Skip to main content

जपू एकट्याने घडी जीवनाची...

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 06/11/2013 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
नको ओढ ती रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची नको फार गुंता आता जीवनात नको अडकणे रे कुणात,कशात पुरे जाहले रोज झुरणे अवेळी पुरे जाहले आठवांचे उसासे तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे आता सावरू दे मनाला जरासे कधी बंध तुटले,कळलेच नाही मला तू,तुला मी उमगलेच नाही आता ओढ अश्रूंत वाहून गेली सुखाची मनाशी चुकामूक झाली गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे आता ना तमा रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची... © अदिती
लेखनविषय:

वाचने 5566
प्रतिक्रिया 28

प्रतिक्रिया

छान आशय. अजून जरा लक्ष दिले तर उत्तम भुजंगप्रयात वृत्तात बसू शकेल (मनाचे श्लोक ज्या फॉर्म मध्ये आहेत ते). आत्ताही कवितेतील अनेक ओळी सहजपणे वृत्तात आलेल्याच आहेत. शुभेच्छा :)

सुंदर..

In reply to by अत्रुप्त आत्मा

मलाही, म्हणूनच मी वर भुजंगप्रयातबद्दल म्हंटलंय. यशवंत देव यांनी स्वतः लिहिलेले आणि अर्थातच बाबुजींनी गायलेले हे गाणेही याच वृत्तात आहे.

सूड, राजेंद्र मेहेंदळे, अत्रुप्त आत्मा, मिसळलेला काव्यप्रेमी... खूप खूप धन्यवाद!! अमेय६३७७, धन्यवाद...! मी ही कविता (संदीप खरेच्या 'प्रिये ये निघोनी' या कवितेवरून इन्स्पायर होवून) मनाच्या श्लोकांच्या फॉर्ममध्येच लिहिण्याचा प्रयत्न केलाय.. त्याला 'भुजंगप्रात्यय वृत्त' म्हणतात हे माहित नव्हतं.. या फॉर्ममध्ये/वृत्तात अधिकाधिक अचूकपणे मीटर साधून लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन..:)

भुजंगप्रयात वृत्तात आहे. पढा है मेरी जा नजर से पढा है बता मेरे चेहेरे पे क्या क्या लिखा है... :)

आवडली

कविता आवडली.

>>>मला तू,तुला मी उमगलेच नाही छान. सुंदर गेय कविता. खरंच छान आहे. (थोडा पाचकळपणा: प्रेमभंग झालेल्या हिरॉईनला भणंगदशेत साडेपाच मिनिट दाखवल्यावर तिनं सावरत सावरत हे गाणं मागं बॅक्ग्राऊंड ला वाजतंय. आहाहा. ;) )

रचना आवडली! :)

आवडली कविता. -दिलीप बिरुटे

वाह..! क्षणांना उगा जाणीवांचे धपाटे! मस्त लिहिलंय.

कविता आवडली. मलाही 'धपाटे' शब्द बाकीच्या शब्दयोजनेशी विसंगत वाटला. जाता जाता : 'अम्ही चालवू हा पुढे वारसा' या गाण्याची आठवण आली. या चालीवरसुद्धा ही कविता बसवता येईल.

धन्यवाद ..........................................................