एक नविन कॉकटेल बनवले, त्या कॉकटेलला नांव सुचवा....
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
मागच्याच दिवाळीच्या सुमारास आपला मंगळ कट्टा (http://www.misalpav.com/node/25976) छान पार पडला.तिकडून परत येतांना मला पण काही कॉकटेल्स सुचली.(मंगळाचा गूण...दुसरे काय?)सुदैवाने परतीच्या प्रवासात मी आणि सोत्री एकत्रच बसलो होतो.मला सुचलेले कॉ़कटेल मी सोत्रींना सांगीतले.त्यांनी पण ही संकल्पना उचलून धरली.
ऑक्टोबर हीट चालू झाली.आणि मला काही तरी थंड पेय प्यावे असे वाटायला लागले.आणि अशा कडाक्यात आंबा नसेल तर काय अर्थ तरी आहे का?
असो. नमनाला थेंबभर तेल खूप झाले.
आता जिन्नस....
१. आपल्याला जितकी पचते तितकी व्होडका.
२. माझाचा मेंगो ज्युस
३. मेंगो आइस्क्रीम
४. भरपूर बर्फ
५. मिरपुड् + दालचिनी पुड् + सुंठ पूड (थोडी मिरमिरीत चव असेल तर आणि तरच ह्या कॉकटेलला रंग जमतो.)
६. सर्वात महत्वाचा जिन्नस म्हणजे माहौल....
छान रविवार असावा.बाहेर कडक उन असावे.उत्तम मासे, खास आपल्यासाठी म्हणून कोळीणीने मुद्दाम बाजूला काढलेले असावेत.(आमची कोळीण म्हातारी असल्याने,बायकोला नको त्या शंका येत नाहीत.)आदल्याच दिवशी उत्तम नाटक पाहिल्याने घरची ग्रुहिणी ठाक-ठीक असावी.पापलेट आणि कोलंबी स्वच्छ करून त्यांना बायकोच्या स्वाधीन करावे.घरची सगळी मंडळी खूष आहेत,ह्याची खातरजमा करून आपण आता क्रुतीच्या मागे लागावे.
तसा मी स्टीलच्या ग्लासातूनच मदिरास्वाद घेतो.(कारण लिहायला परत एखादा लेख टाकायला लागेल.)पण ह्यावेळी मला काचेच्या ग्लासातून मदिरास्वाद घेता आले.तर मंडळी,आता ह्या ग्लासात भरपुर बर्फ आणि पहिल्या वेळी जितकी घेता तितकी व्होडका टाका.हे करण्यापुर्वी बायकोने तेल तापायला ठेवून, कोलंबीला पीठात बुडवलय का? ह्याची खात्री करून घ्या.
त्या रसायनाला थोडी चव आणण्यासाठी त्यात मँगो ज्युस टाका.तेल तापत आलेले आहे आणि बायकोने आता पापलेट्ला रवा लावायला घेतला आहे की नाही, हे पण हळूच बघून या.(कारण दुसरा ग्लास पापलेट बरोबर आहे.)
आता त्या रसायनाला थोडे ढवळून घ्या आणि थोडे मँगो आइस्क्रीम टाकून परत एकदा ढव़ळून घ्या.थोडे आइस्क्रीम टॉप अप करून मग त्यावर आपली मिरपूड्+दालचिनीपुड्+सुंठ पुड भ्रुरभरून टाका.तो पर्यंत स्वैपाक घरातून कोलंबी भज्जीचा खंग्री वास आला असेलच.
बायकोने केलेली कोलंबी भज्जी आणि हे कॉकटेल ह्याचा आस्वाद घेता घेता साउंड ऑफ म्युसिकची व्ही.सी.डी. शोधून ठेवा.
दुसर्या ग्लासला तळलेले पापलेट आणि सुंदर सिनेमा आणि बायको ह्यांच्या बरोबर रविवार साजरा करा.
डिस्क्लेमर : दारु पिणे प्रक्रुतीला हानीकारक आहे. हे कॉकटेल सोत्री गुरुजींना अर्पण.तळलेल्या कोलंबीचे आणि पापलेटचे फोटो मुद्दामच टाकलेले नाहीत."साउंड ऑफ म्युसिक" हा बघण्याचा विषय आहे.लेखनाचा नाही.मी जगातील सगळ्यात "ढ" फोटोग्राफर असल्याने, जे काही फोटोसारखे दिसत आहे, त्याला फोटो म्हणा.माझ्या लेखातील शुद्धलेखन,व्याकरण ह्यांच्या कडे जास्त लक्ष न देण्याची वाचकांना सवय झाली असेलच.झाली नसेल तर सवय लावून घ्या,ही विनंती.
प्रतिक्रिया
झकास ! आमचे एक खूप जुने
प्रयोग केल्यावर कॉकटेलचे
मसाला-ए-आम
तुमचा धागा हीट्ट कसा करावा
कतरीना
छान नावः आम्रदिरा
Mangifera piper
+१
कधीतरी चुकून मराठी नाव सुचवा
व्होडका कुठं मराठी आहे?
ऑरेन्जिनो बलूयाना' >>>
याला तुम्ही "आम पार्टी
"आम पार्टी कॉकटेल"
(No subject)
आधी ट्राय करुन बघतो .
अश्या वेळी हा सोक्या कुठ सुकत
तीन नावं सुचतायेत!!
हेचं अंबानी ठेवा नाव... लई
कोंबडीतुरा
बारसे
आता तुम्हाला बारश्याला नक्की बोलावणार....
व्होडका + माझा जरा जास्तच
मिपावरचे
आपली आपली चॉईस आहे हो देवा,
Rum Screwdriver Cocktail!
ज ब र द स्त!!!!! काय तो
१ला
+१
+२ सहमत!
@ विनायक प्रभू....
क्या बात हैं!!
आयला... ही गोष्ट एकदम खरी आहे...
मोजी कॉकटेल - जो पिये एक बार,
माहोल जिंगल आहे.
वाहव्वा, भनाट प्रयोग!
मॅंगो मिरमिरा
ह्या कॉकटेलच्या पूर्व तयारीत
'मँगो ज्वाला'
असे नांव सुचवावेसे वाटते. बाकी, चवी बाबत सोत्रींशी सहमत.