हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्हेने उहापोह केलेला आहे.
-------------------------------
औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटना, जगातील बहुतेक राष्ट्रे याबाबतीत अतिशय सतर्क असून औषधांचा वापर योग्य पद्धतीने व्हावा व त्याचा कोणताही अनिष्ट परिणाम रुग्णावर होऊ नये म्हणून त्याप्रमाणे त्याची तरतूद विस्तृतपणे कायद्यात करून त्याची अमलबजावणी केली जाते. औषध विक्री हि त्यामुळे अन्य इतर व्यावसायासारखी न ठेवता ती निष्णात तज्ञाच्या ( pharmasist ) देखरेखीखाली व्हावी याबाबतची तरतूद आणि प्रणाली सर्व देशामध्ये आहे. त्यचि अमलबजावणी झाली नाही तर रुग्णास औषधाचा फायदा होण्याऐवजी अनेक वेळेस विविध व्याधी, ऑर्गन फ़ेल्युअर व प्रसंगी मृत्यू तसेच drug resistance इत्यादी सारख्या समस्यांचे या आणि पुढील पिढ्यांसमोर आव्हान उभे राहू शकते.
आपल्या देशातसुद्धा जन्स्वस्थ्याकरिता वरील बाबींचा विचार करून देशामध्ये संसदेने औषधे व सौंदर्या प्रसाधने कायद्यात वरील गोष्टींच्या अनुषंगे विशेष तरतूद करून रुग्णांच्या जीविताची खात्री दिलेली आहे. संसदेने केलेल्या या रुग्ण हित तरतुदींची अमलबजावणी झाली नाही तर वर नमूद केल्याप्रमाणे रुग्ण हितास मोठ्या प्रमाणात बाधा येउन अत्यंत अनमोल मानवी जीवनावर दुष्परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये केवळ रुग्ण हितास्तव संसदेने केलेल्या याकारीतांच्या नियमांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. नवीन औषध विक्री परवाना घेण्यापूर्वी registered pharmacist ची नियुक्ती असल्याशिवाय परवाना मिळू शकत नाही. याचाच अर्थ परवान्यां अंतर्गत किरकोळ औषध विक्री व्यवसाय करताना registered pharmacist ची उपस्थिती असणे हे रुग्नाहीतासाठी आवश्यक असून pharmasist जर अश्या औषध दुकानामध्ये उपलब्ध नसेल तर तो औषध परवाना अस्तित्वात असूच शकत नाही. pharmacist कडे असलेल्या या औषध क्षेत्रातील ज्ञानाचा फायदा हा रुग्णाला डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरील औषध योग्य मात्रेमध्ये, योग्य combination मध्ये, योग्य वेळी अश्या अनेक महत्वाच्या बाबतीत सल्ला देऊन विक्री करणे आवश्यक आहे . तसेच चुकीचे औषध विक्री होऊन रुग्णाच्या जीवितास धोका पोहचू नये हेही आहे.
pharmacist हजर नसेल तर रुग्णांना या सल्ल्यापासून वंचित राहावे लागते किंवा चुकीच्या औषधाची विक्री होऊन रुग्णांना प्रसंगी भयानक परिस्थितीतून जावे लागते व रुग्ण याबाबतीत अनभिज्ञ असतो. त्यामुळे फक्त परवाना घेताना pharmacist व नंतर परवाना चालवताना pharmasist उपस्थित नसणे हे रुग्णांच्या जीविताशी खेळण्यासारखे आहे. बाजारात बनावट औषधांची विक्री होऊ नये तसेच गरज पडल्यास अप्रमाणित औषधांचे recall करावयाची गरज पडल्यास रुग्णांचा पत्ता असणे तसेच DPCO अंतर्गत अल्प दराने विक्री करावयाची औषधांची विक्री हि अल्प दरानेच होते किंवा नाही इत्यादी महत्वाच्या बाबींकरिता औषधांची विक्री हि बिलावरच करण्याची कायद्यात तरतूद आहे. इतर कोणत्याही वस्तूप्रमाणे औषधांची विक्रीदेखील बिलावर करण्यात कोणतीही अडचण नाही.
रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वता औषध घेणे हे मनुष्याच्या स्वास्थ्या करिता अतिशय वाईट असून या मुळे उत्पन्न होणाऱ्या drug resistance मुळे जनतेचे स्वास्थ्य आणि त्यांच्या पुढील पिढ्यांचे स्वास्थ्य याकरिता अतिशय गंभीर बाब आहे. multi resistance व असे अन्य प्रकार मोठया प्रमाणात वाढीस लागले आहेत व याबाबत जागतिक पातळीवर दखल घेण्यात आली आहे. त्यामुळे pharmacist ची उपस्थिती, औषधांची बिलावर विक्री, prescription वर विक्री या सर्व बाबी मानवी हित विचारात घेऊन संसदेने कायद्यामध्ये अंतर्भूत केलेल्या आहेत. देशाच्या संसदेने विचारपूर्वक केलेल्या नियमातील तरतुदींचा जर सर्वसामान्यांना फायदा झाला नाही तर हि बाब रुग्णांचे आरोग्य किंवा त्यांच्या जीवितास बाधा येऊ शकते व हि बाब समान हिताच्या दृष्टीने मोठे अपयश ठरु शकते. अन्न व औषध प्रशासन या रुग्नाहीताच्या बाबीचे काटेकोरपणे पालन करीत आहे. परवानाधारक म्हणून जेंव्हा परवाना घेतला जातो त्यावेळेस फक्त व्यवसाय म्हणून नाही तर रुग्णांचे हित म्हणून आपण वरील गोष्टींची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. तथापी या नियमांची पायमल्ली केल्यास कायद्या अंतर्गत कारवाई घेऊन रुग्ण हितास प्राधान्य देणे हीसुद्धा अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी आहे. परवाना घेतल्यानंतर रुग्णांना अव्याहतपणे औषध पुरवठा होईल याची जबाबदारी आपणावर आहे. औषध हे जीवनावश्यक वस्तू कायद्या अंतर्गत असलेली वस्तु असून केवळ काही व्यक्तींच्या दडपणाखाली ही विक्री अचानकपणे थांबविणे हे बेकायदेशीर ठरते.
वाचने
15153
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
मिपावर स्वागत
महत्वाचा मुद्दा
तिमा साहेब,
In reply to महत्वाचा मुद्दा by तिमा
+१११
In reply to तिमा साहेब, by सुबोध खरे
+१००
In reply to तिमा साहेब, by सुबोध खरे
सुंदर लेख !
लेख आवडला.
लेख आवडला.
+१००००अतिवास ताई!
औषधभान आवश्यक
छान माहितीपुर्ण लेख.....
मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाचे नियम पाळणे बंधनकारक
मोक्षदा
हा लेख तुमचा नाही?
In reply to मोक्षदा by मोक्षदा
हल्लीच महाराष्ट्र राज्याचे
In reply to हा लेख तुमचा नाही? by आतिवास
तुमचा प्रतिसाद वाचून असं
In reply to हल्लीच महाराष्ट्र राज्याचे by मोक्षदा
मी डॉक्टर नाही आणि त्या
१. कायद्याने ऑन-द-काऊंटर
In reply to मी डॉक्टर नाही आणि त्या by ज्ञानोबाचे पैजार
half knowledge is always dangerous!
माझा गोंधळ अजुनच वाढतो आहे
In reply to half knowledge is always dangerous! by आयुर्हित
प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काही उपाय?
In reply to माझा गोंधळ अजुनच वाढतो आहे by ज्ञानोबाचे पैजार
आयुर्हित, लहान मुले आजारे
In reply to प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी काही उपाय? by आयुर्हित
साहेब,
डॉक्टर,
In reply to साहेब, by सुबोध खरे
++१. अतिरेक म्हणजे काय...?
In reply to साहेब, by सुबोध खरे
औषध
हम्म!
अन्न आणि औषध प्रशासनालय
In reply to हम्म! by पिवळा डांबिस
उपयुक्त माहिती आणि प्रतिसाद!
औषधांवरील खर्च का वाढतो आहे?
याच्या दुसर्या भागाचा दुवा
In reply to औषधांवरील खर्च का वाढतो आहे? by आयुर्हित
औषधावरील वाढता खर्च: भाग दुसरा
In reply to याच्या दुसर्या भागाचा दुवा by सुबोध खरे
डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे
Central Drugs Standard Control Organization
३,११६ कोटी रुपयांची लुट
औषध
जेनेरिक औषधे : भारताची गरज
जेनेरिक औषधे द्यावीत हा