Skip to main content

तिळगुळाच्या पोळ्या

लेखक Mrunalini यांनी रविवार, 15/01/2012 03:48 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : मैदा - १ कप गव्हाचे पीठ - १/२ कप बेसन - ४ चमचे तांदुळाचे पीठ - ४ चमचे तीळ - १ कप किसलेले सुके खोबरे - १/२ कप गुळ - १ कप तुप - ४ चमचे विलायची पावडर - १/२ चमचा जायफळ पावडर - १/४ चमचा मीठ - १ चिमटी कृती : १. गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व बेसन एकत्र चाळुन घ्यावे. ह्यात २ चमचे तुप गरम करुन घालावे व नीट मिक्स करावे. ह्यात थोडे थोडे पाणी टाकुन गोळा मळुन घ्यावा व झाकुन ठेवावा. २. कढईत तीळ व खोबरे वेग वेगळे भाजुन घ्यावे. त्यानंतर २ चमचे तुप टाकुन २ चमचे बेसन खरपुस भाजावे. ३. हे सर्व एका भांड्यात गार करावे. ह्यात १ कप गुळ, विलायची पावडर व जायफळ पावडर टाकावी. ४. हे सारण एकत्र करुन एकदा मिक्सर मधे फिरवुन घ्यावे. त्यामुळे गुळ नीट बारीक होतो. ५. कण्केतला एक छोटा गोळा घ्यावा. ह्यात पुरणपोळीला जसे सारण भरतो, तसे हे सारण भरुन घ्यावे. ६. ह्याची हलक्या हाताने पोळी लाटुन घ्यावी. ही पोळी लाटताना ती तांदुळाच्या पीठावर लाटावी. त्यामुळे ती खरपुस भाजली जाते व मस्त कडक होते. ७. पोळी भाजुन कागदावर काढुन घ्यावी व मग त्यावर तुप लावावे. ९. ही पोळी तशीच किंवा दुधा सोबत किंवा तुपासोबतही छान लागते. gulpoli १०. मी फोटो मधे तुपासोबत serve केली आहे आणि ग्लास मधे व्हॅनिला आईसक्रिम सोबत पोळीचे तुकडे करुन serve केली आहे.

वाचने 10260
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

सुंदर सादरीकरण :) व्हॅनिला आईसक्रिम बरोबर सर्व्ह करण्याची कल्पना आवडली मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

In reply to by कौशी

अपुन तेरे डीश प्रेझेन्टेशन के fan हो गैले है ;) साधीच पाक्रु ,पण अफलातुन दिसते आहे प्रेझेन्टेशन मुळे :)

छान झाल्या आहेत ..... माझे काम केलेस ..मी आज देणार होते...गुळाच्या पोळ्या... मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!!

In reply to by निवेदिता-ताई

>>माझे काम केलेस . पक्षी, माझा भावी धागा हायजॅक केलास ;) असो. पाकृ नेहमीप्रमाणेच सुंदर वगैरे वगैरे....... ती व्हॅनिला आइस्क्रीमबरोबर सर्व्ह करण्याची ट्रिक आवडली. :)

In reply to by अन्या दातार

>>माझे काम केलेस . >>>>पक्षी, माझा भावी धागा हायजॅक केलास पुण्यात कुणी असं काही मत व्यक्त केलं की बाजार उठवला असं म्हणतात.

या खेपेला थोडा आक्षेप , तिळाच्या किंवा शेंगांच्या पोळ्या इतक्या कडक होइपर्यंत भाजत नाहीत, म्हणजे अगदी पुरणपोळी एवढ्या मउ नसल्या तरी अगदी चिक्की एवढ्या कडक सुद्धा नसतात. यावेळी पोळ्या खाण्यासाठी करण्यापेक्षा प्रेझेंटेशनसाठी केल्यासारख्या वाटल्या,चार चतकोर पिझ्झा कटरने कट केलेत काय अशी शंका आहे, कारण गुळाची पोळी हातानं चार चतकोर करताना एवढी परफेक्ट कधीच कापली जाणार नाही, एक शक्यता आहे, चिक्कीचा गुळ वापरलेला असेल तर हे थोडंसं शक्य आहे वरच्या कणकेला तुटायचं असतं पण आतला गुळ तुटु देत नाही , मग दोन्ही बाजुला थोडे थोडे तुकडे राहतात, अगदी घरं दुभंगताना होतं ना तसं, वरवरच्या व्यवहाराला तुटायचं असतं पण आतली माया सुटु देत नाही मग दोन्हीकडं तुकडे उरतात तसं. आणि दुसरं, गुळ आणि व्हॅनिला हे कॉम्बीनेशन पटलं नाही. गुळाची एक एक्स्ट्रिम गोड चव आहे अन व्हेनिलाची मैं इधर जाउं या उधर जाउं टाइपची कन्फुजड टेस्ट असते, त्यामुळं आइस्क्रिम सोबत बिस्किट असणं पटतं पण गुळाची पोळी नॉट पटेश.

In reply to by ५० फक्त

आहो पोळ्या काही चिक्की एवढ्या कडक नाही आहेत. ते खरपुस म्हणतात ना, तेवढी कडक आहे. हो, पोळ्या मी सुरीने कापल्या आहेत presentation साठी. आणि ते icecream सोबत फोटो, ते पण presentation साठी. मला स्वतःला पोळी नुसतीच खायला आवडते. त्या सोबत तुप पण लागत नाही आणि दुध पण नाही. :)

In reply to by Mrunalini

तुम्हि बरोबर आहात म्रुणालिनी.... पोळ्या छान झाल्या आहेत्,आणि छान दिसत आहेत.माझी आई खुप छान करायची त्या आठ्वणी जाग्या झाल्या. धन्यवाद.

In reply to by गणपा

माझ्यासाठी हा नवा प्रकार आहे. आ..ऑ..ऐकुन आश्चर्य वाट्ले . गण्पा शेठ तुम्हाला गुळाची पोळी नविन आहे ..? कि व्हैनिला आइस्क्रिम नविन आहे..?

कल्पक प्रेझेंटेशन मस्तच.. तिळगुळाची आणि गुळ-शेंगदाण्याची पोळी हा आपला वुईक पॉईंट आहे. :)

सुपर...... से उपर......!!!! *GOOD* *THUMBS UP* तिळगुळाच्या पोळ्या आवडल्यात. ह्या वर्षी काही तरी नवीन होऊन जाऊ द्या! मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ! in advance धन्यवाद आपला लाडका: आयुर्हीत

छान आहे मेन्यू.. तोंपासु...