Skip to main content

वर्तमानकालीन महाराष्ट्रातील स्त्री-अभ्यास आणि स्त्रीवादाची स्थिती आणि आव्हाने

लेखक माहितगार यांनी शनिवार, 18/01/2014 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
१९ जानेवारी १९६६ म्हणजे साधारणतः ४८ वर्षापुर्वी इंदिराजी भारताला पहिल्या स्त्री पंतप्रधानांच्या रूपाने लाभल्या.राहुल गांधींच्या कालच्या भाषणात त्यांनी काँग्रेस शासित ५० टक्के राज्यात स्त्री मुख्यमंत्री आणण्याच आश्वासन दिल आहे.आतापर्यंत तामिळनाडू राजस्थान पंजाब जम्मु आणि काश्मिर दिल्ली उत्तरप्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि मध्यप्रदेश या राज्यांना स्त्री मुख्यमंत्री झालेल्या आहेत. पुरोगामी महाराष्ट्रात १ जानेवारी १८४८ ला पहिली मुलींची शाळा काढली गेली त्याला दिडशेहून अधिक वर्षे होऊन गेली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुषतुलना हे पहिल स्त्रीवादी ग्रंथ लेखन इ.स. १८८२ साली करून सव्वाशेहुन अधिक वर्ष लोटून गेली.अद्याप महाराष्ट्राला स्त्री मुख्यंमंत्री मिळालेल्या नाहीत हाही भाग सोडून द्या सध्याच्या मंत्रिमंडळात ४० पैकी केवळ दोन महिला मंत्री आहेत आणि त्यांच्या कडे दिलेली खाती आहेत महिला व बालविकास आणि कुटूंब कल्याण. भारताला पहिल्या स्त्री राष्ट्रपती उपलब्ध करणार्‍र्‍या महाष्ट्रास महसूल अर्थ गृह सहकार मुख्यंमंत्री अशा खाती चालवण्यास सक्षम स्त्री राजकारणी का पुढे येऊ शकल्या नसाव्यात ? मुंबई दूर असेल तर सहकार चळवळ (साखर कारखाने) गावाच्या जवळच असते सध्याची सहकार चळवळीतील महिलांच्या सहभागाची स्थिती काय आहे ? महाराष्ट्रात विद्यापीठात किती महिला कुलगुरू होऊन गेल्या आणि सध्या किती आहेत याची आकडेवारी हवी आहे. उद्देश महाराष्ट्रीय राजकारणातील स्त्रीयांच्या सहभागाची चर्चा करण्याचा नाही. उद्देश इ.स. १८८२ ते आता पर्यंत महाराष्ट्राने बरेच स्त्रीवादी विचारवंत दिले परंतु महाराष्ट्रातील स्त्रीवाद अजूनही अभिजन वर्गा पर्यंत मर्यादीत आहे का की बहुजन समाजा पर्यंत पोहोचतो आहे ? बहुजन समाजा पर्यंत पोहोचत असेल तर त्याच प्रभावी प्रतिबिंब आजच्या इ.स.२००० ते २०१४ या काळातील समाज आणि राजकारणातल्या सहभागातून पुरेस दिसत का ? सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ? गेल्या १३ वर्षात ज्या बहुजन सामाजीक वैचारीक चळवळी आहेत त्यातील वैचारीक दृष्टीकोण स्त्री वादाच्या परिपेक्षातून कसे आहेत अथवा होते या परिपेक्षात स्त्रीवादाची स्त्रीचळवळींची सद्य स्थिती काय आणि आव्हाने कोणती ? आज नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे या संदर्भाने बहुजन मराठी स्त्रीयांचा सहभाग स्त्रीवादाच्या परिपेक्षातून कुठे आहे.मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चातून स्त्रीवादी दृष्टीकोण गेल्या १३ वर्षात व्यवस्थित पणे मांडला जातो आहे का सद्य स्थिती काय आहे आणि स्त्रीवादी विचारांसमोरील या नवीन क्षेत्रातील आव्हाने कोणती इ.स. २००० ते २०१३ बहुजन आणि एकुण स्त्रीवादी साहीत्य आणि चळवळीचा आढावाही या चर्चेतून घेऊन हवा आहे. या चर्चा धागा चालू करताना याची कल्पना देण्यास आवडेल कि मराठी विकिपीडिया चळवळीच्या कार्यात तसेच मराठी विकिपीडियावरील स्त्री अभ्यास आणि स्त्रीवाद या विषयावरील लेखनात पुणे विद्यापीठातील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील अभ्यासकांनी वेळोवेळी सहभाग नोंदवला आहे. काळाच्या ओघात नेहमी प्रमाणे ह्या चर्चा धाग्यातील ज्ञानकोशास सुयोग्य भाग मराठी विकिपीडियावरील संबंधीत लेखांमध्ये घेतला जाऊ शकतो म्हणून या चर्चेतील आपला स्वतःचा सहभाग कॉपीराईट फ्री होत आहे असे गृहीत धरले जाईल. चर्चेत सहभागाबद्दल आणि विषयांतर टाळण्यात सहकार्याबद्दल सदस्य आणि मॉडरेटर मिपा व्यवस्थापन सर्वांचे आभार.

वाचने 72090
प्रतिक्रिया 111

प्रतिक्रिया

In reply to by स्वप्नांची राणी

आपला प्रतिसाद आला ते बरे झाले कारण आपण म्हटल्या प्रमाणे विषय स्त्रीयांबद्दल आणि पुरुष साचे ठरवताहे असे काहीसे झाले असावे. प्रस्तावात सुद्धा काही सुधारणा सुचवावयाच्या असल्यास हरकत नाही. पण आपण वर म्हणाल्या प्रमाणे सामाजीक, सान्स्क्रुतिक ई. सगळ्याच चौकटींच चर्चा प्रस्तावानुसार गेल्या दहा बारा वर्षांच मुल्यमापन आपण कस करता ? हे जाणून घेणे आवडेल.

In reply to by माहितगार

चर्चा प्रस्तावानुसार गेल्या दहा बारा वर्षांच मुल्यमापन आपण कस करता ?
मी एक बाळबोध शंका विचारु का? मी १०-१२ वर्षांपुर्वी शालेत जाणारी मुलगी होते.. मला स्त्रियांना मिळणारी असमान वागणुक ह्या प्रकाराची फारशी झळ बसली नव्हती.. गेल्या २-३ वर्षात नोकरी, लग्न ह्या मुळे गोष्टि जास्त समजल्यात.. बरं मी मध्यमवर्गीय कुटुंबातली शहरात राहणारी, आंतरजालावर आहे म्हणजे सुशि़क्षित कुटुंबातली बाई (इथल्या बहुतांश स्त्रिया अशाच असाव्यात..).. मग मागच्या १०-१२ वर्षांचं, बहुजन समाजातल्या स्त्रीयांविषयीच मुल्यमापन मी कसं करावं? ते असं आंतरजालावर चर्चा करुन होईल का? त्यासाठी प्रत्यक्ष जाऊन माहिती नाही का काढावी लागणार?

बॅटमॅन ने जी काही वरती उदाहरणे दिली आहेत.. जी मोठ मोठी नावं घेतली आहेत ती खरच मला अजिबात माहित नाहीत.. मी फारसं काहिही वाचलेलं नाही.. माझा अभ्यासही नाही.. मी एक स्त्री आहे, आणि भारतीय, मध्यमवर्गीय स्त्रीला जे काही प्रश्न पडतात, तसलेच मलाही पडतात एवढाच काय तो माझा स्त्री स्वातंत्र्याविषयीचा अभ्यास.. पण म्हणुनच माझं मत मला महत्वाचं वाटतं कारण ते माझ्या अनुभवातुन बनलं आहे.. कुठल्याही विचारप्रवाहाने प्रभावीत झालेलं नाही.. माझं म्हणण स्वप्नांची राणी म्हणतेय साधारण तेच आहे.. इथे दैनंदीन जीवनात स्त्री म्हणुन अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. इथे पुरूषांना विरोध नसुन सिस्टीमला विरोध आहे. पण ही सिस्टीम बनवणारे मुख्यतः पुरूषच म्हणुन कदाचित "पुरुषी व्यवस्थेला विरोध हे स्त्रीवादाचे यूएसपी" झालं असेल.. ह्या संघर्षानंतर जी काही शक्ती उरेल त्यातुन बायका राजकारण, आंतरजाल इ ठिकाणी वावरतील ना? मुलगी आहोत तरी जन्म देतील का? शिकवतील का? हवं तेवढं शिकु देतील का? घरात समान वागणूक देतील का? घरकामाच्या व्यतिरिक्त काही करायचे असेल तर करु देतील का? हुंडा मागतील का? जाळणार तर नाहीत ना? छळणार तर नाहीत ना? मुलगाच होऊ दे म्हणुन त्रास देतील का? मुलगी झाली तर..... मुलगी आहे तरी जन्म देतील का?.... हेच प्रश्न सुरु रहातात.... हे बहुजन समाजात जास्त आढळणारे प्रश्न आहेत.. प्रश्न जितके मुलभुत (अगदी जगण्या मरण्याशी संबंधित) तेवढं स्वातंत्र्य कमी.. जिथे मुळात जन्म देतील का हा प्रश्न आहे तिथे स्त्रियांचा राजकारणात सहभाग कमी दिसतो ह्यावर चर्चा करण्यात काय हशील? त्यातही तुम्हाला बहुजन / अभिजन अशी चर्चा करायची असेल तर आधी तुम्ही हे शोधा की त्या त्या समाजात स्त्रीयांची दर १००० पुरूषां मागे आकडेवारी किती? किती घरात १ मुलगा आणि ७-८-९ मुली आहेत? जिथे स्त्रीया राजकारणात दिसतात तिथे किती जणींचा नवराही राजकारणात अत्यंत सक्रीय आहे आणि स्त्रिला स्वतःच्या ओळखी पेक्षा "वहीनी" ही ओळख आहे? अगदी सुशिक्षित आणि मुलगा-मुलगी समान वागवणार्‍या मध्यमवर्गीय घरात सुद्धा स्वयंपाक स्त्रीनेच केला पाहीजे, शिकली आहे तर नोकरीही केली पाहीजे पण घरी येऊन स्वयंपाकघरही तिनेच पहावे ही अपेक्षा असतेच (तुम्ही मला २-४ % घर दाखवाल जिथे बाहेरुन जेवण आणतात / बाई स्वयंपाक करत नाही घरात्..पण % वारी फार नाहीये अशा घरांची अजुन..) ऑफिसात काम करुन बाईच्या बरोबरीने स्वयंपाक करणारे, पार अगदी ओटा धुणे, कचरा काढणे, पोरांची शि शु काढणे, आलेल्या पाहुण्यांना चहा करुन देणे, सणवाराला पुरणावरणाचा नैवेद्य करणे वगैरे काम करणारे असे कितीसे पुरुष आहेत? मी म्हणत नाही की ह्याला पुरूषच एकटे जवाबदार आहेत.. कारण स्वत: बायका सुद्धा कामाची ही विभागणी मान्य करतात आणि मुली/सुनांवर लादतात. शिवाय स्वतः बाहेरची काम करायला कचरतात आणि तिथे पुरूषांनाच पुढाकार घ्यावा लागतो.. पण एकंदरीत सिस्टीम अशी आहे की जी बाईला घरात बसवेल..राबवुन घेईल्..आणि तुझी काळजी पुरुषच घेईल हे तिला पटवेल.. पुरूषावरही हेच बिंबवलं जातं.. विरोध ह्या सिस्टीमला आहे.. ह्या सगळ्यात बाईचा नसर्गिक पिंड पहाता तिने राजकारणात येणं आणि आलीच तर नवर्‍याच्या प्रभावाखाली काम न करणं अवघडच आहे.. बहुजन असो वा अभिजन.. आंतरजालावरील वावर - मुळात स्त्री आंतरजालावर असेल तर मुक्त / स्त्रि वादी , असं काही आहे का? माझ्या मते नाही.. पण त्यातही बहुजन समाजातील स्त्रीयांचा नक्की सहभाग किती हे काही माहित नाही.. ह्यावर कधी विचार केलेला नाही.. सबब माझा पास... बाकी तुम्ही बर्‍याच अवघड शब्दात लेख लिहीलाय, तरी इतर प्रतिसाद वाचुन, अंदाजा अंदाजानी लिहीलय (त्यातही प्रतिसाद लिहीताना १० वेळा वर जाऊन लेख वाचलाय.. कारण लिहीता लिहीता विसरायला होतं होतं की नक्की लिहायचय कशाबद्दल) .. समजा मी भलत्याच विषयावर लिहीलं असेल तर आधी मला सोप्या भाषेत तुम्हाला नक्की काय हवय हे सांगावे, ही नम्र विनंती.. (मी सध्या थोडी इतर कामात बिझी असल्याने इथे लगेच प्रतिसाद देईनच असं नाही....)

स्वप्नांची राणी यांचा प्रतिसाद आवडला. मुळ धाग्याबद्दल, सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती ? ताराबाई शिंदे यांच्याच गावात मी १८ वर्षे राहिली आहे. बाकी कुठे माहिती नाही पण खुद्द बुलढाण्यात त्यांच्या कार्याविषयी माहिती असणाऱ्या किती जणी असतील याविषयी शंका आहे. स्त्रीवाद किंवा स्त्री समता याविषयी अजून स्त्रिया सुद्धा अजून तेवढ्या जागरूक नाहीत. नवरा म्हणेल ती पूर्वदिशा ही मानसिकता अनेक आजूबाजूला राहणाऱ्या स्त्रियांमध्ये पहिली आहे. शिक्षणाचा प्रसार होत असला, तरीही अजून तेवढी प्रगती दिसत नाही. सद्य स्थितीत स्त्रीयांना स्वतंत्र पणे विचार करता यावा, निर्णय घेता यावे इतक्या लहान गोष्टींपासून आधी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. नवऱ्याने मारले तर ते चुकीचे आहे हे ज्यादिवशी बायकोला वाटेल तिथून पुढे मग हे सगळे सुरु करता येईल. ही परिस्थिती बघता हरितालिके दिलेले उदाहरण टोकाचे वाटत नाही. राजकारणात कागदोपत्री ग्रामपंचायत वगैरे ठिकाणी महिला आहेत. परंतु त्या फक्त सही शिक्के देण्यातच कार्यरत आहेत. बहुतांश वेळा पडद्यामागून सगळी सूत्रे हलविणारे त्यांचे नवरे किंवा नातेवाईक आहेत. (देऊळ चित्रपटातील सरपंच हे अगदी योग्य उदाहरण) नवीन इलेक्ट्रॉनीक माध्यमे आणि इंटरनेटची माध्यमे मराठी संकेतस्थळे मराठी अनुदिनी मराठी संकेतस्थळे आणि अनुदिनी आणि त्यावरील चर्चा धागे हा अजून बराच लांबचा पल्ला आहे असे वाटते. इंटरनेट चा प्रसार झाला असेल तरीही चेपू, युट्युब या पलीकडे तो फारसा जाताना दिसत नाही.

तुमची मते टोकाची नसावीत असंहि काही नहिये हां! दैव, नशिब, अध्यात्म, आत्मा, कर्मविपाक, गुरू आणि तत्सम बाबतित माझी अगदी टोकाची मते आहेत. आणि गम्मत म्हणजे या विषयांवर पुरुषांशी अगदी मनमोकळेपणी चर्चा होऊ शकते. पण स्त्रीयांशी यावर काही बोलण ईतक कठीण असत. माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता. हे वाक्य का येत नाहिये?..

In reply to by स्वप्नांची राणी

काव्यगत न्याय? ;-)

मधुरा, पैसा , पिरा, तुम्ही जे म्हणताय ना अगदी तेच मला म्हणायचय पण तुमच्या पतिसादानी ते अधिक स्पष्ट झालं. धन्यवाद! यावर अजुन काही लिहायची ईछा आहे. विशेषता गेल्या १०-१२ वर्षातही होत असलेला बदल ईतका कुर्मगतिनी होतोय कि एकंदरित व्यवस्थेवर त्याचा ढिम्म परिणाम होत नाहिये. काहि वाक्ये प्रकाशितच होत नाहियेत.... तुमची मते टोकाची नसावीत... असंहि काही नहिये हां! दैव, नशिब, अध्यात्म, आत्मा, कर्मविपाक, गुरू आणि तत्सम बाबतित माझी अगदी टोकाची मते आहेत. आणि गम्मत म्हणजे या विषयांवर पुरुषांशी अगदी मनमोकळेपणी चर्चा होऊ शकते. पण स्त्रीयांशी यावर काही बोलण ईतक कठीण असत. माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता.

In reply to by स्वप्नांची राणी

विशेषता गेल्या १०-१२ वर्षातही होत असलेला बदल ईतका कुर्मगतिनी होतोय कि एकंदरित व्यवस्थेवर त्याचा ढिम्म परिणाम होत नाहिये.
हे पाहून निराशा येणंही स्वाभाविक आहे. पण ताराबाई शिंदेंचं 'स्त्री-पुरुष तुलना' पहा आणि आजूबाजूला काय दिसतं हे पहा. त्यांच्या काळापेक्षा आज परिस्थिती बरीच बदललेली दिसते. चांगल्या दिशेने. त्यांच्या काळात त्या आणि पं. रमाबाई या दोनच लेखिका होत्या. (२० व्या शतकात बऱ्याच स्त्रियांनी लिहीलं.) पैकी पं. रमाबाईंनी थोर संस्कृतिची फार प्रशंसा करून स्त्रीवाद नाकारलाच होता.
माझ्या आसपासच्या स्त्रीवर्गात याविषयी ईतक प्रचण्ड अंतर्विरोध आहे की काही बोलायला जाव तर तत्क्शणी तुम्ही तिथे 'नकुश्या' होऊन जाता.
+१ वर सिमोन दी बोव्व्हारबद्दल गौरवोद्गार आलेले नाहीत. पण तिच्या 'सेकंड सेक्स'मधे याबद्दल चांगला उहापोह आहे. वाचलं नसेल तर जरूर वाचा, मराठी अनुवादही उपलब्ध आहे.

In reply to by रेवती

निदान दोन-चार हजार शब्द खर्च करून ज्या विषयावर लिहायचं, त्यासाठी शे-पाचशेच खर्च केले की फार लफडा होतो.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आता चर्चा बर्‍या पैकी धागा प्रस्तावाच्या दिशेनी आलेली आहे. वि.अदितींचा "माझा प्रश्न किंचित निराळा आणि जास्त व्यापक आहे." हा प्रतिसाद सुद्धा प्रस्तावातील प्रश्नच उपस्थीत करतो.धागा प्रस्ताव तसा बर्‍यापैकी व्यापक परीघ उपलब्ध करतो. गेल्या १२ वर्षातला स्त्रीवादी दृष्टीकोणाच एकुण प्रतिबींब हव आहेच. पण मला व्यक्तीशः बर्‍याच सामाजिक राजकीय सांस्कृतीक वैचारीक घटना जागा अशा वाटल्या की जिथे स्त्रीवादी दृष्टीकोण हिरहिरीने मांडण्याची संधी होती वर स्व.रा. म्हणतात त्या प्रमाणे निर्णय प्रक्रीयेत समान संधी मागण्याची संधी होती पण कदाचित त्या बहुजनांशी संबंधीत असल्यामुळे असेल स्त्रीवादी दृष्टीकोण हिरहिरीने कदाचित मांडला गेला नसेल तर अशा सुटणार्‍या संधी कोणत्या. या चर्चेत एक सूर इथे बहुजन समाजातील स्त्रीया कदाचित कमी आहेत म्हणून त्यांच्या सामाजिक सहभागाच्या संबंधाने चर्चा करणे कठीण होते.बहुजन समाजातील स्त्रीया जर सदस्य संख्येत कमी असतील तर बहुजन समाजातील पुरुषांनीही बहुजन स्त्रीयांचा सहभाग कुठे कुठे होता कुठे कुठे कमी पडला काय संधी होत्या काय असू शकतात या बद्दल चर्चेत भूमिका मांडण्यात पुढाकार घ्यावयास हवा असे वाटते.

चर्चेकरीता काही विषय एकएक करून मीही देईन. त्यातलाच हा एक २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याच सांस्कृतिक धोरणाची आखणी झाली.हे सांस्कृतिक धोरणात महिलांच्या सहभागा संबंधी उहापोह आहे हा पुरेसा होता/आहे/वाटतो का ? सोबतच गेल्या दशकातल्या महिलांच्या सांस्कृतिक सहभागाची कशी दखल घेता येईल ?

कलकत्त्याहून १८० किमी किलोमीटरवरील कु(सु)बलपूर नावाच्या गावात salishi sabha जात पंचायतीनी घडवलेला सामुहीक अत्याचार सुन्न करणारा आहेच पण स्थानिक गावातील इतर महिला पण अत्याचाराचे समर्थन करत असल्याची वृत्ते आहेत. कु(सु)बलपूर रविंद्रनाथ टागोरांच्या शांतीनिकेतनहून अवघ्या २५ किमीवर असल्याचे दैनिक टेलिग्राफ म्हणते बहुजन समाजातल्या स्त्रीस्वातंत्र्या बद्दल बोलल तर बहुजन समाजात स्त्रीयांना कामाच स्वातंत्र्य आहे ह्याबद्दल बरच बोलल जातय का या शहरात बसून केलेल्या कल्पना आहेत अशी शंका दैनिक टेलिग्राफचे वृत्त वाचताना आली. अत्याचाराच्या घटने नंतर विरोधी पक्षांनी राजकाराण करत केवळ आरोप बाजी केली ममता बॅनर्जींनी राजकीय दबाव टाळण्याकरता म्हणून पोलीस अधिकार्‍यावर कारवाई केली असे दिसते.पण राजकीय नेत्यांचे काम फक्त राजकारण करून निवडून येण्या एवढेच असते का समाज शिक्षणाचेही असते.बहुजन राजकीय नेत्यांनी समाज शिक्षणाचे काम व्यवस्थित केले असेल तर salishi sabha खाप आणि जात पंचायतींच्या अत्याचाराच्या बातम्या कशा येत आहेत ? *टाईम्स ऑफ इंडियातील बातमी *कललक्त्त्याच्या डेली टेलीग्राफ मधील बातमी *मुंडा लोक इंग्लिश विकिपीडियावर

In reply to by माहितगार

कामाचं स्वातंत्र्य नाही ते. मजबुरी आहे. आणि मिळालेले पैसे खर्च कसे करायचे यावर त्याना फार काही अधिकार नसावाच.

In reply to by पैसा

आर्थीक कमकुवत गटातील कुटूंबात एकुण आर्थीक जबाबदारीमुळेही स्वातंत्र्य कमी होते.पण या केस मध्ये मुलगी दिल्लीला जाऊन बांधकामावर रोजंदारीने काम करून साठवलेल्या पैशातून पक्क्या वीटांची खोली बांधली एक छोटा टिव्ही आणि म्युझीक सिस्टीम घेतली या बाबीला बाकी गावाचा आक्षेप ? आणि एवढे किळसवाणे वर्तन आणि गावातील इतर महिलांचा पांठींबा समजेनासे होते .

In reply to by माहितगार

ममता बॅनर्जी सरकार स्त्री अत्याचारांबद्दल नॅशनल वुमेन्स कमिशनला अ‍ॅक्शन टेकन रिपोर्टच पाठवत नाही अशी नॅशनल वुमेन्स कमिशनची तक्रार असल्याचे वृत्त आहे. *इकॉनॉमीक टाईम्स मधील वृत्त

मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच निरर्थक वाटते. कुठल्याही प्राण्यामध्ये नर आणि मादीमध्ये निसर्गाने जे बदल ठेवले आहेत ते माणूस हा प्राणी कितीही प्रगत झाला तरी हे नर आणि मादीमध्ये निसर्गतः असलेले बदल ओव्हरराईड करताच येणार नाही. त्यामुळे कितीही बेंबीच्या देठापासून शंख केला तरी स्त्री पुरुष समानता वगैरे गोष्टींनी काहीही अर्थ नाही. अगदी "मेन आर फ्रॉम मार्स.." सारखी परक्या मातीतील पुस्तकं सोडली तरीही डॉ. वैजयंती खानविलकरांचं "मुग्ध मधुर" हे मुलीच्या जन्मापासून तिच्या वृद्धावस्थेपर्यंतचा प्रवास मानसशास्त्राच्या अंगाने उलगडणारे पुस्तक किंवा मंगला गोडबोलेंचं "काय तुझ्या मनात" हे स्त्रीच्या भावविश्वाचा वेध घेणारं पुस्तक वाचलं की जाणवतं की ही दुनियाच वेगळी आहे. स्त्रीच्या शरीराची ठेवण वेगळी, तिच्या शरीरातील हार्मोन्स वेगळे, तिच्याकडे असणारं मातृत्वपण आणि त्याच्या अनुषंगाने येणारी मासिक पाळी हे सारं वेगळं आहे. ती येणार्‍या प्रसंगांना वेगळ्या पद्धतीने सामोरी जाते, भावना वेगळ्या पद्धतीने व्यक्त करते. इतकंच कशाला, शरीरसंबंधांमध्ये तिच्या पुरुषाकडून असलेल्या अपेक्षा या पुरुषाच्या स्त्रीकडून असलेल्या अपेक्षांपेक्षा पुर्णतः वेगळ्या आहेत. स्त्री आणि पुरुष या दोघांचीही कामपूर्ती वेगवेगळ्या प्रकारांनी होते. हे सगळं असताना स्त्री पुरुष समानता येणार कशी आणि कुठून? गरज आहे ती स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागणे.

In reply to by धन्या

आपण चर्चेत सहभागी महिलांची बाजूही वाचून मग प्रतिसाद दिला आहे ना ? त्यांच्या अपेक्षा सुद्धा व्यक्ती म्हणून आदर निवडीचे स्वातंत्र्य निर्णयात सहभाग अशा आहेत.आणि हि चर्चा पुरुष विरुद्ध स्त्री नव्हे व्यवस्था (समाजकारण संस्कृती राजकारण) आणि स्त्रीचे सहअस्तीत्व अशाच स्वरूपाची आहे असे वाटते. बाकी महीला त्यांची बाजू मांडण्याचे कार्य करतीलच. महिला प्राचार्य होऊ शकतात तर कुलगुरू का होऊ शकत नाहीत ? कुलगुरू होण्या मध्ये स्त्रीयांना पुरेसे प्रतिनिधीत्व का नसावे ? का या गोष्टीत समानता येऊ शकत नाही ?

In reply to by धन्या

मला ही स्त्रीवादाची संकल्पनाच निरर्थक वाटते.
सहकारी साखर कारखान्यांच्या चेअरमन पदी स्त्रीयांना पुरेसे स्थान असावयास हवे यात समानता हवी अशी समजा स्त्रीयांची मागणी आहे.समजा महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाचे गृह आणि अर्थखाते चालवण्यास हवे आहे तर त्यात आपण दिलेल्या स्त्री शरीररचनेच्या अंगाने केलेल्या युक्तीवादाचा कुठे आणि काय संबंध येतो ? आणि असे असेल तर स्त्रीवादाची संकल्पना सरसकट कशी निरर्थक ठरते ? आपल्या बसा स्त्रीवादावर वाद घालत. या वाक्या नंतरची स्माईली नक्की स्माईलच करत आहे ना ? :)

In reply to by धन्या

तुमच्या कडुन मला हा प्रतिसाद अपेक्षित नव्ह्ता. असो.. स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुष जे जे करतात ते ते आणि तेच्च करायला मिळावे इतका उथळ अर्थ नाहीये.. स्त्री आणि पुरूष वेगवेगळेच आहेत हे पहिल्यांदा मान्य करुन मगच ह्या विषयावर बोलल्या जाऊ शकते. त्यामुळे पुरूष जर अमुक काम, अमुक वेळ करत असेल तर ते तसेच्च, तितकाच वेळ स्त्री ने पण करावे असं होऊच शकत नाही (मासिक धर्म, गरोदर असणे, बाळांतीण असणे, लहान मुल अंगावर असणे असे अनेक कंगोरे तिच्या आयुष्यात असतात आणि ते तिच्या प्रत्येक निर्णयात ग्रुहित धरावे लागतात..) स्त्री म्हणुन. तिच्या शाररिक आणि मानसिक जडणघडणीचा विचार करुन स्त्री आणि पुरूषात जी असमानता आहे, ती मान्य आहेच.. पण... स्त्री म्हणुन शिकु न देणे, बुरख्यात ठेवणे, निर्णय स्वातंत्र्य नसणे, घरातील कामे करावीच लागणे, बाहेरच्या कामांमध्ये फारसा वाव दिल्या न जाणे (किंवा "ती कामे स्त्रीची नाहीतच" असे बिंबवणे), पुरुषावर अवलंबुन ठेवल्या जाणे, काही ठिकाणी कमावुन सुद्धा कमाई वर / घरातील निर्णयांवर काही हक्क नसणे, कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणुन दुय्यम वागणुक मिळणे... अशी अनेक उदाहरणं देता येतील जी अत्यंत सार्वत्रिक आहेत.. पण ह्या सर्व उहाहरणात स्त्री म्हणुन अशी वागणुक मिळावी हे योग्य आहे का? मी वर दिलेली उदाहरणे अगदी साधी आणि रोजच्या व्यवहारातली आहेत. जी तुम्ही - आम्ही रोज आजुबाजुला पहातो, काही तर आम्ही स्वतः अनुभवली आहेत.. कदाचित त्यामुळे त्या बद्दलची संवेदना बोथट झाली असेल.. म्हणुन तुम्हाला ही "असमानता" दिसत नसेल किंवा मान्य असेल.. स्त्री भ्रुण हत्या, स्त्रीला उपभोगाची वस्तु समजुन बलात्कार करणे, तिच्या आयुष्याचे निर्णय आपल्या हातात आहेत हे ठाम मत बनवुन तिला नागवे गावभर फिरवणे / ठेचुन मारणे, मोबाईल वापरायचा नाही/शाळेत जायच नाही असले फतवे काढणे, मुस्लिम स्त्रियांवरील बंधनांबद्दल तर वेगळा लेख होईल.. इतकी गंभीर असमानता आजुबाजुला अगदी ढळढळीत दिसत असताना
त्यामुळे कितीही बेंबीच्या देठापासून शंख केला तरी स्त्री पुरुष समानता वगैरे गोष्टींनी काहीही अर्थ नाही.
हे विधान मलातरी फार उथळ आणि वरकरणी केलेले वाटते.. तुम्ही दोन पुस्तकांची नावं घेतली आहेत.. त्या व्यतिरिक्त तुम्ही "नॉट विदाऊट माय डॉटर" सारखी पुस्तकं पण वाचली असतीलच.. ती वाचुन तुमचं मत काय झालं?
गरज आहे ती स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागणे.
अर्थातच.. पण खरच ते इतकं सोप्प आहे का? आणि मुख्य म्हणजे असं घडतय का?

In reply to by पिलीयन रायडर

तुमचा गैरसमज झाला आहे किंवा मी माझं म्हणणं योग्य रितीने मांडण्यात कमी पडलोय.
स्त्री म्हणुन शिकु न देणे, बुरख्यात ठेवणे, निर्णय स्वातंत्र्य नसणे, घरातील कामे करावीच लागणे, बाहेरच्या कामांमध्ये फारसा वाव दिल्या न जाणे (किंवा "ती कामे स्त्रीची नाहीतच" असे बिंबवणे), पुरुषावर अवलंबुन ठेवल्या जाणे, काही ठिकाणी कमावुन सुद्धा कमाई वर / घरातील निर्णयांवर काही हक्क नसणे, कामाच्या ठिकाणी स्त्री म्हणुन दुय्यम वागणुक मिळणे... अशी अनेक उदाहरणं देता येतील जी अत्यंत सार्वत्रिक आहेत.. पण ह्या सर्व उहाहरणात स्त्री म्हणुन अशी वागणुक मिळावी हे योग्य आहे का? मी वर दिलेली उदाहरणे अगदी साधी आणि रोजच्या व्यवहारातली आहेत. जी तुम्ही - आम्ही रोज आजुबाजुला पहातो, काही तर आम्ही स्वतः अनुभवली आहेत.. कदाचित त्यामुळे त्या बद्दलची संवेदना बोथट झाली असेल.. म्हणुन तुम्हाला ही "असमानता" दिसत नसेल किंवा मान्य असेल.. स्त्री भ्रुण हत्या, स्त्रीला उपभोगाची वस्तु समजुन बलात्कार करणे, तिच्या आयुष्याचे निर्णय आपल्या हातात आहेत हे ठाम मत बनवुन तिला नागवे गावभर फिरवणे / ठेचुन मारणे, मोबाईल वापरायचा नाही/शाळेत जायच नाही असले फतवे काढणे, मुस्लिम स्त्रियांवरील बंधनांबद्दल तर वेगळा लेख होईल..
मी ही हेच म्हणतोय. स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आपल्याईतकंच व्यक्ती म्हणून महत्व देतो तेव्हा तिथे असमानता संपते.
अर्थातच.. पण खरच ते इतकं सोप्प आहे का? आणि मुख्य म्हणजे असं घडतय का?
होउ शकतं. निदान आपण आपल्यापुरती सुरुवात करु शकतो. आजूबाजूच्यांना शहाणे करण्याचा नक्कीच प्रयत्न करु शकतो. मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. कुणी प्राचार्या केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला कुलगुरु पदाची संधी नाकारली जात असेल असं वाटत नाही. अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल. शाळेच्या दिवसांमध्ये सुभाष भेंडेंची "बोनसाय" म्हणून एक कादंबरी वाचली होती. तिची मध्यवर्ती कल्पना कुलगुरु पदाची नेमणूक ही आहे. धागाकर्ता/ धागाकर्ती या विषयात खरच निरागस असेल तर तिने/त्याने ही कादंबरी जरुर वाचावी.

In reply to by धन्या

धागाकर्ता/ धागाकर्ती ह्यांचा निरागसपणा आपण बाजुला ठेवु.. त्यांना पडणारे प्र्श हे कदाचित खरचं फारसे लॉजिकल नसतीलही (माझ्या मते त्यांना थोडसं वेगळं काहीतरी विचारयच.. म्हणजे अशा नेमणुकांच्या वेळेस राजकारण होत असेल, पण मुळात स्त्रि म्हणुन अनेक ठिकाणी जबाबदारीची पदे नाकारली जातात हे ही तेवढेच सत्य आहे..आणि स्त्रीयाही अनेकदा अशी जबाबदारी घेताना कचरतात हे ही सत्य आहेच..कदाचित धागाकर्ता/ धागाकर्ती फक्त उदाहरण म्हणुन प्राचार्य - कुलगुरू म्हणत असतिल.. त्यांचा मुद्दा बहुदा "स्त्रीयांना महत्वाची पदे का मिळत नाहीत" असा असावा..) पण तुम्ही जे मुळात "स्त्रि - पुरुष समानता" ह्या मुद्द्याला अर्थच नाही असं जे टोकाचं विधान करत आहात ते मला चुकीच वाटतय.. कारण तसा अर्थ नसता आणि तुम्ही म्हणताय इतकं एकमेकांना पुरकं वागत असते लोक तर खरच जग फार वेगळं असतं..
स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत. जेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण आपल्याईतकंच व्यक्ती म्हणून महत्व देतो तेव्हा तिथे असमानता संपते.
तुम्हाला जर खरच इतकं सोप्पं वाटत असेल हे तर मला तुम्हीच फार निरागस वाटायला लागला आहात.. असं घडायला हवं हे तर कुणीही सांगेल, पण तसं घडत नाही हे ही सत्य आहे.. आणि ते का घडत नाही ह्याची कारण फार गंभीर आणि समाजाच्या जडणघडणीत घट्ट रुतुन बसलेली आहेत.. त्यामुळे असमानता संपायला अजुन पुष्कळ वेळ आहे. अदगी साधी गोष्ट पहा ना, वर मुळ लेखात स्त्रीयांना पुरूषा इतकेच महत्व आणि आदर देण्यासाठी अनेक वर्षांपासुन जे प्रयत्न सुरू आहेत त्यांची माहिती दिली आहे.. तरीही असे धागे आजही निघतातच ना?

In reply to by पिलीयन रायडर

स्त्री आणि पुरुष दोघांनीही एकमेकांचा व्यक्ती म्हणून आदर करुन निसर्गतः असलेले स्त्री आणि पुरुषांमधले भेद लक्षात घेऊन परस्पर पुरक वागलं की या गोष्टी होणारच नाहीत.
इथेच तर सगळी गोम आहे. धार्मिक कारणे, कुटुंबसंस्था, भारतीय संस्कृतीसारखीच ही 'नैसर्गिक'वेगळेपण ही अजून एक पळवाटा. माझ्या मते पुनरुत्पादनक्षमता व काही अवयवांतील वेगळेपण सोडल्यास निसर्गतः स्त्री-पुरूषांचे असे घाऊक काही वेगळे असते असे वाटत नाही. बायकांना स्वयंपाक आवडतो, पुरूषांनी दणकट असावे, बायकांनी रात्री बाहेर पडायचं नाही, पुरूष घरी बाथरूम झाडतो आणि बाई टिव्ही बघत बसते म्हणजे काय वगैरे लिंगाला चिकटवलेलं 'घाऊक' वेगळेपण जर नैसर्गिक आहे असे वाटत असेल आणि त्यावर आधारीत 'कामाची विभागणी' वगैरे होणार असेल तर अन्याय हा होणारच कारण कामाच्या विभागणीसाठी वापरलेला निकषच चुकीचा आहे. घरातील प्रत्येकाने आपल्याला आवडत+जमेल ते काम करणे, कोणालाच न जमणारे काम सर्वांत वाटून - शिकून करणे हाच उत्तम उपाय आहे. ते काम स्त्री ने करावे की पुरूषाने किंवा नैसरगिक रित्या काय रोग्य आहे वगैरे बाब येतेच कुठे. व्यक्तीस्वातंत्र्य म्हणजे कोणते काम कोणी करणे नाही तर एखादे काम मला (किंवा कोणाही स्त्री/पुरूषाला) करायचे नसेल तेव्हा ते न करायचीही मुभा त्यात्ग समाविष्ट आहे! एखाद्या स्त्रीला स्वयंपाक करायचा नसेल किंवा एखाद्या पुरूषाला घर्च्या वस्तुंची दुरूस्ती करायची नसेल तर त्याला/तिला ती मुभा असावी. हे काम त्यांचेच वगैरे असे काही नसते. इत्केच. असो. धागा लांबल्याने या धाग्यावर हे शेवटचे लिहितोय

In reply to by धन्या

मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. कुणी प्राचार्या केवळ ती स्त्री आहे म्हणून तिला कुलगुरु पदाची संधी नाकारली जात असेल असं वाटत नाही. अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल.
मात्र जर कुणाला "स्त्री प्राचार्य होऊ शकते तर कुलगुरु का नाही" हा प्रश्न पडत असेल तर मात्र अवघड आहे. असं म्हणताय आपण का बर प्रियांका गांधी सुप्रीया सुळे प्राध्यापक प्राचार्य असत्यातर त्यांचा नंबर कुलगुरू पदा करता लागला नसता का ? आणि त्यांचा लागु शकला असता तर बाकी महिला प्राचार्यांनी कोणत घोड मारल ? बाकी महिलांच मत त्याच देतील

In reply to by माहितगार

अशा पदांवर नेमणूका करणं हा राजकारणाचा भाग असतो. त्यात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल.
प्राचार्यांच्या नेमणूक करणार्‍यां शिक्षण संस्थातही बहुतांश पुरुषच असतात आणि राजकारणही करतात त्यांना प्राचार्य नेमताना महिला दिसता (कोणतही विशेष रिझर्वेशन न देताही) राज्यस्तरावर राजकारण करणार्‍यांना कुलगुरू नेमताना सक्षम अनुभवी प्राचार्या दिसत नाहीत ? राजकारणात स्त्री पुरुष समान संधी वगैरे गोष्टी पाहणं हा निरागसतेचा कळस म्हणावा लागेल. ?

स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी काही बोलायचं म्हटलं की तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती आहे. बाई म्हणा वा बाईसाहेब, फाडून खाणार एवढं नक्कीच.

In reply to by बॅटमॅन

उगाच पिंक टाकायची आहे का? मग ठिक आहे.. कारण वर ऋषिकेश च्या प्रतिसादाशी मी संपुर्ण सहमत आहे. इथे माझ्या मते व्यवस्थित चर्चा चालली आहे. स्त्रि वादा संबंधीत अनेक मुद्दे समोर येत आहेत.. अगदी व्याख्या काय पासुन.. तु स्वतःही उत्तम प्रतिसाद दिलास वरती एका ठिकाणी ...जे मुद्दे पटलेत (अदगी स्त्रीयांच्या निगेटिव्ह बाजु मांडणारे) ते ही मान्य आहेतच.. जिथे पटलेलं नाही तिथे नीट शब्दात लोक लिहीत आहेत.. अशा वेळेस
स्त्रीवादाबद्दल पुरुषांनी काही बोलायचं म्हटलं की तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी स्थिती आहे.
वगैरे पिंकांची गरज नाहीये माझ्या मते.. आपण स्त्रीवादावर चर्चा करत आहोत.. स्त्री वि. पुरूष नाही.. त्यामुळे स्त्रीवादाविषयी मत जर पुरूषाने दिले तर ते ऑटोमॅटीकली स्त्रीयांच्या विरोधात जाणारे आहे असं इथे कुणीही म्हणत नाहीये..

In reply to by पिलीयन रायडर

ब्वॉर्र... जे चाललंय ते मलाही दिसतंय. पण माझ्या म्हणण्यात तथ्य आहेच. मी जे म्हणतो ते याच चर्चेला लागू असावे अशा अस्थानी आग्रहाचे कारण समजले नाही. शिवाय भावनिक प्रतिसादांची सवय असल्याने आश्चर्य वाटले नाही, पण खेद जरूर वाटला. असो.

In reply to by बॅटमॅन

जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं नसेल तर "सहसा..बाकी चर्चांमध्ये" वगैरे शब्द वापरता येतील ना.. इथे लिहीलं तर ते ह्याच चर्चे बद्दल लागु आहे असा समज होणे साहाजिक आहे.. (तसंही जर ते इथे लागु नाही तर इथे का लिहीलं आणि नक्की कुणाचा प्रतिसाद अस्थानी हा ही प्रश्न पडलाच.. पण असो.. )
शिवाय भावनिक प्रतिसादांची सवय असल्याने आश्चर्य वाटले नाही, पण खेद जरूर वाटला. असो.
आणि तुझ्याही प्रतिसादाबद्दल साधारण हेच विचार आहेत.. माझ्या कडुन तुला ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद..

In reply to by पिलीयन रायडर

जर ह्या चर्चे बद्दल बोलायचं नसेल तर "सहसा..बाकी चर्चांमध्ये" वगैरे शब्द वापरता येतील ना.. इथे लिहीलं तर ते ह्याच चर्चे बद्दल लागु आहे असा समज होणे साहाजिक आहे.
जऽरा अभ्यास वाढवला तर असे समज कमी होतील.
आणि तुझ्याही प्रतिसादाबद्दल साधारण हेच विचार आहेत..
धन्यवाद. :) अस्थानी भावनिक प्रतिसादांची सवय आहेच त्यामुळे पुनरेकवार नवल वाटले नाही.
माझ्या कडुन तुला ह्या मुद्द्यावर शेवटचा प्रतिसाद..
मुद्दे संपले की त्रागा सुरू होतो याचे अजून एक उदाहरण दिल्याबद्दल धन्यवाद. :)

In reply to by बॅटमॅन

खर म्हणजे धागाकर्त्यानी स्त्रीवाद आणि स्त्रीवाद विरोधक असा खेळ लावण्याकरता स्त्रीवाद खरे म्हणजे खेळ पण नाही आहे. हे आपल्या समाज आणि संस्कृती विषयक गंभीर प्रश्न आहेत ज्यात तुमच्या आमच्या कुटूंबातील घटकांचा सरळ संबंध आहे. स्त्री अभ्यासक स्त्रीवादी गेल्या दहा बारा वर्षात सांस्कृतिक सामाजिक मैदानावर होते का ? समालोचनात त्याची नोंद घेतली गेली का ? त्या समालोचनांच समीक्षण झाल का ? मैदानात असावयास होते पण नव्हते असे प्रसंग कोणते ? आजच्या काळात मैदानात पाय रोखून उभे रहाण्या करताची आव्हाने कोणती ? इत्यादी विषयांचा उहापोह आहे. पण स्त्रीया मैदानावर आल्यातर अंपायर होतील कॅप्टन होतील आपल्याला बॅटींगचा चान्सच जाईल असा विचारकरून बरीच मंडळी शिरस्त्राण आणि सारी सुरक्षा कवच घालून दोन हातात दोन दोन दोन बॅटी घेऊन जोरदार तयारीने मैदानावर उतरत आहेत.एवढी तयारी करून आल्यावर मिपा भगिनी तुम्ही सांगितलेल्या भारतीय नियमानी साधे सरळ दोन चार चेंडूही टाकून मदतच करताहेत. तरी सुद्धा दुसर्‍या बाजूनी खुपच सोप्या सोप्या गोष्टीत झेल दिल्यावर त्या तरी काय करणार नाही का ? :)

In reply to by बॅटमॅन

बॅटमन फक्त पुरूषच फलंदाजी करणार असा आग्रह धरल्या नंतर मिपा भगिनींना गोलंदाजी करण्या शिवाय दुसरा काही मार्ग आहे का ? मिपा भगिनी सांगताहेत आपण सगळे भारतीय आहोत पुरुष विरुद्ध स्त्री असा खेळ लावायचा नाही आहे. चमू बनवून खेळताना स्त्री पुरुष भेद करण्याची मुळीच गरज नाही तरीही पुरुषच भेद करण्याचा अट्टाहास करताहेत. पुरुष परदेशी कोच घेऊ नका म्हणाले तर महिला हो म्हणाल्या.खेळाचे नियम भारतीय पाहिजेत म्हटल तर त्याला हो म्हणाल्या. बॅट बॉल शब्द भारतीय नाहीत म्हणाले भारतीय भाषेत फळी चेंडू म्हणायला तयार झाल्या. उसळते चेंडू आणि गूगली चेंडू पण टाकत नाहीएत.साधे सरळ चेंडू टाकताहेत. तरीही झेल जाताहेत. झेल देणारे बॅटमन आणि दोषी मात्र झेल घेणारेच ? चीत भी मेरीच पट भी मेरीच हा कोणता निपक्ष व्यवहार (फेअर प्ले) झाला बॅटमन ? :) ;)

In reply to by माहितगार

त्यांनीही करावी गोलंदाजी वा फलंदाजी, आम्ही कोण बोलणारे. बाकी उपमा आवडली-यद्यपि हुकलेली असली तरीही.

