याविषयावर खूप आधीपासून लिहायची इच्छा होती, पण आज मकर संक्रांतीचं निमित्त मिळालं. आपण वर्षभरात एवढे छोटे-मोठे सण साजरे करतो, पण त्यातल्या देशाभरात मोठ्या प्रमाणावर साज-या होणा-या जवळ जवळ प्रत्येक सणामध्ये आपण कोणत्या न कोणत्या स्वरूपात निसर्गाचं नुकसान करत असतो. लेखनामागचा आशय शीर्षकावरून स्पष्ट होत नसेल तर - 'आक्षेप सण साजरे करण्याला नसून साजरे करण्याच्या पद्धतीला आहे.' असा आहे.
सुरुवात मकर संक्रातीपासून करूया. हल्ली चायनीज नायलॉनचा मांजा मिळतो जो धारदार आणि सहजासहजी न तुटणारा असतो. आकाशात खेळल्या जाणा-या चढाओढीमध्ये आपला पतंग काटला जाऊ नये म्हणून हल्ली बरेच जण हा नायलॉनचा मांजा वापरतात. हा अशा प्रकारचा मांजा बाजारात यायच्या आधीपासूनच पतंग उडवण्यामुळे पक्ष्यांना आणि प्रसंगी माणसांना होणा-या त्रासाबद्दल अनेक माध्यमांतून जनजागृतीचे (निष्फळ?) प्रयत्न होत आल्येत. निष्फळ अशासाठी की माणसं पतंग उडवायचं थांबायच्या ऐवजी पक्ष्यांना अधिकच घातक ठरणारे मांजे वापरायला लागल्येत. यासंबंधी हवी तितकी जनजागृती होत नसावी असं वाटतं.
होळीला जागोजागी एवढी जाळपोळ होते. वाळवी लागलेली, सुकलेली, आधीच मेलेली झाडं असतील तर एकवेळ ठीक आहे पण प्रसंगी जाळायला लाकडंच नाहीत म्हणून सरळ जिवंत झाडांना तोडून जाळून टाकतात. काही वर्षांपूर्वी एक लेख वाचला होता, होळीनिमित्तच आला होता. त्यात असं म्हटलं होतं, की कचरा ओला असो किंवा सुका, तो जाळू नये. कारण तो अर्धवट जळला की त्याने निसर्गाला हानीच होते. (हेच कदाचित माणसांवर अंत्यसंस्कार करतानाही लागू होत असावे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे इलेक्ट्रिक चितेवर मोठ्या तापमानावर शरीर पूर्णपणे जळून जात असल्याने निसर्गाला हानीकारक घटक हवेत शिरत नसावेत?) होळी आग न लावता साजरी करता येत नाही का?
होळीच्या दिवशी आगीचा अतिरेक, तर रंगपंचमीच्या दिवशी पाण्याचा!! एवढ्या प्रमाणावर पाणी वाया जातं, की महानगरपालिकेला फतवे काढावे लागतात, अमूक अमूक प्रमाणाबाहेर एखाद्या सोसायटीने पाणी वापरलं तर दंड बसेल वगैरे. त्याचा कितपत परिणाम होतो? तरी नाही म्हटलं तरी गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे ब-याच ठिकाणी 'सुकी होळी' साजरी करण्यात आली. (सदाशिव आमरापूरकरांच्या शेजारच्या कॉलनीतले 'रेन डान्स' सारखे अपवाद सोडून) पण या सुक्या होळीने काय साध्य केलं? सहजासहजी न निघणा-या पक्क्या रंगांना ऊत आला आणि मग ते काढण्यासाठी आंघोळ करताना जेवढं पाणी एरव्हीच्या आंघोळीपेक्षा जास्त वाया गेलं असेल त्याचा काय हिशेब?
