बेल वाजली..
’आत्ता या वेळी कोण?’
चडफडत दार उघडले,
तर समोर पांडुरंग -
मला म्हणाला, “बोल".
कटेवर हात नव्हते,
पायाखाली वीट नव्हती,
चंदनाचा टिळा नव्हता,
भोवती भक्तीचा मळा नव्हता.
मी म्हटले, “या, बसा.
सुखदु:खाच्या गोष्टी बोलू हवे तर,
पण उगीच दांभिक
देवत्त्वाचा आव आणू नका.”
“हे तर लई बेस झालं"
म्हणत तो विसावला,
आरामखुर्चीत बसून
गॅलरीतून दिसणारा
आकाशाचा तुकडा
न्याहाळताना हरवून गेला.
त्याने मला
प्रश्न विचारले नाहीत,
मीही नाही.
त्याने मला
उपदेश केला नाही,
मीही नाही.
त्याने स्वत:भोवती
एक अदृष्य भिंत रचली,
मीही तेच केले.
माझ्या सहवासात
त्याने स्वत:चे एकाकीपण
मनमुराद जपले -
मीही तेच केले.
तरीही आम्ही
एकमेकांचे झालो
आणि त्या एकतानतेतही
दोन भिन्न वस्तू उरलो.
खूप दिवसांनी
काचेला तडा जाताना
मधेच एकदा भावूक म्हणाला,
“ज्ञाना, तुका, नामा
गेल्यापासून
जीव रमत नाही....”
त्याला पुढचे बोलू न देता
(ते जरासे चुकलेच माझे!)
मी चकित होऊन म्हटले,
“मायेच्या
या जंजाळात अडकून
देवा, तुम्ही वायाच गेलात!”
त्याने दयार्द्र
(की कसल्याशा त्याच)
नजरेने माझ्याकडे पाहिले
आणि गप्प झाला.
माझे लक्ष नसताना
कधीतरी अचानक
मला न सांगताच
हलके निघून गेला.
माझ्या घरात
अजून त्याची
वैजयंती माळ आहे;
सगळे व्यापून
एकाकीपणाशी
चिरंतन नाळ आहे;
मुठीत आलेले
हरपून गेले
रौद्र त्याचा जाळ आहे;
व्याकूळ स्वर
भिरभिरणारा
अनंत बाहू काळ आहे.
वाट पाहते मी रोज
पण मला खात्री आहे-
तो इकडे फिरकणार नाही,
विटेविना त्याचा
अधांतरी पाय आता
माझ्या दारात थिरकणार नाही.
आता अखेर
मलाच पाऊल उचलावे लागेल,
त्याच्या दारात
जाऊन म्हणावे लागेल,
“बोल".
पण तो अखेर
पांडुरंग आहे.
माझ्या घरात येणे, गुंतणे
आणि निघून जाणे
त्याला शक्य होते -
मला जमेल का गुंतणे?
आणि गुंतल्यावर
सहज निघून जाणे?
**
अन्यत्र पूर्वप्रकाशित
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6678
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त !
सुरेख हा शब्द सुद्धा तोकडा
+१११
In reply to सुरेख हा शब्द सुद्धा तोकडा by यशोधरा
पण तो अखेर
(No subject)
एक नंबर.........
खुप सुंदर
वाहवा !
खूप दिवसांनी काचेला तडा जाताना मधेच एकदा भावूक म्हणाला, “ज्ञाना, तुका, नामा गेल्यापासून जीव रमत नाही....” त्याला पुढचे बोलू न देता (ते जरासे चुकलेच माझे!) मी चकित होऊन म्हटले, “मायेच्या या जंजाळात अडकून देवा, तुम्ही वायाच गेलात!”हे विशेष आवडलं !हे फार आवडले..मला जमेल का
आवडलीच. छानच!
अतिशय आवडली.
सुंदर लिहिलंय.
१८० अंश विरुद्ध कविता
अर्थ अंदाजाने समजतोय.
In reply to १८० अंश विरुद्ध कविता by आयुर्हित
शब्दार्थ
In reply to अर्थ अंदाजाने समजतोय. by आतिवास
हे 'विकी' भाषांतर दिसतंय.
In reply to शब्दार्थ by आयुर्हित
माझ्या शब्दातला अर्थ
In reply to हे 'विकी' भाषांतर दिसतंय. by आतिवास
शब्दशः तर नव्हे, पण..
In reply to अर्थ अंदाजाने समजतोय. by आतिवास
आभार. अर्थ बराच स्पष्ट झाला
In reply to शब्दशः तर नव्हे, पण.. by यशोधरा
छे, धागा वगैरे नको व्य नि
In reply to आभार. अर्थ बराच स्पष्ट झाला by आतिवास
सुंदर अर्थ!
In reply to शब्दशः तर नव्हे, पण.. by यशोधरा
सुंदर!
भावले !
एकदम सहज सुंदर !
आभार
इट्ठला पांडुरंगा!
@माझ्या घरात
मस्तच!