नमस्कार मंडळी,
मिसळपाववर २०१४ च्या लोकसभा निवडणुकविषयक वातावरणनिर्मिती करण्यात हातभार लावायच्या उद्देशाने तयार केलेल्या प्रश्नमंजुषेला सुरवात करताना खूपच आनंद होत आहे.
राजकारणात आणि विशेषत: निवडणुकांमध्ये अगदी चौथी-पाचवीमध्ये असल्यापासून अतोनात रस असल्यामुळे सगळ्या घडामोडी मी भक्तीभावाने वाचल्या/बातम्यांमध्ये पाहिल्या आहेत.आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात असे कुठेतरी कधीतरी वाचलेले/बघितलेले होते ते एका चिटोऱ्यावर लिहून काढून, आंतरजालावर परत एकदा जुने संदर्भ तपासून २० प्रश्न तयार करण्याइतपत माहिती एकत्र झाली. ती सगळी माहिती अचूक आहे याची खात्री करायचा माझ्या परिने होईल तितका प्रयत्न मी केला आहे.तरीही त्यात काही चूक/त्रुटी असल्यास ती निदर्शनास जरूर आणून द्यावी ही विनंती.
खाली दिलेल्या पहिल्या प्रश्नाच्या काठिण्यपातळीला सर्वसाधारणपणे समकक्ष इतर प्रश्नांची काठिण्यपातळी असेल.प्रत्येक प्रश्नाला पाच पर्याय असतील. दर आठवड्याला एक अशा पध्दतीने ते प्रश्न मी इथे पोस्ट करणार आहे.प्रश्नांची उत्तरे व्य.नि वरच कळवावी ही विनंती.प्रत्येक व्य.नि ला उत्तर द्यायचा प्रयत्न करेनच पण तसे करता न आल्यास प्रश्नाचे उत्तर जाहिर करताना कोणी बरोबर उत्तरे दिली हे पण जाहिर केले जाईल. तसेच काही वेळा पर्यायात नसलेले पण बरोबर असलेले उत्तर असेलच.व्य.नि वर उत्तर पाठवताना असे पर्यायात नसलेले कुठले उत्तर माहित असल्यास ते पण पाठवावे ही विनंती.
या २० प्रश्नांसाठी एका धाग्यात प्रत्येकी ४ असे एकूण ५ वेगळे धागे काढायचा सध्याचा विचार आहे. नंतर या आकड्यात गरज पडल्यास नक्कीच बदल करेन. इथे सुरवात पहिल्या प्रश्नापासून करत आहे.
प्रश्न क्रमांक १
आतापर्यंत चार वेगळ्या राज्यांमधून (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली आणि गुजरात) लोकसभेवर निवडून गेलेले अटलबिहारी वाजपेयी हे असे आतापर्यंतचे एकमेव लोकसभा सदस्य आहेत. खालीलपैकी कोण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेले आहेत?
अ. कांशीराम
ब. जॉर्ज फर्नांडिस
क. शरद यादव
ड. इंदिरा गांधी
इ. (क) आणि (ड) दोन्ही
या पर्यायांमध्ये नसलेल्या पण लोकसभेवर तीन वेगळ्या राज्यांमधून निवडून गेलेले/ल्या किमान दोन सदस्य मला माहित आहेत.ते उत्तरात जाहिर करणारच आहे.आपल्यालाही अन्य कोणी सदस्य माहित असल्यास जरूर कळवावे.
(उत्तर व्य.नि वरच द्यावे ही विनंती. उत्तर इथेच ५ जानेवारी रोजी जाहिर केले जाईल)
वाचने
23986
प्रतिक्रिया
50
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तर व्य नि वर पाठवले आहे.
माझे ज्ञान तितपतच..
आम्ही उत्तरे आणि प्रश्न वाचत
हेच म्हणणार होतो
In reply to आम्ही उत्तरे आणि प्रश्न वाचत by arunjoshi123
+१.. पुढिल प्रश्नांबद्दलही
In reply to हेच म्हणणार होतो by सुधीर
नवीन माहिती मिळाली , आज आनंदी
निवडणुकांवर फेसबुक पान
अभ्यास करायला लावणारा धागा!