जम्प टू दहिहंडी आणि गणेशोत्सव. गोंगाट, गर्दी, वाहतूकीची तारांबळ, होर्डिंग्जचा कचरा, इ. हे दरवर्षी ठरलेलं. गणपती उत्सवांत एवढा गोंगाट असतो, आणि त्यात पीओपीचे गणपती. म्हणजे ध्वनी आणि जल प्रदूषण. तरी बरेच जण हल्ली शाडूच्या मूर्तींकडे आणि विसर्जनासाठी खास तयार केलेल्या कृत्रिम तलावांकडे वळू लागल्येत हे त्यातल्या त्यात बरं.
सगळ्यात शेवटी दिवाळी. निसर्गाला त्रास देण्याचा उच्चांक गाठणारा हा सण. याला तोड नाही. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, फटाक्यांचा, दारूचा, फटाक्यांच्या बॉक्सेसचा कचरा जिकडे तिकडे पडलेला असतो. नीट पाहिलं तर हवेत स्मॉगचा एक काळसर जाड पट्टा असतो या काळात, त्याच्या वरती मग आकाश दिसतं. रात्रीच्या वेळी रॉकेट्सची रोषणाई पाहायला म्हणून गच्चीत गेलो तर लक्ष फटाक्यांऐवजी फटाका फुटण्याच्या प्रत्येक आवाजानिशी त्या आवाजाजवळच्या पक्ष्यांच्या होणा-या धावपळीने वेधून घेतलं. वर्षभरात कधीही साधं लग्नाच्या किंवा क्रिकेटच्या निमित्ताने कुणी एखादा जरी फटाका फोडला तरी या पक्ष्यांची तारांबळ उडते. सैरावैरा धावत सुटतात. फटाक्यांच्या आवाजाने आपल्या सारख्या ५-६फूटी माणसांना सुद्धा त्रास होतो, त्या चिमुकल्या जीवांचं काय होत असेल? आणि हे सगळं फक्त पक्ष्यांच्या बाबतीतच नाही, तर इतर छोट्या-मोठ्या प्राण्यांच्या बाबतीतही होतच असणार.
या सगळ्या सणांच्या साजरकरणाविषयीच्या आक्षेपांवर ब-याच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं मिळतात -
१. एवढे जण सेलिब्रेट करतात. आम्ही केलं तर काय मोठा फरक पडणार आहे? (असाच विचार प्रत्येक जण करत बसला, तर परिस्थितीत बदल कसा होईल?)
२. होळी/रंगपंचमी/दिवाळी/संक्रातीच्या वेळी आमच्या चिमुकल्या मुलांचा आनंद पाहून धन्यता वाटते. (तुमच्या चिमुकल्यांच्या हौशीपायी तुम्ही इतर कित्येक निरपराध चिमुकल्या जीवांना विनाकारण त्रास देता त्याचं काय?)
३. संपूर्ण वर्षभर आम्ही अगदी व्यवस्थित राहतो. निसर्गाला आमच्या परीने काहीही इजा होणार नाही याची काळजी घेतो, मग एखाद्या सणाच्या दिवशी जरा केली मज्जा, तर काय हरकत आहे? (म्हणजे वर्षभर तुम्ही निसर्गाला इजा न पोचवण्यासाठी घेतलेली काळजी एका दिवसात धुळीला मिळते)
४. फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय? (सगळं कबूल. पण "दुसरा गू खातो मग मी खाल्ली तर काय बिघडलं?" या प्रश्नाचं उत्तर कसं द्याल? आणि आपण आपल्या स्वतःमध्ये काही सुधारणा करता येते का हे आधी बघावं. आपल्या सणांमध्येच नको त्या गोष्टी होत असताना इतरांच्या सणांविषयी आक्षेप घेतले, तर 'आधी स्वतःच्या नाकाचा शेंबूड पूसा' असंच आपल्याला लोक म्हणणार ना)
५. जगभर होणारी युद्धं, गाड्या, कारखाने यांच्यातून निघणारे दूषित वायू, सांडपाणी, ऐरोप्लेनच्या आवाजाने जवळपासच्या लोकांना होणारा त्रास, फिल्म्समध्ये दाखवल्या जाणा-या खोट्या पावसात होणारा पाण्याचा अपव्यय यांच्या मानाने आम्ही खेळलेल्या रंगपंचमीने, उडवलेल्या फटाक्यांनी होणा-या प्रदूषणाचं प्रमाण अत्यल्प म्हणावं लागेल. (अच्छा, म्हणजे सगळी दुनिया येन केन प्रकारेण निसर्गाची वाट लावतंच आहे, त्यात आपणही खारीचा वाटा उचलावा असा उद्दात्त हेतू दिसतो मंडळींचा)
६. तू एवढा बोलतोयस, निसर्गाला हानी, निसर्गाला हानी... स्वतः काय करतोस रे भाड्या? (निसर्गाला होणारी हानी दिसून आल्यावर, पतंग उडवणं, होळी/रंगपंचमी खेळणं [सुकी असो वा ओली], घरी गणपती आणणं, दहीहंडीत भाग घेणं [मला तसंही कोण घेणार म्हणा], दिवाळीला किंवा अगदी ३१स्ट ला सुद्धा फटाके उडवणं,
बंद केलं आहे
. तरी माझ्या परीने हे सगळे सण निसर्गाला त्रास न देता एंजॉय करायला शिकलो आहे.) सुधारणेला सुरुवात स्वतःपासून करावी असं म्हणतात. मी तर केली, इतर अनेकांनी करण्याची वाट पाहतोय. [काय रे नेहमीचं तेच तेच रटाळ विषय किती किस पाडणार?? - (कळत/नकळत निसर्गाला हानी पोचवून सण साजरा करणा-या दहा लोकांनी समजा लेख वाचला, तर निदान एकाच्या तरी डोक्यात प्रकाश पडून आचरणात बदल होईल अशी लेख लिहीण्यामागची आशा... पुढेही वेळीवेळी याच आशयाचा किस [जमल्यास अधिक सशक्तपणे] पाडत राहीन...)
वाचने
18971
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
सहमत
सण म्हटलं की निसर्गाला त्रास
ओके
आज इथे संक्रांत कोसळली
च्यायला :(
In reply to आज इथे संक्रांत कोसळली by यसवायजी
थोड्याच वेळापूर्वी मी स्वतः
In reply to आज इथे संक्रांत कोसळली by यसवायजी
एकूणच
कॅलेंडर बघुन ( मग ते हिंदू
कोणाला सांगायला गेलं की राग
हीच चर्चा रंगपंचमी, गणपती,
ही चर्चा अशीच सणावारी
In reply to हीच चर्चा रंगपंचमी, गणपती, by अनुप ढेरे
सहमत आहे. वाचकांपैकी कुणीतरी
In reply to ही चर्चा अशीच सणावारी by वडापाव
एकदम योग्य निरीक्षण. सहमत.
१००% अनुमोदन...
सहमत, पण असे केल्याशिवाय सण
खरं आहे.
