नाईट-ओव्हर!!!
सुट्टीच्या दिवसात आई-वडील गावाला निघाले की पोरं जाम खुश होतात... लगेच ग्रुपमधल्या सगळ्या मेंबरांना फोनाफोनी होते. प्रत्येकाने किती किती पैसे काढायचे याचा एक अंदाज ठरतो. कोणकोणत्या मुलींना बोलवायचं(किंवा होस्ट मुलगीच असेल तर सोन्याहूनही पिवळं), कोणाला कटवायचं वगैरे बोलणी होते. प्रत्येकाचे आपआपल्या पसंतीनुसार आणि ऐपतीनुसार 'ब्रँड्स' ठरलेले असतात. कोणी नुकतीच भीष्म प्रतिज्ञा करून 'दारू सिगरेटला हात लावणार नाही' असा चारजणांचे ग्लास समोर भरलेले दिसल्यावर आपोआप ढळणारा अढळ निश्चय केलेला असतो. कोणा मुलीची आई पाठवायला तयार नसते म्हणून ती स्वतःबरोबर तिच्या आईच्या भरवशातल्या एखाद्या 'उत्सुक' आणि प्रसंगी 'उतावळ्या' मैत्रीणीला बरोबर घेऊन येते. ती दिसायला चांगली निघाली तर सगळे 'चीअर्स' तिच्या नावानेच होतात. बेताचीच पण निरुपद्रवी असली तर ब-यापैकी स्वागत वगैरे होतं. कटकटी निघाली तर सरळ फाट्यावर मारून दुर्लक्ष केलं जातं. ग्रुपमधल्या कपल्सना आयती संधी चालून आलेली असते. त्यामुळे ज्याच्या/जिच्या घरी 'पार्टी' असेल, ते घर जितकं मोठं आणि प्रशस्त, तितकं या युगुलांसाठी बरं असतं. या युगुलांनी बॅटिंग करताना बॉल चुकून बाऊंडरी बाहेर जाऊ नये म्हणून सगळे 'फिल्डर्स' सुद्धा बरोबर आणलेले असतात. कुणाचं नुकतंच हृदय दुखावलेलं असतं त्यामुळे देवदास किंवा देवदासी होण्याचा श्रीगणेशा ते इथे करणार असतात. काहीजणांसाठी हा पहिलाच अनुभव असतो त्यामुळे कुतुहल आणि उत्सुकता प्रचंड असते. सरावलेली मंडळी, पार्टी कोणाच्या का घरी असेना, 'ऑर्गनायझिंग' ची जबाबदारी आपल्या खांद्यांवर घेतात. अशा प्रकारे सगळा उतावळा गोतावळा जमतो, आणि 'पार्टीला' सुरुवात होते. अशा नाईटओव्हरना जाण्यात विशेष रस नसतानाही 'नाही आलास तर कंबरेत लाथ घालेन भे***' अशा त-हेच्या धमकावण्यांना बळी पडल्याचे नाटक करून एका नाईटओव्हरला जावं लागलं होतं.
