✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

आपण आणि आपले "ठराविक साचे"

म
मुक्तसुनीत यांनी
Sun, 09/28/2008 - 10:16  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35757 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

उत्तम प्रतिसाद

मुक्तसुनीत
Sun, 09/28/2008 - 19:45 नवीन
>>>असो. लिहिण्यासारखे बरेच आहे, स्वतंत्र लेख होईल इतके. तूर्तास एवढेच! चतुरंग , लिहाच तुम्ही ! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

उत्तम प्रतिसाद

प्रकाश घाटपांडे
Sun, 09/28/2008 - 21:10 नवीन
उत्तम प्रतिसाद, तत्वतः मान्य असलेल्या कित्येक गोष्टी वास्तवात पचवायला अवघड जातात. (बायकोचा लाडावलेला नवरा) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

छान लेखन मुक्तराव.

प्राजु
Sun, 09/28/2008 - 21:43 नवीन
मला वाटतं मुक्तसुनित यांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या मार्गानी करताना त्यामध्ये एक अपमानची जी पुसटशी पण अतिशय महत्वाची रेषा असते ति दाखवून दिली आहे. यामध्ये समलिंगी संबंधाचा उल्लेख उदाहरणादाखल केला गेला आहे. "कसला हा भात पाणिदार झालाय!!! छे!!" असे वाक्य न टाकता जर "आज आमचा भात चावून खायचा त्रास वाचवला आहे वाटतं!!" असे बोलले गेले तर सत्य जे आहे न बदलता त्यामध्ये खेळीमेळीचे वातावरण येऊ शकते. आज अमेरिकेमध्ये सिटि बस, स्कूल बस चालवणार्‍या बहुतांशी स्त्रीयाच आहेत. क्वचित एखाद्या सिटी बस वर पुरूष ड्रायव्हर दिसतो पण स्कूलबसेस तरी केवळ स्त्रीयाच चालवताना दिसतात. याचे एक कारण मुलांचा बस मध्ये होणारा दंगा, त्याची चढण्याची आणि उतरण्याची धडपड सहन करणे आणि त्यांच्यावर न खेकसता त्यांना प्रेमाने वागवणे हे केवळ स्त्रीच करू शकते. कारण ती सहनशील तर आहेच शिवाय उपजतच प्रेमळ असते. वरती अज्जुका म्हणते त्याप्रमाणे शेतकर्‍याची आत्महत्या हे केवळ पुरूषाच्या अशक्त मानसिकतेचे लक्षण आहे. त्याच्या मागे मुलांना वाढवते आणि कुटूंबाचा कारभार चालवते ति स्त्रीच. मग यामध्ये कोण खंबीर?? पळ्पुटेपणा करून आत्महत्या केलेला पुरूष की पाठीमागे जबाबदारी पेलणारी स्त्री? असं म्हणतात की, स्त्री ही पुरूषाला जशी घडवू शकते तशी त्याला रसातळालाही पोचवू शकते.. या एका वाक्यातच स्त्रीची क्षमता सिद्ध होते. "यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: " देवाने सृष्टी निर्माण केली, पण सगळ्याच प्राणिमात्रांवर एकाचवेळी प्रेम करायला, त्यांची काळजी घ्यायला त्याला जमेना. आणि म्हणून त्याने स्त्रीची निर्मिती केली. आज तिच्या इतकी सहन शक्ती स्वतःकडे नाही, तिच्या इतकि मॅच्युरीटी स्वतःकडे नाही, तिच्या इतका आत्मविश्वास स्वतःकडे नाही, तिच्या इतकी जबाबदारी पेलण्याची क्षमता स्वत:कडे नाही आणि कोणत्याही कामात स्वतःला झोकून देऊन काम करण्याची वृत्ती नाही. त्यामुळे नाचता येईना अंगण वाकडे (स्वतःला जमले नाही म्हणून "स्त्रीयांना ड्रायव्हिंग येते का?" असे म्हणणे) हे चुकीचे आहे. कदाचित जिच्या मुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करताना त्रास झाला तीही हाच विचार करत असेल हे विसरू नये. तेव्हा आपण बोलतो तेव्हा जे बोलतो ते जपून बोलावे हेच सांगणे आहे. काल "स्त्रीयांना ड्रायव्हिंग येते का?" ला प्रतिक्रिया दिली नाही त्याबद्दल समस्त महिला स्त्री सभासदांची माफी मागते. आजकाल वाट्टेल ते कौल आणि बर्‍याचशा चर्चांना प्रतिक्रिया देणं बंद केलं आहे मी. आज मुक्तरावांचा लेख आवडला.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्राजूप्र

