भारताच्या राजकारणात १९६९ हे वर्ष फार महत्वाचे आहे. सर्वसाधारण पणे अनेक नेत्यांच्या मताना मान असे राजकारण त्यापूर्वी सत्ताधारी व विरोधी पक्षात चालत असे. आजही काही प्रमाणात असे राजकारण फक्त भाजप या पक्षात चालते असे
म्हणण्यास हरकत नाही. पण बाकी राहुल गांधी, मुलायम सिंग, जयललिता, लालूप्रसाद, मायावती, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, ई ई त्या त्या पक्षातील हुकुमशहाच आहेत. तशा प्रकारची कबुली त्यांचे प्रवक्ते देतच असतात. ( काही कारणाने आपण शरद पवार याना हुकुमशहा या यादीत नको टाकायला ! ) इंदिरा गांधी च्या उदयानंतर काँग्रेस पक्षात " वरून खाली" राजकारणाची सुरूवात झाल्याचे दिसते. " हाय कमांड" हा शब्द " रिमोट कंटोल" हा शब्द त्याची फळे आहेत.
सध्याचा आप पक्ष हा केजरीवालानी भारतात चालविलेला अपारंपारिक राजकारणाचा प्रयोग असून हा प्रयोग भारतातील शिकलेले नागरिक करीत आहेत. काही न शिकलेल्या व पारंपारिक राजकारणाने फसविले गेलेल्या कमी शिक्षितांचा ही पाठिंबा
या पक्षाला मिळत आहे. राज ठाकरे यांच्या पक्षापेक्षाही मोठ्या प्रमाणावर या पक्षाची प्राथमिक सदस्य नोंदणी होताना दिसते आहे. आप पक्ष या प्रयोगातील एक साधन आहे. कारण आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश नागरिकाना मान्य नाही. त्यातून "माहितीचा कायदा" नावाची कल्पना घटनेचा
परम आदर असणार्याना देखील चकित करणारी अशी आहे. पाच वर्षे मत दिल्यावर आम्ही स्वस्थ बसणार नाही .सरकारच्या कारभाराचे मुल्यमापन वेळोवेळी करणार ! कर प्रणाली, निवडणूक प्रक्रिया ई महत्वाच्या मुद्यांवर आंदोलने करून
घटनेत बदल कारावयाला लावणार व लोकांचे खरेखुरे प्रतिनिधी तिथे पाठवणार हा संदेश प्रस्थापित राजकारणाला देण्याचा हा प्रयोग आहे.म्हणून दिल्ली विधानसभेत इमानदार व बेईमान अशा दोनच जाती आम्ही मानतो असे केजरीवाल यानी सांगितले आहे. हिंदू- मुस्ल्लीम सवर्ण- दलित या भेदांपेक्षाही मूलभूत भेद कोणता आहे व तो प्रगतीला कसा घातक आहे याचे विवेचन या केजरीवाल यांच्या एका वाक्याने होईल.ध्रुवीकरण हे वैचारिक धाटणी पेक्षा वर्तणुकीतील धाटणीने करा असा कोणीतरी केजरीवाल याना पुढे करून या देशाला बजावीत आहे.