In reply to सहमत, पण असे केल्याशिवाय सण by बॅटमॅन
फटक्यांनी प्रदूषणच पसरते. पण
In reply to खरं आहे. by मारकुटे
मला तरी माणुस निसर्गाची वाट
लेखाशी एकदम सहमत
सुंदर लेख
असहमत
फक्त आमच्या सणांनाच का बोल लावता? इतर धर्माचे लोक सण साजरा करताना जणू निसर्गाला त्रास होतच नाही. ईदेच्या दिवशी केवढे बोकड कापले जातात, ३१स्ट च्या रात्री एकाच वेळी जगभरात होणा-या वायू आणि ध्वनी प्रदूषणाचं काय?यावर अशी मखलाशी केलेली असली तरीही श्रीयुत वडापाव यानी हिम्मत असेल तर बकरी इद च्या दिवशी मुस्लिम मोहल्ल्यात जावून शाकाहारी असण्याचे फायदे ,अहिन्सा व प्रदूशण इत्यादी विशयाव्र प्रवचन देवुन दाखवाल का? उगाच आपल्या फुशारक्या झाले .... ;(अशी मखलाशी केलेली असली तरीही
म्हणजे तुम्ही आपले आणि दुसरे
In reply to अशी मखलाशी केलेली असली तरीही by वडापाव
मुद्दा कमी वेळात पटवून देताना
In reply to म्हणजे तुम्ही आपले आणि दुसरे by मारकुटे
>>>मुद्दा कमी वेळात पटवून
In reply to मुद्दा कमी वेळात पटवून देताना by वडापाव
आधी (आपल्यासारख्या) 'आपल्या'
आधी (आपल्यासारख्या) 'आपल्या' माणसांना दिलेल्या 'प्रवचना'तून इच्छित यश मिळालं तर(च) बकरी इदच्या दिवशी 'हिम्मत' करण्यासाठी मन धजावेल ना ब्वा!! इथे एवढी आरडाओरड करूनही आपलीच माणसं दाद देत नाहीत तिथे दुस-यांकडून कशा काय अपेक्षा ठेवायच्या??मग कमीत कमी ईद च्या मुहूर्तावर बकर्यांच्या कत्तलीवर असला काथ्या तरी कुटा इथे ! रंगपंचमी , फटाके व पतंग न उडवणारा तसेच पुरोगामीपणाचा आव न आणणारा --- बालकपतंग उडवणं, होळी/रंगपंचमी
+/-
सहमत
In reply to +/- by विकास
आता
In reply to सहमत by मनिम्याऊ
पण तुम्ही म्हणता तितकेच सण
In reply to +/- by विकास
+१
In reply to +/- by विकास
ऑन अ लाईटर नोट...
(No subject)
In reply to ऑन अ लाईटर नोट... by विकास
सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का?
>>> रेडि टु थिंक.
In reply to सण म्हटलं की निसर्गाला त्रास द्यायलाच हवा का? by अर्धवटराव
काय फरक पडतो.
In reply to >>> रेडि टु थिंक. by प्यारे१
हे वापरू शकता का? ;)
In reply to काय फरक पडतो. by अर्धवटराव
हा हा हा
In reply to हे वापरू शकता का? ;) by विकास
काय सत्य? कोण सत्य? कसलं सत्य
In reply to काय फरक पडतो. by अर्धवटराव
तुमची उद्वीग्नता मी समजु शकतो.
In reply to काय सत्य? कोण सत्य? कसलं सत्य by प्यारे१
भले!
In reply to तुमची उद्वीग्नता मी समजु शकतो. by अर्धवटराव
बाकी सणासुदीला निसर्गाला
तुम्हाला मधुमेह आहे का ?
In reply to बाकी सणासुदीला निसर्गाला by वडापाव
बरं
तेच अक्षय तृतीयेला सोने घेऊ
करा की मग!! कोण अडवतंय!!
पण वडापावराव...
माझ्या माहितीप्रमाणे पिकावर
विचार करा
(No subject)
धन्यवाद!!
आओ होली मनाये
In reply to धन्यवाद!! by वडापाव
प्रत्येक दिवस
In reply to धन्यवाद!! by वडापाव
+१
In reply to प्रत्येक दिवस by विकास
मी एक पोस्टर पाहील्याचे आठवले
In reply to प्रत्येक दिवस by विकास
हरकत
In reply to मी एक पोस्टर पाहील्याचे आठवले by वडापाव
वडापाव, छान धागा
होळी निमित्त सर्वांना विनंती आहे की
अन्यथा तुमच्यात आणि आसाराम बापूंमध्ये फरक तो काय उरला?
खरं आहे.... मात्र हे सण मूलतः
फक्त सणंच नव्हे
In reply to खरं आहे.... मात्र हे सण मूलतः by वेल्लाभट
माणसाच्या एकंदरीतच सवयींचा