Skip to main content

प्रिय मित्रा!

लेखक नीधप यांनी रविवार, 28/09/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
क्षिप्राच्या ब्लॉगवरच्या तिच्या प्रिय या कवितेतल्या तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही या पहिल्या दोन ओळी चोरून पुढे.... ----------------------------------------- तुझ्या माझ्यावरच्या तात्कालिक प्रेमामुळे मी कधी फुशारुन गेले नाही मी मोहरले नक्कीच हे तात्कालिकच आहे अशी समजूत घातली स्वतःची तगमग शांतवण्यासाठी 'का होईना! ओढ तर आहे' अशीही समजूत घातली मनाची सुखवून जाण्यासाठी.. या तात्कालिक प्रेमाआड नक्की काय आहे मी कधीच पाह्यलं नाही. गरज वाटली नाही भितीही वाटली. प्रिय मित्रा, मला सांग रे तात्कालिकची मर्यादा किती? किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती? की मिठी, चुंबन, देहापुरती? सांगच! बोलून टाकूया एकदा सगळं.. हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे!
लेखनविषय:

वाचने 3977
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

प्रिय मित्रा, मला सांग रे तात्कालिकची मर्यादा किती? किती दिवस, आठवडे, महिन्यापुरती? की मिठी, चुंबन, देहापुरती? सांगच! बोलून टाकूया एकदा सगळं.. हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे! जब्रा !!!

कविता भन्नाट आहे. वाचायला सुरूवात केली पण झपाट्यात वाचून संपली असे वाटले. रेवती

नाजूक नात्याचे रेशीमधागे उलगडवून दाखवणारी कविता. समजूतदार आणि तरीही लखलखीत.

उत्तम कविता.
बोलून टाकूया एकदा सगळं..
आणि मग? बोलून झाल्यावर काय पुढे? घोळच की. त्यापेक्षा न बोललेलं बरं. :-)

In reply to by मृदुला

कविता आवडली. बाकी मृदुलाशी सहमतः)

मनाची घालमेल शब्दात सुंदररीत्या व्यक्त केली आहे. कविता आवडली. :)

सांगच! बोलून टाकूया एकदा सगळं.. हा दुहेरी गोफ माझ्याच्याने पेलत नाही रे! क्या बात है..! बाकी, एकदा समोरासमोर बोलून टाकलेलं बरंच असतं! :) असो, एक वेगळी कविता... तात्या.

आता तरी नियमित लिहायचे मनावर घे..काय?

कृपया आपल्या कवितेचे समिक्षण करावे ज्यामुळे कळण्यास सोपे जाईल. तात्कालीक मर्यादा, दुहेरी गोफ काही समजले नाही :-(

In reply to by नीधप

दुसरीकडे विचारले तर तुम्हाला राग आला. तुम्ही म्हणालात की दुसरीकडे कशाला विचारणा? म्हणुन इथे विचारले तर उत्तर नाही. असो तुम्ही आता आम्हाला लायसेन्स दिले आहे :-) लेट द गेम्स बिगीन :-)

In reply to by स्वाती राजेश

सहमत ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.