मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चॉकलेट चीझ केक (नो बेक )

wrushali kulkarni · · पाककृती
साहित्य:- २ पुडे oreo बिस्किटं किंवा कोणतेही चॉकलेट बिस्किटं, १/४ कप बटर, १ कप क्रीम चीझ, १/२ कप चॉकलेट, १/४ कप सावर क्रीम( optional), साखर ( optional) कृती :-बिस्किटंाचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून घ्या. त्या मध्ये बटर घालून नीट मिक्स करा . एका बाउल मध्ये क्रीम चीझ फेटून घ्या ( हॅण्ड मिक्सर ने केलेले उत्तम). दुसर्या बाउल मध्ये चॉकलेट वितळवून घ्या. वितळलेले चॉकलेट आणि सावर क्रीम ,क्रीम चीझ मध्ये घालून एकत्र करा. हवी असल्यास थोडी साखर घाला. एका मोठया भांड्याला foil लावा. त्यात आधी बिस्किटं आणि बटर चे मिश्रण घाला. आणि वरुन क्रीम चीज़चे मिश्रण घाला. हवे तसे सजवा. आणि फ्रीझ मधे ४-५ तासासाठी ठेवा . मग केक बाहेर काढून भांड्याची foil काढून केक हळूच foil सह एका प्लेट मधे काढा. आणि खायला द्या. c1 c2

वाचने 10549 वाचनखूण प्रतिक्रिया 33

मयुरा गुप्ते Sat, 01/18/2014 - 03:38
मस्त आणि झटपट दिसतोय. साखर ऑपश्नल का आहे? सावर क्रिम जरासं आंबटच असतं ना? क्रिम चीज मध्ये पण स्वतःची गोडी अशी नसतेचं.. नाही का? अंड केक मध्येही न खाणार्‍यांसाठी एकदम छान रेसीपी. -मयुरा.

In reply to by मयुरा गुप्ते

wrushali kulkarni Sat, 01/18/2014 - 03:59
चॉकलेट आहे ना त्यामुळे गोड होतो केक पण जास्त गोड हवा असेल तर साखर घाला.

wrushali kulkarni Sat, 01/18/2014 - 04:05
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा रेसिपी खूप मस्त लागते.

wrushali kulkarni Sat, 01/18/2014 - 04:05
सगळ्यांना खूप खूप धन्यवाद! नक्की करून पहा रेसिपी खूप मस्त लागते.

भाते Sat, 01/18/2014 - 14:25
कालपासुन मी हा धागा ऊघडायचे टाळत होतो पण आज रहावले नाही. चॉकलेट आणि चीझ एकत्र! विकेट पडली ना माझी! आता हा केक करून बघायलाच लागणार. डायटिंग गेलं तेल लावत.

मोक्षदा Sun, 01/26/2014 - 15:35
आजच माझ्या मुलीच्या वाढदिवसा निमित्ताने असचे कॅके आणला होता तो पण मैत्रिणीने घरीच केला होता अर्थात तिने मुंबईतील प्रभादेवी येथील कॅटरिंग महाविद्यालाय्तून ६ महिन्याचाcourseपूर्ण केला आत्ता ती अतिशय चांगले कॅके करते कोणाला कोणतेही पदार्थ करण्याची आवड असेल तर professional short term course करता येतात वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहिती हवी असल्यास देता येईल धन्यवाद