Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विजुभाऊ on Sat, 01/18/2014 - 12:36
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
शुभेच्छा
मागील दुवा..... काSSSSSSयपो छे.... http://misalpav.com/node/16556 संक्राम्तीच्या निमित्ताने पुन्हा अहमदाबादच्या आठवणी जाग्या झाल्या. तिथला पतंगमहोत्सव हा अवर्णनीय असतो. गरब्याप्रमाणेच पतंग हाही गुजरातच्या सांस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. संक्रान्तीला सगळेजण पतंग उडवत असतात. मुले मुली आजी आजोबा आई वडील नातेवाईक मित्र सगळे जणू मिळून अक्षरशहा दिवसभर आकाशात असतात. सगळा गुजरात पतंगमय झालेला असतो. अहमदाबादच्या एअरपोर्टवर सुद्धा स्वागतासाठी पतंगाचे मोठमोठे कटआउट्स लावलेले असतात.इतकेच काय पण जहिरातीसुद्धा पतंगमय झालेल्या असतात. http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375328120/sizes/l/in/photostream/ संक्रान्तीचेच निमित्त काढून तेथे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सव आखला जातो. जवळपास ३० /३२ देशातेल पतंगबहद्दूर येतात आनि आपली कला पेश करतात. आपल्याला कल्पनाच नसते की हे असले काही पतंग असू शकतात. कोणी नुसते सांगीतले तर विश्वास बसणार नाही इतके अचाट. अहमदाबाद मधे हा पतंगमहोत्सव दरवर्षी असतो. सम्क्रान्तीच्या आसपास हा अहमदाबाद शहरात , त्यानंतर कच्छ आणि नंतर गुजरातच्या इतर भागात नेला जातो. http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375293044/sizes/l/in/photostream/ या इथे काय काय बघायला मिळेल याची आपणाला अगोदर थोडीफार कल्पना असते पण आत आल्यावर जे दिसते ते कल्पनातीत असते. वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या प्रकारचे पतंग हवे विहरत असतात. अगदी छोटा चिंटुकला इथपासून ते अक्षरशः दोन मजली उंच इमारती एवढा अवाढव्य http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375295974/sizes/l/in/photostream/ आकार/ डिझाईन्स सुद्धा अनेक. हा पतंग एका फ्रेंच माणसाने आणला होता जवळजवळ दोन मीटर रुंदीचा. सिल्कच्या कापडापासून बनवलेला. अत्यंत वेगवान. दोन दोर्‍या वापरुन उडवावा लागतो http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375302852/sizes/l/in/photostream/ भगतमासा( स्टिंग रे) आणि वाघ हे इथले फेवरेट प्राणी. हे पतंग कोरीयन आहेत http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374705047/sizes/l/in/photostream/ http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374706629/sizes/l/in/photostream/ . http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375319230/sizes/l/in/photostream/ हे जपानी महाराज आकशात उडायला एकदम तयार आहेत http://www.flickr.com/photos/43995406@N02/5374725125/sizes/l/in/photostream/ हा अवाढव्य पतंग उडवायला तेवढीच जाड दोरी आणि अठरा माणसे लागतात. याच चित्रात मागे उजव्या बाजुला दिसतेय ती कसली दोरी किंवा वायर नाहीय्ये. "बगळ्यांची माळ दिसे अजूनी अंबरात " त्यासारखीच अडीचशे पतंगांची माळ उडताना दिसतेय. http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375309068/sizes/l/in/photostream/. इथून जाताना आपण नक्की काय पाहिले याचा हिषेब लागत नाही. विंचु , बॅटमॅन , अवाढव्य फुलपाखर ,विमाने अक्षरशः दिवसा स्वप्न पहातोय असे वाटते. हे स्वप्न जगत पुढचे काही दिवसतरी आनंदात जाणार असतात. http://www.flickr.com/photos/43995406@N02/5375326326/sizes/l/in/photostream/ कॅमेर्‍यातली दृष्ये आपल्या पुन्हा पुन्हा ते आनंदाचे क्षण आपल्या भेटीला आणतात.आणि सांगतात अरे पतंगासारखे मस्त आकाशात आनंदात विहरत जग.
  • Log in or register to post comments
  • 14597 views

प्रतिक्रिया

Submitted by टॉपगिअर्ड फिलोसॉफर on Sat, 01/18/2014 - 12:48

Permalink

मोदिचा पतंग उडणार का?

मोदिचा पतंग उडणार का?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Sat, 01/18/2014 - 15:10

In reply to मोदिचा पतंग उडणार का? by टॉपगिअर्ड फिलोसॉफर

Permalink

खुब जमेगा रंग जब भौकेंगे ३

खुब जमेगा रंग जब भौकेंगे ३ यार...'चीन', 'स्टिंकर' और 'लोफर' ;) 'मुद्दाम' मीटरमे बस्याच नै :P
  • Log in or register to post comments

Submitted by बर्फाळलांडगा on Sat, 01/18/2014 - 12:51

Permalink

मस्त मस्त

.
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sat, 01/18/2014 - 13:14

Permalink

फोटू दिसंना...