या धाग्याची व्याप्ती बरीच मोठी आहे. त्यातील ज्या थोड्या भागावर लिहिता येईल त्याचा प्रयत्न करते. माहितगार यांच्या मूळ लेखातील 'सद्य स्थिती आणि आव्हाने कोणती' या प्रश्नाचे उत्तर दुर्दैवाने
कलकत्त्याहून १८० किमी किलोमीटरवरील कु(सु)बलपूर नावाच्या गावात salishi sabha जात पंचायतीनी घडवलेला सामुहीक अत्याचार सुन्न करणारा आहेच पण स्थानिक गावातील इतर महिला पण अत्याचाराचे समर्थन करत असल्याची वृत्ते आहेत......
या घटनेतून काही प्रमाणात मिळू शकते. ही घटना बंगाल मधील असली तरीसुद्धा महाराष्ट्रात देखील खेड्यापाड्यांमध्ये थोड्या बहुत प्रमाणात ही स्थिती आहे. यातील काही घटना कदाचित बाहेर येणार नाहीत. त्यामुळे आव्हानांचा विचार करता आधीच्या माझ्या प्रतिसादात आणि स्वप्नांची राणी, पिरा यांच्या प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे सर्वप्रथम दैनंदिन जीवनातील व्यक्तीगत पातळीपासूनचे प्रश्न सोडविणे हे सगळ्यात मोठे आव्हान आहे. तिथून पुढे मग मराठी विकीपीडीया किंवा अनुदिनी यावर ही सगळी माहिती देण्यातून खरच कितपत बदल घडतील? बहुजन समाजातील अनेक स्त्रिया आज सुद्धा जर शिक्षणापासूनच वंचित आहेत, तर मग स्त्रीवाद वगैरे विषयावर मराठी अनुदिनी शतकांनी आल्या तरी नेमके काय हशील होणार? अर्थातच हा सुधारणेचा एक महत्वाचा भाग आहे (आपला हेतू नक्कीच चांगला आहे) पण तूर्तास याने अंतिम ध्येय साध्य कसे होईल असा प्रश्न पडतो. ज्या लोकांपर्यंत ही सगळी माध्यमे पोचतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाने हे पुढे जाइल असा प्रयत्न करणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे. बाकी ऋषिकेश यांच्या सगळ्या प्रतिसादांशी सह्मत. इतक्या योग्य शब्दात ही भूमिका मांडल्यानंतर अजून याबाबत वेगळे फार काही लिहिण्यासारखे वाटत नाही.

In reply to by मधुरा देशपांडे

ज्या लोकांपर्यंत ही सगळी माध्यमे पोचतात, त्यांच्यापैकी प्रत्येकाने हे पुढे जाइल असा प्रयत्न करणे हे पण तेवढेच महत्वाचे आहे.
जे साधन आपल्या हातात आहे त्याचा जमला तेवढा सदुपयोग करावा एवढेच ध्येय. अर्थात मी मराठी संस्थळांचा आणि मराठी विकिपीडियाला दिल्या जाणार्‍या भेटींचा अभ्यास जेवढा केला त्या नुसार चेपु काही ऑनलाईन मराठी वृत्तपत्रे सोडली तर ग्रामीण आणि बहुजन वाचक इतर मराठी संस्थळांपेक्षा मराठी विकिपीडियाकडे अधिक आहे तो लिहितो कमी पण श्रोता निश्चित आहे. जरासे विषयांतर : साधारणतः वर्षाला ९ लाख मूल दहावी पास होतात दहावी झाल्या नंतर काहीन काही कारणाने किमान प्रमाणात यातील बहुतांशजणांना इंटरनेटला हाताळावेच लागते तुमच्या हातात सातबाराची कॉपी असेल तर बिएसएनएल कडून इंटरनेटचा खर्च मासिक दोन अडीचशे रुपयांवर नसावा म्हणजे शहरात ज्या इंटरनेट सर्वीसला हजार एक चा खर्च होतो तेच काम ग्रामीण भागात दोन अडीचशे रुपयात होते.अर्थात इंटरनेट हाताळणार्‍या इक्विपमेंट्सच्या किमती अजूनही ग्रामीण क्षेत्रा करता प्रोहीबिटीव्ह आहेत.जिथे सरकार खर्च करते तेथे इ॑विपमेंट्स वापरण्यापेक्षा पुन्हा मार्केट मध्ये विकली जाणे अशा समस्याही आहेत.तरीही जेवढी मंडळींकडे इंटरनेट आहे त्यातील अत्यंतकमी संख्याबळ मराठी संकेतस्थळांवर अथवा अनुदिनींवर येत असाव असा कयास आहे अर्थात हा एकुण मराठी संस्थळांनी विचार करावयाचा वेगळ्या चर्चेचा आणि मोठा प्रश्न आहे असे वाटते.

स्त्री पुरुष समानता म्हणजे पुरुष जे जे करतात ते ते आणि तेच्च करायला मिळावे इतका उथळ अर्थ नाहीये.. स्त्री आणि पुरूष वेगवेगळेच आहेत हे पहिल्यांदा मान्य करुन मगच ह्या विषयावर बोलल्या जाऊ शकते. हे आणि असेच! यापुढे स्त्रीमुक्ती, तिचा अमूक एका कार्यक्षेत्रातील सहभाग या आणि अशाच गोष्तींचा उहापोह होताना वरील गोष्ट लक्षात घेऊन त्यापुढे चालू होणार असेल तरच काही संवाद होऊ शकेल (अगदी वादही चालेल), अन्यथा, साध्यासाध्या गोष्तींवर 'हा माझा हक्क हा तुझा हक्क' करण्याचे दिवस खरच (काहीजणींसाठी) संपलेत (तर काहीजणी अजूनही मरतायत).

८ मार्च हा "जागतिक महिला दिन" मराठी विकिपीडियावर लेखन करून सहभाग घ्यावा हे आवाहन. *विकिपीडिया:स्त्री अभ्यास प्रकल्प *विकिपीडिया:महिला प्रकल्प