मेघना भुस्कुटे
Sun, 09/28/2008 - 22:13 नवीन
प्राजूप्रमाणेच लक्ष जाऊनसुद्धा काल या धाग्यावर काही प्रतिसाद देणं टाळलं. त्याबद्दल माफी मागते. मुक्त सुनीत यांचा लेख आवडला. समलैंगिकतेबद्दल त्यांनी मांडलेल्या विचारांशीही मी सहमत आहे. चष्मे अटळच, पण निदान आपले चष्मे आपण पारखून निवडावेत, परंपरांनी दिलेली ढापणे लावून फिरण्यात धन्यता मानू नये.
  • Log in or register to post comments

तात्याच्या मताशी अगदी १००% सहमत

वेताळ
Sun, 09/28/2008 - 22:58 नवीन
समलैगिंक संबधाचे समर्थन करणे हे चुकीचे आहे. ते पुर्ण:त चुकीचे व अनैसर्गिक आहे. समलैगिंकता ही अलीकडच्या आधुनिक काळात खरी फोफवली आहे. आपण किती मुक्त,उदात्त विचारसरणी चे आहोत हे दाखवण्याचा तो एक किळसवाणा प्रकार आहे. निसर्गात इतर कोणत्याही सजीवात हा प्रकार आढळत नाही. सिग्मड फ्राईड ने तर लैगिंकता व प्रजनन ह्याचा किती निकट संबध आहे ते स्पष्ट केले आहे. लैगिंकसंबधाचा खरा पाया प्रजनन हाच आहे. फक्त मनुष्यप्राणी ह्याला अपवाद आहेत.समलैगिंकतेचे समर्थन करणे चुकीचे आहे.तसेच पाश्चात्य सिनेमे पाहुन आपण आपली विचारसरणी ठरवावी का?,हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे. बाकी मुक्तसुनित ह्याचा लेख उत्तम आहे. आज अमेरिकेत तुम्ही "निग्रो" हा शब्द उच्चारणे म्हणजे आपल्या देशात एखाद्याला "म्हारड्या" म्हणण्यासारखे आहे. "निग्रो" आणि " म्हारड्या" दोन्ही चूकच ; हे मान्य आहे. आणि त्यासाठीच अट्रोसिटी कायदा केला गेला,परंतु आजकाल दलित लोक ह्याच अट्रोसिटी कायद्याचा वापर इतरांविरुध्द हत्यार म्हणुन करत आहेत्.त्याचे काय? ह्या बद्द्ल तुम्ही काहीच बोलत नाही. वेताळ
  • Log in or register to post comments

>>तसेच

नीधप
Sun, 09/28/2008 - 23:59 नवीन
>>तसेच पाश्चात्य सिनेमे पाहुन आपण आपली विचारसरणी ठरवावी का?,हा एक विचार करण्याचा मुद्दा आहे.<< यासाठीच जरा विषयाचा अभ्यास करा आणि मग शिक्के मारा अशी विनंती केली होती. आपल्या खजुराहोच्या शिल्पांमधेही समलिंगी शरीरसंबंधांचे चित्रण आहे. पाश्चिमात्य जगाचा वाराही न लागलेल्या एका बिहारी खेड्यात दोन स्त्रियांनी लग्न करण्याची परवानगी पंचायतीकडे मागितल्याची आणि त्यांना ती मिळाल्याची काही वर्षांपूर्वीची नोंद आहे. - नी http://saaneedhapa.googlepages.com/home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

...निसर्गात

अभि
Sun, 09/28/2008 - 23:52 नवीन
...निसर्गात इतर कोणत्याही सजीवात हा प्रकार आढळत नाही.... हे मात्र अगदी खोटे आहे,नॅशनल जिऑग्राफिक वर सिंहाचे देखील समलिंगी संबंध दाखवले आहेत.
  • Log in or register to post comments

