✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साहित्यिक ख़ज़ीना

श
शुचि यांनी
Tue, 01/07/2014 - 07:47  ·  लेख
लेख
कवितांचा शोध घेता घेता, खरे पाहता एका सुर्हुदाच्या ओळखीतून पुढील खजीना सापडला. http://www.belvalkarhousing.com/ या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले. शांता शेळके , बोरकर , जी ए, अरुणा ढेरे अशा अनेकानेक नामवंत साहित्यिकांच्या कथा, कविता, ललीत असा ख़ज़ीनाच हाती लागला आहे. एक एक डाऊन लोड करत वाचत आहे. लहानपणी चिवड़ा लाडूचे बोकाणे भरत भरत वाचलेले साहित्य परत वाचावयास मिळते आहे. पुनर्वाचनाचा अत्यंत उच्च आनंद अनुभविण्यास मिळत आहे. आपणा सर्वाना तो लाभावा म्हणून , सर्वांबरोबर शेअर करावासा वाटला म्हणून हा धागाप्रपंच. मला जेवढे माहीत पडले, त्यावरून - श्रीयुत शरदचंद्र बेलवलकर यानी "विनामूल्य साहित्य उपलब्ध करून देण्याचा" हा प्रकल्प "बेलवलकर ग्रुप तर्फे" राबविला आहे. या साइटवर त्यांचे या प्रकल्पासंदर्भात धोरण वाचण्यात आले ते पुढीलप्रमाणे - Aise Akshare is an endevour of Belvalkar Housing to regenerate and promote interest in Marathi literature. The Marathi language has a rich literary history, and this is our humble effort to promote the rich Marathi culture.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
बातमी

प्रतिक्रिया द्या
6496 वाचन

💬 प्रतिसाद (37)

प्रतिक्रिया

खजिन्याची किल्ली

चित्रगुप्त
Tue, 01/07/2014 - 08:01 नवीन
खजिन्याची किल्ली दिलीत, पण कुलूप उघडून आतल्या खजिन्यापर्यंत कसे पोचायचे? दुवा उघडल्यावर मराठी साहित्य कुठे आहे, हे समजले नाही. तरी कळवावे.
  • Log in or register to post comments

चित्रगुप्त जी , त्या दुवयावर

शुचि
Tue, 01/07/2014 - 08:11 नवीन
चित्रगुप्त जी , त्या दुवयावर क्लिक केल्यावर जे पान उघड़ते त्या पानावर उजवीकडे , खालती पहा. ऐसी अक्षरे शब्द दिसतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

खुप धन्यवाद...

जोशी 'ले'
Tue, 01/07/2014 - 08:15 नवीन
खुप धन्यवाद...
  • Log in or register to post comments

माझ्या माहीतीप्रमाणे, २०१३

शुचि
Tue, 01/07/2014 - 08:38 नवीन
माझ्या माहीतीप्रमाणे, २०१३ मध्ये या मासिकाला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. मला तरी, थोर साहीत्यिकांचे साहीत्य समाजाला विनामूल्य उपलब्ध करुन देण्याची कल्पकता प्रचंड कौतुकास्पद अन सुसंस्कृत वाटली. सध्या माझं तेच चाललं आहे. अंक डाऊन्लोड करणे व एन्जोय करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जोशी 'ले'

मस्तच आहे.

कवितानागेश
Tue, 01/07/2014 - 09:56 नवीन
मस्तच आहे. :)
  • Log in or register to post comments

धन्यवाद

मुक्त विहारि
Tue, 01/07/2014 - 10:45 नवीन
वाचत आहे.
  • Log in or register to post comments

धन्स ग

स्पा
Tue, 01/07/2014 - 10:54 नवीन
बराच माल आहे ;) चला ट्रेन मध्ये भरपूर वाचायची सोय झाली
  • Log in or register to post comments

आणि त्यातले निवडक विचार

प्रचेतस
Tue, 01/07/2014 - 12:48 नवीन
आणि त्यातले निवडक विचार तुमच्या वॉलवर वाचायची पण सोय झाली. :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@ आणि त्यातले निवडक विचार

अत्रुप्त आत्मा
Tue, 01/07/2014 - 13:06 नवीन
@ आणि त्यातले निवडक विचार तुमच्या वॉलवर वाचायची पण सोय झाली >>> =)) दे मारा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

याची खरं तर काहीच गरज नव्हती

किसन शिंदे
Tue, 01/07/2014 - 16:07 नवीन
याची खरं तर काहीच गरज नव्हती इथे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काड्या

स्पा
Tue, 01/07/2014 - 16:17 नवीन
यालाच वल्लीच्या सातवाहन कालीन काड्या असे म्हणतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

छ्या....आजकाल प्रामाणिकपणे

प्रचेतस
Tue, 01/07/2014 - 16:22 नवीन
छ्या....आजकाल प्रामाणिकपणे प्रतिसाद द्यायची पण सोय राहिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

(No subject)

प्यारे१
Tue, 01/07/2014 - 16:24 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चूक. सातवाहन काळात काडीला

