Skip to main content

निरलस

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 20/01/2014 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सुकते झडते पुन्हा उगवते भावुक ओले नाते अवनीलाही कळते ना कोशात कसे तण अंकुरते स्पर्श खुणेचा थेंब एक , गंधाळ : कुपीतुन उलगडते रोम रोम रंध्रातुन अलगद अंतरातले दरवळते कुठेच ना शब्दांचे जोखड मुक्यानेच सारे घडते झुळुक वाहते अशीच निरलस अंग अंगणी शहारते ………………. अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2061
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

छान कविता! मी "मन उधाण वार्‍याचे" ची चाल ही बसतेय.