिकल्या शिकवल्या जातात. नुसतं अ ब क काय घेऊन बसला आहात??? बरेच ठाणेकर 'पंचगनी महाबलेश्वर' ला येतात हो 'कोचिंग क्लासेस' साठी.

In reply to by विजुभाऊ

तुम्ही 'फुटके हौद गळक्या तोट्या आणि भिंत बांधणारे अ ब आणि क नामक मजूर' ही ऊदाहरणे दिलीत पण भिंतीवर चढणाऱ्या पाली 'एक फुट वर जा अर्धा फुट खाली ये' विसरलात की!

In reply to by आनन्दिता

अहो, "हे काय" म्हणून काय विचारता? कुणी आपल्याला "हॅपी न्यू इअर्" म्हटल्यावर आपण "थँक्यू, अँड् सेम् टू यू!" असेच म्हणतो ना? "आय् लव् यू"चही तसंच झालंय आजकाल... हा हा हा...!!!

उत्तर - (साताचा चौथा घात) - (सहाचा चौथा घात + पाचाचा चौथा घात + चाराचा चौथा घात + तिनाचा चौथा घात) अर्थातच, मिथुनदा म्हणता त्याप्रमाणे :)

असं थेट विचारलं तर मी गोंधळून जाईन. माझा विश्वास वगैरे बसणार नाही. आणि सावरलोच धक्क्यातून तर 'लव यू टू' असं म्हणेनच म्हणेन. पण, वाट बघायला लावू नये बॉ कोणी कोणाला असं.... लय जीवघेणं असतं ते. आणि कोणीही कोणत्या निमित्तानं 'व्यक्त' होत असेल तर मी त्या सर्व निमित्तांचं स्वागत करेन. Thanks To facebook :) -दिलीप बिरुटे

दुसर्‍या कोणीही विचारले तर आम्ही नाही म्हणू. पण या वयातही वहिदा रेहमान, प्रभा अत्रे,शबाना आझमी यांनी विचारले तर टुणकन उडी मारुन गळ्यांत पडू.

धन्यवाद असे म्हणेन. तीनही प्रेम आहेत तेव्हा आता आणखी नव्याला जागा नाही... क्षमस्व:)

विवाहितांसाठी हा प्रश्न बाद आहे का? कारण काही स्कोपच नाही म्हटल्यावर उगीच कोप तरी कशाला ओढवून घ्या. प्रेमाचं म्हणाल तर फार सोपं असतं हो ते...छान, सुरेख मुलगी दिसली की तात्काळ तिच्या प्रेमात पडायचं आणि ती नजरेआड झाली की सर्रकन स्वतःला बाहेर काढून घ्यायचं. बहुतेक सगळे ३०-५० वयोगटातले पुरुष असंच करतात. ५० च्या पुढचे काय करतात माहित नाही. ३० च्या आधीचे नाहक मजनू-बिजनू बनून फिरतात आणि "दिल का दर्द, तुम्हारी आंखों मे देखा तो उल्फत..." वगैरे अवस्था करून टाकतात स्वतःची. एवढं काही ते अवघड नसतं. ;-) बाकी आता कुणी तसा संदेश पाठवला (ज्याची की शक्यता शून्य टक्के आहे) तरी मी डगमगून जाणार नाही. मोठ्या धीरोदात्तपणे मी या समरप्रसंगाला सामोरा जाईन. कुठल्यातरी हॉटेलात तिला घेऊन जाईन, मस्त कॉफी वगैरे पितांना तिच्या निर्णयातला फोलपणा तिला समजावून सांगीन आणि "पुढच्या जन्मी मी फक्त तुझाच..." असं भरघोस आश्वासन देऊन तिला घरी सोडून येईन (आणि गुपचूप तिचं घर ही पाहून ठेवीन ;-)).

In reply to by समीरसूर

विवाहितांसाठी हा प्रश्न बाद आहे का?
का बरं ? प्रेमाचा अन लग्नाचा काय संबंध ;)

तेव्हा अगदी ध्यानी मनी नसतांना, किंवा अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?
>>> चालेल की ! सवती सवती भांडनार नसाल तर आमची काही हरकत नाही ! मोअर द मेरीयर :) ---- खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम"बिम" अर्पावे !! - गोडबोले गुरुजी

