जपू एकट्याने घडी जीवनाची...
नको ओढ ती रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची
नको फार गुंता आता जीवनात
नको अडकणे रे कुणात,कशात
पुरे जाहले रोज झुरणे अवेळी
पुरे जाहले आठवांचे उसासे
तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे
आता सावरू दे मनाला जरासे
कधी बंध तुटले,कळलेच नाही
मला तू,तुला मी उमगलेच नाही
आता ओढ अश्रूंत वाहून गेली
सुखाची मनाशी चुकामूक झाली
गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे
क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे
आता ना तमा रे कुणाची,कशाची
जपू एकट्याने घडी जीवनाची...
© अदिती
लेखनविषय:
याद्या
5554
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
छान रचना
आवडली
सुरेख कविता
धन्यवाद
सुंदर..
वाचता वाचता एकदम, "प्रीया आज
येस्स आत्मा.
In reply to वाचता वाचता एकदम, "प्रीया आज by अत्रुप्त आत्मा
कविता आवडली
आवड्ले !!
सूड, राजेंद्र मेहेंदळे,
.
छान
छान
आवडली खूप कविता
धन्यवाद
कविता आवडली.
>>>मला तू,तुला मी उमगलेच नाही
छान !
छान लिहिलिय कविता.
सर्वांचे अगदी मनापासून आभार _
छान
छान
धन्यवाद
वाह..!
धन्यवाद
अफलातून! (मात्र 'धपाटे' शब्द
छान आहे.
धन्यवाद