या अशा नाईटओव्हरना जाण्यात फायदा हाच असतो, की रात्रभर आपल्याला हवं ते करता येतं, कोणीही अडवणारं नसतं. कधी कधी चांगल्या ओळखीसुद्धा होतात. क्वचितप्रसंगी माझ्यासारखा विचार करणारी माणसं सुद्धा भेटतात. माझा स्वभाव सगळ्यांना माहित असल्यानं मला कोणीही कधीच 'घे रे, एकदा ओढून बघ रे' असा आग्रह वगैरे करत नाही. कारण मग मी माझी लेक्चरबाजी सुरू करून त्यांचा सगळा मजा किरकिरा करून टाकेन याची सगळ्यांना खात्री असते. माझे शब्द सुद्धा बहि-या कानांवर पडतात याचा अनुभव असल्याने मीसुद्धा अशा वेळी त्यांच्या कोणत्याही 'कार्यक्रमाच्या' स्वतःहून आड येत नाही. जेवण झालं की कुठेतरी एका कोप-यात एकटाच जाऊन बसतो. अशा वेळी झोप येत नाही, कारण जो काही प्रकार चाललेला असतो तो मनाला पटणारा नसतो आणि असं असूनही मी हातावर हात घेऊन बसलोय या लाचारीच्या भावनेने कितीही दमलो असलो तरी झोप लागतच नाही. आजही मी असाच एकटाच बालकनीत जाऊन बसलो होतो. आतमध्ये गोंगाट चालू होता. कोणी रडत होतं, कोणी गात होतं, कोणी नाचत होतं, कोणी उगाच मोठमोठ्याने हसत होतं, कोणी टॉयलेटमध्ये जाऊन कमोडऐवजी आजुबाजुलाच ओकत होतं. आज पार्टीला पंधरा-वीसजणांनी हजेरी लावलेली होती. मुलींची हजेरी जास्त होती. ब-याच नव्या जणींशी ओळख झाली होती. त्यातली एक लगेच डोळ्यांत भरली होती. शांत, लाजाळू, हसतमुख चेह-याची. तिची आणि माझी जेवताना ब-याचदा नजरानजर सुद्धा झाली होती. पण जेव्हा मित्राने तिच्या नावाचा पेग भरला आणि तिने तो आधी संकोचाची हजार नौटंकी करून झाल्यावर शेवटी एका झटक्यात संपवला, तेव्हा डोकं फिरलं आणि सरळ जाऊन बाल्कनीत बसलो. आत बराच वेळ गोंगाट चालू होता. तिच्या हसण्याचा आवाजही येत होता. तो जरावेळाने असह्य झाला. म्हणून मग बोंडं कानात घालून गाणी ऐकायला लागलो. पण त्यांतही मन रमेना. तरी गाणी चालूच ठेवली. त्या मुलीच्या कानफटात मारावीशी वाटत होती. शेवटी 'छोड ना यार!! एवढे सगळे जण याच वाटेवर आहेत, तिच्या एकटीकडूनच अपवाद ठरण्याची अपेक्षा का ठेवा?' असं म्हणून स्वतःचीच समजूत घातली तेव्हा थोडा शांत झालो आणि बाहेरच्या थंडीमध्ये स्वतःला गुरफटवून घेऊन मी 'कधीतरी हे चित्र बदलेन' अशी स्वतःची समजूत घालत तिथल्या झोपाळ्यावर स्वस्थपणे बसून राहिलो.
ब-याच वेळाने कोणीतरी पाठी येऊन उभं राहिलंय असं वाटलं. पण जो किंवा जी कोणी असेल तो किंवा ती झिंगलेली असणार याची खात्री असल्याने मी तसाच न वळता बसून राहिलो.
'तू का असा इथे एकटाच बसलायस?' आवाजात स्थिरता होती. मी वळून बघितलं. तीच होती. मला स्वतःचा चेहरा निर्विकार ठेवता आला नाही. माझ्या डोळ्यांत राग धगधगत होता.
'सहज... हवा खायला' मी आवाज शक्य तेवढा शांत आणि सहज ठेवण्याचा प्रयत्न करत होतो. ती हसली.
'मघाशी आत जे काही चालू होतं ते तुला आवडत नाही ना??'
'ह्म्म!!'
'मलाही नाही आवडत'
'हो का!!'
'अरे खरंच...!! मी एरवी अशी पीत वगैरे नाही. स्मोकिंगचा तर भयंकर तिटकारा आहे मला. पण सगळे एवढं फोर्स करत होते... आणि त्यात थंडीसुद्धा होती ना!!'
'तू मला का एक्सप्लेन करून सांगत्येस हे सगळं?'
'तुझ्या चेह-यावरून कळतंय की तू रागावलायस माझ्यावर!! तुझ्या फ्रेंड्सनी सुद्धा सांगितलं की तू 'शहाणा बच्चा' आहेस म्हणून' हे म्हटल्यावर ती हळूच खिदळली. मला भयंकर राग आला. पण तरी मी शांत होतो.
'मी का रागवू तुझ्यावर? आपली धड ओळख सुद्धा नाही. आणि तसंही मी रागावलो तरी तुला का फरक पडावा?'