केवळ गम्मत ..ह घ्या रे बाबांनो ती : आय लव्ह यु सोन्याबापु : प्रेम हाच ग्रंथ , व्हॅलेन्टाईन हाच प्रेमग्रंथ ती : आय लव्ह यु सुड : आजचा सुविचार (?) : जिथे प्रेम नसेल तिथे सुड ही नसेल ती : आय लव्ह यु प्रशांत आवले : पांडुंरग पाडुंरग ती : अरे, आय लव्ह यु प्रशांत आवले : श्री हरी श्री हरी ती : *$#^%$^&$ प्रशांत आवले : विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल ती : आय लव्ह यु पैजारबुवा : ॐ प्रेममदः प्रेममिदं प्रेमत्प्रेममुदच्यते प्रेमस्य प्रेममादाय प्रेममेवावशिष्यते तो : आय लव्ह यु पैसा : Don't waste your time with explanations: people only hear what they want to hear - Paulo Coelho ती आय लव्ह यु विजुभाउ : तेरी मेरी कहानी ...एक नैंन पे दुसरा फ्री !! ती: आय लव्ह यु मोदक : काय ...कधी ...कुठे ? ती : आय लव्ह यु मुक्त विहारि : ( आता प्रेमकट्टा पण भरवायला हवा ! ) प्रेमकट्टा ! आपआपल्या प्रेमाबरोबर ती : आय लव्ह यु श्रीरंग_जोशी : आय_लव्ह_यु_टु_ खरड_फळ्या_वर_ये ( क्रमश : )

In reply to by सुहास..

ती: आय लव्ह यु क्लिंटनः (स्वगत) १९८७ साली ती एकदा असंच म्हणालेली, त्यानंतर १९९२ साली ती दुसर्‍याच्या प्रेमात पडता पडता राहिली. ९७ साली असंच काहीतरी झालं.... उत्तर व्यनितूनच देईन! ती: डिपॉझिट जप्त झालंय तुझं! ;) ती: आय लव्ह यु स्पावड्या: खिक्क्क! ती: आय लव्ह यु लिमाऊ : तुझ्या लाल रिबीनीत कोंडा साठलाय. ती: आय लव्ह यु गणेशा: मला तू दिसत नाहीयेस. ती: आय लव्ह यु इ ए: चल, अल्जिरियाला प्रवास करुन येऊ. ती: आय लव्ह यु मुवि: चल कट्टा करु. ती: आय लव्ह यु वल्ली: तुझ्यात मला मूर्ती दिसतेय ती: आय लव्ह यु .... : तुला तू काय बोलतेय ते कळतंय का? काही आचपेच नाही, अक्कल काडीची नाही नि .... मी आधीच्च सांगितलेलं.

In reply to by आदूबाळ

दोन्ही लै लै भारी !!! ती: आय लव्ह यु बॅटमॅन- आश नाझ्ग दुर्बातुलुक, आश नाझ्ग गिम्बातुल, आश नाझ्ग थ्राकातुलुक, अघ बुर्झुम ईशी क्रिम्पातुल!!!! ती- मर मेल्या .. ती: आय लव्ह यु जेडी- आयला धामीण !!!!! ती: आय लव्ह यु गणपा- चल पेरी पेरी चिकन खाऊ ती: आय लव्ह यु - हे सप्रमाण सिद्ध करायला काही विदा आहे का? या जाणीवेसंदर्भातले संशोधन आपण कुठे केलंत ?? कुठल्या जर्नलमध्ये या भावनेबद्दल काही केस स्टडी आहे का?? ती: आय लव्ह यु स्वॅप्स – ते काहीही असलं तरी क्यामेरा मात्र निकॉनच भारी !!! चल जाऊन खाऊ चहा खारी.. ती: आय लव्ह यु मालक- जागेवरून गायब, दुसऱ्या दिवशी फोटो आणि खाली ओळी.. ही आमची ढमी. हिच्यावर आमचा भारी जीव. ती: आय लव्ह यु धमु- फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स काय लाजवता का जीव घेता? नाकातोंडातुन कॉफी उडाली ना.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मस्त आहे! सगळ्यांची प्रतिभा मोकाट उधळते आहे!

In reply to by लॉरी टांगटूंगकर

ती: आय लव्ह यु स्वॅप्स – ते काहीही असलं तरी क्यामेरा मात्र निकॉनच भारी !!! चल जाऊन खाऊ चहा खारी..
हाहाहाहा!... रच्याकने - 'ती' चा कॅनन आणि माझा निकॉन पाहून पहिल्याच भेटीत आमच्या होऊ घातलेल्या प्रेमाच्या 'एक्स्पोजर' चं 'मीटरिंग' चुकलं होतं त्याची आठवण झाली... ;-) नंतर 'पोस्ट प्रोसेसिंग' मध्येपण ते कधीच नीट नाही झालं. प्रत्येक 'शटर रिलीज' मनासारखी प्रतिमा देईलच असे नसते ना! :-)

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मन्द्या!!!!
धमु- फुस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स काय लाजवता का जीव घेता? नाकातोंडातुन कॉफी उडाली ना.
बेक्क्कार रे...!!!!

In reply to by प्यारे१

ती: आय लव्ह यु वल्ली: तुझ्यात मला मूर्ती दिसतेय
छे. तू अगदी कोरीव मूर्तीसारखी सुंदर आहेस असे मी म्हणेन. =))

In reply to by सुहास..

