खरंच का आपण इतके भयंकर आहोत?
आज दुपारी एका गॅरेजमध्ये गाडी दुरुस्तीसाठी उभा होतो. बाजुने एक कुत्री दबकत दबकत चालली होती, तिचे माझ्या हालचालीकडे लक्ष होते...नेमके मी जिथे उभा होतो तिथुनच तिला जायचे असल्याने अर्थातच तिला जाण्यासाठी वाट द्यावी म्हणुन मी जरा सरकलो, त्यावर दचकुन ती मागच्या मागे पळत सुटली...हे पाहुन मला सखेद आश्चर्य वाटले...
इतकी वर्षे माणसांबरोबर राहुनही कुत्री-मांजरे किती भितात आपल्याला?
माणुस हा इतका भयंकर प्राणि आहे का?
मानव जातीच्या उत्क्रांतीबरोबर आज समस्त जगावर स्वत:चे अनभिषिक्त साम्राज्य माणसाने उभं केलय. समस्त प्राणी-पशु जगताला ताब्यात घेऊन त्यांच्यावरही राज्य करतो आहे ( काहींना गुलाम, पाळीव प्राणि बनवलय तर काहींना पिंजऱ्यात कोंडलय) जगातल्या इंचभर जमीनीवर एकाही प्राण्याचा अधिकार नाही....सगळ्या सातबाराच्या उताऱ्यावर माणसाचीच नोंदणी ( भुतदयेच्या नावावर थोडीफार अभयारण्ये केलीयेत पण ती देखील नावालाच)
वाट्टेल ती पापे करायची आणि मग बिचार्या प्राण्यांच्या नावाच्या उपमा द्यायच्या ( "पशुतुल्य बलात्कार", "अकलेने गाढव आहेस नुसता", "कुत्ते की मौत", गीदड, जानवर, इत्यादी इत्यादी)
काय हो खरंच इतके भयंकर, कृतघ्न आणि विश्वास ठेवायला नालायक आहोत का आपण?
वाचने
4243
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
>>काय हो
In reply to >>काय हो by सखाराम_गटणे™
हो, जर
जबरा
कारण..
कोई शक
मुके प्राणी
माणूष्य = जल्लाद
माझं मत..
एक संवाद
कुत्रीच काय..
असं काहीही