'सगळे मला फोर्स करत असताना तू माझ्याकडे एकटक बघत होतास. मी समहाऊ तुझ्या नजरेला नजर देऊ शकले नाही. मी तो पेग मारल्यावर तू सरळ उठून निघून गेलास. तेव्हा खरं तर मला तू खूप नॅरो माइंडेड वाटलास, फ्रँकली स्पिकींग अजूनही वाटतोयस बट आय अॅम शुअर यू हॅव अॅन एक्सप्लनेशन फॉर दॅट!!'
'मी का तुला एक्सप्लनेशन देऊ?? माझी मर्जी मला हवा खावीशी वाटली मी आलो उठून!! त्याचा तुझ्या पेग मारण्याशी काय संबंध??'
'बरं...'
'आणि इतकाच जर नॅरो माइंडेड वाटलो मी तर कशाला स्वतःची बेइज्जती करून घ्यायला आलीस इथे?'
'हेय हेय हेय चिल ओके!! मी आल्यापासून तू मला चेकआऊट करत होतास हे सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. माझ्यासुद्धा- ऑबविअसली!! मी एक पेग काय घेतला तू लगेच उठून गेलास तेव्हा सगळे थोड्या वेळासाठी शांत झाले होते आणि मग एकदम सगळे तू किती चांगला आहेस, सगळ्यांची कशी हेल्प करतोस ब्ला ब्ला ब्ला... तुझी स्तुती करायला लागले. टू बी फ्रँक मला जरा गिल्टी वाटायला लागलं, म्हणून खरं तर गरज नसताना, काही ओळख पाळख नसताना मी उगाच तुला सॉरी म्हणायला आले होते.'
'तू सॉरी म्हणायला आली होतीस? "तुझ्या नॅरोमाइंडेड बिहेविअरचं एक्सप्लनेशन दे" हे तुझं सॉरी आहे का?'
'अफ कोर्स बिकझ आय ऑल्सो एक्स्पेक्टेड अॅन अपॉलॉजी इन रिटर्न'
'ओह आय माय सॉरी पण आय डोंट थिंक आय ओ यू वन!!'
तिने रागाने माझ्याकडे बघितलं. मीसुद्धा बघितलं. दोघं थोडा वेळ एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत होतो. शेवटी मी झुला फिरवून तिच्याकडे पाठ केली आणि मग ती सुद्धा आत निघून गेली. थोड्या वेळाने पुन्हा आली, आणि दात ओठ खात म्हणाली,
'तुझा प्रॉब्लेम काय आहे हा?? तुझे एवढे सगळे फ्रेंड्स बिन्धास्त दारू ढोसतायत स्मोक करतायत, मारला मी एक पेग तर काय बिघडलं त्यात एवढं? जस्ट बिकझ आय अॅम अ गर्ल??'
'एक मिनीट... तू मुलगा आहेस किंवा मुलगी, याने याबाबतीत फरक नाही पडत मला. आत बसलेल्या माझ्या काही मैत्रीणी अट्टल बेवड्या आहेत माझ्या मित्रांहूनही जास्त फुकतात, पितात. मला मुळात हा प्रकारच आवडत नाही, गरज काय आहे याची? हे सगळं न करता तुम्ही एंजॉय करू शकत नाहीका??' माझ्या बोलण्यातल्या आक्रमकतेने ती जरा वेळ शांत झाली. माझ्यासमोरच्या कट्ट्यावर बसली.
'हे बघ... एंजॉय करू शकतो पण त्यात एवढी मजा नाही येणार ना रे... आता तू मघाशी बघायला हवं होतंस, कसे सगळे जण टाईट होऊन नाचत होते, हसत होते... एव्हरीवन जस्ट वेंट... क्रेझी... वाईल्ड!!'
