महाराष्ट्राचा विचार आणि तोही सांस्कृतिक अंगाने केला तर माझ्या मनात खालील विचार आले.
महाराष्ट्राचे तीन बा : ज्ञानोबा, तुकोबा आणि विनोबा. ( मराठीभाषेचे आध्यात्मिक जीवन यांच्याशिवाय कसे बरे समजता येईल?) कदाचित चालतेबोलते विद्यापीठच म्हणा हवे तर.
महाराष्ट्राचे तीन बाबा : गाडगेबाबा, बाबा(साहेब) आंबेडकर आणि बाबा आमटे. या तिघांनीही पददलितासाठी आपले जीवन वेचले.
महाराष्ट्राचे तीन तात्या : तात्या सावरकर, कुसुमाग्रज आणि आपले आवडते सेनानी तात्या टोपे.
महाराष्ट्राचे तीन लाडके क्रीडा खेलाडु : खाशाबा, सुनिल गावस्कर आणि सचिन. आपल्या क्रीडा आयुष्यात अनेक अडचणी सोसुन महाराष्ट्राचे नाव पंचखंडात नेले.
महाराष्ट्राचे तीन लाडके राजकारणी : यशवंतराव, चिंतामणराव देशमुख आणि आबा पाटील. ( प्रबोधनाचा वारसा जपणारे असे तीनही राजकारणी. त्यात यशवंतरावामुळेच महाराष्ट्र आज प्रगतिपथावर आहे हे कोणीही मान्य करेल).
महाराष्ट्राचे तिन लाडके लेखक : खांडेकर ,अत्रे आणि पुल.
महाराष्ट्राची एकमेव लाडकी गान कोकिला फक्त आणि फक्त लता दिदीच.....
वाचने
4819
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
महाराष्ट्
तुमचाच आधिकार.
In reply to महाराष्ट् by विसोबा खेचर
तीन अण्णा...!
कर्मवीर भाउराव पाटील ( अण्णा)
In reply to तीन अण्णा...! by विसोबा खेचर
तीन तात्या
गणामास्तर,
In reply to तीन तात्या by गणा मास्तर
व्यंकटेश
In reply to गणामास्तर, by विसोबा खेचर
अरे वा..
द्वारकानाथजी..
बा
बा.
In reply to बा by ३_१४ विक्षिप्त अदिती
>> शिवबा हे
In reply to बा. by कलंत्री
"आणि
In reply to >> शिवबा हे by ३_१४ विक्षिप्त अदिती
एक
In reply to "आणि by शैलेन्द्र