आपल्या देशात खरे तर डावी विचार सरणी, उजवी विचार सरणी व मध्यम मार्ग असे राजकारण झाले तर मी म्हणेन ठीक आहे.साधनसंपत्तीचा वापर व वितरण कसे व्हावे हे सांगणारे हे तीन मार्ग आहेत. त्याना काही तरी तार्किक पाया आहे. पण बर्याच बाबीत सारखीच आर्थिक व सामाजिक धोरणे असणारे भाजपा व कोंग्रेस हे एकमेकाना पर्यायी पक्ष कसे असू शकतात? हे न सुटणारे कोडे आहे.कॉग्रेस पक्षाने बाहेर धाडलेले ,त्यातून नाराज होऊन बाहेर पडलेलेच एकूण चार पंतप्रधान आपण निवडून दिलेले आहेत.म्हणजे त्या पक्षाच्या विचारानेच त्या वेळेही तिथे राज्य केलेले दिसते. भारताचा प्रधानमंत्री डाव्या पक्षाचा झाला तरच खर्या अर्थाने विरोधी पक्षाचे राज्य भारतावर आले असे म्हणता येईल. जगात डावी विचारसरणी मार खाताना दिसतेय मग अशा विचारसरणीचे सरकार भारतात येणेच दुरापास्त आहे.मग सामान्य माणसे खाजगीत बोलताना असे म्हणतात की " भाजपा व काँग्रेस " हे एकाच माळेचे मणी असून त्यानी सत्ता येन केन प्रकारेण
जिंकण्याचा डाव करण्याचा फार्स लोकांपुढे चालविला आहे.जिंकेल त्याला ६५ टक्के हरेल त्याला ३५ टक्के अशी विभागणी
मिळणार्या मलिद्याची नंतर करू. असा त्यांचा एक अलिखित अजेंडा आहे. कारण भाजपाकडून उभा रहाणारा साधा नगरसेवक देखील सत्ता नसताना कॉग्रेस इतकाच खर्च निवडणूक पूर्व करमणूक, सहली यावर करताना दिसतो. हा पैसा त्याला सत्ता नसताना मिळतो कोठून ? आतापर्यंत भाजपाने खर्या अर्थाने कोंग्रेसचा एकही खासदार वा आमदार वा मंत्री राजकारणातून " भ्रष्ट " आहे म्हणून हद्दपार केल्याचे उदाहरण असेल तर सांगा. उलट गडकरी प्रकरणात हेच लोक एकमेकाना अशी मद्त करीत असतात हेच बाहेर आले ना ?
६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत खासदार, आमदार हे लोकांशी मिसळत असत . भेटत असत. त्याना फारसे आर्थिक अधिकार ही नव्हते. खासदार वा आमदार हा लोकांचा वैधानिक प्रतिनिधी असे. कायदेमंडळ असे खरोखरचे स्वरूप संसद व विधानसभेचे असे. एस टी च्या गाडीत पुढचे पाच सीट मधे एक दोन सीट्स यांच्या साठी राखून ठेवली जास्त. त्यानंतर त्याना निधी वाटपाचे अधिकार मिळाले. इतर अनेक ठिकानी लुडबुड करण्याचा अधिकार त्यानी स्वत:कडे घेतला व लोक नुसते पहातच राहिले. पाच वर्षातून एकदा चेहरा दाखवायचा. ठराविक एरियात पैसे, लुगडी, वाटायची व निवडून यायचे. या मधे ५१ टक्के मते न मिळाली तरी चालत असत. त्यामूळे डिव्हाईड अॅन्ड रूल ही ब्रिटीश पद्धति आपल्या राजकरणाने ही स्वीकारली. मग एका विशिष्ट जातीला प्रतिनिधीत्व नाही मिळाले तर पक्षशिस्त तर पाळायची पण त्याच जातीचा एखादा
अपक्ष उमेदवार मते फोडण्यासाठी उभा करायचा असे खेळ चालू झाले. या सर्वाचे कारण असे की गुप्त मतदानाचा आपण केलेला बाउ. लोकानी पक्षाचे प्राथमिक सदस्य व्हायचे. आपल्या मगदुराप्रमाणे समस्या सोडविण्यात भाग घ्यायचा, पदे मिळवायची निवडणुका घेऊन, अशा रितीने पक्ष उभारायचा असे न होता. गणपती उत्सवातून, गरबा उत्सवातून, प्रसिद्ध व्हायचे हळू हळू कोणत्या तरी पक्षात बस्तान बसवायचे. पैशाच्या जोरावर व दादागिरीने पक्षास नमवायचे, व खर्या कार्यकर्त्याना बाजूस सारून जात धर्म व पैसा वर दादागिरी यांच्या संकराने वर वर जायचे हा खाक्या निर्माण झाला.
यात पतसंस्था काबीज करणे, साखर कारखाने पटकाविणे, शिक्षणसंस्था, दूध उत्पादक संस्था बळकविणे यातून पदाधिकारी व त्यांचे पुढेमागे धावणारे हितसंबंधी यांचे टो़ळके निर्माण झाले.आमचे स्फुर्तिस्थान व त्याखाली शुभेच्छुक यांचे फोटोची लाईन असे फ्लेक्स निर्माण करून त्यातून शक्ती प्रदर्शन करण्याची युक्ती सर्वच पक्षात उदयास आली.
याचा पुढचा टप्पा म्हण्जे या टो़ळक्याला भक्कम संरक्षण देण्याची सोय करण्याची तयारी सुरू झाली. त्यासाठी सोयीचे लोक राज्यपाल पदी नेमणे, सोयीचा राष्ट्रपती निवडणे ई पासून ते राजकीय सूड म्हणून कोणी कुणाचे करियर संपवू नये म्हणून लोकप्रतिनिधीना वेगळा न्याय देण्याचे विधेयक ही संसदेत आले. एका अंतुले यांच्या उदाहरणाचा दाखला देऊन केवढी चुकीची पायरी आपले संसद सदस्य ओलाडित होते हे आपण सार्यानी पाहिले. वास्तविक सर्व नोकरशहा व लोकप्रतिनिधी यांच्यावर खरोखरीच कुणी किटाळ आणत असेल तर त्याला फास्ट ट्रॅक विशेष न्यायालयाचा पर्याय निर्माण करून एक तर सन्मानाने त्याला सार्वजनिक जीवनात परत संधी देणे वा अशा किडक्या आंब्याला गजाआड पाठविणे दोन्ही बाबी साध्य झाल्या असत्या. पण असे कोणतेही व्हिजन या तथाकथित जाणत्या राजांकडे नाही.
सगळयात विशेष दु:खाची गोष्ट अशी की भारतातील बर्याचशा विचारवंताना हे काहीतरी सन्मान देऊन मिंधे करून घ्यायचे. जरा काही नवा विचार , आंदोलन आले की राज्यघटनेचा अवमान झाला असा डंका पिटण्याची काही विचारवतांकडून (?) व्यवस्था करायची.लोकानुनयी निर्णय व लोकांसाठी निर्णय यात गल्ल्लत करायची. अशी खेळी हे पारंपारिक राजकारण करत आहे. काही सामान्य लोकांचे हितसंबंध त्यामुळे राखले जात असतीलही पण बर्याच सामान्य जनाना आपली फसवणूक होत आहे याचीही जाणीव होत आहे. त्या जाणीवेची सुरूवात आण्ण्णा हजारे यांच्या आंदोलनाने झाली आहे. केजरीवाल यानी अगदी आताच दिलेल्या मुलाखतीत " ही लोकांची लढाई आहे" आम्ही त्याचा केवळ परिणाम आहोत .आम्ही जर चुकाच करू तर आमच्या मरणाने आम्ही मरू " असे म्हटले आहे. देश प्रथम मग पक्ष मग सदस्य या त्रयीला आप कितपत न्याय देते यावर सारे अवलंबून आहे.
वाचने
20325
प्रतिक्रिया
96
मिसळपाव
प्रतिक्रिया
असहमत
>>> माजी राष्ट्रपती के.आर
In reply to असहमत by क्लिंटन
राज्यघटना: त्रुटी व बदल
In reply to >>> माजी राष्ट्रपती के.आर by श्रीगुरुजी
तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ?
पार्टिसिपेटीव्ह राजकारण बला
In reply to तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ? by चौकटराजा
त्रुटी आणि उपाय
In reply to तो राज्य घटनेचा दोष नसेल तर कुणाचा .. ? by चौकटराजा
+१
In reply to त्रुटी आणि उपाय by क्लिंटन
असहमत
In reply to +१ by अनुप ढेरे
सहमत....
In reply to असहमत by हुप्प्या
एक उदाहरण देतो
In reply to असहमत by हुप्प्या
...आपण पाच वर्षात फक्त एकदा
...आपण पाच वर्षात फक्त एकदा मत द्या मग बसा कोपर्यात धूळ खात" हा घटनेने नागरिकाना दिलेला संदेश...एवढं सोडून बाकी सगळ्याशी तत्वतः सहमत. वरचा संदेश घटनेने दिलेला नसून तो धूर्त राजकारण्यांनी पसरवेला आणि आळशी / नेभळट जनतेने स्विकारलेला समज आहे. केवळ मतदान करण्यासाठीच नव्हे तर निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा लेखाजोखा मागण्याचा हक्क बजावण्यासाठीही नागरीक सतत जागरूक असल्याशिवाय उत्तम लोकशाहीचे परिणाम प्रत्यक्षात येत नाहीत. हे केवळ भारतातच नाही तर जगातल्या प्रत्येक लोकशाहीत आस्तित्वात असलेले सत्य आहे.जिसके हाथ मे लाठी, उसीकी भैस!
राजकारण
राहुलब्बब्बा चा ह.ह.पु.वा. इंटरव्हू
In reply to राजकारण by विकास
"या जनतेची पण गंमतच आहे.
In reply to राजकारण by विकास
चांगले प्रतिसाद ...
असहमत
In reply to चांगले प्रतिसाद ... by चौकटराजा
पाळणारे जास्तच अगदी पुण्यातही
In reply to असहमत by llपुण्याचे पेशवेll
परदेशात व भारतात राहिल्याने
In reply to पाळणारे जास्तच अगदी पुण्यातही by चौकटराजा
मस्त लेख....
हा सनातन प्रॉब्लेम आहे.
किंचित वेगळे
In reply to हा सनातन प्रॉब्लेम आहे. by अर्धवटराव
वेळ तर लागेलच
In reply to किंचित वेगळे by राही
म्हणूनच कदाचित एखाद्या
In reply to वेळ तर लागेलच by अर्धवटराव
उत्तम विवेचन
देश प्रथम मग पक्ष मग सदस्य : दॅट्स द पॉइंट
संवीधान फापटपसारा?
In reply to देश प्रथम मग पक्ष मग सदस्य : दॅट्स द पॉइंट by संजय क्षीरसागर
संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत.
In reply to संवीधान फापटपसारा? by अर्धवटराव
आधि देश म्हणजे काय?
In reply to संविधान लोकांकरता लिहिले आहे. लोक संविधानाकरता नाहीत. by संजय क्षीरसागर
तुम्ही केजरीवालांचे दिल्ली
In reply to आधि देश म्हणजे काय? by अर्धवटराव
मला आश्चर्य वाटतं...
In reply to तुम्ही केजरीवालांचे दिल्ली by क्लिंटन
इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे!
In reply to मला आश्चर्य वाटतं... by अर्धवटराव
आश्चर्य तर आहेच...
In reply to इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे! by संजय क्षीरसागर
काही वाचायचं नाही, समजण्याची
In reply to इतकी निर्बुद्धता कशी असू शकते याचं आश्चर्य आहे! by संजय क्षीरसागर
दोन गोष्टी
In reply to काही वाचायचं नाही, समजण्याची by बॅटमॅन
खरे आहे. इतःपर असेच करेन,
In reply to दोन गोष्टी by क्लिंटन
मुळात बहुपक्षीय राजकारणात २१
काहीसे अमान्य
In reply to मुळात बहुपक्षीय राजकारणात २१ by ऋषिकेश
तरीही एक प्रश्न राहतोच की ३५%
In reply to काहीसे अमान्य by क्लिंटन
त्रुटी
In reply to तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% by ऋषिकेश
तृटी आहेच ...
In reply to त्रुटी by क्लिंटन
ह्म्म.. विचार करण्यासाऱहे
In reply to तृटी आहेच ... by चौकटराजा
+/-
In reply to त्रुटी by क्लिंटन
बरेच पटण्याजोगे
In reply to +/- by ऋषिकेश
सध्याची पद्धत
In reply to तरीही एक प्रश्न राहतोच की ३५% by ऋषिकेश
माझ्या मते निवडणूकीचे हे हे
खेळ व निवडणुका....
In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
लढाईत निष्कारण हानीस सामोरे
In reply to खेळ व निवडणुका.... by चौकटराजा
लढाई निवडणुकीतील नव्हे ...
In reply to लढाईत निष्कारण हानीस सामोरे by ऋषिकेश
भारतात सरकार बनवायला मतांच्या
In reply to लढाई निवडणुकीतील नव्हे ... by चौकटराजा
पक्ष
In reply to खेळ व निवडणुका.... by चौकटराजा
गल्ल्लत ..
In reply to पक्ष by सुनील
माझ्या अल्पमाहितीप्रमाणे..
In reply to गल्ल्लत .. by चौकटराजा
अरे जरा चुकले
In reply to माझ्या अल्पमाहितीप्रमाणे.. by चिगो
माझ्या मते निवडणूकीचे हे हे
In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
माझ्या मते निवडणूकीचे हे हे नियम आहेत. त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.!!! निवडणूकीचे नियम म्हणजे काही "अढळ" लेखन नव्हे. ते बहुमताच्या संमतिने बनवलेले त्याकाळात उपयोगी असे मानदंड असतात, जे भविष्यात बहुमताने बनवलेले नवे नियम आस्तित्वात येईपर्यंत लागू असतात. वस्तुस्थिती आणि कालमानाप्रमाणे न बदलले जाणारे नियम चांगल्या / खर्या / प्रगतिशील लोकशाहीचे लक्षण असणार नाहीत. म्हणून आपल्याला अन्याय वाटणार्या नियमांबद्दल लोकशाही पद्धतीत बसणार्या कृतींनी विरोध दाखवायला अथवा ते बदलण्यास केलेल्या प्रयत्नांना बंदी लोकशाहीत बसत नाही. मात्र याबरोबरच हे ही खरे की जोपर्यंत नवीन नियम लोकशाही तत्वांप्रमाणे मान्य होवून अंमलात येत नाहीत तोपर्यंत सर्वांनी अगोदर मान्य झालेले नियम मानूनच व्यवहार करणे योग्य असते.+/-
In reply to माझ्या मते निवडणूकीचे हे हे by ऋषिकेश
इस्पिक एक्का व विकास या
In reply to +/- by विकास
त्या चौकटीत राहुन जिंकता येत
In reply to इस्पिक एक्का व विकास या by ऋषिकेश
त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.बाकी सगळे ठीक. पण तुमच्या अगोदरच्या प्रतिसादातले (येथे ठळक केलेले) अट्टाहासपूर्ण वचन लोकशाहीत अजिबात बसत नाही. त्याला माझ्या प्रतिसादात विरोध आहे. वर तो विरोध पुरा स्पष्ट झाला नसावा असे वाटल्याने आता येथे परत लिहीत आहे.नै कळ्ळे
In reply to त्या चौकटीत राहुन जिंकता येत by डॉ सुहास म्हात्रे
+111
In reply to नै कळ्ळे by ऋषिकेश
१. असलेले नियम योग्य नाहीत हे
In reply to नै कळ्ळे by ऋषिकेश
आणि एक...
In reply to १. असलेले नियम योग्य नाहीत हे by डॉ सुहास म्हात्रे
काय बोलताय?
In reply to १. असलेले नियम योग्य नाहीत हे by डॉ सुहास म्हात्रे
समांतर मुद्दा
In reply to काय बोलताय? by ऋषिकेश
अजून काही उदाहरणे...
In reply to समांतर मुद्दा by क्लिंटन
अजेंड्यातील तीन मुद्दे सोडून
In reply to समांतर मुद्दा by क्लिंटन
>>>मी कुठे अधिकार नाही म्हटले
In reply to काय बोलताय? by ऋषिकेश
त्या चौकटीत राहुन जिंकता येत असेल तर जिंका नैतर निवडणूकीला उभेच राहु नका.हे तुम्ही केवळ मुद्दा ठासून सांगण्याकरता भावनेच्या भरात लिहिले असावे असे समजून पूर्णविराम :)या संदर्भात
In reply to >>>मी कुठे अधिकार नाही म्हटले by डॉ सुहास म्हात्रे
उद्बोधक
सहमत