स्वप्नसुंदरी
हातात हिरव्या बांगड्यांचा
चुडा भरला होता,
तोच हात मेंदीने,
तेव्हा रंगला होता !
नथनीचा तुझा त्यावेळी
डौलच न्यारा होता,
गालावरील लालीचा
रंग लाजरा होता!
डोळ्यांमध्ये निरागसता
पराकोटीची जपलेली,
गोष्ट माझ्या प्रेमाची
तव ओठी लपलेली !
वाळवंटातही कोठेतरी
हिरवळ थोडी असावी
रखरखत्या या जीवनात माझ्या
सावली तुझी मिळावी !
अनिरुद्ध
वाचने
2006
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा..
बहोत खुब..अनिरुध्द्जी
मस्त कविता आहे आपली..
स्वप्नसुंदरी
गोष्ट माझ्या प्रेमाची
तव ओठी लपलेली !
- हे फारच छान