साहित्य :
मैदा - १ कप
गव्हाचे पीठ - १/२ कप
बेसन - ४ चमचे
तांदुळाचे पीठ - ४ चमचे
तीळ - १ कप
किसलेले सुके खोबरे - १/२ कप
गुळ - १ कप
तुप - ४ चमचे
विलायची पावडर - १/२ चमचा
जायफळ पावडर - १/४ चमचा
मीठ - १ चिमटी
कृती :
१. गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व बेसन एकत्र चाळुन घ्यावे. ह्यात २ चमचे तुप गरम करुन घालावे व नीट मिक्स करावे. ह्यात थोडे थोडे पाणी टाकुन गोळा मळुन घ्यावा व झाकुन ठेवावा.
२. कढईत तीळ व खोबरे वेग वेगळे भाजुन घ्यावे. त्यानंतर २ चमचे तुप टाकुन २ चमचे बेसन खरपुस भाजावे.
३. हे सर्व एका भांड्यात गार करावे. ह्यात १ कप गुळ, विलायची पावडर व जायफळ पावडर टाकावी.
४. हे सारण एकत्र करुन एकदा मिक्सर मधे फिरवुन घ्यावे. त्यामुळे गुळ नीट बारीक होतो.
५. कण्केतला एक छोटा गोळा घ्यावा. ह्यात पुरणपोळीला जसे सारण भरतो, तसे हे सारण भरुन घ्यावे.
६. ह्याची हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी. ही पोळी लाटताना ती तांदुळाच्या पीठावर लाटावी. त्यामुळे ती खरपुस भाजली जाते व मस्त कडक होते.
७. पोळी भाजुन कागदावर काढुन घ्यावी व मग त्यावर तुप लावावे.
९. ही पोळी तशीच किंवा दुधा सोबत किंवा तुपासोबतही छान लागते.
१०. मी फोटो मधे तुपासोबत serve केली आहे आणि ग्लास मधे व्हॅनिला आईसक्रिम सोबत पोळीचे तुकडे करुन serve केली आहे.
१०. मी फोटो मधे तुपासोबत serve केली आहे आणि ग्लास मधे व्हॅनिला आईसक्रिम सोबत पोळीचे तुकडे करुन serve केली आहे.
वाचने
10260
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर
आवडली तिळाची पोळी..
अपुन तेरे डीश प्रेझेन्टेशन के
In reply to आवडली तिळाची पोळी.. by कौशी
मस्तच...
>>माझे काम केलेस . पक्षी,
In reply to मस्तच... by निवेदिता-ताई
>>माझे काम केलेस . >>>>पक्षी,
In reply to >>माझे काम केलेस . पक्षी, by अन्या दातार
कुणाच का कोंबड आरवेना ,
In reply to >>माझे काम केलेस . पक्षी, by अन्या दातार
पोळ्या सादर करण्याची अभिनव
छान
सादरीकरण आवडले.
सुंदर... हटके सादरीकरणामुळे
सगळ्यांचे धन्यवाद... मंडळ
या खेपेला थोडा आपेक्ष,
आहो पोळ्या काही चिक्की एवढ्या
In reply to या खेपेला थोडा आपेक्ष, by ५० फक्त
तुम्हि बरोबर आहात
In reply to आहो पोळ्या काही चिक्की एवढ्या by Mrunalini
माझ्यासाठी हा नवा प्रकार
माझ्यासाठी हा नवा प्रकार
In reply to माझ्यासाठी हा नवा प्रकार by गणपा
कल्पक प्रेझेंटेशन
क ला स!
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! in advance
बरं झालं हा धागा शोधलात ते.
मस्तच....
तुम्ही फोटो कसा काय टाकला?
इथे बघा राव...
In reply to तुम्ही फोटो कसा काय टाकला? by वासु