बॅटमॅन
Tue, 01/07/2014 - 17:18 नवीन
चूक. सातवाहन काळात काडीला "शलाका" किंवा "काट्टिका" असे म्हणायचे. नाणेघाटातील शिलालेख ज्या रूममध्ये आहे त्याच्या शेजारीच एक पुसला गेलेला शिलालेख आहे त्यात त्याचा उल्लेख असल्याचे एका पानशेतच्या पुरात वाहून गेलेल्या गाथासप्तशतीच्या पोथीत असल्याचं एका आता डिलीट केलेल्या पीडीएफमध्ये वाचल्याचं आठवतंय. बहुतेक ती गाथा अशी होती: "पिया जस्स मधुर केसरवर्णवरत्तिका बहुसो करस्स काट्टिका | लवणसिंचितो आतमना वल्लि ख्यातो दु-दु-रठ्ठिका ||" केसरवर्णवरत्तिका= यालाच पुढे जिलबी असेही म्हटल्या गेले. अर्थ असा: " जिलब्यांची आवड असलेला आणि बहुत काड्या करणारा वल्ली आत्म्याकडून लवणवर्षावाने सिंचित होत असून दु-दु-राष्ट्रिक अशा संज्ञेने ख्यात आहे."
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अरारा

स्पा
Tue, 01/07/2014 - 17:27 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

किञ्चितसा बदल करून मांडल्या

प्रचेतस
Tue, 01/07/2014 - 17:37 नवीन
=)) किञ्चितसा बदल करून मांडल्या गेली आहे. :) पिया जस्स मधुर केसरवण्णवरत्तिका बहुसो करस्स काट्टिका | लवणसिञ्चितो आतमना वल्लि ख्यातो दु-दु-रठ्ठिका ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

यातही काडी सारलीच का शेवटी

बॅटमॅन
Tue, 01/07/2014 - 17:43 नवीन
यातही काडी सारलीच का शेवटी =)) वल्लीचे नाव आता सातवाहन + रोमन फ्याशनमध्ये 'वल्लियस काट्टिकस' ठेवावे काय =)) बदलांबद्दल +१.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

Thanks to all of you too.

शुचि
Tue, 01/07/2014 - 10:57 नवीन
:) Thanks to all of you too.
  • Log in or register to post comments

खूप खूप धन्यवाद शुचितै !!!

खटपट्या
Tue, 01/07/2014 - 11:07 नवीन
खूप खूप धन्यवाद शुचितै !!! डाऊन लोड चालू केले आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

प्रभाकर पेठकर
Tue, 01/07/2014 - 11:07 नवीन
धन्यवाद शुची. नक्कीच पाहतो. आणि निवडक साहित्य उतरवूनही घेतो.
  • Log in or register to post comments

धन्यवाद ! मोठ्या खजिन्याची

डॉ सुहास म्हात्रे
Tue, 01/07/2014 - 12:26 नवीन
धन्यवाद ! मोठ्या खजिन्याची वाट दाखवलित !!
  • Log in or register to post comments

एक अंक सोडून सर्व डाऊन लोड

खटपट्या
Tue, 01/07/2014 - 12:29 नवीन
एक अंक सोडून सर्व डाऊन लोड झाले आहेत
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

vrushali n
Tue, 01/07/2014 - 13:54 नवीन
आभार..
  • Log in or register to post comments

मी देखील प्रतिसादान्बद्दल ,

शुचि
Tue, 01/07/2014 - 14:55 नवीन
मी देखील प्रतिसादान्बद्दल , सर्वांची आभारी आहे.
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

पैसा
Tue, 01/07/2014 - 15:07 नवीन
मस्त साईट आहे!
  • Log in or register to post comments

>>या साइट वरती "ऐसी अक्षरे"

मारकुटे
Tue, 01/07/2014 - 15:11 नवीन
>>या साइट वरती "ऐसी अक्षरे" नावाच्या नियतकालिकाचे काही अंक सापडले या नियतकालिकाची सध्याची स्थिती काय आहे? नेट वर पाहिले असता याच नावाची एक तद्दन रद्दड साईट सापडली.
  • Log in or register to post comments

छान लिंक शुचितै.

अभ्या..
Tue, 01/07/2014 - 15:37 नवीन
छान लिंक शुचितै. अवांतरः आलीस, मस्त. :)
  • Log in or register to post comments

लिंकबद्दल मंडळ आभारी आहे

किसन शिंदे
Tue, 01/07/2014 - 16:06 नवीन
लिंकबद्दल मंडळ आभारी आहे शुचिमामी. :)
  • Log in or register to post comments

मामी ??

खटपट्या
Tue, 01/07/2014 - 22:05 नवीन
मामी ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

आवडेश!

प्यारे१
Tue, 01/07/2014 - 16:15 नवीन
आवडेश! >>>सुर्हुदाच्या ... सुहृदाच्या?
  • Log in or register to post comments

kavitakosh.org var type Karun

शुचि
Tue, 01/07/2014 - 17:04 नवीन
kavitakosh.org var type Karun liheelay to shabd. I couldn't get "हृ"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

शुचीताय, धन्यवाद्स!

आदूबाळ
Tue, 01/07/2014 - 17:08 नवीन
शुचीताय, धन्यवाद्स! मला ईमेल द्या लिंक पाठवतो असं कायसं दिसतं आहे. सगळ्यांना हेच दिसतंय का डायरेक डालो मारता येतंय?
  • Log in or register to post comments

I forgot to mention - Name

शुचि
Tue, 01/07/2014 - 17:16 नवीन
I forgot to mention - Name/email is needed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

I mean mandatory.

शुचि
Tue, 01/07/2014 - 17:17 नवीन
I mean mandatory.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

अच्छा! धनवा...

आदूबाळ
Tue, 01/07/2014 - 17:26 नवीन
अच्छा! धनवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शुचि

यांना कॉपीराईट वगैरेचं टेन्शन

आदूबाळ
Tue, 01/07/2014 - 19:51 नवीन
यांना कॉपीराईट वगैरेचं टेन्शन नाही का?
  • Log in or register to post comments

वाह

चाणक्य
Fri, 01/10/2014 - 06:20 नवीन
आजच उतरवून बघतो. धन्यवाद या माहितीबद्द्ल
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा