सध्या आमच्याकडे इतकी बेक्कार करडी,ढगाळ,कंटाळवाणी हवा आहे,फारसं करता येण्यासारखं काही नाही म्हणून एखादा जुना हिंदी सिनेमा टाइमपास म्हणून लावावा असं मनात आलं आणि मग तेच केलं..
आणि कोणत्याही पॅकेज डिल मध्ये येतात तसे 'बी ए पास' आणि बेटे के लिए खाँस 'मुली के पराठे','गाजर का हलवा','खीर' इ. इ... आलेच त्याबरोबर..
खूप खूप दिवसात हे 'मुली के पराठे' आपणही केले नसल्याचा साक्षात्कार झाला आणि मग लागलेच मी मुळा किसायला..
तर पेश है हिंदी सिनेमाने फेमस केलेले 'मुली के पराठे'..
साहित्य- मुळ्याचा किस २ वाट्या,
१ लहान सिमला मिरची किसून(हा माझा शोध- भोपळी मिरचीमुळे एक वेगळाच फ्लेवर येतो.)
१ ते १.५ चमचा तिखट,१/२ चमचा हळद,१ चमचा ओवा,१ चमचा धनेपूड,
फोडणीचे साहित्य, तेल, मीठ, डाळीचे पीठ,कणिक
कृती- मुळा किसून घ्या, सिमला मिरची किसून घ्या. त्यात तिखट,हळद,ओवा,धनेपूड,मीठ घालून मिक्स करुन घ्या.
एका कढईत १ ते १.५ टेबल स्पून तेल गरम करुन फोडणी करुन घ्या. त्यात हे मुळ्याचे मिश्रण घाला व परता. अंदाजाने २ ते २.५ चमचे डाळीचे पीठ घालून परता, व झाकण ठेवून वाफ काढा. म्हणजेच चक्क मुळ्याची पीठ पेरुन भाजी करुन घ्या. ती पूर्ण थंड होऊ द्या.
पोळ्यांना भिजवतो तशी कणिक भिजवा.
भाजी गार झाली की पराठे करायला घ्या.
नेहमीच्या पुरीवढ्या दोन पुर्या लाटून घ्या. एका पुरीवर सारण घाला. दुसरी पुरी त्यावर ठेवून दाब देऊन बंद करा. हलक्या हाताने पराठा लाटा. तव्यावर तेल सोडून भाजा.
दही+ चाट मसाला, लोणचे, चटणी, सॉस.. हवे त्याबरोबर खा.
जोडीला त्याबरोबर हवा असला तर गाजर का हलवा
जोडीला त्याबरोबर हवा असला तर गाजर का हलवा
याद्या
9740
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
"तुम्हारे फूफाजी को मूली के
उत्पल दत्तचा गोलमाल.
In reply to "तुम्हारे फूफाजी को मूली के by आदूबाळ
तुम उससे शादी करोगी जीसे मै
In reply to उत्पल दत्तचा गोलमाल. by गणपा
फोटो बघून भूक चाळवली.
असले सारणाला आपल्या आतं कैद
>>>आमचं म्हणजे शर्ट्च्या
In reply to असले सारणाला आपल्या आतं कैद by गणपा
असं कसं? असं कसं? पुरणपोळीत
In reply to >>>आमचं म्हणजे शर्ट्च्या by प्यारे१
>>>जे नेहमी बर्याचदा आपल्या
In reply to असं कसं? असं कसं? पुरणपोळीत by सूड
अहाहा!!
अरे वा एकदम सह्हि
आमची ही....
वा!
सुंदर दिसत आहेत!
मस्त पराठे ! सिमला मिर्चीचा
लै भारी स्मायली केल्ये
फोटू छान आलाय. ढब्बू मिरची
मस्त
जरा वेगळी...
मुळा पार्टी!
In reply to जरा वेगळी... by प्रभाकर पेठकर
मस्त्च... मला पण खुप आवडतात
असे मिरची घालून सारणाचे कधी
सहीच... ती मिरची हसून
आवडले खुप ....करुन बघेन......
सिमला मिरचीने स्वाद एकदम