मी हसलो... 'कसं आहे, क्रेझी आणि वाईल्ड होण्यासाठी मला तरी दारू प्यायची गरज वाटत नाही. हे लोक चढल्यावर जेवढा धिंगाणा घालतात त्याहून कितीतरी जास्त धिंगाणा मी शुद्धीवर असतानाही घालू शकतो. हवं तर माझं गुणगान गाणा-या माझ्या मित्रांना विचार... ते मस्करीत म्हणतात, "हा शुद्धीवर असताना एवढा येडा होऊ शकतो तर चढल्यावर काय होईल याचं?" अर्थात तेव्हा त्यांना हे कळत नाही, की आपण दारू प्यायलो की(च) आपण ओपन अप होतो, या त्यांच्या समजुतीमुळेच त्यांना चढल्यावर(च) क्रेझी आणि वाईल्ड होता येतं. मला नाही वाटत की मला चढल्यावर मी शुद्धीत असताना घालतो त्यापेक्षा जास्त धिंगाणा घालू शकेन. आणि मला प्रयोग करायचाही नाहीये.'
'ओके... पण काहीजण खरोखर दारू प्यायल्याशिवाय ओपन अप होऊच शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, सपोज एखाद्या मुलीचा किंवा फॉर दॅट मॅटर मुलाचा ब्रेक अप झाला असेल, एक्झाममध्ये केटी लागली असेल, फॅमिली इशुज असतील, जे तो किंवा ती नॉर्मली कोणाशीही शेअर करायला तयार नसतील, त्यांना दारू हेल्प करते ना फीलींग्ज बाहेर काढायला...'
'त्यासाठी सुद्धा दारूची खरंच गरज नाहीये. जर मी दु:खात असेन, आणि मला रडावंसं वाटलं, तर खुश्शाल रडेन मी... जेव्हा रडतो तेव्हा मुलीहून वाईट रडतो मी... दु:ख बाहेर काढण्यात जो संकोच वाटतो, क्रेझी आणि वाईल्ड होण्यात जो संकोच वाटतो, तो दारू चढल्यानंतर मिळण्या-या 'फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी' मुळे नाहीसा होतो. प्रत्यक्षात त्या व्यक्तीकडे ऑलरेडी एक पर्याय असतो, आत्मविश्वास!! दारू हा सोपा पण फसव्या ऑप्शन आहे. आपल्याला आपण दारूच्या नशेत कशासाठी रडलोय हे नंतर दारू उतरल्यावर लक्षात राहिलंच असं नाही, त्यामुळे माणूस पुन्हा पुन्हा त्याच कारणासाठी रडत बसतो. हेच जर स्वतःवर विश्वास ठेवून पूर्ण शुद्धीत असताना आजुबाजुला कोणीका असेना, रडून घेतलं की मग पुढे त्याचा तेवढा त्रास होत नाही, पुन्हा रडायची गरज भासत नाही...'
'ह्म्म... पण सगळे तुझ्यासारखा विचार नाही ना करू शकत... प्रत्येकाचं थिंकींग वेगळं असतं.'
'तीच तर दुर्दैवाची बाब आहे... गांडीतून पादायच्या ऐवजी नळकांडी वापरून तोंडाने जास्त घाण पादतात आणि त्याला कूल समजतात हे लोक... यांच्याकडून अजून काय अपेक्षा ठेवायच्या?'
'ए पण फक्त एकदा ट्राय करायला काय हरकत आहे? मी आज फर्स्ट टाईम घेतली होती रे.. खरंच आणि आय प्रॉमिस मी ही लास्ट टाईम घेतलीये. तू उठून गेल्यानंतर मी हात सुद्धा लावला नाही दारूला..'
'वेल दॅट इज नाईस... पण खरं तर जेव्हा तू स्वतःच्या मनावरचा ताबा सोडलास आणि पीअर प्रेशरला भुलून तो ग्लास उचललास तेव्हाच माझ्या मनातून उतरलीस... कारण व्यसनाची सवय सुरू करायला फर्स्ट ट्राय पुरेसा असतो... (ती हिरमुसली... तोंडातल्या तोंडात 'आय अॅम सॉरी' असं काहीतरी पुटपुटली) डोंट वरी... अशीच परिस्थिती माझ्यावर सुद्धा आलीये. तेव्हा मीसुद्धा स्वतःच्याच नजरेतून उतरलो होतो... नशिबाने त्यापुढे कधी ताबा सुटला नाही आणि माझी गाडी फर्स्ट ट्रायवरच थांबून राहिली'
'व्हॉट!!!? ए मग तुला याबद्दल काहीही बोलायचा काय अधिकार आहे??'
