Skip to main content

पारा

लेखक drsunilahirrao यांनी शुक्रवार, 17/01/2014 17:35 या दिवशी प्रकाशित केले.

...पारा

तुझ्या पावलांची इथे खुण अजुनी
पडे पावलांना तुझी भुल अजुनी

नभी कल्पनेच्या उन्हाचा धुराळा
तुझ्या सावलीला उरे प्राण थोडा

दिशांच्या उरी वादळाची कहाणी
उरे जन्म आता दिव्याच्या ठिकाणी

फुटे प्राण उल्केसम वेदनेला
फुलांच्या उरी दाटतो घाव ऒला

तुझा शब्द प्राणातुनी साद देतो
जुन्या मैफिलीची जुनी य़ाद देतो

तुझे ऒठ हळव्या मदाच्या मशाली
रुधीरातुनी वाहते तप्त लाली

उङो सप्तरंगी निशेचा धुराळा
असा चंद्र श्वासातुनी माळ थोडा

तुझे गात्र॑ गात्र लपेटून घेतो
तुझे भास श्वासात माळून घेतो

मिठीने सरावा युगांचा दुरावा
इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा

फिरे कालचक्रावरी उष्ण पारा ..
उरे फक्त थोडा मिठीचा किनारा

डॉ.सुनील अहिरराव

लेखनविषय:

वाचने 1817
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आशय घन कविता ! काफिया रदीफ यांना विचारात घेऊन मीटरमध्ये बसवली असती तर एक छान गझल बनली असती असे वाटते.


आवडली.

मिठीने सरावा युगांचा दुरावा
इथे ज्न्म अवघा फुलांचा उरावा

हे खासच!