साचे

मृदुला
Mon, 09/29/2008 - 00:18 नवीन
चर्चा प्रस्ताव पटला, आवडला. साच्यांबद्दलचे पुष्कळसे प्रतिसाददेखील आवडले. वि. प्रकाश घाटपांडे व चतुरंग यांचे. समलिंगी 'संबंध' नैसर्गिक आहेत. पुष्कळ वेळा 'संस्कारांमुळे', म्हणजे वाढीच्या वयात अनुभवलेल्या विविध घटनांमुळे किंवा वर उल्लेखल्याप्रमाणे भिन्नलिंगी जोडीदार मोठ्या काळापर्यंत उपलब्ध नसेल तर मनुष्य समलिंगी होऊ शकतो. तृतीयपंथी लोक हे त्यांच्या नावाप्रमाणेच स्त्री व पुरूष सोडून तिसर्‍या वर्गातले, म्हणजे यापैकी नाही वर्गातले असतात. त्यांच्यांत सहसा जनुकीय दोष असतो. समलिंगी व तृतीयपंथी हे वेगवेगळे गट आहे, त्यांचीदेखील गल्लत होऊ नये.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Mon, 09/29/2008 - 01:42 नवीन
स्फुट, लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

+१

सहज
Mon, 09/29/2008 - 09:45 नवीन
असेच म्हणतो. समलिंगी संबध हा विषय पुढे त्याबद्दल घृणा, विरोध इ भावना ह्या लहान मुलाला अंधाराची [तीव्र] भिती, विषारी सापाची [जबरदस्त] भिती अश्या सारख्या [फीयर ऑफ अननोन!] भितीतुनच आल्या आहेत. विषारी साप हे काही समोर आलेल्या कुणालाही चावत सुटत नाहीत. अंधाराला घाबरणारे प्रत्येक लहान मुल आयुष्यभर अंधाराला घाबरतेच असे नाही. आयुष्यभर परिणाम होईल अश्या मोजक्या वाईट घटना घडल्यातरी अंधार व विषारी साप हे रियालिटी आहेत व बहुसंख्य लोकांना हे प्रकार नीट कळले आहेत व योग्य ती उपाययोजना केल्यास अंधार, विषारी साप व आपण हे तीन्ही घटक पृथ्वीवर व्यवस्थीत नांदु शकतो. खरे तर "समलिंगी संबध" ह्या विषयासाठी वेगळा धागा करावा. बर्‍याच लोकांनी यावर विचार केला नसतो फक्त घृणा/किळस करुन सोडून दिला असतो. बाकी मुळ स्फुट, लेखात व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे. खरे तर ५० च्या वर प्रतिसाद गेले की त्या धाग्यातील पुढचे प्रतिसाद बघणे जरा किचकट असते. चर्चा चालू रहाणार असेल तर कृपया भाग २ सुरु करावा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

छान लेख!

पिवळा डांबिस
Mon, 09/29/2008 - 02:44 नवीन
मुक्तसुनीतांनी व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत! आपण उराशी बाळ्गलेल्या ठराविक साच्यांमुळे आजच्या काळातही काही गोष्टी लोकांना स्वीकार करायला जड जातात.... उदा. उत्तम स्वयंपाक करता येत असलेला (किंवा एकंदरीत गृहकृत्यदक्ष!!) नवरा... बीफ खाणारा हिंदू.... शेकडो/हजारो लोकाना मॅनेज करू शकणारी कॉर्पोरेट मॅनेजर (श्रीमती इंद्रा नूयींसारखी) समर्थ स्त्री... प्रेमळ आणि मायाळू सासू... रसिक/विद्वान/रोमँटिक श्रीमंत माणूस... ही हिन्दी सिनेमांची देणगी! खरा रोमँटिक प्रियकर हा गरीबच आणि ज्या श्रीमंताशी लग्न लागते तो अरसिक किंवा फक्त पैशाच्या मागे लागलेला.... :) मस्त धागा आहे, चालू द्या...
  • Log in or register to post comments

समलैंगिकता.

नारायणी
Tue, 09/30/2008 - 21:08 नवीन
समलैंगिकते बद्द्ल किळस व्यक्त करण्या आधी, या विषयावर १९ सप्टेंबर च्या लोकप्रभात आलेला हा लेख नक्की वाचा. बरेच गैरसमज दूर होतील. http://www.loksatta.com/lokprabha/20080919/lpfront.htm
  • Log in or register to post comments

लेख वाचला...