'खरं तर नाहीये मला अधिकार... पण मला कुठे माहिती होतं तुझा आजचा फर्स्ट ट्राय होता ते? माझं एवढं सगळं पुराण ऐकून झाल्यावर मग तू सांगितलंस फर्स्ट ट्राय होता ते. तरी आपली मैत्री असती तर मी तुला अडवलं असतं. मला ताबा ठेवता आला म्हणून तुला ठेवता येईलच असं नाहीना...'
'हो पण... यापुढे अडवशील ना??' मी भुवया उंचावून तिच्याकडे पाहायला लागलो. 'आता आपण फ्रेंड्स आहोत ना!!' मी हसलो... 'आहोत ना?? नाहीयोत का??'
'अगं आहोत आहोत... डोंट वरी, आहोत...' ती गोड हसली.
'ए पण...'
'काय?'
'काही नाही जाऊदे... पुन्हा केव्हातरी...'
'अगं बोल ना...'
'तुला एक विचारू?'
'हो विचार ना!!'
'तू व्हर्जिन आहेस ना??' मी चाट पडलो. हे काय मध्येच. हसायला लागलो.
'हो आहे मी व्हर्जिनच आहे अजून तरी...'
'हा मग ठीक आहे.'
'म्हणजे??? काय म्हणायचंय काय तुला?? नसतो व्हर्जिन तर मैत्री केली नसतीस??' ती गप्प. 'अगं बोल...'
'आता कदाचित मी नॅरो माइंडेड वाटेन तुला.. पण मला हे सगळं नाही आवडत...'
'अगं पण त्यासाठीच तर जन्म झालेला असतो आपला'
'अरे लग्नानंतर ठीक आहे रे... आधी काय!! मघाशी आतमध्ये तुमच्या ग्रुपमधली ती दोघं जणं सगळ्यांसमोर बिनधास्त... श्शी.. मला तिथे बसवेनाच...'
'अच्छा... म्हणून तू इथे आलीस काय!!'
'हो... मला हे नाही आवडत असलं काही. माझा होणारा पार्टनर किंवा इव्हन माय फ्रेंड्स... दे ऑल शुड बेटर बी व्हर्जिन... आता खरं तर मला माझ्या इथल्या फ्रेंड्स वर डाऊट येतोय... बट स्टिल...'
'हे बघ... एकदा का मुलगा-मुलगी जवळ आले ना, की उत्साहाच्या, भावनेच्या भरात हे सगळं घडणं स्वाभाविक आहे - कारण ते नैसर्गिक आहे. मग त्यांचं लग्न झालेलं असेल काय किंवा नसेल काय - कारण लग्न ही मानवी संकल्पना आहे!! कन्सेप्ट - ह्युमन कन्सेप्ट आहे (तिच्या चेह-यावरून तिला संकल्पना म्हणजे काय हे कळलं नसल्याचं जाणवलं मला). मी या सगळ्याचं समर्थन करतोय असं नाही. सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता अनमॅरीड कपल्सनी या भानगडीत पडणं म्हणजे मूर्खपणा ठरेल असंच माझं मत आहे... पण समजा... एखाद्या मुलीने भावनेच्या भरात व्हर्जिनीटी घालवली असेल, आणि नंतर पुढे तिचा ब्रेक अप झाला, मग मला ती आवडली, तिला मी आवडलो, तिने मला तिच्या पास्ट बद्दल सगळं सांगितल, आणि तेव्हा जस्ट बिकॉझ ती आता व्हर्जिन नाहीये म्हणून तिला दूर सारलं तर ते चुकीचं आहे. हेच मुलाच्या बाबतीतही लागू आहे हा.. फक्त मुलींनाच लागू असं नाही. तिने किंवा त्याने मूर्खपणा केला, नो डाऊट!! पण तो जेव्हा केला, तेव्हा त्यांना कुठे माहिती होतं की पुढे जाऊन त्यांचा ब्रेक अप होणार आहे ते!! मुलामुलीनं नात्यात असताना "रोमान्स"च्या किती पाय-या गाठल्या ही त्यांची पर्सनल गोष्ट आहे आणि तिचा विषय, तिचं महत्त्व हे त्यांच्या नात्याच्या शेवटाबरोबरच संपायला हवं. हां... हीच चूक उद्या वारंवार एखाद्याकडून एकाहून अनेक जणांच्या बाबतीत घडू लागली, तर त्या व्यक्तीला तू कॅरेक्टरलेस वगैरे म्हणायला मोकळी आहेस!! पण एक चूक सबको माफ है यार!!' ती माझ्याकडे एकटक बघत होती. तिच्या त्या नजरेतून पोरगी माझ्या बोलण्यात इंटरेस्ट दाखवत होती, की फक्त माझ्यात, ते कळणं मुश्कील होतं. 'थोडं तरी पटतंय का मी काय म्हणालो त्यातलं?'