+१
In reply to अभ्यास करायला लावणारा धागा! by पैसा
प्रश्न क्रमांक १ चे उत्तर
आणखी एक नाव--व्ही.के.कृष्ण मेनन
In reply to प्रश्न क्रमांक १ चे उत्तर by क्लिंटन
प्रश्न क्रमांक १ श्रेयनामावली
माझ्या कडे असलेल्या थोड्याशा
स्वसंपादन
टिवटिव आणि तथास्तु यांनी
टिवटिव आणि तथास्तु यांनी यापेक्षा वेगळी उत्तरे पाठवली.या दोघात एक समानता आहे ओळखा बर ! *mosking* *wink*दोघेही लातूरकर आहेत.
In reply to टिवटिव आणि तथास्तु यांनी by जेपी
टिवटिव आणि तथास्तु - दोघेही
In reply to दोघेही लातूरकर आहेत. by श्रीरंग_जोशी
टिवटिव आणि तथास्तु - दोघेही लातूरकर आहेत. बरोबर का?+१हामीबी हाव.
In reply to टिवटिव आणि तथास्तु - दोघेही by जेपी
दोघांनी ही चुकीची उत्तरं दिली
In reply to टिवटिव आणि तथास्तु यांनी by जेपी
ही प्रश्न मंजुषा सुरु केल्याबद्दल आभारी आहोत.
प्रश्नांची उत्तरे देण्याइतका
>>> विदा "विदा" म्हणजे काय?
Data.
In reply to >>> विदा "विदा" म्हणजे काय? by श्रीगुरुजी
"विदा" आणि "Data" यांचा कसा
In reply to Data. by विश्वनाथ मेहेंदळे
मला इतकेच म्हणायचे होते की
In reply to "विदा" आणि "Data" यांचा कसा by श्रीगुरुजी
नाही नाही, गुर्जींना भौदा
In reply to मला इतकेच म्हणायचे होते की by डॉ सुहास म्हात्रे
हायला खर्र्च की. पण हा शब्द
In reply to नाही नाही, गुर्जींना भौदा by आदूबाळ
सुरेख.
प्रश्न क्रमांक २
प्रश्न क्रमांक २ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक २ by क्लिंटन
जरी जास्त महिती नसली तरी ही
वेगळा धागा
मान्य आहे, पण किमान
In reply to वेगळा धागा by क्लिंटन
शीर्षकात बदल?
In reply to मान्य आहे, पण किमान by आनन्दा
संपादकांना विनंती करून
In reply to शीर्षकात बदल? by क्लिंटन
पुढच्या बुधवारी दुसरा भाग
In reply to संपादकांना विनंती करून by डॉ सुहास म्हात्रे
अहो, चालेल नाही... धावेल !
In reply to पुढच्या बुधवारी दुसरा भाग by क्लिंटन
चांगला उपक्रम .. वाचते आहे.
प्रश्न क्र्मांक ३
प्रश्न क्रमांक ३ चे उत्तर
In reply to प्रश्न क्र्मांक ३ by क्लिंटन
प्रश्र्ण खरोखरच चकवणारा होता
In reply to प्रश्न क्रमांक ३ चे उत्तर by क्लिंटन
प्रश्र्ण खरोखरच चकवणारा होता
In reply to प्रश्र्ण खरोखरच चकवणारा होता by ज्ञानोबाचे पैजार
धागा वर काढायला
प्र.क्र. २
प्रश्न क्रमांक ४
या सर्वांनी पंत प्रधान
In reply to प्रश्न क्रमांक ४ by क्लिंटन
उत्तर व्य.नि वरच पाठवावे ही
In reply to या सर्वांनी पंत प्रधान by विअर्ड विक्स
प्रश्न क्रमांक ४ चे उत्तर
In reply to प्रश्न क्रमांक ४ by क्लिंटन
एकात २ प्रश्न
यावेळेस आपला पास .