वा वा वा आमचा तर त्रिफळाचित होऊन ही गडाबडा लोळालोळी चा हा पैलाच अन भारी मौका!!!! ज ब र द स्त हो सुहास शेठ!!! *lol*

लाइट, साउंड....

ती: आय लव्ह यु तो: फिल्मी मोड> फूल खिलते है, बहारोंका समा होता हैं इसी मौसम में ही तो, प्यार जवाँ होता हैं दिल की बातों को होटो से नही कहते, ये फसाना तो निगाहों से बयाँ होता हैं ... ती पुस्प्गुच हवेत भिरकावणार एवढ्यात अरे अडीचशे रुपयांचा पुस्प्गुच हाये तो...

सुटलेत तडार..................

ती: आय लव यू भौ: असं उभे उभं नको. ती: कुठे जाऊया ? भौ: चल, मटण आणायला. ती: शी! मटण कशाला ? भौ: आशी वैतागु नगं! ती: पण, आय लव यू! भौ: उगाच काय,मी ऋत्विक रोशन नाही आन तू ऐश्वर्या राँय नाहीस!

In reply to by तिमा

तीन ठिकाणी ग़ ऐवजी ग आल्याचे प्रत्येकी पाव प्रमाणे पाऊण मार्क कापले आहेत. भौंच्या कथेतले शुद्धलेखन लक्षात ठेवावे. कळावे.

=)) मंद्या, लेका पार हशिवलंस =)) बाकी वल्ली अन जेडी पण जबरीच रिप्लाय!!!!! सगळ्यांची प्रतिभा एकदम जोर्रात उधळतेय =))

१४ तारीख तशी दूर आहे अजून.. :) तुम्हा सर्वांची धमाल सुरु आहे इथे. प्रतिसाद जबरी आहेत! प्रेमात कोण शुद्धलेखन शोधत आहे?आणि प्रतिभा? आणखी काय काय दिसेल थांबा..

ती :आय लव यू तो : निवांत वेळी एखाद्या भिंतीकडे तोंड करुन बसा व आपल्या मनातल्या विचारांचे प्रतिबिंब त्या भिंतीच्या पडद्यावर तटस्थ पणे पहा. समोर एक वस्तू दिसेल. मग स्मृतीतल्या आकाराशी वेरिफाय करून मन आपल्याला ती काय आहे याचं 'नांव' सांगतं "पाणी पुरी" पण गाडी तिकडेच थांबत नाही. पाणी पुरी वरुन मसाला पुरी, शेवपुरी भेळपुरी, ओमपुरी, अमरीशपुरी मग त्यांचे सिनेमे मग बघता बघता पाणीपुरी दिसेनाशी होते आणि उरते फक्त तोंडाला सुटलेली लाळ. ती: जरा माणसात ये. तो : लादेन ही ध्यान प्रक्रिया मी सांगतो म्हणुन करून पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की काही सेकंद देखिल, मन आपल्याला निरंतर पाहू देत नाही. विचारांची दृष्यमय प्रोजेक्शन्स आपलं लक्ष वेधून घेतात किंवा मानसिक संवादात आपण इनवॉल्व होते. ती: काय ध्यान आहे. झक मारली आणि आय लव यू म्हणाले. आयुष्यात परत हि चुक करणार नाही तो : थांब नेहमी शेवटच वाक्य माझच असत. बुद्ध त्याच्या वेळीही लोकांना समजला नव्हता, आणि मी काय म्हणतो ते अजूनही लोकांना समजत नाही. मला वाटलं होतं तुमचा अभ्यास कमी पडतोय. आता तर आभ्यास शून्य आहे असं दिसतं. ती काही न बोलता रडत रडत निघुन जाते. मि.पा. वरच्या माझ्या चतुर मित्रमैत्रिणिंनो ओळखा पाहु "तो" कोण?

राहुल गांधी: 'मम्मीला विचारून सांगतो' केजरीवाल: 'मुझसे जितना प्यार करती हो उतना आम आदमीसेभी करोगी क्या?' राज ठाकरे: 'अगं एऽऽऽ, मराठीत बोल, मराठीत!!' अजितदादा: 'थांब, मला आत्ता एका धरणात पाणी सोडायला जायचं आहे, आल्यावर बोलू' आबा: 'हूं...! बडे बडे शहरोंमे ऐसे छोटे छोटे प्यार होते रहते है!' मनमोहन सिंग: '.......................'

ती: आय लव्ह यु. तो: अस्सं, मी कितवा ?

अनपेक्षित व्यक्तीकडून तुम्हाला प्रेमाचा या दिवशी संदेश मिळाला तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? क्या रे पोट्टि क्या मै हौला दिखरा तेरेकु ;) सुब्बसे क्या मैच मिला यारो, अरे जाव भै दिमाघ का बैंगन नक्को कर्रो.