'अं... हो.. कळलं मला.. म्हणजे पटतंय थोडं थोडं...'
'नशीब...'
'तुझे मित्र बरोबर म्हणाले तुझ्याबद्दल'
'मी खूप चांगला आहे ना... आय नो' मी हसून म्हटलं.
'ते नाही रे... तू खूप बोलतोस...!!' आणि असं म्हणून, माझी रिअॅक्शन बघून ती हसायला लागली. मीही ओशाळून थोडासा हसलो. मग अजुन गप्पा रंगल्या... आता मी मुद्दामून तिला जास्त बोलायला दिलं. एकटक बघत बसण्याची पाळी माझी होती. आणि असं बघता बघता पहाट झाली.
वाचने
14357
वाचनखूण
प्रतिक्रिया
61
आणि असं बघता बघता पहाट झाली ??
अविदितगतयामा रात्रिरेव
लिखाण आवडलं. जास्त 'सोललं'
In reply to लिखाण आवडलं. जास्त 'सोललं' by प्यारे१
प्यार्या च्यामारी कस्काय शेम
In reply to लिखाण आवडलं. जास्त 'सोललं' by प्यारे१
प्यारे१
मस्तै !!!
नाइटौट!
पुण्यामुंबैबंगळूरातील
साला कॉलेजात असताना बर्याच नाइट आउट झाल्या...
बाब्बौ!
In reply to बाब्बौ! by पैसा
कॉलेजची पोट्टेच काय आयटी मधील
In reply to कॉलेजची पोट्टेच काय आयटी मधील by मारकुटे
आयटी मधील
In reply to बाब्बौ! by पैसा
आधीच्या पोट्ट्यांना मुभा
In reply to बाब्बौ! by पैसा
ह्या पैसातैला नं नसत्या
खूप काय काय लिहायचं होतं,
प्रत्येकाचा आपापला माईन्डसेट
In reply to प्रत्येकाचा आपापला माईन्डसेट by गवि
चामरी गवि, सेंट परसेंट अशी
In reply to चामरी गवि, सेंट परसेंट अशी by सोत्रि
च्यामारी मला सोकाजिच्या
In reply to च्यामारी मला सोकाजिच्या by अभ्या..
+१ टू अब्या..डब्या!
In reply to चामरी गवि, सेंट परसेंट अशी by सोत्रि
*
नशेची एक गोष्ट मला फार आवडते
In reply to नशेची एक गोष्ट मला फार आवडते by बर्फाळलांडगा
सहमत आहे. युरोपीयन देशात
In reply to सहमत आहे. युरोपीयन देशात by मारकुटे
या शतकाच्या पहिल्या दशकात भारताचे आयटि मधे नाव होते
In reply to या शतकाच्या पहिल्या दशकात भारताचे आयटि मधे नाव होते by बर्फाळलांडगा
तेच तर. मग शाळेपासूनच सुरवात
In reply to तेच तर. मग शाळेपासूनच सुरवात by मारकुटे
नाही.. .!