फोटू दिसंना...
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sat, 01/18/2014 - 13:40

Permalink

मस्त हो विजुभाऊ.

मस्त हो विजुभाऊ. बाकी काही पतंग पाहुन त्यांना पतंग म्हणावं का बलून का पॅराशुट या गोंधळात पडलोय. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Sun, 01/19/2014 - 14:56

In reply to मस्त हो विजुभाऊ. by गणपा

Permalink

+१

असेच म्हणते...
  • Log in or register to post comments

Submitted by मारकुटे on Sat, 01/18/2014 - 13:45

Permalink

फटू दिसत नाहित

फटू दिसत नाहित
  • Log in or register to post comments

Submitted by गणपा on Sat, 01/18/2014 - 13:59

Permalink

फोटो http://www.flickr.com या

फोटो http://www.flickr.com या संस्थळावर असल्याने ज्यांना या साईटचा अ‍ॅक्सेस नाही त्यांना कदाचित दिसणार नाहीत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 01/18/2014 - 14:15

Permalink

खरच विजुभाऊ.

खरच विजुभाऊ. हवे मने खबर पय्डी के 'काSSSSSSSय पो छे' एटले सूं. बहु मजा आयवी हो आटला बधा पतंग जोता. हवे बाफेळूनी (एऊच केवाय ना? के कांई बिजू नांम होय छे?)पण बहु याद आवे छे. तमारी पासे पाककृती छे?
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 01/20/2014 - 03:25

In reply to खरच विजुभाऊ. by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकर काका

पेठकर काका बाफलो = कैरीचे पन्हे बाफेलु शाक = उकडलेली भाजी बाफेळु नावाची भाजी ऐकीवात नाही. ( माझ्य किंवा मझ्या मुलांच्या आईला विचारुन सांगतो )
  • Log in or register to post comments

Submitted by भाते on Sat, 01/18/2014 - 14:18

Permalink

मस्तच फोटो आहेत.

फोटो आणि वर्णन दोन्ही आवडले. फोटो दिसत नाहीत… थोडी कळ सोसा. मलासुद्धा पहिल्या दोनवेळा धागा ऊघडल्यावर फोटो दिसत नव्हते. मी सुद्धा असाच प्रतिसाद देणार होतो. पण आता दिसताहेत मला फोटो.
  • Log in or register to post comments

Submitted by आतिवास on Sat, 01/18/2014 - 14:33

In reply to मस्तच फोटो आहेत. by भाते

Permalink

+१

मलाही फोटो आधी दिसले नाहीत, आता दिसले.
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Sat, 01/18/2014 - 14:31

Permalink

झ॑क्कास

पतंगोत्सवासाठी कधीतरी वेळ पकडून चक्कर टाकली पाहीजे..
  • Log in or register to post comments

Submitted by संजय क्षीरसागर on Sat, 01/18/2014 - 15:00

Permalink

एकदम पतंगासारखं उन्मुक्त करणारा लेख!

फोटो बघून अतीव आनंद वाटला, धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Sat, 01/18/2014 - 16:17

Permalink

मस्त

लेख आवडला.
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 01/18/2014 - 16:37

Permalink

वावा..

पतंगबाजी आवडली, स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by काकाकाकू on Sat, 01/18/2014 - 17:28

Permalink

विजूभाउ, ते निळ्या/मोरपीशि

रंगाचं ग्राउंड कुठलं हो? खास पतंग उडवणार्‍या मंडळींसाठी तयार करतात का काय? आणि अडिचशे पतंग काय नुसते एकामागे एक जोडलेले असतात? ही पतंगांची माळ उडवतात कशी सुरूवातीला याचा व्हिडीओ असला तर द्याल का? गंमत आहे खरी.......
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Mon, 01/20/2014 - 03:28

In reply to विजूभाउ, ते निळ्या/मोरपीशि by काकाकाकू

Permalink

त्या ग्राउंडवर कारपेट

त्या ग्राउंडवर कारपेट अंथरलेले होते. अहमदाबादच्या रीव्हर साईड भागात हा महोत्सव भरवला होता. ही पतंगांची माल कशी उडवतात याचा नाही मात्र तो पॅरॅशूटच्या आकाराचा पतंग उडवतानाचा व्हिडीओ आहे. मार्च मध्ये भारतात जाईन तेंव्हा शेअर करेन
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Sat, 01/18/2014 - 18:00

Permalink

मस्तच. आवडली कापाकापी!

मस्तच. आवडली कापाकापी!
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 01/18/2014 - 18:39

Permalink

वॄतांत आणि फोटु बद्धल

वॄतांत आणि फोटु बद्धल इजुभाऊंना शुभेच्छा. !!! माझे पतंग उडवण्याचे दिवस आठवले. :) आमच्या वेळी आठ आण्याच्या {५० पैसे} चा साधा पतंग मिळायचा, तर कौवा {म्हणजे मोठा पतंग } १ रुपयाला मिळत असे. पतंगाला योग्य ठि़काणी कण्णी बांधली जात असे{कण्णी :- पतंगाला बांधला जाणारा दोरा} मग शेपटी लावण्याचा कार्यक्रम होत असे...गोंद म्हणुन शिजवलेला भात आम्ही वापरायचो. वेगवेगळ्या दुकानात जाउन मांजा आणायचो... त्याची विविधरंगी फिरकी बनवली जात असे. शिवाय यात दुसर्‍या मांज्यावर देखील भर पडत असे तो म्हणजे... गुल केलेला पतंग जो तुमच्या हाताला गवसला आहे,त्याच्या बरोबर अनेक वेळा थोडा फार मांजा मिळत असे.पतंग बदवणे { पतंग उडवणे}मांज्याचा झोल टाकणे किंवा ठील देणे,काटाकाटी हे ठरावीक शब्द पतंग उडवताना वापरले जातात.गुल झालेला पतंग लुटण्याच्या नादात काही मुलांचे जीव देखील गेले आहे. परंतु काही म्हणा पतंग उडवण्याचा जो आनंद आहे... तो उडवणाराच जाणु शकतो. :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Sat, 01/18/2014 - 19:54

In reply to वॄतांत आणि फोटु बद्धल by मदनबाण

Permalink

का मोठे झालो आपण?

आमच्या वेळी आठ आण्याच्या {५० पैसे} चा साधा पतंग मिळायचा, तर कौवा {म्हणजे मोठा पतंग } १ रुपयाला मिळत असे.
माझ्या लहानपणी १ पैसा, ३ पैसे आणि ६ पैसे (कौवा) ह्या दरात पतंग मिळायचे. साखळी छाप दोर्‍याचे रिळ आणून आठ आण्याच्या फिरकीला गुंढाळायचे. पुढे थोडा गुलाबी मांजा (अंगठा आणि करंगळीत लड मोजून) जोडायचा. त्यात तार मांजा सर्वात महत्त्वाचा. भाताने पतंग चिकटविणे, घरीच काचांचा चुराकरून मांजा बनविणे वगैरे बरेच उद्योग केले आहेत. मस्तं होते ते दिवस. रेडिओ, टिव्ही, कॉम्प्युटर कांही नव्हते. मैदानी खेळ हेच मनोरंजनाचे साधन होते.
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Sat, 01/18/2014 - 21:23

Permalink

काय फटू बगा विजुभौ. मजा आ गया

काय फटू बगा विजुभौ. मजा आ गया. बाकी बॅटमॅन पतंग कुठे आहे? त्याचा फटूही दाखवणे, आगौ धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Sat, 01/18/2014 - 21:40

Permalink

मस्तैत फोटू

मस्तैत फोटू
  • Log in or register to post comments

Submitted by इन्दुसुता on Sat, 01/18/2014 - 22:30

Permalink

लेख व फोटो आवडले. आयुष्यात

लेख व फोटो आवडले. आयुष्यात काही गोष्टी ( मला ) अगदी निर्मळ आनंद देवून जातात, त्यात एक .. आकाशात विहरत असणारे पतंग बघणे....
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Sun, 01/19/2014 - 11:01

Permalink

(No subject)

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo:
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Sun, 01/19/2014 - 14:14

Permalink

मन प तंssssssssssग जाहले!

मन प तंssssssssssग जाहले! :)
  • Log in or register to post comments

Submitted by पैसा on गुरुवार, 01/23/2014 - 15:04

Permalink

मस्त!

मस्त लेख आणि फोटु! काही पतंग मात्र फुग्यासारखे दिसताहेत!
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 01/26/2014 - 14:05

Permalink

काही पतंग मात्र फुग्यासारखे

काही पतंग मात्र फुग्यासारखे दिसताहेत! बरोबर. त्याना ते सिल्क च्या कापडापासून बनवलेले असतात. एक भला मोठ्ठा पतंग अगोदर वर सोडतात.( मदर काईट) अन त्यानंतर हे सिल्कचे काइट्स त्याच दोरीला बांधुन वर सोडतात. हवेत गेल्यावर ते एकदम मस्त फुगतात
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Wed, 01/13/2016 - 17:03

Permalink

घ्या इंटरनॅशनल काईट

घ्या इंटरनॅशनल काईट फेस्टिव्हल चा आनंद पुन्हा एकदा.
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाश लोंढे. on गुरुवार, 01/14/2016 - 15:46

Permalink

लई भारी

लई भारी
  • Log in or register to post comments

Submitted by विजुभाऊ on Sun, 01/16/2022 - 12:09

Permalink

दहा पर्षांपूर्वी ......याच

दहा पर्षांपूर्वी ......याच शहरात .......याच कालात
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sun, 01/16/2022 - 17:42

Permalink

व्वा .... मस्त हो विजुभाऊ !

मस्त हो विजुभाऊ ! मझा आ गया ! दोन वर्षांपुर्वी अनुभवलेला पतंगोत्सव आठवला ! दणदणीत पतंगोत्साह, विविध आकारी पतंग आणि उत्साहाने भरलेले पतंगबाज बघून मन उडू उडू झालं !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com