१. उप्स मिssssssर्रच्या (घाबरु नका ह्या नुसत्या लांबीला मोठया असतात; तिखट अजीबात नाहि)
२. बगारा राईस
३. मर्चि का सालन
साहित्य सालन साठि:
१. मोठया मिरच्या - ५
२. चेरी टोमॅटो - ३
३. जीरं - १ चमचा
४. धणे (आख्खे) - १ चमचा
५. तीळ - पाव वाटि
६. किसलेलं सुखं खोबरं - ३/४ वाटि
७. कच्चे शेंगदाणे - पाव वाटि
८. ४ मध्यम कांदे उभे चीरुन
९. आलं/लसुण पेस्ट - २ चमचे
१०. चींचेचा कोळ - पाव वाटि
११. तिखट - २ चमचे किंवा आवडिप्रमाणे कमी/जास्त
१२. हळद - १/२ चमचा
१३. तेल - १ वाटि
१४. पाणि आवश्यकतेनुसार (फक्त वाटणाकरीता)
१५. सजावटिसाठि कोथींबीर
१६. मीठ चवीनुसार
कॄती:
१. एका नॉनस्टिक पॅन मधे अनुक्रमे कच्चे शेंगदाणे, सुखं खोबरं, जीरं, धणे आणि तीळ; लालसर होईस्त सगळे वेगवेगळे भाजुन/परतुन घ्या. वेगवेगळं अशासाठि कि तीळ/धणे लवकर भाजले जातात. सगळं एकदम घातलं तर शेंगदाणे/खोबरं नीट भाजलं जाणार नाहि.
२. आता त्याच पॅन मधे १ चमचा तेल टाकुन उभा चीरलेला कांदा परतुन घ्या
३. भाजलेलं मिश्रण थंड झालं कि गरजेनुसार पाणी घालुन मीक्सरमधे त्याची मुलायम पेस्ट करुन घ्या
४. आता मध्यम आचेवर एका नॉनस्टिक कढईत/पातेल्यात १ वाटि तेल घाला
५. तेल तापलं कि आलं/लसुण पेस्ट टाकुन परता (ह्या स्टेपला टिप नं ४ बघा)
६. पेस्टचा कच्चा वास गेला कि वाटलेली पेस्ट टाकुन अगदि मंद आचेवर सतत ढवळत रहा (एक साधारण १५-२० मि.) तीळा मुळे पेस्ट कदाचीत खाली लागण्याची शक्यता आहे
७. पाणी पुर्ण आटुन कडेन तेल सुटु लागलं कि तीखट, हळद, चींचेचा कोळ आणि चवीनुसार मीठ घाला
८. एक ५ मि. ग्रेव्हित मोठया मिरच्या (देठासकट) आणि चेरी टोमॅटो (आख्खे) घाला
९. मंद आचेवर मधुन मधुन ग्रेव्हि/सालन हलवत रहा. शेवटच्या स्टेजला ग्रेव्हि/सालनावर पुर्ण तेलाचा तवंग येईल. तो पर्यत मिरच्यांची सालंहि मउ होतील आणि चेरी टोमॅटो अर्धवट गळालेले असतील. गॅस बंद करा आणि वरुन बारिक चीरलेली कोथिंबीर पेरा
गरमा गरम मिर्चि का सालन खालील बगारा राईस बरोबर सर्व करा......
साहित्य बगारा राईस साठि:
१. बासमती तांदुळ - २ कप
२. दालचीनी - १ काडी
३. लवंगा - ४
४. तमालपत्र - २
५. काळि मीरी - ४
६. काळि / मोठि वेलची - १
७. हिरवी वेलची - ४
८. आलं/लसुण पेस्ट - २ चमचे
९. बारीक चीरलेला पुदिना - १.५ कप
१०. हिरव्या मिरच्या उभ्या चीरुन - आवडिप्रमाणे कमी/जास्त
११. उभे चीरलेले कांदे - २
१२. काजु मधुन तुकडे करुन - १० (एच्छिक)
१३. साजुक तुप - ४ पळ्या
१४. चवीनुसार मीठ
कॄती:
१. बासमती तांदुळ स्वच्छ धुवुन एक १/२ तास भीजत ठेवा
२. मंद आचेवर आता एका जाड बुडाच्या पातेल्यात तुप तापलं कि खडे मसाले घाला. मसाले चांगले परतले कि आलं/लसुण पेस्ट घालुन परता
३. पेस्टचा कच्चा वास गेला कि उभे चीरलेले कांदे घालुन परता. कांदा पारर्दर्शक झाला कि पुदिना घालुन एक २ मि. परता
४. आता त्यात ३ कप पाणि घालुन उकळि आणा (ह्या स्टेपला टिप नं २ बघा)
५. आता त्यात भीजवलेले बासमती तांदुळ घाला व भात मोकळा शीजवुन घ्या
६. गॅस बंद केलात कि तुकडा काजु १ चमचा तुपात तळुन/शॅलो फ्राय करुन तयार भातात मिसळा
गरमागरम बगारा राईस वरील मिर्चि का सालन बरोबर हाणा :)
टिपा:
१. मुळ ग्रेव्हि तीच ठेवुन त्यात वेगवेगळे पदार्थ घालुन वेगवेगळ्या सालन ग्रेव्ह्या बनवु शकतो. उदा:
अ. मिरच्यां एवजी छोटया वांग्यांना स्वच्छ धुवुन त्यांना + ची चीर देउन फोडणीपात्रात कमीत कमी तेलात शॅलो फ्राय करुन घ्या आणि मग देठासकट ग्रेव्हित घाला......कि झाले भगारा बैंगन
ब. नुसते छोटे चेरी टोमॅटो किंवा मद्रासी कांदे (दोन्हि आख्खे) ग्रेव्हित घातले......कि होईल टमाटर या प्याज का सालन
क. कलरफुल सीमला मिरच्यांच (चौकोनी तुकडे करुन) सालन छान तर लागतंच शीवाय कलरफुलहि दिसतं. फक्त त्या ग्रेव्हित घालण्याआधी १ चमचा तेलात शॅलो फ्राय करा आणि अगदि चीमुटभर मीठ/धणे पावडर भुरभुरा जेणेकरुन खाताना सीमला मिरच्यांचे तुकडे प्लेन लागणार नाहित
२. भाताच्या गुणवत्तेनुसार पाण्याचं प्रमाण अॅडजेस्ट करा. खरं तर मी पाणि उकळल्यामुळे खडया मसाल्यांचा रंग उतरुन भात तपकिरी झालाय. जर मसाले परतल्यावर लगेच भीजवलेला भात घातला तर भात मस्त पांढराशुभ्र होतो. असो आवड आपली आपली.
३. हैदराबादेत हे सालन खासकरुन चिकन/मटण बिर्याणी सोबत पेश करतात. वेल पण व्हेज बिर्याणीहि आपली काहि कसर सोडत नाहि.
४. आवडत असेल तर सालनात १ चमचा मोहरी (पण अगदि बारीक मीळते ती) घाला. मोठि घातलीत तर खाताना कदाचीत कडवट लागेल. वेल पण नाहि घातलीत तरी चव तसुभरहि कमी होत नाहि.
चला तर मग करा आणि खायचा/खीलवायचा आनंद द्विगुणीत करा.......
वाचने
17084
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
मायला काय हिरव्यागार मिरच्या
मस्त रेसीपी.
In reply to मायला काय हिरव्यागार मिरच्या by सुहास..
+१
In reply to मस्त रेसीपी. by विजुभाऊ
संमं
In reply to +१ by गणपा
जबरा....
वा.. खुपच छान दिसतय सालन आणि
+१
In reply to वा.. खुपच छान दिसतय सालन आणि by Mrunalini
+२
In reply to वा.. खुपच छान दिसतय सालन आणि by Mrunalini
लाहौलविलाकुवत.
सहमत सहमत.
In reply to लाहौलविलाकुवत. by प्यारे१
धन्स अभ्या
In reply to सहमत सहमत. by अभ्या..
हायक्लास.....!!!!!!!!!!!
मार डाला!!!
खल्लास!
मस्तच.
सालनचा फटु बघून वारल्या गेलो
आत्मे वारतात?
In reply to सालनचा फटु बघून वारल्या गेलो by अत्रुप्त आत्मा
माणसे नै का सूड घेत?
In reply to आत्मे वारतात? by सूड
स्स्स्स्स्सही !
अगदी अगदी... कसले जीवघेणे
In reply to स्स्स्स्स्सही ! by गणपा
सही.
खाना!
In reply to सही. by साती
आता भगारे आणि निखरे म्हणजे
In reply to खाना! by साती
पाकृ
In reply to आता भगारे आणि निखरे म्हणजे by सूड
बघार
In reply to पाकृ by साती
सहि बोलती तुम आपा .. !
In reply to खाना! by साती
पहाटवार्या......
In reply to सहि बोलती तुम आपा .. ! by पहाटवारा
नाहि :(
In reply to पहाटवार्या...... by दिपक.कुवेत
अहाहा!
खल्लास!
दोन्ही पाककॄती सुंदर .. :)
अरारारारा....पोटात बेक्कार
ऐग्गं! मस्त फोटू व पाकृ.
खत्रा
सालन फोटो व पाकृ आवडले, सालन
सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद
आवडलेली आहे पाकृ !!!!!
वावा..
मस्त
सखी....
In reply to मस्त by सखी
दिपक.कुवेत सालन फोटो व पाकृ
घ्या पान वाढायला , एकदम लजीज
एकदम लजीज
धन्यवाद अनन्त
In reply to एकदम लजीज by अनन्त अवधुत
चेरी टोमॅटो म्हणजे काय?
अहो ते नाहिच मिळाले तर
In reply to चेरी टोमॅटो म्हणजे काय? by वामन देशमुख
चेरीसारखे दिसणारे छोटे टोमॅटो
चेरी टोमॅटो म्हणजे काय?
खूप छान रेसिपी
अप्रतिम.
काय राव मिर्ची का सालन ची
वॉsssssssssव
ऐसाइइच्च लाइफ होना
डोकं आउट केलय