प्रात्यक्षिकः चित्रे माऊंट कशी करावीत
कागदावर केलेले चित्र माऊंट कसे करावे, याचे प्रात्यक्षिक या लेखात बघा.
साहित्यः कागदावरील चित्र, माऊंट बोर्ड, स्टीलची पट्टी, मोजण्याचा टेप वा स्केल, पेन्सिल, माऊंट कटर, जाडा पांढरा कागद, कटिंग मॅट (किंवा साधा पुठ्ठा), सेलोटेप वा अन्य चिकट टेप.
कृती:
१. चित्र माऊट बोर्ड वर ठेऊन बघितले. बोर्ड एका बाजूने पांढरा, आणि दुसरी बाजू राखाडी असा आहे, यापैकी कोणताच रंग चित्राला उठाव देणारा वाटला नाही, त्यामुळे बोर्ड रंगवून घ्यायचे ठरवले. चित्राच्या चारी बाजूला दीड इंच जागा ठेऊन तेवढा बोर्ड कापून घेतला. (चित्र मोठे असेल तर अडीच वा जास्त इंच योग्य)
आधी लाल रंग लावून बघितला, पण तोही ठीक न वाटल्याने त्यावर रॉ सायना रंग चढवला, आणि बोर्ड वाळायला ठेवला.
.
२. पेन्सिलीने चौकोन आखून घेऊन माऊंट कटरने बोर्डात खिडकी कापून काढली. हे करताना माऊंट कटिंग मॅट वर ठेऊन कापला. (कटिंग मॅट नसल्यास साधा पुठ्ठा वा हार्ड बोर्ड ठेवता येईल)
.
३. चित्रावर खिडकी कापलेला बोर्ड ठेऊन बघितला. रंग वगैरे एकंदरित समाधानकारक वाटल्यावर चित्राएवढ्याच आकाराचा पांढरा जाड कागद कापून घेतला. आता मूळ चित्र, त्याच आकाराचा पांढरा कागद, आणि कापलेला माऊंट हे तयार आहे.
.
.
४. कापलेला माऊंट पालथा ठेऊन त्यावर चित्र नेमके कुठे ठेवायचे, याच्या खुणा पेन्सिलीने करून घेतल्या. (टेप लावताना चित्र सरकले, तर कळावे म्हणून). मग पालथा माऊंट, त्यावर पालथे चित्र, त्यावर पांढरा कागद असे नीट जुळवून ठेवले, आणि चारीकडे टेप लावला.
.
.
५. झाले चित्र माऊंट. आता ते असे दिसते आहे:
चित्रामागे जाडा पांढरा कागद लावल्याने चित्र मागून सुरक्षित रहाते ( हा कागद अॅसिड फ्री असेल, तर फार चांगले), चिकट टेप प्रत्यक्ष चित्रावर लावला जात नाही, शिवाय फ्रेम केल्यावर फ्रेमच्या मागचा हार्डबोर्ड प्रत्यक्ष चित्राच्या संपर्कात येत नाही. हे अतिशय आवश्यक आहे, कारण कालांतराने हार्डबोर्डमुळे चित्रावर डाग पडून ते खराब होते. खबरदारी म्हणून फ्रेमिंगचे वेळी आणखी एक जाडा पांढरा कागद मधे घालावा. कागदावर चित्र काढून झाल्यावर चित्र शक्यतो माऊंट करून ठेवावे.
हे चित्र मी जरा बदल म्हणून प्रयोगादाखल केले आहे, 'घोड्यांची चित्रे' असा लेख लिहिण्याचा विचार आहे. यात ग्रीक कलेपासून हुसेनचे घोडे वगैरे यावे, असा विचार आहे. मी आणखी घोड्यांची चित्रे केल्यास तीही येतील.
प्रतिक्रिया
मस्त लेख...
जरुर लिहा
गणेशा झालाय माझा!!
फोटो भारीच. घोड्यांबद्दलचा
उपयुक्त माहिती. लवकरच घोडे
मस्त.
उपयुक्त माहिती.
त्वरा करावी...घोडे सत्वर तटास भीडवावेत ही विनन्ती....
आवडले,मी ही घोड्यांची वाट
माउन्ट बोर्ड कुठे मिळेल ?
माऊंट बोर्ड आणि अन्य सूचना.
माऊंट बोर्ड आणि अन्य सूचना.
सहज आठवले म्हणून...
चित्रे, दस्तावेजांची काळजी
खरे ै आहे
एकच फ्रेम
अवश्य धागा काढा.
मस्त!