ढोकळ्याच्या अनेक रेसिप्या यापूर्वी येऊन गेल्या आहेत, पण ही एका गुज्जु मैतरिणीची बिनताकाची ही रेसिपी थोडी वेगळी वाटली म्हणून तुम्हा सर्वांसाठी-
साहित्य- नेहमीचेच.. डाळीचे पीठ(बेसन) साधारण कपभर, २ चहाचे चमचे रवा,
पाऊण ते १ चमचा खायचा सोडा,
१/२ चमचा धणे खरगटून, १-२ हिरव्या मिरच्या + पेरभर आलं भरड वाटून्,
साखर,लिंबू,मीठ,तेल,मोहरी,हिंग,खोबरे,कोथिंबिर
कृती-
अर्ध्या लिंबाचे २ चमचे साखर घालून पेलाभर सरबत बनवून घ्या.
त्यात मावेल एवढे बेसन घाला आणि ढोकळ्याच्या पीठाला भिजवतो तितपर सरसरीत कालवा.साधारण कपभर पीठ लागते.
त्यात २चमचे रवा, खरगटलेले धने १/२ चमचा, १ चमचा तेल,१चमचा आलं मिरचीचे वाटण घाला. चव बघून वाटल्यास थोडे मीठ घाला.
एका पसरट पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा. एका थाळीला तेलाचा हात लावून घ्या.
पाणी चांगले उकळले की ढोकळ्याच्या मिश्रणात खायचा सोडा घाला व फेटून घ्या. मिश्रण फसफसताना दिसले की थाळीत ओता आणि पॅन मध्ये वाफवायला ठेवा.
वर घट्ट झाकण ठेवा.ह्या झाकणाला पंचाने घट्ट बांधा म्हणजे वाफेचे पाणी त्यात शोषून घेतले जाईल व ढोकळ्यावर पडणार नाही- (ही चकलीची सुचवणी)
साधारण १५ मिनिटे मध्यम आचेवर वाफवा, नंतर आच बंद करा व २ मिनिटे तसेच राहू द्या. नंतर थाळी बाहेर काढा. गार झाला की वड्या पाडा.
ढोकळा वाफवत ठेवला की एकीकडे २ टेबल स्पून तेल तापवा, त्यात चमचाभर मोहरी,घाला. ती तडतडली की हिंग घाला. फोडणी गार झाली की त्यात एक चमचा साखर + १ चमचा लिंबाचा रस यांचे मिश्रण घाला.
ढोकळ्यावर ही फोडणी ओता, ओले खोबरे व कोथिंबिरीने सजवा.


वाचने
12432
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान आणि मस्त....
पाटवड्या..
In reply to छान आणि मस्त.... by मुक्त विहारि
पाणी सुटले तोंडाला...
तू भारतात कधी येणार, सांग
वॉव!!
संध्याकाळी पोटात कावळे ओरडत
जरा क्लोSSजप फटू टाकायला हवा
हा पदार्थ मला कध्धी जमणार
वेगळी आहे ही कृती. छान लागतील
वॉव्व .. इ लोवे योउ धोकला
पाकॄ आवडली. पण हे खमण आहे ना?
छान दिसतोय ढोकळा
छान पा.कॄ!
मस्त पाकृ!
मस्त दिसतोय ढोकळा..
यम्म...यम्म्म्म.
सहीच..
मलाही कध्धी जमत नाही ढोकळा...
जमला
स्वाती झिंदाबाद !!
स्वातीताईंच्या रेसीपीने आज