प्रभाकर पेठकर
Tue, 09/30/2008 - 22:42 नवीन
लेख वाचला. त्यात समलिंगी लैगिकतेबद्दल वैद्यकिय दृष्टीकोन काय आहे ह्या विषयावर उहापोह नाही. हा मानसिक आजार आहे का? ह्यावर वैद्यकिय उपचार आहेत का? असे प्रश्न मनात निर्माण होतात. त्यांच्या बद्दल किळस वाटत नसली तरी असे वागणे नैसर्गिकही वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारायणी

लेख.

नारायणी
Tue, 09/30/2008 - 23:03 नवीन
लेख जरा लांबलचकचं आहे हो.मलाही संपूर्ण लेख लक्ष देउन वाचता नाही आला. वैद्यकिय दृष्टीकोन काय आहे ह्या विषयावर उहापोह नसला तरी लेखात असे वागणे हे नैसर्गिक असते, हे दिलेले आहे. शब्द वेगळे असतील पण अर्थ हाच आहे.
  • Log in or register to post comments

उद्धार

विजुभाऊ
Wed, 10/01/2008 - 12:14 नवीन
शिळा झालेल्या अहिल्येचा रामाने पायाच्या अंगठ्याने उद्धार केला. तेंव्हापासुन प्रत्येक तथाकथीत पुरुषाला वाटते की त्याच्या समोर शिळा उभी आहे आणि तो स्वतः राम आहे. स्वतःच्या पायाचा अंगठा फ्रॅक्चर करुन घेण्याव्यतीरीक्त दुसरे काहीच तु करु शकत नाहीस हा धडा त्याला ती शिळा शिकवते. डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments

स्त्रीपुरुष समानता

विसुनाना
Fri, 10/03/2008 - 13:19 नवीन
शेतकरी संघटनेचे अध्वर्यू श्री. शरद जोशी यांनी एका मराठी पाक्षिकात शेतकरी महिला आघाडीच्या निमित्ताने लिहिलेला 'स्त्री पुरुष समानता : चांदवडची शिदोरी' अशा काही नावाचा लेख नुकताच वाचनात आला. अत्यंत अभ्यासपूर्ण लेख! विविध विदा, प्रत्यक्ष अनुभव आणि थोरामोठ्या संशोधकांची मते यावर आधारित हा लेख असे सिद्ध करतो की स्त्रिया आणि पुरुष सर्व बाबतीत समान नसले तरी ज्याप्रमाणे काही बाबतीत पुरुष वरचढ आहेत त्याप्रमाणेच काही बाबतीत स्त्रिया वरचढ आहेत. त्यामुळे कोण श्रेष्ठ? असे जनरलायझेशन शक्य नाही. अनेक चुकीचे पूर्वग्रह (उदा. स्त्रिया पुरुषांपेक्षा लहानखुर्‍या असतात, त्यांची बुद्धीमत्ता कमी असते इ.) त्यांनी पुर्णपणे खोडले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे जर स्त्रियांनी आपल्याहून लहानखुर्‍या पुरुषांबरोबर संतती निर्माण करणे काही युगे सातत्याने सुरू ठेवेले तर पुरुष स्त्रीपेक्षा कायमचा लहानखुरा होऊन जाईल. शिवाय पुनरुत्पादन हा निकष धरला तर स्त्री पुरुषाच्या प्रत्यक्ष संगाशिवायही/कुटुंबात न राहताही पुनरुत्पादन करू शकते आणि अशा अपत्यावर केवळ तिचाच हक्क राहील. आजही अनेक पुरुष स्त्रीने चालवलेल्या संसारात परजीवी (पॅरासाईट) सारखे चिकटून असतात. हे केवळ अपत्यप्राप्तीसाठी बाळगलेले ओझे जर स्त्रीने झुगारले तर एक वेगळाच स्त्रीप्रधान समाज तयार होईल ज्यात पुरुषाला केवळ एका स्पर्म बँकेइतके महत्त्व असेल. सध्यातरी स्त्रीच्या भावनाशीलतेमुळे (भारतात तरी) तसे घडलेले नाही. या अर्थाने पाहिले तर स्त्रीच श्रेष्ठ ठरते. मूळ लेख वाचण्याजोगा आहे. ............................................. माझ्या माहित आलेल्या अनेक स्त्रिया त्यांच्या पुरुषांपेक्षाही हुशार आणि कर्तबगार आहेत. (यात माझ्या पत्नीचाही समावेश होतो .)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा