"परिस्थिती"
(सुनीत: वनहरिणी मात्रावृत्त)
बर्फावरती झुंजूमुंजू थंड शांतता करे पहारा
शेकोटीची ऊब सोडता श्वास गोठतो, फुले शहारा
दूर कुठेसे शहर जागते आखडलेले पाय मोकळे
पुन्हा एकदा सळसळती जे काल श्रमाने गाढ झोपले
बर्फावरच्या 'ह्याच्या' हाती बंदुक चमचमणारी काळी
तंबूमधली झोप क्षणाची अंधुक सीमा घाली हाळी
शहराकाठी 'त्याची' जागा गाडी गाठायाची घाई
वेळ साधणे सूत्र दिनाचे वेगासंगे वाहत जाई
काही तत्त्वे थोड्या निष्ठा एकाचे जगण्याचे इंधन
कर्तव्याचे पाश टाकती दुसऱ्याच्या असण्याला बंधन
काय माहिती कुठली गोळी करील अवचित सावज 'याचे'
तसेच 'त्याचे' जगणेसुद्धा ताणामधल्या सुप्त भयाचे
इथला हा अन् तिथला तोही, दोघे सैनिक एका अर्थी
परिस्थितीशी दोघे लढती, आयुष्याच्या सोसुन शर्ती !
-- अमेय
वा..वा..वा..! __/\__ काय
क्या बात! अनेक वर्षांपूर्वी
दादा, अत्यंत भारी!
छान कविता!
उत्कृष्ट रचना. फार भावली.
भारी...
+१
मस्तच!!
भावना पोचल्या!
सहमत आहे. सियाचेनवर थंडीवार्
होय
व्वा..सुंदर रचना
सुंदर कविता. आवडली.