अचानक ठाणे कट्टा - वृत्तांत
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
नमस्कार समस्त मिपाकरहो, (घाबरू नका, मी काही पत्र लिहित नाही आहे)
मिपाचा मी अनुभवलेला हा दुसराच कट्टा आहे. माझा पहिला कट्टा 'इस्पिकचा एक्का' यांचा पुण्यानंतरचा दुसरा आणि भारतातुन परत जाण्यापुर्वीचा मुंबईमध्ये झालेला कट्टा होता. माझ्या सुदैवाने, माझा दुसरा कट्टा 'जेडी' यांचा भारतातुन परत जाण्यापुर्वीचा एकमेव कट्टा होता. मिपाकर भारतातुन आपल्या कामासाठी इतर देशात परत जाताना भारतात कुठेतरी (कोण आहे रे तो मुंबई पुणे करतोय?) किमान एकतरी कट्टा करतातच! याअगोदर काही अप्रतिम कट्टे झाले होते त्याचे वृत्तांत मी वाचले आहेत. त्यामुळे केवळ माझ्या स्मरणशक्तीच्या जोरावर, मी ह्या कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. कट्टयाचे फोटो सुबोध खरे यांनी आधीच इथे डकवले आहेत.
माझ्या सुदैवाने माझ्या पहिल्या कट्टयाला विमेकाका ऊपस्थित होते आणि त्यांनी या कट्टयाचा सविस्तर वृत्तांत लिहिला होता. विमेकाका, लक्ष असु द्या, यावेळी तुम्ही हापिसच्या कामामुळे (इतके काय काम करता हो तुम्ही हापिसात? :) ) कट्टयाला न येऊ शकल्यामुळे माझ्यावर आज ही कट्टयाचा वृत्तांत लिहिण्याची वेळ ओढावली आहे. त्यामुळे पुढच्या कट्टयाच्या आधी मी तुम्हाला व्यनि करून तुम्ही कट्टयाला येणार आहात का हे विचारूनच कट्टयाला यायचे का नाही ते ठरवणार आहे. ह घ्या. :)
काय लिहितो आहे मी हे? कट्टयाचा वृत्तांत लिहायचा आहे मला! :)
सोमवारी संध्याकाळी मिपावर सुबोध खरे यांचा अचानक ठाणे कट्टा हा धागा पाहिला आणि लगेच तो धागा ऊघडला. कट्टयाला सुबोध खरे, मुक्त विहारी आणि जेडी असे किमान तिघे येत आहेत हे नक्की होते. दुसऱ्या दिवशी संक्रातीची सुट्टी असल्याने ठाण्यात जेडी साहेबांबरोबर कट्टा आहे हे वाचुन आनंद झाला. जेडी यांचे सापांविषयीचे अनेक लेख वाचलेले असल्यामुळे सापांशी खेळणारा हा माणुस आहे तरी कोण या ऊत्सुकतेपोटी कट्टयाला जायची खुप इच्छा झाली. जमल्यास कटयाला येण्याचा नक्की प्रयत्न करेन असा प्रतिसाद टाकल्यावर अपेक्षेप्रमाणे मुक्तविहारी यांचा फोन आला. त्यांना येण्याचा प्रयत्न करेन असे सांगुन मी मात्र या कटयाला जायचे ठरवले.
तलावपाळी माहित असली तरी धाग्यावर पद्मश्री चित्रे यांनी सांगितल्याप्रमाणे राजावंत ज्वेलर्स शोधत तिकडे पोचलो. बाकी या समस्त स्त्रियांना दागिन्यांची सगळी दुकाने नक्की माहित असतात. :) राजावंत ज्वेलर्सच्या ऊजव्या बाजुला नमस्कार हॉटेल होते, जे रिनोव्हेशनसाठी बंद होते. डाव्या बाजुला एक बिननावाचे हॉटेल होते, जिथे, सुट्टी असल्याने, बरीच गर्दी होती. समोर झब्बा घालुन एकजण कोणाचीतरी वाट पहात ऊभा होता. इतक्यात समोरून मुक्त विहारी एका इसमाबरोबर येताना दिसले. त्यांनी त्या इसमाची ओळख भटक्या खेडवाला अशी करून दिली. मग सुबोध खरे यांना फोन करण्याचे ठरल्यावर साक्षात सुबोध खरे (आणखी एका इसमाबरोबर) आमच्या समोर प्रकट झाले. त्यांनी त्या इसमाची ओळख जेडी अशी करून दिल्यावर मग आम्ही आत शिरत असताना तो आधीचा झब्बा घालुन ऊभा असलेला इसम आपली ओळख मदनबाण अशी करून देत आमच्याबरोबर आला. मग कडेची जागा बघुन आम्ही (ऊत्त्सवमुर्ती जेडी, सुबोध खरे, मदनबाण, मुक्त विहारी, भटक्या खेडवाला आणि मी) स्थानापन्न झालो. कट्टा अचानक ठरलेला असल्याने, खुपश्या लोकांना सुट्टी नसल्याने आणि बरेच जण 'नक्की येतो, जमल्यास येतो, उशिरा येतो पण नक्की येईन, येण्याचा प्रयत्न करतो' असे सांगुन आयत्या वेळी टांग देतात याची जाणिव असल्याने कटयाची ऊपस्थिती गौण होती.
