Skip to main content

ओढ

लेखक psajid यांनी बुधवार, 05/02/2014 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले सूर्यकिरण त्याचे आसुसले नयन, रात्रभर पळाला तो धरणीस भेटण्याला ....... लहानशी कळी उमलतेय तळी, तिची धाव ती वृक्षास व्यापण्याला ....... नदीचे काठ जशी चांदण्यातली वाट, चालण्याचा योग परी आसुसली भेटीला ........ भिरभिरती नजर तिची धाव अवाक्यापर, काव्य धाव घेतेय निसर्ग पिण्याला ........ कशाची तरी ओढ हवी माणसाला, नाहीतर निष्फळ आयुष्य काय अर्थ जगण्याला ........ श्री. साजीद यासीन पठाण दह्यारी पलूस, सांगली (महाराष्ट्र)
लेखनविषय:

वाचने 1702
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

कशाची तरी ओढ हवी माणसाला, नाहीतर निष्फळ आयुष्य काय अर्थ जगण्याला ........ १००% खरे आहे! चांगला प्रयत्न!!!

पहिली चार कडवी पहाटेचे सुंदर वर्णन करताहेत. नंतरची दोन कडवी कवीला त्या निसर्गाबद्दल ओढ व्यक्त करतात. आशय छान आहे.