In reply to नाही.. .! by बर्फाळलांडगा
ओके. खुलाशाबद्दल धन्यवाद
In reply to ओके. खुलाशाबद्दल धन्यवाद by मारकुटे
धन्यवाद माधव सर. आपल्या मनाचा हां निर्मळ/प्रांजळ पणा बघून
In reply to धन्यवाद माधव सर. आपल्या मनाचा हां निर्मळ/प्रांजळ पणा बघून by बर्फाळलांडगा
का बाबा धावती गाढवं सोडतोयस
In reply to का बाबा धावती गाढवं सोडतोयस by मारकुटे
:) :D xd xd xd गाढव न्हवे....
In reply to नशेची एक गोष्ट मला फार आवडते by बर्फाळलांडगा
ती द्वैत संपवून टाकते विविध
यान्ना लाज कशी वाटत नाही.
In reply to यान्ना लाज कशी वाटत नाही. by वासु
अशी मुक्ताफळे उधळणार्या
In reply to अशी मुक्ताफळे उधळणार्या by बॅटमॅन
.
In reply to . by शिद
अगदी अगदि!!!! इनोवाल्यांनी
In reply to अशी मुक्ताफळे उधळणार्या by बॅटमॅन
@अशी मुक्ताफळे उधळणार्या
In reply to @अशी मुक्ताफळे उधळणार्या by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to @अशी मुक्ताफळे उधळणार्या by अत्रुप्त आत्मा
हाहाहा
आई-वडिलान्चा धाकच पुरेसा
In reply to आई-वडिलान्चा धाकच पुरेसा by वासु
त्या धाकामुळेच पुणे सोडवत
होय
In reply to होय by वासु
मग काय कामाचा तो धाक???? धड
जबरदस्त!!!!
In reply to जबरदस्त!!!! by कैलासवासी सोन्याबापु
दारु न पिता ....आणखीनच मज्जा
In reply to जबरदस्त!!!! by कैलासवासी सोन्याबापु
आयला सोन्याबाप्पु लयच भारी....
In reply to आयला सोन्याबाप्पु लयच भारी.... by बाबा पाटील
हा हा हा काय पण पाटील तुम्ही
In reply to हा हा हा काय पण पाटील तुम्ही by कैलासवासी सोन्याबापु
कोयनाळ म्हणजे नक्की काय?
In reply to कोयनाळ म्हणजे नक्की काय? by प्यारे१
कोयनेलची झाडं असतात त्यांचं
In reply to कोयनाळ म्हणजे नक्की काय? by प्यारे१
कोयनाळ म्हणजे ?
In reply to जबरदस्त!!!! by कैलासवासी सोन्याबापु
बादवे, खरेच गावाकडल्या
In reply to बादवे, खरेच गावाकडल्या by बॅटमॅन
सालं सेक्स टॅबु असणा-या ह्या
In reply to सालं सेक्स टॅबु असणा-या ह्या by कैलासवासी सोन्याबापु
नक्कीच!
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
नवीनच व्याख्या
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
म्हंजे घटकंचुकी वेग्रे का?
In reply to म्हंजे घटकंचुकी वेग्रे का? by डॉ सुहास म्हात्रे
घटकंचुकी लीव्ज टू मच टू चान्स
In reply to म्हंजे घटकंचुकी वेग्रे का? by डॉ सुहास म्हात्रे
ते उदाहरण एकदम क्लिशे झालंय-
In reply to ते उदाहरण एकदम क्लिशे झालंय- by बॅटमॅन
त्याहून जुनं
In reply to त्याहून जुनं by पैसा
आणि तरी लोक आपल्या संस्कृतीचे
In reply to नक्कीच! by बॅटमॅन
ते आले हो बॅटमॅन आमच्या
In reply to ते आले हो बॅटमॅन आमच्या by कैलासवासी सोन्याबापु
अरे हो की. लक्षातच आले नव्हते
दोघेही भलतेच जजमेंटल दिसताय!
जजमेंटल (शॉर्ट फॉर जरा जरासे