आम्ही एकेमेकांची ओळख करून घेत असतानाच मदनबाण यांनी आपल्याकडल्या कुपितले सुगंधी अत्तर इतरांना देऊ केले. संक्रांत असल्याने, मग तिळगुळांची देवाणघेवाण झाली. सकाळपासुन गोड खाऊन पोट भरलेले असल्याने खरंतर कोणालाही काही खाण्याची इच्छा नव्हती. पण हॉटेलमध्ये सर्वजण बसलेलो असल्याने खायला काहीतरी मागवणे गरजेचे होते. इथे मला विमेकाकांचे मुलुंड कटयाच्या वृत्तांतातले एक वाक्य आठवले 'कट्टे होतात ते खाण्यासाठी किंवा पिण्यासाठी नाही तर भेटण्यासाठी'. मग सर्वानुमते एक पिझ्झा मागवण्यात आला. मग गप्पा सुरु झाल्यावर जेडी यांचे सर्पोद्यानातले अनुभव आणि सुबोध खरे यांचे वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव ऐकत गप्पा सुरु झाल्या. च्यायला, आपण चाराणे, आठाणे, रुपया जितक्या सहजतेने बोलतो तसे जेडी सुसर, मगर, मण्यार, नाग अश्या भयानक प्राण्यांपद्धल बोलत होते. बहुतेक वेळा सामान्य माणुस साप वैगरे प्राण्यांना घाबरतो, पण जेडी कडे पाहिल्यावर बिचारे सापच या मनुष्य प्राण्याला घाबरतिल असे वाटले. मग सुबोध खरे यांनी आपल्या वैद्यकीय क्षेत्रातले अनुभव सांगायला सुरुवात केली. प्रत्येक कटयाला सुबोध खरे यांची ऊपस्थिती का गरजेची असते हे मला त्यावेळी समजले. सुबोध खरे यांनी डॉक्टरांसाठी यशस्वी अशी त्रिसुत्री ३ ग सांगितली जी सर्व क्षेत्रातल्या व्यक्तींना लागु पडु शकते. पण इथे मिपावर वैद्यकीय क्षेत्रातले बरेचसे तज्ञ असल्याने सुबोध खरे यांच्या परवानगीशिवाय मी ती त्रिसुत्री उघड करू शकत नाही. :)
आमच्या गप्पा सुरु असताना अजया ताई तिथे आल्या. कदाचित मी धाग्यावर अनाहिता तर्फे कोणी येईल का अशी शंका ऊपस्थित केली असल्याने त्यांच्या प्रतिनिधी म्हणुन अजया ताई तिथे आल्या याचा आनंद झाला. मग पुन्हा ओळख झाल्यावर पुन्हा एकदा तिळगुळांची देवाणघेवाण झाली. पुन्हा एकदा काहीतरी खाण्यासाठी म्हणुन आणखी एक डिश मागवण्यात आली. मग जेडी, सुबोध खरे, अजया ताई, मुक्त विहारी यांची अनेक विषयांवर चर्चा सुरु झाली. गप्पा रंगत असतानाच मध्येच चहा कॉफी मागवण्यात आली. मग कामानिमित्त जायचे असल्याने अजया ताई निघुन गेल्यावर पुन्हा आमच्या गप्पा रंगल्या. मदनबाण यांनी मिपा आणि मिपाकर यावर थोडासा प्रकाश टाकला. :)
कंटाळा आला मला आता लिहुन. पुढचा वृत्तांत मुक्तविहारी/मदनबाण/सुबोध खरे यांनी पुर्ण करावा ही विनंती.
कटयाचा वृत्तांत लिहायची ही माझी पहिलीच वेळ असल्याने त्यात जर काही चुका झाल्या असतील तर संपादक मंडळ/कटयाला आलेली मंडळी/इतर समस्त मिपाकर यांनी कृपया त्यात योग्य ते बदल करावेत ही नम्र विनंती.
प्रतिक्रिया
मस्तच!
ज्जे बात!
भातेसाहेब, चांगला झालाय
मदनबाणा, आपल्याला भेटून किती
मदनबाणा, आपल्याला भेटून किती
आदुबाळ तुझ्या बद्धल बरीच
बापरे! काय विस्फोटक वाक्य!
कॉलेजमधलं टोपणनाव!
किंचित सुधारणा....
त्रिसूत्री "ग" ची
गर्दी आणि गाडीचं ठीके पण
वा हा प्रश्न वाचुन तुमच्यात यशस्वी डागदर चे
गाढवपणा
प्रथितयश डॉक्टर होण्याचा
प्रथितयश डॉक्टर होण्याचा संकटापासून आम्ही वाचलो आहोत.थोडक्यात, तुम्ही "प्रथितयश" (यशस्वी होण्याच्या अगोदरच्या, यशाकडे मार्गक्रमण करणाच्या) अवस्थेला टाळून तडक "यशस्वी" डॉक्टर अवस्थेची पाहिरी गाठली आहे ! ;)(No subject)
मस्त !!!
छान
लवकरच...
(No subject)
व्वा!!!
का घाबरायचे?
मस्त वृतांत लिहिला आहे.
अरे बापरे! इतके प्रतिसाद!
मिपाकर इतके उदारमतवादी आहेत हे समजल्यावर आनंद झाला.
भाते, धन्यवाद.....
छान लिहिले आहे!
अरे वा..
अरेरे, या वेळेला पन चानस
मस्त